व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

दानीएलाचे भविष्यसूचक दिवस आणि आमचा विश्‍वास

दानीएलाचे भविष्यसूचक दिवस आणि आमचा विश्‍वास

दानीएलाचे भविष्यसूचक दिवस आणि आमचा विश्‍वास

“जो वाट पाहील आणि त्या एक हजार तीनशे पस्तीस दिवसांत पोहचेल तो धन्य आहे!” —दानीएल १२:१२, न्यूव.

१. खरी धन्यता प्राप्त करण्यासाठी अनेकांना अपयश का येत आहे व खऱ्‍या धन्यतेचा मेळ कशासोबत आहे?

 आपण धन्य असावे असे प्रत्येकाला वाटते. तथापि, आज फार कमी लोकांना धन्यता वाटते. का बरे? थोडक्यात सांगावयाचे तर, अनेकजण चुकीच्या दिशेने आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतात. शिक्षण, संपत्ती, व्यवसाय किंवा अधिकार चालविताना आनंदप्राप्तीचा शोध केला जातो. तथापि, येशूने डोंगरावरील त्याच्या प्रवचनाच्या सुरवातीस, आध्यात्मिक गरजांची जाणीव, दया, हृदयातील शुद्धता आणि यासारख्याच गुणांसोबत आनंदाचा मेळ घातला. (मत्तय ५:३-१०) येशूने सांगितलेला आनंद अस्सल आणि टिकणारा आहे.

२. भविष्यवाणी केल्याप्रमाणे, अंताच्या काळात आनंदाप्रत काय निरवील, आणि या संबंधाने कोणते प्रश्‍न उद्‌भवतात?

अंत समयात, अभिषिक्‍त शेषांकरता आनंदाचा संबंध अधिक काही गोष्टींच्याबाबतीत आहे. दानीएलाच्या पुस्तकात आम्ही वाचतो: “हे दानीएला, तू आपला स्वस्थ राहा, कारण अंतसमयापर्यंत ही वचने गुप्त ठेवून ती मुद्रित केली आहेत. जो वाट पाहील आणि त्या एक हजार तीनशे पस्तीस दिवसांत पोहचेल तो धन्य आहे.!” (दानीएल १२:९, १२, न्यूव.) हे १,३३५ दिवस, कोणता समय पूर्ण करतात? त्या काळात राहात असलेले धन्य का होते? आज याचा संबंध आमच्या विश्‍वासासोबत काही आहे का? इस्राएली लोक बाबेलच्या बंधनातून मुक्‍त झाल्यानंतर, तसेच पारसाचा राजा कोरेशच्या कारकिर्दीच्या तिसऱ्‍या वर्षात लागलेच दानीएलाने लिहिलेल्या या शब्दांकडे आम्ही लक्ष दिल्यास, या प्रश्‍नांची उत्तरे मिळण्यास आम्हाला मदत होऊ शकते.—दानीएल १०:१.

पुनर्स्थापना आनंद आणते

३. कोरेश राजाने, इ.स.पूर्व ५३७ मध्ये केलेल्या कोणत्या कृत्याने विश्‍वासू यहुद्यांना मोठा आनंद मिळाला, परंतु कोरेशने यहुद्यांना कोणता विशेषाधिकार दिला नाही?

बाबेलातून सुटका, यहुद्यांसाठी खऱ्‍या अत्यानंदाचा प्रसंग होता. जवळजवळ ७० वर्षे बाबेलच्या बंधनात राहिल्यावर, यरूशलेमास जाऊन यहोवाच्या मंदिराची पुनर्बांधणी करण्यासाठी थोर कोरेशने त्यांना आमंत्रण दिले. (एज्रा १:१, २) ज्यांनी प्रतिसाद दिला, ते मोठ्या आशेने इ.स.पूर्व ५३७ मध्ये त्यांच्या मायदेशी परतले. तथापि, कोरेशने त्यांना दावीद राजाच्या वंशजाकडून राज्याची पुन्हा सुरवात करण्याचे निमंत्रण दिले नाही.

४, ५. (अ) दाविदाच्या राज्याधिकाराला कधी उलथून पाडण्यात आले? व का? (ब) दाविदाच्या राज्याधिकाराला पुनर्स्थापिले जाईल याविषयी यहोवाने कोणती हमी दिली?

ते अभुतपूर्व होते. पाच शतकांआधी यहोवाने दाविदाला अभिवचन दिले होते की: “तुझे घर [घराणे] व तुझे राज्य सर्वकाळ स्थापित केले जाईल तुझे राजासन सर्वकाल स्थापित होईल.” (२ शमुवेल ७:१६, पंडिता रमाबाई भाषांतर) दुःखाची गोष्ट म्हणजे, दाविदाच्या राजघराण्यातील बहुतेकांनी बंडखोर प्रवृत्ती दाखवली, आणि राष्ट्राचा रक्‍तपात इतका अधिक झाला की, ज्यामुळे इ.स.पूर्व ६०७ मध्ये यहोवाने दाविदाची राजसत्ता उलथून टाकली. यरूशलेम मेकाबीज्‌च्या काही काळ अधीन राहिल्यावर, तेव्हापासून इ.स. ७० पर्यंत ते विदेशी अधिपत्याखाली देखील आले. अशारितीने, इ.स.पूर्व ५३७ मध्ये, ‘राष्ट्रांचे नियुक्‍त काळ’ चालू असताना, दाविदाचा एकही पुत्र राजा या नात्याने राज्याधिकार करणार नव्हता.—लूक २१:२४, न्यूव.

तरीसुद्धा, यहोवा दाविदाला दिलेले अभिवचन विसरला नाही. दृष्टांत, व स्वप्नांच्या मालिकांकरवी, त्याने त्याचा संदेष्टा दानीएल याच्याद्वारे बाबेलच्या जागतिक वर्चस्वाच्या काळापासून ते दाविदाच्या वंशातील राजा पुन्हा एकदा यहोवाच्या लोकांवर राज्य करुपर्यंतच्या काळाबद्दल शतकांच्या अवधीत होणाऱ्‍या जागतिक घटनांची सविस्तर माहिती प्रगट केली. दानीएलाच्या २, ७, ८ आणि १०-१२ अध्यायात नमूद केलेल्या या भविष्यवाण्या, दावीदाचे राजासन सरतेशेवटी वास्तविकपणे “सर्वकाळ स्थापित” केले जाईल याची विश्‍वासू यहुद्यांना हमी देतात. निश्‍चितच, इ.स.पूर्व ५३७ मध्ये त्यांच्या मायदेशी परतलेल्या यहुद्यांना, प्रकट केलेल्या या सत्यामुळे आनंद मिळाला!

६. आमच्या काळात दानिएलाच्या काही भविष्यवाण्यांची पूर्णता होईल हे आम्हाला कसे कळते?

पवित्र शास्त्राचे अनेक भाष्यकार दावा करतात की, दानिएलाच्या भविष्यवाण्यांची पूर्णता येशूच्या जन्माच्या आधीच पूर्णपणे झाली आहे. परंतु ही गोष्ट खरी नव्हे. दानीएल १२:४ मध्ये देवदूत दानिएलाला सांगतो: “अंतसमयापर्यंत ही वचने गुप्त ठेव व हे पुस्तक मुद्रित करून ठेव. पुष्कळ लोक धुंडाळीत फिरतील व ज्ञानवृद्धी होईल.” दानिएलाच्या पुस्तकाचे अनावरण केवळ अंतसमयात होणार होते, म्हणजे त्याच्या अर्थाचे पूर्णपणे प्रकटीकरण होणार होते, तर त्याच्या काही भविष्यवाण्यांचा अवलंब त्या काळासाठी निश्‍चितपणे लागू झाला पाहिजे.—पाहा दानीएल २:२८; ८:१७; १०:१४.

७. (अ) राष्ट्रांच्या नियुक्‍त काळांचा अंत कधी झाला, आणि तद्‌नंतर कोणत्या महत्त्वाच्या प्रश्‍नाला उत्तर द्यावयाचे होते? (ब) कोण “विश्‍वासू व बुद्धिमान दास” नव्हते?

राष्ट्रांच्या नियुक्‍त काळांची समाप्ती १९१४ मध्ये होऊन, या जगाच्या अंताच्या काळाची सुरवात झाली. दाविदाच्या राज्याची पुनर्स्थापना, पार्थिव यरूशलेममध्ये नव्हे, तर ती अदृश्‍य रूपाने “आकाशातील मेघा”त झाली. (दानीएल ७:१३, १४) त्या काळात, बनावट ख्रिस्ती धर्माचे “निदण” उत्कर्ष पावत असल्यामुळे, निदानपक्षी मानवांच्या नजरेत तरी खऱ्‍या ख्रिस्ती धर्माची ओळख स्पष्ट झाली नव्हती. असे असले तरी, “विश्‍वासू व बुद्धिमान दास कोण आहे?” या महत्त्वपूर्ण प्रश्‍नाचे उत्तर मिळण्यास हवे होते. (मत्तय १३:२४-३०; २४:४५, पंडिता रमाबाई भाषांतर) या पृथ्वीवर दाविदाच्या राज्याची पुनर्स्थापना करण्याचे प्रतिनिधीत्त्व कोण करणार होते? दानिएलाचे दैहिक बांधव यहुदी करणार नव्हते. विश्‍वासाच्या अभावामुळे व मशीहावर अडखळून पडल्याने, त्यांना नाकारले गेले. (रोमकर ९:३१-३३) ख्रिस्ती धर्मराज्याच्या संस्थांमध्ये विश्‍वासू दास कोणत्याही प्रकारे सापडला नाही! त्यांच्या [ख्रिस्ती धर्मराज्य] दुष्ट कामाने येशू त्यांना ओळखत नसल्याचे शाबीत केले. (मत्तय ७:२१-२३) मग ते कोण होते?

८. अंत समयाच्या काळात “विश्‍वासू व बुद्धिमान दास” या नात्याने स्वतःला कोणी शाबीत केले? हे आम्हाला कसे कळते?

कोणतीही शंका न बाळगता, येशूच्या अभिषिक्‍त बांधवांचे मिळून बनलेले एक लहान मंडळ, १९१४ मध्ये पवित्र शास्त्र विद्यार्थी या नावाने परिचित होते पण नंतर १९३१ मध्ये त्याला यहोवाचे साक्षीदार असे ओळखले गेले. (यशया ४३:१०) केवळ त्यांनीच दाविदाच्या वंशातून आलेल्या पुनर्स्थापित राज्याची घोषणा केली. (मत्तय २४:१४) केवळ तेच जगापासून अलिप्त राहिले आणि त्यांनी यहोवाच्या नावाची स्तुती केली. (योहान १७:६, १४) केवळ त्यांच्याच बाबतीत, शेवटल्या काळातील देवाच्या लोकांसंबंधी केलेल्या पवित्र शास्त्रातील भविष्यावाण्यांची पूर्णता झाली. ह्‍या भविष्यवाण्यांमध्ये, दानिएलाच्या १२ व्या अध्यायात भविष्यसूचक काळांच्या मालिकांची यादी दिलेली आहे, ज्यात आनंद आणणाऱ्‍या १,३३५ दिवसांचा देखील समावेश होतो.

ते १,२६० दिवस

९, १०. दानीएल ७:२५ च्या “एक समय, दोन समय आणि अर्धा समया”ला कोणत्या घटना विशेष स्पष्ट करतात, आणि इतर कोणत्या शास्त्रवचनात समांतर काळाविषयी उल्लेख केला आहे?

दानीएल १२:७, मध्ये आम्ही पहिल्या भविष्यसूचक काळाबद्दल वाचतो: “एक समय, दोन समय व अर्धा समय एवढा अवधी आहे. पवित्र प्रजेच्या बलाचा चुराडा करण्याचे संपेल तेव्हा ह्‍या सर्व गोष्टी पुऱ्‍या होतील.” * याच काळाबद्दल प्रकटीकरण ११:३-६ मध्ये उल्लेख केलेला आहे, ते म्हणते की, देवाचे साक्षीदार तरट पांघरून साडे तीन काळ प्रचार करतील आणि नंतर त्यांना जिवे मारतील. पुन्हा दानीएल ७:२५ मध्ये आपण वाचतो, “तो परात्पर देवाविरूद्ध गोष्टी बोलेल आणि परात्पर देवाच्या पवित्र जनांस जेर करील, तो नेमलेल्या सणात व घालून दिलेल्या शिस्तीत बदल करावयास पाहील एक काळ, दोन काळ व अर्धा काळपर्यंत ते त्याच्या कबजात राहतील.”

१० नंतरच्या या भविष्यवाणीत, “ते” म्हटलेले, बाबेलपासून मोजणी केल्यावर पाचवे जागतिक साम्राज्य आहे. ते “एक लहानशे शिंग” आहे, त्याच्या अधिपत्याच्या काळात मानव पुत्राला “प्रभुत्त्व, वैभव व राज्य” मिळते. (दानीएल ७:८, १४) आरंभीला हे लाक्षणिक शिंग ब्रिटनचे साम्राज्य होते, ज्याची वाढ पहिल्या महायुद्धाच्या काळात अँग्लो अमेरिकन द्वैत जागतिक साम्राज्यात झाली, व आता अमेरिका त्यावर सत्ता गाजवत आहे. साडे तीन काळासाठी किंवा वर्षांसाठी ही सत्ता, पवित्र जनांना जेरीस आणील आणि काळ व कायदा बदलण्याचा प्रयत्न करील. शेवटी, पवित्र जनांना त्याच्या हाती देण्यात येईल.—प्रकटीकरण १३:५, ७ हेही पाहा.

११, १२. कोणत्या घटनेने १,२६० च्या भविष्यसूचक दिवसांच्या सुरवातीपर्यंत निरवले?

११ या समांतर असणाऱ्‍या भविष्यवाण्यांची पूर्णता कशी झाली? पहिल्या महायुद्धाच्या पुष्कळ वर्षाआधी, १९१४ हे वर्ष, राष्ट्रांच्या नियुक्‍त काळांची समाप्ती पाहील याविषयी येशूच्या अभिषिक्‍त बांधवांनी जाहीरपणे इशारा दिला. युद्ध सुरू झाले तेव्हा दिलेल्या इशाऱ्‍याकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट दिसत होते. सैतानाने, देवाचे राज्य शासन करण्याच्या काळाला लांबणीवर टाकण्यासाठी, “नेमलेल्या सणात व घालून दिलेल्या शिस्तीत बदल” करण्याच्या प्रयत्नात, तेव्हा प्रभुत्त्व गाजविणाऱ्‍या ब्रिटिश साम्राज्याचा, “श्‍वापद,” म्हणजे जगाच्या राजकीय संस्थेचा वापर केला. (प्रकटीकरण १३:१, २) सैतान अपयशी झाला. देवाचे राज्य स्वर्गात, मानवाच्या आवाक्याबाहेर स्थापित झाले.—प्रकटीकरण १२:१-३.

१२ पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांकरता, युद्ध, परीक्षेचा काळ ठरला. जानेवारी १९१४ पासून ते दानिएलाच्या भविष्यवाण्यांवर लक्ष केंद्रित करणारे फोटो ड्रामा ऑफ क्रिएशन याची पवित्र शास्त्रीय सादरता दाखवत होते. त्या वर्षाच्या उन्हाळ्यात उत्तर गोलार्धात युद्ध पेटले. ऑक्टोबरमध्ये नेमलेल्या काळांची समाप्ती झाली. वर्षाच्या शेवटी, अभिषिक्‍त जन छळाची अपेक्षा करीत होते, ही वास्तविकता आम्हाला, १९१५ मध्ये त्यांनी निवडलेले वार्षिक वचन, मत्तय २०:२२, ज्यात येशू त्याच्या शिष्यांना प्रश्‍न करतो की, “माझा प्याला तुम्हाला पिता येईल का?” यावरून दिसते.

१३. पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांनी कशारितीने १,२६० दिवसांच्या दरम्यान तरट पांघरून प्रचार केला, आणि त्या काळाच्या अंतास काय घडले?

१३ याप्रकारे, डिसेंबर १९१४ पासून साक्षीदारांच्या या लहान गटाने ‘तरट पांघरूण प्रचार’ केला, यहोवाच्या न्यायदंडाची घोषणा करताना नम्रपणे ते टिकून राहिले. वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीचे पहिले अध्यक्ष सी. टी. रसेल यांचा १९१६ मध्ये मृत्यू झाला तेव्हा कित्येकांना धक्काच बसला होता. युद्ध सर्वत्र पसरले तेव्हा साक्षीदारांना अनेक विरोधाला सामोरे जावे लागले. काहींना तुरुंगात बंद केले. अधिक क्रुर असलेल्या अधिकाऱ्‍यांनी इंग्लंड मधील फ्रँक प्लॅट आणि कॅनडातील रॉबर्ट क्लेग्‌ अशा काही वैयक्‍तिकांना पीडिले. शेवटी जून २१, १९१८ मध्ये वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीचे नवे अध्यक्ष जे. एफ. रदरफोर्ड आणि प्रमुख अधिकाऱ्‍यांवर खोटा आरोप लावून त्यांना दीर्घ काळासाठी तुरूंगात डांबण्यात आले. अशाप्रकारे, भविष्यसूचक काळाच्या अंतात, ‘लहानशा शिंगाने’ संघटित असलेल्या जाहीर प्रचारकार्याचा अंत केला.—दानीएल ७:८.

१४. अभिषिक्‍त शेषांसाठी १९१९ मध्ये व त्यानंतर कशाप्रकारे गोष्टींमध्ये बदल झाला?

१४ प्रकटीकरणाचे पुस्तक पुढे घडलेल्या गोष्टींचे भाकीत करते. अल्पावधीच्या अक्रियाक स्थितीनंतर, साडे तीन दिवस रस्त्यावर मृत स्थितीत असण्याचे भाकीत केल्यानंतर, अभिषिक्‍त जन जिवंत झाले आणि पुन्हा क्रियाशील झाले. (प्रकटीकरण ११:११-१३) मार्च २६, १९१९ मध्ये वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीचे अध्यक्ष आणि प्रमुख अधिकाऱ्‍यांना तुरुंगातून सोडण्यात आले व नंतर त्यांच्यावर केलेल्या खोट्या आरोपातून ते पूर्णपणे दोषमुक्‍त झाले. अभिषिक्‍त शेषांची सुटका झाल्यानंतर लगेच, पुढील कार्याची पुन्हा व्यवस्था करण्यासाठी त्यांनी सुरवात केली. यास्तव प्रकटीकरणातील पहिल्या अनर्थाच्या पूर्णतेत, ते अक्रियाक स्थितीच्या अगाधकुपातून आध्यात्मिक टोळासारखे धुराबरोबर बाहेर आले आणि खोट्या धर्मासाठी असलेले अंधकारमय भवितव्य त्यांनी भाकीत केले. (प्रकटीकरण ९:१-११) पुढील काही वर्षांच्या दरम्यान त्यांचे आध्यात्मिकतेत भरणपोषण झाले आणि त्यांनी भवितव्यात राखलेल्या गोष्टींसाठी तयारी केली. नवोदितांना आणि मुलांना पवित्र शास्त्राचे मूलभूत सत्य शिकण्यासाठी, १९२१ मध्ये त्यांनी देवाचे तंतुवाद्य [इंग्रजी] हे पुस्तक प्रकाशित केले. (प्रकटीकरण १२:६, १४) या परिच्छेदात चर्चा केलेल्या सर्व गोष्टी एका अभुतपूर्व काळादरम्यान घडल्या.

ते १,२९० दिवस

१५. कशारितीने आम्ही १,२९० दिवसांच्या सुरवातीची मोजणी करू शकतो? या समयाचा अंत कधी झाला?

१५ देवदूताने दानीएलास म्हटले: “नित्याचे बलिहवन बंद होईल व विध्वंसमूलक अमंगलाची स्थापना होईल. तेव्हापासून एक हजार दोनशे नव्वद दिवस लोटतील.” (दानीएल १२:११) मोशेच्या नियमशास्त्रात, “नित्याचे बलिहवन” यरूशलेम मंदिराच्या वेदीवर केले जात असे. ख्रिश्‍चन होमार्पणे करीत नाहीत, परंतु ते आध्यात्मिकरूपात नित्याचे बलिहवन करतात. पौलाने याचा उल्लेख असे म्हणून केला: “त्याचे नाव पत्करणाऱ्‍या ओठाचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण त्याच्याद्वारे देवाला नित्य अर्पण करावा.” (इब्रीयांस १३:१५; पडताळा होशेय १४:२.) नित्याची अर्पणे जून १९१८ मध्ये बंद झाली. तर मग, पाहण्यासारखे दुसरे चिन्ह, “अमंगळ गोष्ट” कोणते होते? पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीस विजय मिळवलेल्या सत्तांनी उद्युक्‍त केलेले ते लिग ऑफ नेशन्स्‌ होते. * ती अमंगळ गोष्ट होती, कारण ख्रिस्ती धर्मराज्याच्या नेत्यांनी लिगला मानवजातीसाठी असलेली एकमेव आशा म्हणून देवाच्या राज्याच्या जागी ठेवून तिला सूचित केले. जानेवारी १९१९ मध्ये लिगची योजना केली होती. त्या काळापासून आम्ही १,२९० दिवसांची (तीन वर्षे, सात महिने) मोजणी केल्यास, सप्टेंबर १९२२ मध्ये आम्ही येतो.

१६. अभिषिक्‍त शेष त्या १,२९० दिवसांच्या अंतास, कार्य करण्यासाठी तयार होते हे कसे उघड झाले?

१६ मग काय घडले? आता पवित्र शास्त्र विद्यार्थी मोठ्या बाबेलपासून मुक्‍त झाल्यामुळे, त्यांना तजेला मिळाला होता, आणि कार्य करण्यास ते तयार होते. (प्रकटीकरण १८:४) सीडर पाँइट, ओहायो, अमेरिकेत सप्टेंबर १९२२ मध्ये भरलेल्या अधिवेशनात, ख्रिस्ती धर्मराज्यावर देवाच्या न्यायदंडाची त्यांनी निडरपणे घोषणा करण्यास सुरवात केली. (प्रकटीकरण ८:७-१२) टोळांच्या शेपटीने डंक मारण्यास खरेपणाने सुरवात केली! त्यापेक्षा अधिक म्हणजे प्रकटीकरणातील दुसऱ्‍या अनर्थाची सुरवात झाली. प्रथम अभिषिक्‍त जन व त्यांच्यासोबत एकत्र आलेला व वाढलेला मोठा लोकसमुदाय, ख्रिश्‍चन घोडदळाची पृथ्वीभर लाट उसळली. (प्रकटीकरण ७:९; ९:१३-१९) होय, १,२९० दिवसांच्या अंताने देवाच्या लोकांना आनंद दिला. * परंतु आणखी काही बाकी होते.

ते १,३३५ दिवस

१७. त्या १,३३५ दिवसांची सुरवात व अंत कधी झाला?

१७ दानीएल १२:१२ म्हणते: “जो वाट पाहील आणि त्या एक हजार तीनशे पस्तीस दिवसांत पोहचेल तो धन्य आहे.!” हे १,३३५ दिवस किंवा तीन वर्षे आणि साडे आठ महिन्यांची सुरवात, उपलब्ध असलेल्या पुराव्याच्या आधारावरून आधीच्या काळाच्या समाप्तीपासून झाली. सप्टेंबर १९२२ पासून त्याची मोजणी केल्यास, ते आम्हाला १९२६ च्या वसंत ऋतुच्या उत्तरार्धात आणते. त्या १,३३५ दिवसांमध्ये काय घडले?

१८. कोणत्या वास्तविकता प्रकट करतात की १९२२ मध्ये आणखी प्रगती करावयाची होती?

१८ एकोणिसशे बावीस मध्ये घडलेल्या घटनेचे लक्षणीय स्वरुप असले तरी, काही जन गत काळाकडे अजूनही उत्कट इच्छेने पाहत होते हे स्पष्ट दिसते. सी. टी. रसेल यांनी लिहिलेले शास्त्रवचनावर अभ्यास [इंग्रजी] अजूनही अभ्यासाचे मूळ साहित्य होते. शिवाय, पृथ्वीची नंदनवनात पुनर्स्थापना करण्याचा तसेच गत काळातील विश्‍वासू मनुष्यांचे पुनरूत्थान करण्याच्या पूर्णतेस सुरवात झाली, हा दृष्टिकोन १९२५ मध्ये, लाखो जिवंत असलेले कधीही मरणार नाहीत [इंग्रजी] या विस्तृतपणे वाटप केलेल्या पुस्तिकेत सादर केला. अभिषिक्‍तांचा धीर पूर्ण होत असल्याचे दिसत होते. तरीसुद्धा, पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांसोबत असलेल्या काहींना इतरांबरोबर सुवार्तेची सहभागिता करण्याची जरूरी आहे असे वाटले नाही.

१९, २०. (अ) त्या १,३३५ दिवसांच्या दरम्यान देवाच्या लोकांकरता अनेक गोष्टीत कशारितीने बदल झाला? (ब) कोणत्या घटनेने १,३३५ दिवसांच्या काळाच्या अंताला चिन्हित केले, आणि यहोवाच्या लोकांबद्दल त्यांनी काय सूचित केले?

१९ त्या १,३३५ दिवसांची जशी प्रगती होत गेली, तसा या सर्वात बदल झाला. बांधवांना दृढ करण्यासाठी, टेहळणी बुरूज [इंग्रजी] मासिकाच्या नियमित अभ्यासाच्या समुहाला संघटित केले गेले. क्षेत्रकार्यावर जोर दिला गेला. मे, १९२३ मध्ये सुरवात होऊन, प्रत्येक महिन्यातील पहिल्या मंगळवारी, क्षेत्रसेवेसाठी सर्वांना निमंत्रण दिले गेले, आणि या कामात त्यांना उत्तेजन देण्यासाठी आठवड्याच्या मध्यात मंडळीच्या सभांसाठी वेळ बाजूला ठेवला गेला. ऑगस्ट, १९२३ मध्ये, अमेरिकेतील कॅलिफोर्निया, लॉस एंजिल्स येथील अधिवेशनात, येशूच्या दृष्टांतातील मेंढरे आणि शेरडे यांची पूर्णता हजार वर्षाच्या कारकीर्दी आधी होईल हे दाखवले गेले. (मत्तय २५:३१-४०) हवेतील ध्वनी लहरीमार्फत सुवार्तेचे प्रसारण करण्यासाठी १९२४ मध्ये डब्ल्यूबीबीआर या रेडिओ स्टेशनाचा आरंभ झाला. मार्च १, १९२५ च्या टेहळणी बुरूज [इंग्रजी] मधील “बर्थ ऑफ द नेशन्स्‌” या लेखाने प्रकटीकरणाच्या १२ व्या अध्यायातील सुधारणेची समज दिली. अखेरीस, विश्‍वासू ख्रिश्‍चन १९१४-१९ मधील गोंधळाच्या घटना खऱ्‍या अर्थाने समजू शकले.

२० वर्ष १९२५ त्याच्या समाप्तीस पोहोचले, परंतु अंत अजून आला नव्हता! पवित्र शास्त्र विद्यार्थी, १८७० पासूनच, प्रथम १९१४ व नंतर १९२५ ही तारीख लक्षात ठेवून सेवा करत होते. आता, जोवर यहोवाची इच्छा आहे तोवर त्यांनी सेवा केली पाहिजे हे त्यांना समजले. जानेवारी १, १९२६ च्या द वॉचटावर मधील “यहोवाचा आदर कोण करील?” या कलाटणी देणाऱ्‍या महत्त्वाच्या लेखाने, देवाच्या नावाचे महत्त्व पूर्वीपेक्षा अधिक स्पष्ट केले. आणि शेवटी, मे १९२६ मध्ये, इंग्लंड, लंडन येथील अधिवेशनात “ए टेस्टमनी टू द रूलर्स ऑफ द वर्ल्ड” या नावाचा ठराव संमत केला गेला. याने देवाच्या राज्याचे सत्य आणि सैतानाच्या जगावर येणाऱ्‍या नाशाबद्दल थेटपणे घोषणा केली. त्याच अधिवेशनात, मुक्‍तता [इंग्रजी] हे अत्यंत प्रभावी पुस्तक प्रसिद्ध झाले, व शास्त्रवचनांवर अभ्यास [इंग्रजी] याच्या ऐवजी मालिकेत ते प्रथम ठरले. देवाचे लोक आता मागे पाहण्याऐवजी पुढे पाहत होते. त्या १,३३५ दिवसांची समाप्ती झाली होती.

२१. देवाच्या लोकांसाठी तेव्हा १,३३५ दिवसांच्या काळात टिकून राहण्याचा अर्थ काय होत होता, आणि या काळात पूर्ण होणाऱ्‍या भविष्यवाणीचा आमच्यासाठी काय अर्थ होतो?

२१ काही लोक ह्‍या बदलाचा स्वीकार करण्यास तयार नव्हते, परंतु जे टिकून राहिले ते खरे धन्य होते. शिवाय, आम्ही या भविष्यसूचक काळाच्या पूर्णतेसाठी अवलोकन करतो तेव्हा, अभिषिक्‍त जणांचे त्या काळात राहिलेले लहान मंडळ खरोखर विश्‍वासू आणि बुद्धिमान दास आहेत, यावर आमचा भरवसा दृढ झाल्यामुळे आम्ही देखील धन्य आहोत. त्या वर्षांपासून, मग यहोवाच्या संस्थेत विस्तृत प्रमाणात वाढ झाली, परंतु विश्‍वासू आणि बुद्धिमान दास त्याच्या अजूनही केंद्रस्थानी, मार्गदर्शन करीत आहेत. तर मग, अभिषिक्‍त आणि इतर मेंढरांसाठी आणखी आनंद ठेवलेला आहे हे जाणणे किती शिरशिरी भरविणारे आहे बरे! दानिएलाच्या दुसऱ्‍या भविष्यवाण्यांचा विचार करताना आम्हाला हे दिसून येईल.

[तळटीपा]

^ या भविष्यसूचक काळांची मोजणी कशी करावी यासाठी वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीने प्रकाशित केलेल्या आमचे येणारे जागतिक सरकार—देवाचे राज्य (इंग्रजी) या पुस्तकातील अध्याय ८ पाहा.

^ एप्रिल १, १९८६, टेहळणी बुरूज अंकाची १३-२३ पृष्ठे पाहा.

^ एप्रिल १, १९९१ च्या टेहळणी बुरूजची पृष्ठे २१, २२ पाहा, आणि यहोवाच्या साक्षीदारांचे १९७५ चे वार्षिक पुस्तक [इंग्रजी] यामधील १३२ पृष्ठ पाहा.

तुम्ही स्पष्ट करू शकता का?

▫ दानिएलाच्या पुस्तकातील काही भविष्यवाण्यांची आमच्या काळात पूर्णता होणार असल्याचे आम्हाला कसे समजते?

▫ “विश्‍वासू व बुद्धिमान दास,” हा अभिषिक्‍त शेष आहे याविषयीची खात्री आम्ही का बाळगू शकतो?

▫ त्या १,२६० दिवसांची सुरवात आणि त्यांचा अंत कधी झाला?

▫ अभिषिक्‍त शेषांना त्या १,२९० दिवसांनी तजेला आणि पुनर्स्थापना कशी घडवून आणली?

▫ त्या १,३३५ दिवसांत शेवटपर्यंत टिकून राहणारे का धन्य होते?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१० पानांवरील चौकट]

दानिएलाचे भविष्यसूचक समय

१,२६० दिवस:

डिसेंबर १९१४ ते जून १९१८

१,२९० दिवस:

जानेवारी १९१९ ते सप्टेंबर १९२२

१,३३५ दिवस:

सप्टेंबर १९२२ ते मे १९२६

[७ पानांवरील चित्रं]

“विश्‍वासू व बुद्धिमान दास,” अभिषिक्‍त शेष आहेत हे १९१९ पासून स्पष्ट झाले

[९ पानांवरील चित्रं]

स्वित्झर्लंड, जिनिव्हा येथील लिग ऑफ नेशन्स्‌चे मुख्यालय