यहोवाच्या पवित्र स्थानाला राजा भ्रष्ट करतो
यहोवाच्या पवित्र स्थानाला राजा भ्रष्ट करतो
“जे लोक आपल्या देवाला ओळखतात ते बलवान होतील.” —दानीएल ११:३२.
१, २. मानवी इतिहासाला कोणत्या नाट्यमय चकमकीने २,००० पेक्षा अधिक वर्षापासून चिन्हित केले आहे?
श्रेष्ठब्रच्या झगड्यात दोन प्रतिस्पर्धी राजे एका पूर्ण प्रयत्नात अडकले आहेत. दोन हजार पेक्षा अधिक वर्षे युद्ध चालू राहते, प्रथम एकाला व नंतर दुसऱ्याला प्राबल्य मिळते. आमच्या दिवसात, झगड्याचा परिणाम पृथ्वीवरील अधिक लोकांवर झाला आहे व देवाच्या लोकांच्या सत्त्वपरीक्षेला पारखले गेले आहे. दोन्ही सत्तांच्या न कळत, याचा अंत एका घटनेसह होतो. हा नाट्यमय इतिहास, प्राचीन काळातील संदेष्टा दानीएलाला आधीच प्रकट केला होता.—दानीएल, १० ते १२ अध्याय.
२ या भविष्यवाणीचा संबंध उत्तरेचा राजा आणि दक्षिणेच्या राजामधील कायमचे वैर यासोबत आहे, व या माहितीची सविस्तर चर्चा, “पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो” [इंग्रजी] या पुस्तकात केली होती. * या पुस्तकात दाखवले की उत्तरेचा राजा, मुळचा इस्राएलच्या उत्तरेकडील अश्शुर होता. नंतर, त्याची भूमिका पुढे रोमने घेतली. आरंभाला, दक्षिणेचा राजा इजिप्त हा होता.
अंत समयातील लढाई
३. देवदूताने म्हटल्याप्रमाणे, उत्तरेचा राजा आणि दक्षिणेचा राजा यांच्याबद्दलची भविष्यवाणी केव्हा समजली जाणार होती, आणि कशी?
३ दानिएलाला या गोष्टी प्रकट करणाऱ्या देवदूताने म्हटले: “हे दानीएला, तू अंतसमयापर्यंत ही वचने गुप्त ठेव, व हे पुस्तक मुद्रित करून ठेव, पुष्कळ लोक धुंडाळीत फिरतील व ज्ञानवृद्धी होईल.” (दानीएल १२:४) होय, या भविष्यवाणीचा संबंध अंतसमयाबरोबर, १९१४ मध्ये आरंभ झालेल्या काळासोबत आहे. या चिन्हित केलेल्या समयात, अनेक लोक पवित्र शास्त्रवचनात “धुंडाळीत फिरतील,” आणि पवित्र आत्म्याच्या मदतीने पवित्र शास्त्राच्या भविष्यवाणीची समज यासोबत खऱ्या ज्ञानाची वृद्धी होईल. (नीतीसूत्रे ४:१८) काळाच्या ओघात जसे आम्ही शेवटाला पोहचत जातो, दानिएलाच्या भविष्यवाणीची अधिकाधिक स्पष्ट समज दिली गेली. तर मग, “पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो” [इंग्रजी] या प्रकाशनाच्या ३५ वर्षांनंतर, आता १९९३ मध्ये कशाप्रकारे आम्ही उत्तरेचा राजा आणि दक्षिणेच्या राजांविषयीच्या भविष्यवाण्यांची समज प्राप्त करू शकतो?
४, ५. (अ) उत्तरेचा राजा आणि दक्षिणेचा राजा यांच्याबद्दल दानिएलाने केलेल्या भविष्यवाणीत १९१४ हे वर्ष कोठे दिसते? (ब) देवदूताने म्हटल्याप्रमाणे १९१४ मध्ये काय घडणार होते?
४ येशूने भाकीत केल्याप्रमाणे, १९१४ मध्ये अंत समयाच्या आरंभाला पहिल्या महायुद्धाने व इतर जागतिक विपत्त्यांनी चिन्हित केले. (मत्तय २४:३, ७, ८) ते वर्ष आम्ही दानिएलाच्या भविष्यवाणीत शोधून काढू शकतो का? होय. अंत समयाचा आरंभ, याचा उल्लेख दानीएल ११:२९ मध्ये ‘नेमलेला वेळ’ असा केला आहे. [“पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो,” [इंग्रजी] या पुस्तकातील पृष्ठे २६९-७० पाहा.] दानिएलाच्या दिवसात तो काळ यहोवाद्वारे आधीच नेमलेला होता, कारण तो दानिएलाच्या ४ थ्या अध्यायात नमूद केलेल्या भविष्यवादीत अर्थपूर्ण घटनांच्या २,५२० वर्षांच्या समाप्तीस आला.
५ दानिएलाच्या युवकावस्थे-दरम्यान, इ.स.पूर्व ६०७ मध्ये यरूशलेमाच्या नाशापासून ते १९१४ पर्यंत त्या २,५२० वर्षांना, “राष्ट्रांचा नियुक्त काळ” असे म्हटले गेले. (लूक २१:२४, न्यूव.) कोणत्या राजकीय घटना त्यांचा अंत सूचित करतील? त्याविषयी देवदूताने दानिएलाला प्रकट केले. देवदूत म्हणाला: “नेमलेल्या वेळी तो [उत्तरेचा राजा] पुनः दक्षिणेस जाईल; तरी पूर्वीप्रमाणे आता त्याचे चालणार नाही.”—दानीएल ११:२९
राजाचा युद्धात पराभव होतो
६. एकोणिसशे चौदामध्ये उत्तरेचा राजा, आणि दक्षिणेचा राजा कोण होते?
६ उत्तरेच्या राजाची भूमिका १९१४ येईपर्यंत पुढे जर्मनीने घेतली तेव्हा त्याचा नेता कैसर विल्हेल्म हा होता. युरोपातील प्रतिकूलपणाचा उद्भव उत्तरेचा राजा आणि दक्षिणेच्या राजाच्या झगड्याच्या मालिकेतील आणखी एक गोष्ट होती. या पुढची भूमिका आता दक्षिणेचा राजा, ब्रिटनने घेतली होती, ज्याने दक्षिणेच्या मुळच्या राजाच्या सत्तेखालील इजिप्तला लगेच जिंकून घेतले. युद्ध चालू झाले तेव्हा, ब्रिटनला त्याची पूर्वीची वसाहत अमेरिका येऊन मिळाली. दक्षिणेचा राजा, इतिहासातील अधिक शक्तीशाली साम्राज्य, अँग्लो अमेरिकन जागतिक साम्राज्य बनले.
७, ८. (अ) पहिल्या महायुद्धात, कशारीतीने काही गोष्टी ‘पहिल्यासारख्या झाल्या नाहीत’? (ब) पहिल्या महायुद्धाचा परिणाम काय झाला होता, परंतु भविष्यवाणीनुसार, उत्तरेच्या राजाने कशी प्रतिक्रिया दाखवली?
७ दोन राजांमधील आधीच्या लढाईत, उत्तरेचा राजा असणाऱ्या रोमच्या साम्राज्याला नेहमी विजय मिळत गेला. या वेळी, ‘पूर्वीप्रमाणे आता चालणार नव्हते.’ का नाही बरे? कारण उत्तरेच्या राजाचा युद्धात पराभव झाला. त्याचे एक कारण म्हणजे, उत्तरेच्या राजावर “कित्तिमाची जहाजे” चाल करून आली हे होते. (दानीएल ११:३०) ही जहाजे कोणती होती? दानीएलाच्या काळात, कित्तिम हे कुप्र होते, आणि पहिल्या महायुद्धाच्या आरंभी, सायप्रस ब्रिटनला जोडले होते. शिवाय, पवित्र शास्त्राचा झॉन्डरवॅन चित्रमय विश्वकोश [इंग्रजी] यानुसार, कित्तिम हे नाव, “सर्वसामान्यपणे पश्चिमेपर्यंत, परंतु खासपणे पश्चिमेतील समुद्रपर्यटनापर्यंत विस्तारीत होते.” नवी आंतरराष्ट्रीय आवृत्ती [इंग्रजी] मध्ये “कित्तिमाची जहाजे” याचे भाषांतर “पश्चिम समुद्रकिनारपट्टीवरील जहाजे” असे केले आहे. पहिल्या महायुद्धात, कित्तिमाची जहाजे युरोपातील पश्चिम किनारपट्टीवरील, ब्रिटनची जहाजे अशी शाबीत झाली. त्यानंतर, पश्चिम युरोप खंडाच्या उत्तर अमेरिकेमधील जहाजाद्वारे ब्रिटिश आरमाराला दृढ करण्यात आले.
८ या हल्ल्यात, उत्तरेचा राजा ‘खिन्न’ झाला आणि १९१८ मध्ये त्याने पराभव पत्करला. परंतु त्याचा शेवट झाला नव्हता. “तो मागे फिरेल आणि पवित्र कराराविरूद्ध क्रोधायमान होईल व कार्य करील; नंतर तो फिरेल आणि पवित्र करार सोडणाऱ्यांकडे लक्ष लावील.” (दानीएल ११:३०, पंडिता रमाबाई भाषांतर) अशी देवदूताने भविष्यवाणी केली आणि त्याप्रमाणेच घडले.
राजा परिणामकारक कार्य करतो
९. ॲडॉल्फ हिटलरचा उदय होण्यास काय कारणीभूत ठरले, आणि कशाप्रकारे त्याने ‘परिणामकारक कार्य’ केले?
९ एकोणिसशे अठरामधील युद्धात विजय मिळालेल्या राष्ट्रांनी जर्मनीवर दंडात्मक शांतीचा तह लादला, जर्मन लोकांना अनिश्चित काळापर्यंत उपासमारीच्या तोंडाजवळ ठेवण्यासाठी याची रचना केली होती हे उघडच होते. याच्या परिणामस्वरुपात, काही वर्षांपर्यंत, अतिशय त्रास सहन केल्याच्या डळमळीत अवस्थेनंतर, जर्मनीची ॲडॉल्फ हिटलरचा उदय करण्याची तयारी झाली. त्याने १९३३ मध्ये उच्च अधिकार प्राप्त केला आणि लागलीच येशूच्या अभिषिक्त बांधवांना सूचित करणारा, “पवित्र करार” या विरूद्ध दुष्ट हल्ले सुरू केले. यामध्ये त्याने, प्रामाणिक असलेल्या अनेक ख्रिश्चनांचा अतिशय क्रुरपणे छळ करून, परिणामकारक कार्य केले.
१०. पाठिंबा मिळण्यासाठी हिटलरने कोणासोबत मैत्रीचे सख्य जोडले, आणि कोणत्या परिणामास्तव?
१० हिटलरला, या आर्थिक आणि चातुर्यातील क्षेत्रात परिणामकारक कार्य केल्याने यशाचा आनंद मिळाला. काही वर्षातच, जर्मनीला त्याने ‘पवित्र कराराला सोडतात’ अशांच्या मदतीने गाठ घेण्याजोगी सत्ता असे बनवले. ते कोण होते? उपलब्ध असलेल्या पुराव्याच्या आधारे, ख्रिस्ती धर्मराज्याचे पुढारी, ज्यांनी देवाबरोबर त्यांचा करारबद्ध संबंध असल्याचा दावा केला परंतु बऱ्याच काळापासून येशूचे शिष्य असण्याचे त्यांनी थांबवले होते. हिटलरने त्याच्या पाठिंब्यासाठी या ‘पवित्र करार सोडणाऱ्यांना’ आपलेसे करून घेण्यात यश मिळवले. रोममधील पोपने त्याच्याबरोबर समेट केला आणि रोमन कॅथोलिक चर्च, तसेच जर्मनीतील प्रॉटेस्टंट चर्चेसनी त्याच्या १२ वर्षांच्या दहशतीच्या राज्याधिकाराला पाठिंबा दिला.
११. कशाप्रकारे उत्तरेच्या राजाने ‘पवित्र स्थान भ्रष्ट करून नित्याचे बलिहवन बंद केले’?
११ हिटलर इतका यशस्वी होता की, देवदूताने त्याच्याबद्दल अगदी यथायोग्यपणे भाकीत केले होते की: “त्याच्या पक्षाचे सैनिक उठावणी करतील, ते पवित्रस्थान, तो दुर्ग, ते भ्रष्ट करतील, नित्याचे बलिहवन ते बंद करतील.” (दानीएल ११:३१अ) प्राचीन इस्राएलात, पवित्रस्थान यरूशलेममध्ये असलेल्या मंदिराचा भाग होते. तथापि, यहुद्यांनी येशूला नाकारले तेव्हा, यहोवाने त्यांना व त्यांच्या मंदिराला नाकारले. (मत्तय २३:३७-२४:२) पहिल्या शतकापासून, यहोवाचे मंदिर वास्तविकपणे आध्यात्मिक स्वरुपात अस्तित्वात असून, त्याचे परम पवित्र स्थान स्वर्गात, तर आध्यात्मिक अंगण पृथ्वीवर आहे; येथे महायाजक येशूचे अभिषिक्त बांधव सेवा करत आहेत. अभिषिक्त शेषांबरोबरच्या संगतीत मोठा लोकसमुदाय, १९३० पासून उपासना करीत आहे; म्हणूनच त्यांच्याविषयी म्हटले आहे की ते ‘देवाच्या मंदिरात’ सेवा करत आहेत. (प्रकटीकरण ७:९, १५; ११:१, २; इब्रीयांस ९:११, १२, २४) उत्तरेच्या राजाचे प्रभुत्त्व असलेल्या देशात, पृथ्वीवरील मंदिराच्या अंगणाला, अभिषिक्त शेष आणि त्यांच्या सोबत्यांचा, निर्दयी छळ करून त्याने भ्रष्ट केले होते. हा छळ इतका तीव्र स्वरुपाचा होता की, ज्यामुळे यहोवाच्या नावाचे जाहीरपणे करत असलेले स्तुतीरूपी बलिदान हा नित्याचा प्रकार काढून टाकण्यात आला. (इब्रीयांस १३:१५) तरीदेखील, इतिहास दाखवतो की, विश्वासू अभिषिक्त ख्रिश्चनांसोबत “इतर मेंढरे” यांनी भयंकर त्रास होत असतानाही भूमिगतपणे प्रचाराचे कार्य केले.—योहान १०:१६.
“अमंगळ पदार्थ”
१२, १३. “अमंगळ पदार्थ” काय होता, आणि विश्वासू व बुद्धिमान दासांनी आधीच भाकीत केल्याप्रमाणे तो केव्हा आणि कसा पुनर्स्थापित झाला?
१२ दुसरे महायुद्ध समाप्त होण्याच्या बेतात असताना, आणखी एका गोष्टीची वाढ झाली होती. “विध्वंसमूलक अमंगलाची ते स्थापना करतील.” (दानीएल ११:३१ब) येशूने देखील ज्याचा उल्लेख केला तो “अमंगळ पदार्थ,” लिग ऑफ नेशन्स्, प्रकटीकरणानुसार अगाधकूपात गेलेले किरमिजी रंगाचे श्वापद आहे, असे आधीच ओळखण्यात आले होते. [मत्तय २४:१५; प्रकटीकरण १७:८; प्रकाश [इंग्रजी] या पुस्तकातील पृष्ठ ९४ पाहा.] दुसरे महायुद्ध पेटले तेव्हा त्याची स्थापना झाली. तथापि, १९४२ मध्ये यहोवाच्या साक्षीदारांच्या न्यू वर्ल्ड थिओक्रेटिक अधिवेशनात, वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीचे तिसरे अध्यक्ष नेथन एच. नॉर यांनी प्रकटीकरणाच्या १७ व्या अध्यायातील भविष्यवाणीची चर्चा केली आणि अगाधकुपातून श्वापद पुन्हा उदयास येईल याबद्दल इशारा दिला.
१३ त्यांच्या शब्दांतील सत्याला इतिहासाने पुष्टी दिली. ऑगस्ट आणि ऑक्टोबर १९४४ च्या दरम्यान अमेरिकेतील, डँबॉरटन ओक्स येथे ज्याला संयुक्त राष्ट्रसंघ म्हटले जाणार होते त्याची सनद तयार करण्याचे काम सुरू झाले. या सनदीचा ५१ राष्ट्रांसोबतच पूर्वीच्या रशियाने स्वीकार केला, आणि ऑक्टोबर २४, १९४५ मध्ये सत्तेवर आल्यावर, अस्तित्वात नसलेली लिग ऑफ नेशन्स् अगाधकुपातून परिणामतः वर आली.
१४. उत्तरेच्या राजाची ओळख कधी आणि कशी बदलली?
१४ दोन्ही महायुद्धात, दक्षिणेच्या राजाचा प्रमुख शत्रू जर्मनी होता. दुसऱ्या महायुद्धानंतर, दक्षिणेच्या राजाबरोबर जर्मनीच्या एका भागाचे पुनःसंबंध जोडण्यात आले. परंतु जर्मनीच्या दुसऱ्या भागांचे संबंध आणखी एका संभवनीय साम्राज्यासोबत जोडले होते. आता जर्मनीचा भाग बनलेला कम्युनिस्ट संघ, अँग्लो-अमेरिकन ऐक्याबरोबरील तीव्र विरोधात उभा राहिला तसेच दोन राजांमधील प्रतिस्पर्धाचे परिवर्तन, शीत युद्धात झाले.—“पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो” [इंग्रजी] या पुस्तकातील पृष्ठे २६४-८४ पाहा.
राजा आणि करार
१५. ‘करारासंबंधाने दुष्ट वर्तन करणारे’ कोण आहेत, आणि उत्तरेच्या राजासोबत त्यांचे कसे संबंध होते?
१५ आता देवदूत म्हणतो: “जे करारासंबंधाने दुष्ट वर्तन करतात त्यास तो फुसलावून भ्रष्ट [धर्मत्यागी, न्यूव.] करील.” (दानीएल ११:३२अ) आता, कराराच्या विरोधात दुष्टपणे कार्य करणारे हे कोण आहेत? पुन्हा, ते ख्रिस्ती धर्मराज्यातील पुढारीच केवळ असतील, ते ख्रिस्ती असल्याचा दावा करतात परंतु त्यांच्या कृत्यांनी त्यांनी ख्रिस्ती धर्माच्या नावालाच दूषण लावलेले आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान, “रशियाच्या सरकारने मातृभूमीच्या रक्षणासाठी चर्चेसकडून भौतिक आणि नैतिक साहाय्याकरीता सेनेत भरती होण्यासाठी प्रयत्न केले होते.” [वॉल्टर कोल्रज् यांनी लिहिलेले सोविएत संघराज्या मधील धर्म (इंग्रजी)] युद्धानंतर, आता उत्तरेच्या राजाचे नास्तिकतेच्या धोरणाचे सामर्थ्य असतानाही चर्चच्या पुढाऱ्यांनी ती मैत्री टिकवण्याचा प्रयत्न केला. * अशाप्रकारे, ख्रिस्ती धर्मराज्य, यहोवाच्या नजरेत या जगाचा पूर्वीपेक्षा अधिक अमंगळ धर्मत्यागी भाग बनले.—योहान १७:१४; याकोब ४:४.
१६, १७. “सुज्ञ” असलेले कोण आहेत, आणि उत्तरेच्या राजाच्या वर्चस्वाखाली त्यांना कसा अनुभव आला?
१६ मग खऱ्या ख्रिश्चनांविषयी काय? “जे लोक आपल्या देवास ओळखतात ते बलवान होऊन थोर कृत्ये करतील. लोकातले जे सुज्ञ पुरूष ते पुष्कळांस बोध करतील; परंतु ते बरेच दिवस तरवार, अग्नी, बंदिवास व लुटालूट यांनी संकटात पडतील.” (दानीएल ११:३२ब, ३३) उत्तरेकडील राजाच्या नियंत्रणाखाली राहात असलेले ख्रिश्चन, “वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधीन” असले तरी या जगाचे भाग नाहीत. (रोमकर १३:१; योहान १८:३६) कैसराचे ते कैसराला काळजीपूर्वक देत असताना, “देवाचे ते देवाला” देतात. (मत्तय २२:२१) या कारणास्तव, त्यांच्या सत्त्वपरीक्षेला आव्हान केले गेले.—२ तीमथ्य ३:१२.
१७ याचा परिणाम काय झाला? ते ‘बलवान झाले’ आणि ‘अडखळून पडले’. त्यांचा छळ झाला ते या अर्थी की, त्यांनी तीव्रपणे त्रास सहन केला होता, काहींना तर मारून टाकण्यात आले. परंतु त्यात त्यांनी जय मिळवला, याचा अर्थ अनेक बाबतीत ते विश्वासू राहिले. होय, येशूने जसा जगावर विजय मिळवला त्याप्रमाणे त्यांनी देखील विजय मिळवला आहे. (योहान १६:३३) शिवाय, त्यांनी तुरूंगात किंवा छळ-छावण्यात असताना देखील प्रचारकार्य कधी थांबवले नाही. असे करण्याद्वारे त्यांनी ‘अनेकांना समज दिली.’ उत्तरेकडील राजा राज्य करीत असलेल्या अनेक देशात छळ होत असताना सुद्धा, यहोवाच्या साक्षीदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्या देशांमध्ये ‘मोठ्या लोकसमुदायाचा’ वाढत चाललेला भाग प्रगट झाल्यामुळे ‘सुज्ञांच्या’ विश्वासुपणाबद्दल त्यांना धन्यवाद.—प्रकटीकरण ७:९-१४.
१८. उत्तरेच्या राजाच्या सत्तेखाली राहात असलेल्या अभिषिक्त जणांना कोणती “थोडी बहुत” मदत मिळाली?
१८ देवाच्या लोकांच्या छळाविषयी बोलताना देवदूताने भाकीत केले की: “ते असे संकटात पडतील तेव्हा त्यांस थोडी बहुत मदत होईल.” (दानीएल ११:३४अ) हे कसे घडले? एका गोष्टीसाठी, दुसऱ्या महायुद्धात दक्षिणेच्या राजाच्या विजयामुळे, उत्तरेच्या राजाच्या सत्तेखाली असलेल्या ख्रिश्चनांना मोठी मुक्तता मिळाली. (पडताळा प्रकटीकरण १२:१५, १६.) मग, उत्तरेचा राजा या नात्याने आता पुढे कार्य करत असलेल्या शक्तीकडून ज्यांचा छळ केला होता, त्यांनी वेळोवेळी मुक्ततेचा अनुभव घेतला, आणि शीत युद्ध त्याच्या समाप्तीस पोहचत असता, अनेक राजकीय पुढाऱ्यांना कळून चुकले की विश्वासू ख्रिश्चनांकडून त्यांना धोका नाही व यामुळे त्यांनी त्यांना कायदेशीर मान्यता दिली. * वाढ होत असलेल्या मोठ्या लोकसमुदायांनी अभिषिक्त जणांच्या विश्वासू प्रचारकार्यास प्रतिसाद दिल्याने व मत्तय २५:३४-४० मध्ये वर्णन केल्याप्रमाणे त्यांना साहाय्य केल्याने मोठी मदत देखील मिळाली.
देवाच्या लोकांसाठी शुद्धीकरण
१९. (अ) कशाप्रकारे काही लोक, “त्याजबरोबर गोड बोलून त्यांना मिळाले”? (ब) “अंतसमयापर्यंत” या संज्ञेचा काय अर्थ आहे? (तळटीप पाहा.)
१९ या काळात देवाची सेवा करीत असलेल्या सर्वांनीच चांगली मनोवृत्ती नव्हती. देवदूताने इशारा दिला: “पुष्कळ लोक त्याजबरोबर गोड बोलून त्यांना मिळतील. सुज्ञ पुरूषांपैकी कोणी संकटात पडतील ते अशासाठी की, त्यांनी कसोटीस लागून अंतसमयासाठी [अंतसमयापर्यंत, न्यूव.] शुद्ध व शुभ्र व्हावे, कारण नेमलेला अंतसमय प्राप्त होण्यास अद्यापि अवधी आहे.” * (दानीएल ११:३४ब, ३५) काहींनी सत्यामध्ये आस्था दाखवली परंतु देवाची सेवा करण्यासाठी खरे समर्पण करण्यास ते इच्छुक नव्हते. इतर जणांनी सुवार्तेचा स्वीकार केला होता परंतु अधिकार असलेल्यांचे ते हेर वाटत होते. एका देशातील अहवाल असा वाचला जातो: “यातील काही तत्त्वहीन व्यक्ती निर्लज्ज कम्युनिस्टांपैकीचे होते, ज्यांनी प्रभूच्या संघटनेत न कळत आत शिरून अधिक आवेश दाखवला व त्यांना यहोवाच्या संघटनेत जबाबदारीची नेमणूक देखील देण्यात आली होती.”
२०. दांभिक लोक आत शिरल्यामुळे, यहोवाने काही विश्वासू ख्रिश्चनांना का ‘अडखळू’ दिले?
२० आत शिरलेले लोक, काही विश्वासू जणांना अधिकाऱ्यांच्या हाती देण्यास कारणीभूत ठरले. अशी गोष्ट घडण्यास यहोवाने अनुमती का दिली बरे? शुद्धीकरण व शुभ्रतेसाठी. जसे येशूने “दुःख सोसले तेणेकरून तो आज्ञाधारकपणा शिकला,” त्याप्रमाणेच या विश्वासू जनांनी देखील त्यांच्या विश्वासाची पारख होत असताना ते धीर धरण्यास शिकले. (इब्रीयांस ५:८; याकोब १:२, ३; पडताळा मलाखी ३:३.) अशाप्रकारे ते ‘शुद्ध, स्वच्छ, आणि शुभ्र झाले आहेत.’ अशा विश्वासू जणांना त्यांच्या धीराबद्दल बक्षीस देण्याच्या नेमलेल्या काळात त्यांच्यासाठी मोठा आनंद राखून ठेवलेला आहे. दानिएलाच्या भविष्यवाणीची आम्ही अधिक चर्चा करू तेव्हा हे दिसून येईल.
[तळटीपा]
^ वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीने प्रकाशित केले व यहोवाच्या साक्षीदारांच्या “ईश्वरी इच्छा” या १९५८ मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय संमेलनात हे प्रसिद्ध केले.
^ नोव्हेंबर १९९२ मध्ये वर्ल्ड प्रेस रिव्हीवने द टोरॉन्टो स्टार मधून एक लेख प्रसिद्ध केला, तो म्हणतो: “मागील अनेक वर्षांपासून, रशियन लोकांनी त्यांच्या देशाच्या इतिहासाचा वास्ततिकतेपुढे चुराडा झाला, याविषयीच्या डझनभर अविवादास्पद चुकीच्या कल्पना पाहिल्या. परंतु चर्चच्या कम्युनिस्ट कारकीर्दीसोबत चर्चच्या उघड सहकार्याला चुराडा करणाऱ्या तडाख्याने सूचित केले.”
^ टेहळणी बुरूज [इंग्रजी], जुलै १५, १९९१, पृष्ठे ८-११ पाहा.
^ “अंतसमयापर्यंत” याचा अर्थ “अंतसमया दरम्यान” असा होऊ शकतो. येथे भाषांतरीत केलेला “पर्यंत” हा शब्द अरेमिक लिखाणात दानीएल ७:२५ आढळतो आणि तेथे, त्याचा अर्थ “दरम्यान” किंवा “साठी” असा होतो. इब्री लिखाणाच्या २ राजे ९:२२, ईयोब २०:५, आणि शास्ते ३:२६ मध्ये तोच अर्थ दिला आहे. तथापि, दानीएल ११:३५ च्या बहुतेक भाषांतरात त्याचे, “पर्यंत” असे भाषांतरीत केले आहे, आणि जर ही योग्य समज असेल तर मग, येथे सांगितलेला “अंतसमय” हा देवाच्या लोकांच्या धीराचा अंतसमय असला पाहिजे.—पडताळा “पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो,” (इंग्रजी) पृष्ठ २८६.
तुम्हाला आठवते का?
▫ आज आम्ही दानीएलाच्या भविष्यवाणीची स्पष्ट समज मिळण्याची अपेक्षा का केली पाहिजे?
▫ कशाप्रकारे उत्तरेच्या राजाने ‘जोराने दोषारोप लावला व परिणामकारक कार्य’ केले?
▫ दास वर्गाने “अमंगळ पदार्थ’ पुन्हा दिसण्याविषयीचे भाकीत कसे केले?
▫ कशाप्रकारे अभिषिक्त शेष ‘अडखळले, जय मिळवला व त्यांना थोडी बहुत मदत’ मिळाली?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१४ पानांवरील चित्रं]
हिटलरच्या सत्तेखाली, १९१८ मध्ये, दक्षिणेच्या राजाकडून पराभवामुळे झालेल्या नुकसानीला, उत्तरेच्या राजाने पूर्णपणे भरून काढले
[१५ पानांवरील चित्रं]
ख्रिस्ती धर्मराज्याच्या पुढाऱ्यांनी उत्तरेच्या राजासोबत संबंध वाढवण्याचा प्रयत्न केला