व्हिडिओ पाहण्यासाठी

“नम्र जनांच्या ठायी ज्ञान असते”

“नम्र जनांच्या ठायी ज्ञान असते”

“नम्र जनांच्या ठायी ज्ञान असते”

एखाद्याच्या मर्यादांची जाणीव; तसेच पावित्र्य किंवा व्यक्‍तिगत शुद्धता, अशा प्रकारे नम्रतेची व्याख्या केली जाते. त्सा·नाʽʹ या मूळ हिब्रू क्रियापदाचे मीखा ६:८ मध्ये, ‘नम्रभाव’ असे एकदाच भाषांतर करण्यात आले आहे. जुन्या कराराचा हिब्रू व इंग्रजी शब्दकोश (इंग्रजी) म्हणतो, की ते लाजाळू, सभ्य किंवा नम्र व्यक्‍तीची कल्पना देते. ‘नम्रता’ हा शब्द एई·डोसʹ या ग्रीक शब्दाचे भाषांतर आहे. (१ तीमथ्य २:९) एई·डोसʹ हा शब्द नैतिक अर्थाने वापरल्यास, इतरांच्या भावनेबद्दल किंवा मताबद्दल अथवा एखाद्याच्या विवेकाबद्दल आदर, भय व सन्मान ही भावना व्यक्‍त करतो व म्हणूनच लज्जा, स्वाभिमान, आदराची भावना, नेमस्तपणा व सभ्यता यांना व्यक्‍त करते. अशा प्रकारे, एई·डोसʹ या शब्दाद्वारे सूचित होणाऱ्‍या निर्बंधात्मक परिणामामध्ये खासकरून विवेक समाविष्ट आहे.

देवासमक्ष

नम्रतेच्या बाबतीत, स्वतःबद्दलच्या योग्य समीक्षेच्या अर्थाने शास्त्रवचने पुष्कळ सल्ला देतात. “नम्र जनांच्या ठायी ज्ञान असते,” असे नीतिसूत्र म्हणते. कारण नम्र व्यक्‍ती, मगरूरी किंवा बढाई यासोबत असणाऱ्‍या अनादराला टाळते. (नीतिसूत्रे ११:२) ती यहोवाच्या स्वीकृत मार्गाने चालते व म्हणून सूज्ञ होते. (नीतिसूत्रे ३:५, ६; ८:१३, १४) अशा मनुष्यावर यहोवा प्रीती करतो व त्याला ज्ञान देतो. “देवासमागमे राहून नम्रभावाने चालणे” ही, यहोवाची कृपापसंती प्राप्त करण्यासाठी आणखी एक आवश्‍यकता आहे. (मीखा ६:८) देवासमोर एखाद्याच्या दर्जाची योग्य समज, यहोवाची महानता, शुद्धता आणि पवित्रता यांच्या विरोधात स्वतःची पापमय स्थिती ओळखणे यामध्ये समाविष्ट आहे. आपण यहोवाची एक सृष्टी आहोत, त्याच्यावर पूर्णपणे विसंबून आहोत व त्याच्या सार्वभौमत्वाच्या अधीन आहोत हे एखाद्याने ओळखणे असा देखील त्याचा अर्थ होतो. हीच गोष्ट हव्वा समजू शकली नाही. तिने पूर्ण स्वातंत्र्य व स्वयंनिर्णय मिळवण्याचा प्रयत्न केला. नम्रतेने तिला, “देवासारखे बरेवाईट जाणणारे” होण्याचा विचार मनातून काढून टाकण्यासाठी मदत केली असती. (उत्पत्ति ३:४, ५) आत्मविश्‍वास आणि मगरूरपणा यांच्याविरूद्ध सल्ला देताना प्रेषित पौल म्हणतो, “भीत व कापत आपले तारण साधून घ्या.”—फिलिप्पैकर २:१२.

कशाबद्दल बढाई मारावी

बढाई, नम्रतेच्या विरुद्ध आहे. नियम असा आहे: “स्वमुखाने नव्हे, तर इतरांनी, आपल्या तोंडाने नव्हे तर परक्यांनी तुझी प्रशंसा करावी.” (नीतिसूत्रे २७:२) यहोवाचे स्वतःचे शब्द ह्‍याप्रमाणे आहेत: “ज्ञान्याने आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगू नये; बलवानाने आपल्या बळाचा व श्रीमंताने आपल्या श्रीमंतीचा अभिमान बाळगू नये. बाळगावयाचा असला तर, मी दया करणारा व पृथ्वीवर धर्म व न्याय चालविणारा परमेश्‍वर [यहोवा, NW] आहे, याची त्याला जाणीव आहे, ओळख आहे, याच्याविषयी बाळगावा; यात मला संतोष आहे.”—यिर्मया ९:२३, २४; पडताळा नीतिसूत्रे १२:९; १६:१८, १९.

नम्र लोकांविषयी देवाचा आदर

प्रेषित पौल नम्र लोकांबद्दल देवाला असलेला आदर दाखवतो तसेच मंडळीतील अशा नम्र मनोवृत्तीच्या स्वतःच्या अनुकरणीय वर्तनाचा उल्लेख करतो. त्याने करिंथमधील ख्रिश्‍चनांना लिहिले: “तर बंधुजनहो, तुम्हांस झालेले पाचारणच घ्या; तुमच्यामध्ये जगाच्या दृष्टीने ज्ञानी, समर्थ, कुलीन, असे पुष्कळ जण नाहीत, तरी ज्ञान्यांस लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले, आणि जे बलवान ते लाजवावे म्हणून देवाने जगातील जे हीनदीन, दुर्बळ ते निवडले; आणि जगातील जे धिक्कारलेले व जे शून्यवत्‌ अशांना देवाने ह्‍या करिता निवडले की, जे आहे ते त्याने रद्द करावे, म्हणजे देवासमोर कोणाहि मनुष्याने अभिमान बाळगू नये. . . . जो अभिमान बाळगतो, त्याने परमेश्‍वराविषयी तो बाळगावा ह्‍या शास्त्रलेखाप्रमाणे व्हावे. बंधुजनहो, मी तर तुमच्याकडे आलो तो वक्‍तृत्वाच्या अथवा ज्ञानाच्या श्रेष्ठतेने देवाचे रहस्य तुम्हास सांगत आलो असे नाही. कारण येशू ख्रिस्त, म्हणजे वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त ह्‍याच्याशिवाय, मी तुमच्याबरोबर असताना दुसरे काही जमेस धरू नये असा मी ठाम निश्‍चय केला; आणि मी तुमच्याजवळ अशक्‍त, भयभीत व अतिकंपित असा झालो. तुमचा विश्‍वास मनुष्यांच्या बुद्धिमत्तेवर उभारलेला नसावा तर देवाच्या सामर्थ्यावर उभारलेला दिसावा म्हणून माझे भाषण व माझी घोषणा ज्ञानयुक्‍त अशा मन वळविणाऱ्‍या शब्दांची नव्हती तर आत्मा व सामर्थ्य ह्‍यांची निदर्शक होती.”—१ करिंथकर १:२६–२:५.

शास्त्रलेखापलीकडे जाऊ नका

पौलाने ज्याप्रकारे नम्रता प्रदर्शित केली होती, स्वतःचे योग्यप्रकारे समीक्षण केले होते त्याचप्रकारे सर्वांनी नम्रता दाखवण्याच्या गरजेवर त्याने त्याच्या पत्रामध्ये नंतर जोर दिला. करिंथकरातील काही लोक विशिष्ट लोकांची, जसे की अपुल्लो व स्वतः पौलाबद्दलही, बढाई मारण्याच्या मोहास बळी पडले होते. पौलाने त्यांना दुरुस्त केले व त्यांना सांगितले, की असे केल्याने ते आध्यात्मिक नव्हे तर शारीरिक होतील व पुढे तो म्हणाला, “बंधुजनहो, मी तुमच्याकरिता ह्‍या गोष्टी अलंकारिक रीतीने स्वतःला व अपुल्लोसाला लागू केल्या आहेत; ह्‍यासाठी की, शास्त्रलेखापलीकडे कोणी जाऊ नये हा धडा तुम्ही आम्हापासून शिकावा म्हणजे तुम्हापैकी कोणीहि एकासाठी दुसऱ्‍यावर फुगणार नाही. तुला निराळेपण कोण दिले? आणि जे तुला दिलेले नाही असे तुझ्याजवळ काय आहे? तुला दिलेले असता, दिलेले नाही असा अभिमान तू का बाळगतोस?”—१ करिंथकर ४:६, ७.

येशू ख्रिस्ताचे उदाहरण

येशू ख्रिस्त नम्रतेचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. त्याने त्याच्या शिष्यांना सांगितले, की तो पित्याला जे काही करताना पाहतो त्यावाचून काहीही स्वतः होऊन करत नाही व त्याचा पिता त्याच्यापेक्षा थोर आहे. (योहान ५:१९, ३०; १४:२८) ज्या पदव्या येशूच्या पात्रतेच्या नव्हत्या त्या स्वीकारण्यास त्याने नकार दिला. एका अधिकाऱ्‍याने येशूला “उत्तम गुरुजी” असे संबोधले तेव्हा त्याने उत्तर दिले, “मला उत्तम का म्हणतोस? एकावाचून म्हणजे देवावाचून कोणी उत्तम नाही.” (लूक १८:१८, १९) शिवाय, त्याने त्याच्या शिष्यांना सांगितले, की यहोवाचे दास या नात्याने देवाच्या सेवेमध्ये त्यांनी साध्य केलेल्या गोष्टींबद्दल अथवा देवाला त्यांची किती किंमत आहे याबद्दलचा गर्व बाळगू नये. उलट, त्यांना दिलेले सर्व कार्य पूर्ण केल्यानंतर, “आम्ही निरुपयोगी दास आहो, आम्ही आमचे कर्तव्य केले आहे,” ही त्यांची मनोवृत्ती असली पाहिजे.—लूक १७:१०.

शिवाय, पृथ्वीवर परिपूर्ण मनुष्य या नात्याने प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या अपरिपूर्ण शिष्यांपेक्षा श्रेष्ठ होता तसेच त्याच्या पित्याकडून त्याला मोठा अधिकार देखील मिळालेला होता. तरीही, शिष्यांसोबत व्यवहार करताना, त्याला त्यांच्या मर्यादांची जाणीव होती. त्याने त्यांना कोमलतेने शिकवले व समर्पक शब्दांनी तो त्यांच्याशी बोलला. एकावेळेस ते जितके समजू शकत होते त्याच्यापेक्षा अधिक त्याने त्यांच्यावर लादले नाही.—योहान १६:१२; पडताळा मत्तय ११:२८-३०; २६:४०, ४१.

वेशभूषा आणि इतर मालमत्ता

मंडळीमध्ये योग्य वर्तन आचरले जात होते हे पाहताना, तीमथ्य या पर्यवेक्षकाला प्रशिक्षण देत असताना पौल म्हणाला: “स्त्रियांनी, स्वतःस साजेल अशा वेषाने आपणांस भिडस्तपणाने व मर्यादेने शोभवावे; केस गुंफणे आणि सोने, मोत्ये व मोलवान वस्त्रे ह्‍यांनी नव्हे तर देवभक्‍ति स्वीकारलेल्या स्त्रियांस शोभते तसे सत्कृत्यांनी आपणांस शोभवावे.” (१ तीमथ्य २:९, १०) येथे प्रेषित नीटनेटकेपणा व चांगुलपणा, सुखद स्वरूप याच्या विरूद्ध सल्ला देत नाही कारण तो ‘साजेल अशा वेषाची’ शिफारस करतो. पण तो, पोशाखाचा पोकळ डौल आणि भपकेबाजपणाची अयोग्यता दाखवतो ज्याद्वारे स्वतःकडे किंवा स्वतःच्या उदरनिर्वाहाच्या साधनाकडे लक्ष वेधण्यात येते. तसेच यामध्ये इतरांच्या भावनांविषयी आदर, स्वाभिमान आणि सन्मानाची जाणीव याजशी संबंधित नम्रता, समाविष्ट आहे. ख्रिश्‍चनांच्या पोशाखाच्या पद्धतीमुळे, सभ्यता, मंडळीच्या नैतिक भावना दुखावल्या जाऊ नयेत, ज्यामुळे काहींना अडखळण होऊ शकते. पोषाखाविषयीचा हा सल्ला, एखाद्या ख्रिश्‍चनाकडे असणाऱ्‍या इतर भौतिक मालमत्तेबद्दलचा योग्य दृष्टिकोन आणि वापर याविषयी यहोवाच्या मनोवृत्तीवर अधिक प्रकाश टाकील.

नम्रता, मूर्खपणाचे कार्य आणि मनोवृत्तींपासून आपला बचाव करते. नीतिसूत्रे म्हणते त्याप्रमाणे, नम्रता खरोखरच एक सूज्ञ मार्ग आहे.