व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाच्या मार्गात धैर्याने चाला

यहोवाच्या मार्गात धैर्याने चाला

यहोवाच्या मार्गात धैर्याने चाला

“जो पुरूष परमेश्‍वराचे [यहोवा, न्यूव.] भय धरतो, जो त्याच्याच मार्गांनी चालतो तो धन्य.” —स्तोत्रसंहिता १२८:१.

१, २. यहोवाच्या आरंभीच्या साक्षीदारांचा शब्द व कृत्यांचा पवित्र शास्त्रीय अहवाल कशारीतीने मदतदायक आहे?

 यहोवाचे पवित्र वचन त्याच्या सेवकांच्या परीक्षा आणि आनंदाच्या अहवालांनी भरलेले आहेत. नोहा, अब्राहाम, सारा, यहोशवा, दबोरा, बाराक, दावीद, आणि इतरांच्या अनुभवांचे अहवाल तर त्याच्या पानातून जवळजवळ डोकावून पाहत आहेत. ते काल्पनिक नव्हे तर खरे लोक होते व त्यांच्यात काही खास सर्वसाधारण गोष्टी होत्या. देवावर त्यांचा विश्‍वास होता आणि त्याच्या मार्गात ते धैर्याने चालले होते.

देवाच्या मार्गात आम्ही चालण्याचा प्रयत्न करत असताना, आरंभीच्या काळातील यहोवाच्या साक्षीदारांचे शब्द व कृत्ये आमच्यासाठी उत्तेजनदायक ठरू शकतात. शिवाय, देवासाठी आदर दाखवल्यास आणि त्याला असंतुष्ट न करण्याची सुदृढ भीती राखल्यास आम्ही आनंदी होऊ. जीवनात आम्हाला परीक्षांचा सामना करावा लागणार हे खरे आहे, कारण, प्रेरित स्तोत्रकर्त्याने गायिले: “जो पुरूष परमेश्‍वराचे [यहोवा, न्यूव.] भय धरतो, जो त्याच्याच मार्गांनी चालतो तो धन्य.”—स्तोत्रसंहिता १२८:१.

धैर्य काय आहे

३. धैर्य काय आहे?

यहोवाच्या मार्गात चालण्यासाठी आम्हाला धैर्य असले पाहिजे. वस्तुतः शास्त्रवचने हा गुण दाखवण्यासाठी देवाच्या लोकांना आज्ञा देतात. उदाहरणार्थ, स्तोत्रकर्त्या दाविदाने गायिले: “अहो परमेश्‍वराची [यहोवा, न्यूव.] आशा धरणारे तुम्ही सर्व हिम्मत बांधा; तुमचे मन धीर धरो.” (स्तोत्रसंहिता ३१:२४) धैर्य हे, “साहस, सातत्य यांचे तसेच धोका, भय किंवा संकटाचा प्रतिकार करण्यासाठी असलेले मानसिक किंवा नैतिक बळ आहे.” (वेबस्टरर्स्‌ नाईन्थ न्यू कॉलिजिएट डिक्शनरी) धैर्य असणारी व्यक्‍ती दृढ, धीट व शूर असते. यहोवा त्याच्या सेवकांना धैर्य देतो हे प्रेषित पौलाने त्याचा सहकारी, तीमथ्याला लिहिलेल्या शब्दावरून स्पष्ट दिसते: “देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमाचा आत्मा दिला आहे.”—२ तीमथ्य १:७.

४. धैर्य प्राप्त करण्याचा कोणता एक मार्ग आहे?

देवाने दिलेले धैर्य प्राप्त करण्याचा एक मार्ग म्हणजे, यहोवाचे वचन, पवित्र शास्त्राच्या बाबतीत प्रार्थनापूर्वक विचार करणे हा आहे. शास्त्रवचनातील अनेक अहवाल आम्हाला अधिक धैर्यवान होण्यास मदत करू शकतात. यास्तव, प्रथम इब्री शास्त्रामधील यहोवाच्या मार्गात धैर्याने चाललेल्या काहींच्या अहवालांपासून आपण काय शिकू शकतो ते पाहू या.

देवाचे संदेश घोषित करण्यासाठी धैर्य

५. यहोवाच्या आधुनिक दिवसातील सेवकांना, हनोखच्या धैर्याचा कसा फायदा होऊ शकतो?

देवाचा संदेश धैर्याने सांगण्यासाठी हनोखचे धैर्य आधुनिक दिवसातील यहोवाच्या सेवकांना मदत करू शकते. हनोखचा जन्म होण्यापूर्वीच लोक “परमेश्‍वराच्या [यहोवा, न्यूव.] नावाने प्रार्थना करु लागले.” काही विद्वान म्हणतात की मानवांनी यहोवाचे नाव घेऊन त्याला “अपवित्र करण्यास सुरवात केली.” (उत्पत्ती ४:२५, २६; ५:३, ६) ईश्‍वरी नाव मानवांना किंवा मूर्त्यांनाही लागू केले गेले असावे. यास्तव, इ.स.पूर्व ३४०४ मध्ये हनोखचा जन्म झाला तेव्हा खोट्या धर्माची भरभराट होत होती. वस्तुतः, ‘देवाबरोबर चालणारा,’ यहोवाच्या प्रगट केलेल्या सत्यानुरूप धार्मिक गोष्टीचे पालन करणारा केवळ तो एकटाच कदाचित असेल.—उत्पत्ती ५:१८, २४.

६. (अ) हनोखने कोणता जोरादार संदेश घोषित केला? (ब) आम्हाला कोणता आत्मविश्‍वास असू शकतो?

हनोखने धैर्याने, शक्यतो प्रचाराद्वारे देवाचा संदेश सांगितला. (इब्रीयांस ११:५; पडताळा २ पेत्र २:५.) त्याने एकट्याने साक्ष दिली की, “पाहा! सर्वांचा न्यायनिवाडा करावयास आणि भक्‍तिहीन लोकांनी अभक्‍तीने केलेल्या आपल्या सर्व भक्‍तिहीन कृत्यांवरून आणि ज्या सर्व कठोर गोष्टी भक्‍तिहीन पापी जनांनी त्याच्याविरूद्ध सांगितल्या त्यावरून त्या सर्वांस दोषी ठरवावयास प्रभु [यहोवा, न्यूव.] आपल्या लाखो पवित्र जनांसहित आला.” (यहुदा १४, १५) भक्‍तिहीन लोकांचे खंडन करण्याचा संदेश देताना यहोवाच्या नावाचा वापर करण्यासाठी हनोखजवळ धैर्य होते. तो कठोर संदेश सांगण्यासाठी यहोवाने हनोखला ज्याप्रमाणे धैर्य दिले, तसेच आज देखील तो त्याच्या आधुनिक दिवसातील साक्षीदारांना धैर्याने त्याचे वचन सेवेत, शाळेत आणि इतर ठिकाणी बोलण्यासाठी बळ पुरवतो.—पडताळा प्रे. कृत्ये ४:२९-३१.

परीक्षात असताना धैर्य

७. नोहाने धैर्याचे कोणते उदाहरण पुरवले?

आम्ही परीक्षेत असताना, धार्मिक कृत्ये करत राहण्यासाठी नोहाचे उदाहरण आम्हाला मदत करू शकते. धैर्य आणि विश्‍वासामुळे जगव्याप्त प्रलयाचा ईश्‍वरी इशारा तो देऊ शकला व त्याने “आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी तारू तयार केले.” आज्ञाधारकपणा आणि धार्मिक कृत्याद्वारे नोहाने जगाला त्याच्या दुष्ट कामाबद्दल दोषी ठरवले व नाशास पात्र असल्याचे शाबीत केले. (इब्रीयांस ११:७; उत्पत्ती ६:१३-२२; ७:१६) नोहाच्या कृत्यावर मनन केल्यामुळे, आधुनिक दिवसातील देवाच्या सेवकांना ख्रिश्‍चन सेवेसारख्या धार्मिक कामात धैर्याने भाग घेण्यासाठी मदत होऊ शकते.

८. (अ) “धार्मिकतेचा प्रचारक” या नात्याने नोहाने कशाचा सामना केला? (ब) आम्ही धार्मिकतेचे धैर्यवान प्रचारक असलो तर यहोवा आमच्यासाठी काय करील?

एखादे धार्मिक काम आम्ही करत आहोत, परंतु, विशिष्ट परीक्षेचा कसा सामना करावा हे समजत नसल्यास, त्याचा सामना करण्यास बुद्धी मिळावी म्हणून आपण प्रार्थना करावी. (याकोब १:५-८) परीक्षेत असताना नोहाने देवाला दाखवलेला निष्ठावंतपणा, परीक्षेचा सामना धैर्याने आणि विश्‍वासूपणे करता येणे शक्य असल्याचे दाखवतो. दुष्ट जगाकडील तसेच देह धारण केलेल्या देवदूतांच्या आणि त्यांच्या संकरित संतानाकडील दबावात तो टिकून राहिला. होय, नाशाकडे जात असलेल्या “प्राचीन जगासाठी,” नोहा “धार्मिकतेचा प्रचारक” होता. (२ पेत्र २:४, ५; उत्पत्ती ६:१-९) जलप्रलयापूर्वीच्या लोकांना देवाच्या इशाऱ्‍याची घोषणा करणाऱ्‍या दूताप्रमाणे तो धैर्याने बोलला तरी, ‘जलप्रलय येऊन सर्वांस वाहवून नेईपर्यंत त्यांनी लक्ष दिले नाही.’ (मत्तय २४:३६-३९, न्यूव.) परंतु छळ आणि पवित्र शास्त्रावर आधारित असलेला आमचा संदेश आज अनेक लोकांनी नाकारला तरी, धार्मिकतेचे प्रचारक या नात्याने नोहाप्रमाणे जर आम्ही विश्‍वास आणि धैर्य दाखवले तर यहोवाने त्याला जसा पाठिंबा दिला तसाच तो आम्हाला देखील देऊ शकतो हे आपण आठवणीत ठेवू या.

देवाचे आज्ञापालन करण्यासाठी धैर्य

९, १०. कशाच्या बाबतीत अब्राहाम, सारा, आणि इसहाक यांनी धैर्यवान आज्ञाधारकपणा दाखवला?

“यहोवाचा मित्र” अब्राहाम, धैर्याने देवाच्या आज्ञेचे पालन करण्याचे एक उत्तम उदाहरण आहे. (याकोब २:२३) भौतिकतेत संपन्‍न असलेले खास्दी लोकांचे ऊर नगर सोडण्यासाठी अब्राहामाला विश्‍वास आणि धैर्याची गरज होती. त्याच्या वंशाद्वारे “पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील,” व त्याच्या वंशाला एक वतन दिले जाईल, या देवाच्या अभिवचनावर त्याने विश्‍वास ठेवला. (उत्पत्ती १२:१-९; १५:१८-२१) विश्‍वासाद्वारे अब्राहाम, “परदेशात राहावे त्याप्रमाणे वचनदत्त देशात जाऊन राहिला” आणि “पाये असलेल्या नगराची,” पृथ्वीवरील जीवनासाठी त्याचे पुनरूत्थान केले जाईल अशा देवाच्या स्वर्गीय राज्याची, तो वाट पाहत होता.—इब्रीयांस ११:८-१६.

१० अब्राहामाची पत्नी, साराला देखील ऊर सोडून तिच्या पतीसोबत परदेशात जाण्यासाठी व तेथे येणाऱ्‍या कोणत्याही संकटात धीराने टिकून राहण्यासाठी विश्‍वास आणि धैर्याची गरज होती. तिच्या धैर्यवान आज्ञाधारकपणाबद्दल तिला केवढा मोबदला मिळाला! सारा तिच्या ९० वयापर्यंत वांझ, व “वयोमर्यादेपलिकडे” असतानाही, तिला ‘गर्भधारणेची शक्‍ती मिळाली, कारण तिने वचन देणाऱ्‍यास विश्‍वसनीय मानले होते.’ वेळेच्या अवधीमध्ये इसहाकाचा जन्म झाला. (इब्रीयांस ११:११, १२; उत्पत्ती १७:१५-१७; १८:११; २१:१-७) काही वर्षांनंतर, अब्राहामाने धैर्याने देवाची आज्ञा मानली व “इसहाकाचे अर्पण केले.” देवदूताने त्याला थांबवले, आणि या कुलपित्याला धैर्य व आज्ञांकित असलेला त्याचा पुत्र “लाक्षणिक अर्थाने” मेलेल्या स्थितीतून परत मिळाला. यास्तव, तो व इसहाक, यहोवा देव त्याचा पुत्र, येशू ख्रिस्ताची, त्याच्यावर विश्‍वास ठेवणाऱ्‍यांना सार्वकालिक जीवन मिळण्यासाठी खंडणी पुरवील, हे भविष्यवादितपणे चित्रित करतात. (इब्रीयांस ११:१७-१९; उत्पत्ती २२:१-१९; योहान ३:१६) निश्‍चितच, अब्राहाम, सारा आणि इसहाकाच्या धैर्यवान आज्ञाधारकपणाने आम्हाला यहोवाच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी व त्याची इच्छा सर्वदा करत राहण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे.

देवाच्या लोकांसोबत उभे राहण्यासाठी धैर्य

११, १२. (अ) यहोवाच्या लोकांच्या बाबतीत मोशेने धैर्य कसे दाखवले? (ब) मोशाचे धैर्य पाहता कोणते प्रश्‍न विचारले जाऊ शकतात?

११ मोशे देवाच्या पीडित लोकांच्या वतीने धैर्याने उभा राहिला. इ.स.पूर्व १६ व्या शतकात स्वतः मोशेच्या पालकांनी धैर्य दाखवले. इब्‌ऱ्‍यांच्या नवजात जन्मलेल्या मुलांना मारून टाकण्याविषयीच्या राजाच्या आज्ञेला न घाबरता, त्यांनी मोशेला लपवून ठेवले आणि नंतर एका पेटाऱ्‍यात घालून नाईल नदीकाठच्या लव्हाळ्यामध्ये नेऊन सोडले. फारोच्या मुलीला तो सापडला, तिचा पुत्र म्हणून त्याचे संगोपन केले गेले, तरी आध्यात्मिक शिक्षण त्याला त्याच्या पालकांच्या घरी मिळाले. फारोच्या घरातील एक असल्यामुळे मोशेला “मिसरी [इजिप्त] लोकांच्या सर्व विद्यांचे शिक्षण मिळाले” आणि तो मानसिक व शारीरिक योग्यतेत, “भाषणात आणि कृतीत पराक्रमी झाला.”—प्रे. कृत्ये ७:२०-२२; निर्गम २:१-१०; ६:२०.

१२ राजघराण्यातील भौतिक समृद्धतेचे फायदे असतानाही, मोशेने त्या काळी (मिसऱ्‍यांचे) इजिप्तच्या लोकांचे गुलाम असणाऱ्‍या यहोवाच्या उपासकांबरोबर भूमिका घेण्याची धैर्याने निवड केली. इस्राएली मनुष्याच्या रक्षणासाठी, एका इजिप्तच्या मनुष्याचा वध करून तो मिद्यानला पळून गेला. (निर्गम २:११-१५) जवळ जवळ ४० वर्षांनंतर, इस्राएलांना इजिप्तच्या दास्यत्वातून मुक्‍त करुन त्यांचे नेतृत्त्व करण्यासाठी देवाने त्याचा वापर केला. मोशेने मग, इस्राएलच्या वतीने यहोवाचे प्रतिनिधीत्त्व केल्यामुळे मारून टाकण्याच्या, “राजाच्या क्रोधाला न भिता मिसर [इजिप्त] देश सोडला.” मोशे, यहोवा देव, ‘जो अदृश्‍य आहे त्याला पाहत’ असल्यासारखा चालला. (इब्रीयांस ११:२३-२९; निर्गम १०:२८) तुमचा त्रास आणि छळ होत असताना यहोवा आणि त्याच्या लोकांबरोबर तुम्ही जडून राहाल असा विश्‍वास आणि धैर्य तुम्हाठायी देखील आहे का?

‘यहोवाला पूर्णपणे अनुसरण्याचे’ धैर्य

१३. यहोशवा आणि कालेब यांनी धैर्याची उदाहरणे कशी मांडली?

१३ आम्ही देवाच्या मार्गाने चालू शकतो याचा पुरावा धैर्यवान यहोशवा आणि कालेबने दिला. त्यांनी “परमेश्‍वराला [यहोवा, न्यूव.] पूर्णपणे अनुसरले.” (गणना ३२:१२) यहोशवा आणि कालेब हे, वचनदत्त देशाची हेरगिरी करण्यासाठी पाठविलेल्या १२ हेरांमधील होते. तेथील लोकांना घाबरून, दहा हेरांनी कनानमध्ये जाण्यापासून इस्राएली लोकांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. तथापि, यहोशवा आणि कालेब यांनी धैर्याने म्हटले: “परमेश्‍वर [यहोवा, न्यूव.] आमच्यावर प्रसन्‍न असला तर तो त्या दुधामधाचे प्रवाह वाहणाऱ्‍या देशात आम्हाला नेईल आणि तो देश आम्हाला देईल. तुम्ही परमेश्‍वराविरूद्ध [यहोवा, न्यूव.] बंड मात्र करू नका. आणि त्या देशाच्या लोकांची भीती बाळगू नका कारण ते आमचे भक्ष्य होतील; त्यांचा आधार तुटला आहे, पण आमच्या बरोबर परमेश्‍वर [यहोवा, न्यूव.] आहे, त्यांची भीती बाळगू नका.” (गणना १४:८, ९) विश्‍वास आणि धैर्याचा अभाव असल्यामुळे इस्राएलांची ती पिढी वचनदत्त देशात कधी पोहचू शकली नाही. परंतु यहोशवा आणि कालेब, यांच्यासोबत नव्या पिढीने मात्र त्यात प्रवेश केला.

१४, १५. (अ) यहोशवाने, यहोशवा १:७, ८ मधील शब्दांना अनुसरले तेव्हा, त्याने व इस्राएलांनी कशाचा अनुभव घेतला? (ब) यहोशवा आणि कालेब यांच्याकडून धैर्याच्याबाबतीत आम्ही काय शिकतो?

१४ देवाने यहोशवाला म्हटले: “मात्र तू खंबीर हो व खूप हिंमत धर, आणि माझा सेवक मोशे ह्‍याने तुला दिलेले नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पाळ; ते सोडून उजवीडावीकडे वळू नको म्हणजे जाशील तिकडे तू यशस्वी होशील. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यशःप्राप्ती घडेल.—यहोशवा १:७, ८.

१५ यहोशवाने त्या शब्दांचे अनुकरण केले तेव्हा, इस्राएलांपुढे यरीहो आणि इतर नगरे पडली. गिबोनात, इस्राएल विजयी होईपर्यंत देवाने सूर्याला देखील स्थिर केले. (यहोशवा १०:६-१४) ‘समुद्राच्या वाळूसारख्या अगणित समुदायाप्रमाणे,’ शत्रूंचे सैन्य संघटितपणे चाल करून आले तेव्हा, यहोशवाने धैर्याने कार्य केले, व देवाने पुन्हा एकदा इस्राएलांना विजयी केले. (यहोशवा ११:१-९) आम्ही अपरिपूर्ण मानव असलो तरी, यहोशवा आणि कालेबप्रमाणे, आम्ही देखील यहोवाचे पूर्णपणे अनुसरण करू व देव आम्हाला त्याच्या मार्गात धैर्याने चालण्यासाठी बळ देऊ शकतो.

देवावर भाव ठेवण्यासाठी धैर्य

१६. कशाप्रकारे दबोरा, बाराक आणि याएल यांनी धैर्य दाखवले?

१६ इस्राएलात न्यायाचा कारभार पाहणाऱ्‍या शास्त्यांच्या दिवसातील घटना, धैर्याने देवावरील भावाचे प्रतिफळ मिळाल्याचे दाखवतात. (रूथ १:१) उदाहरणार्थ, शास्ता बाराक आणि संदेष्ट्री दबोरा यांनी धैर्याने देवावर भाव दाखवला. कनानच्या याबीन राजाने २० वर्षे इस्राएलांवर जुलूम केला, तेव्हा यहोवाने बाराकला ताबोर डोंगराकडे १०,००० लोकांना एकत्र करण्याविषयी दबोराजवळ सांगितले. याबीनचा सेनापती सीसरा लोखंडी पाते असलेल्या ९०० रथांबरोबर इस्राएली सामना करू शकणार नाही या खात्रीने, सपाट जमीनीवर किशोन नाल्यापर्यंत गेला. इस्राएली नाल्याजवळ आले तेव्हा देवाने त्यांच्यावतीने कार्य केले व अचानक जोराच्या प्रलयाने युद्धभूमीला दलदलीत बदलून टाकल्याने सीसराच्या रथांना चालता आले नाही. बाराकची मनुष्ये विजयी झाली, आणि “सीसराची सर्व सेना तरवारीने पडली.” सीसरा याएलच्या डेऱ्‍यात पळून गेला, परंतु झोपेत असताना, त्याच्या कानशिलांत मेख ठोकून मारण्याचे तिने धैर्य दाखवले. दबोराने सांगितलेले भविष्यसूचक शब्द खरे ठरले की, या विजयाच्या ‘सुंदर गोष्टीचे’ श्रेय एका स्त्रीला मिळते. दबोरा, बाराक आणि याएल यांनी देवावर धैर्याने भाव ठेवल्यामुळे, इस्राएलाला “चाळीस वर्षे विसावा मिळाला.”—शास्ते ४:१-२२; ५:३१.

१७. शास्ता गिदोनाने यहोवावर धैर्याने भाव ठेवण्याविषयीचे कोणते उदाहरण पुरवले?

१७ मिद्यांनी आणि इतरांनी इस्राएलांवर आक्रमण केले तेव्हा शास्ता गिदोनाने धैर्याने यहोवा देवावर भाव ठेवला. जरी जवळजवळ १,३५,००० आक्रमक असले तरी, देवाने दिलेल्या विजयाचे श्रेय, इस्राएलाच्या ३२,००० लढाऊ मनुष्यांचा स्वतःच्या पराक्रमामुळे त्यांना विजय मिळाला असा कल झाला असता. यहोवाच्या मार्गदर्शनामुळे, गिदोनाने त्याची सेना कमी करून १०० लोकांचे तीन समुह बनवले. (शास्ते ७:१-७, १६; ८:१०) त्या रात्री मिद्यानांच्या छावणीला ३०० लोकांनी घेरले तेव्हा प्रत्येकाजवळ रणशिंगे, घडे व त्या घड्यांच्या आत दिवट्या होत्या. संकेत मिळताच, त्यांनी रणशिंगे फुंकून घडे फोडले, दिवट्या उंच केल्या आणि “यहोवाची तरवार गिदोनाची तरवार” असा घोष केला! (शास्ते ७:२०) घाबरलेली मिद्यानी सेना पळू लागली व त्यांचा पराजय झाला. धैर्याने देवावर भाव ठेवल्यामुळे आज देखील प्रतिफळ मिळू शकते अशी खात्री या घटनेने आम्हाला झाली पाहिजे.

यहोवाचा आदर करण्यास आणि शुद्ध भक्‍ती वाढवण्यासाठी धैर्य

१८. दाविदाने गल्याथला मारून टाकले तेव्हा धैर्याने त्याने काय केले?

१८ यहोवाचा आदर करण्यास व शुद्ध भक्‍ती वाढवण्यासाठी काही पवित्र शास्त्र उदाहरणे धैर्य देतात. तरूण दाविदाने त्याच्या पित्याच्या मेंढरांना धाडसाने सोडवले, तसे धिप्पाड पलिष्टी गल्याथासमोर स्वतःला धैर्यवान शाबीत केले. त्याने म्हटले: “तू तरवार, भाला व बरची घेऊन मजवर चढून आला आहेस, पण इस्राएली सैन्यांच्या देवाला तू तुच्छ लेखले आहेस, त्या सेनाधीश परमेश्‍वराच्या [यहोवा, न्यूव.] नामाने मी तुजकडे आलो आहे. आज परमेश्‍वर [यहोवा, न्यूव.] तुला माझ्या हाती देईल; मी तुझा वध करीन, व तुझे शिर धडापासून वेगळे करीन; . . . तेव्हा इस्राएलामध्ये देव आहे असे अखिल पृथ्वीस विदित होईल. आणि सगळ्या समुदायास कळून येईल की परमेश्‍वर [यहोवा, न्यूव.] तरवारीने व भाल्याने विजयी होतो असे नाही, कारण हे युद्ध परमेश्‍वराचे [यहोवा, न्यूव.] आहे.” (१ शमुवेल १७:३२-३७, ४५-४७) ईश्‍वरी मदतीमुळे दाविदाने धैर्याने यहोवाचा आदर केला, गल्याथला ठार मारले व अशाप्रकारे, शुद्ध भक्‍ती करण्यासाठी पलिष्ट्यांच्या भयाला दूर करण्याची महत्त्वपूर्ण भूमिका त्याने बजावली.

१९. कोणत्या कामासाठी शलमोनाला धैर्याची आवश्‍यकता होती, आणि त्याने घेतलेला पवित्रा आमच्या दिवसात आम्ही कसा लागू करु शकतो?

१९ दाविदाचा पुत्र शलमोन, देवाचे मंदिर बांधण्याच्या बेतात असताना, त्याच्या वृद्ध पित्याने त्याला आर्जवले: “हिंमत बांध, धैर्य धर आणि हे कार्य कर. भिऊ नको किंवा खचू नको कारण परमेश्‍वर [यहोवा, न्यूव.] देव माझा देव तुझ्याबरोबर आहे. परमेश्‍वराच्या [यहोवा, न्यूव.] मंदिराच्या सेवेचे सर्व काम समाप्त होईपर्यंत तो तुला अंतरणार नाही तुला सोडणार नाही.” (१ इतिहास २८:२०) शलमोनाने धैर्याने कृती करून यशस्वीपणे मंदिर बांधले. ईश्‍वरशासित बांधणी कार्यक्रम आज एक आव्हान प्रस्तुत करतो तेव्हा, दाविदाच्या शब्दांची आठवण आपण ठेवू या: “हिंमत बांध, धैर्य धर आणि हे कार्य कर.” यहोवाचा आदर करण्याचा आणि शुद्ध भक्‍तीला वाढवण्याचा किती उत्तम मार्ग आहे!

२०. कशाच्या बाबतीत आसा राजाने धैर्य दाखवले?

२० यहोवाचा आदर करण्याची व शुद्ध भक्‍ती वाढवण्याच्या इच्छेमुळे आसा राजाने यहुदातील मूर्त्या व मंदिरातील पुरूषगमन करणाऱ्‍यास घालवून दिले. त्याने त्याच्या धर्मत्यागी आजीला उच्च पदावरून दूर करून तिची “अमंगळ मूर्ती” देखील जाळून टाकली. (१ राजे १५:११-१३) होय, आसाला “धीर [धैर्य झाले, न्यूव.] आला व त्याने यहूदा व बन्यामीन यांच्या सर्व प्रदेशातून आणि एफ्राइमाच्या डोंगरवटीतील जी नगरे त्याने घेतली होती त्यातून सर्व अमंगळ वस्तू काढून टाकल्या आणि परमेश्‍वराची [यहोवा, न्यूव.] जी वेदी परमेश्‍वराच्या [यहोवा, न्यूव.] देवडीपुढे होती तिचा जीर्णोद्वार केला.” (२ इतिहास १५:८) तुम्ही देखील धर्मत्यागाला नाकारुन शुद्ध भक्‍ती वाढवता का? राज्याची आस्था वाढवण्यासाठी तुम्ही आपल्या भौतिक मिळकतीचा वापर करत आहात का? व यहोवाचा एक साक्षीदार या नात्याने तुम्ही, सुवार्ता घोषित करण्यात नियमित सहभाग घेण्याद्वारे त्याचा आदर करण्याचा शोध करत आहात का?

२१. (अ) आम्हाला काळाआधीच्या ख्रिश्‍चनांच्या सत्त्वनिष्ठ अहवालाची कशी मदत होऊ शकते? (ब) पुढील लेखात कशाचा विचार केला जाईल?

२१ देवाने, आरंभीच्या धैर्यवान सत्त्वनिष्ठ ख्रिश्‍चनांच्या शास्त्रवचनीय अहवालांचे जतन करून ठेवल्याबद्दल त्याचे आम्ही किती आभारी आहोत! त्यांची उत्तम उदाहरणे यहोवाची धैर्याने, ईश्‍वरी भयाने, आणि भीतीयुक्‍त आदराने सेवा करण्यासाठी आम्हाला नक्कीच मदत करू शकतात. (इब्रीयांस १२:२८) परंतु ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनात देखील ईश्‍वरी धैर्याला कृतीने दाखवण्याची उदाहरणे दिलेली आहेत. आम्हाला यहोवाच्या मार्गात धैर्याने चालण्यासाठी यातील काही अहवाल कसे मदत करू शकतात?

तुम्ही कसे उत्तर द्याल?

▫ धैर्य काय आहे?

▫ कशाप्रकारे हनोख आणि नोहाने धैर्य दाखवले?

▫ कशाच्याबाबतीत अब्राहाम, सारा, आणि इसहाक यांनी धैर्याने कृती केली?

▫ मोशे, यहोशवा, आणि कालेब यांनी कोणती धैर्याची उदाहरणे प्रदर्शित केली?

▫ देवावर भाव ठेवण्यासाठी त्यांच्याजवळ धैर्य आहे हे इतरांनी कसे दाखवले?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२६ पानांवरील संक्षिप्त आशय]

गिदोन आणि त्याच्या योद्धांच्या समूहाने यहोवावर धैर्याने भाव ठेवला