सनातन राजाची स्तुती करा!
सनातन राजाची स्तुती करा!
“परमेश्वर [यहोवा, NW] युगानुयुग राजा आहे.”—स्तोत्र १०:१६.
१. सनातनतेच्या संबंधाने कोणते प्रश्न सामोरे येतात?
सनातन—तुम्ही त्याची व्याख्या कशी कराल? वेळ खरोखरच असा चिरकालिक असू शकतो असे तुम्हाला वाटते का? गतकाळ पाहिल्यास, वेळ अनादिकाळापासून आहे यात काही शंकाच नाही. तेव्हा भवितव्यामध्येही तो अनंतकाळापर्यंत का असू शकत नाही? निश्चितच, बायबलचे नवे जग भाषांतर (इंग्रजी) देव “युगानुयुग धन्यवादित” असल्याचा उल्लेख करते. (स्तोत्र ४१:१३) या संज्ञेचा काय अर्थ होतो? याजशी संबंधित असलेला विषय म्हणजे, अंतराळ याविषयाचा संदर्भ घेतल्यावर आपल्याला हे समजण्यास मदत मिळेल.
२, ३. (अ) अंतराळाविषयी कोणती माहिती आपल्याला सनातनता समजण्यास मदत करते? (ब) सनातन राजाची उपासना करण्याची आपण इच्छा का बाळगली पाहिजे?
२ अंतरीक्ष किती विस्तृत आहे? त्याला काही सीमा आहे का? ४०० वर्षांपर्यंत असे समजले जात होते, की आपली पृथ्वी विश्वमंडलाच्या केंद्रस्थानी आहे. त्यानंतर, गॅलिलीओने दुर्बीणीचा शोध लावला ज्यामुळे आकाशाचे अधिक विस्तृत दृश्य दिसू लागले. आता गॅलिलीओ इतर अनेक तारे पाहू शकत होता व पृथ्वी आणि इतर ग्रह सूर्याभोवती भ्रमण करतात हे दाखवू शकला. मंदाकिनी आता अस्पष्ट राहिल्या नाहीत. ती ताऱ्यांची अशी एक आकाशगंगा होती ज्यामध्ये जवळजवळ १०,००० कोटी तारे होते. आपण ते सर्व तारे कदाचित आपल्या संपूर्ण जीवनकालातही मोजू शकणार नाही. नंतर, खगोलशास्त्रज्ञांनी कोट्यावधी आकाशगंगांचा शोध लावण्यास सुरवात केली. सर्वात शक्तिशाली दुर्बीणी छडा लावू शकतात तेथपर्यंत पाहिल्यास या आकाशगंगा अंतरिक्षात अंतहीन प्रमाणात विखुरलेल्या आहेत. असे दिसते की अंतराळाला सीमा नाहीत. सनातनतेच्या बाबतीतही असेच आहे—त्यास ही सीमा नाहीत.
३ सनातनाची कल्पना, आपले मर्यादित मानवी मेंदू समजू शकतात त्याहीपलीकडील आहेत. परंतु, असा एक जण आहे जो त्याला पूर्णपणे समजतो. तो हजारो कोटी आकाशगंगांमध्ये असणाऱ्या शेकडो कोटी अमर्याद ताऱ्यांना मोजू शकतो. होय, तो त्यांची नावे देखील घेऊ शकतो! तो म्हणतो: “आपले डोळे वर करून पाहा; ह्यांना कोणी उत्पन्न केले? तो त्यांच्या सैन्याची मोजणी करून त्यांस बाहेर आणितो; तो त्या सर्वांस नावांनी हाका मारितो, तो महासमर्थ व प्रबळ सत्ताधीश आहे; म्हणून त्यांपैकी कोणी उणा पडत नाही. तुला कळले नाही काय? तू ऐकले नाही काय? परमेश्वर [यहोवा] हा सनातन देव, परमेश्वर, दिगंतापर्यंतच्या पृथ्वीचा उत्पन्नकर्ता, थकतभागत नाही; त्याची बुद्धि अगम्य आहे.” (यशया ४०:२६, २८) किती आश्चर्यकारक देव! निश्चितच, आपण या देवाची उपासना करण्याची मनसा राखली पाहिजे!
‘युगानुयुगाचा राजा’
४. (अ) सनातन राजाबद्दलची गुणग्राहकता दाविदाने कशी व्यक्त केली? (ब) विश्वाच्या उगमाविषयी इतिहासातील सर्वात महान शास्त्रज्ञाने कोणता निष्कर्ष काढला?
४ स्तोत्र १०:१६ मध्ये दावीद निर्माणकर्त्या देवाबद्दल म्हणतो: “परमेश्वर [यहोवा] युगानुयुग राजा आहे.” आणि स्तोत्र २९:१० मध्ये तो पुन्हा “परमेश्वर राजासनावर सर्वकाळ बसलेला आहे,” असे म्हणतो. होय, यहोवा सनातन राजा आहे! पुढे “आकाश देवाचा महिमा वर्णिते; अंतरिक्ष त्याची हस्तकृति दर्शविते,” असे म्हणून दावीद याची ग्वाही देतो, की हा गौरवी राजा, अंतराळामध्ये आपण जे काही पाहतो त्या सर्वांचा रचनाकार व सृष्टीकर्ता आहे. सुमारे २,७०० वर्षांनंतर, जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ सर आयझक न्यूटनने दावीदाच्या बोलण्याशी सहमती दर्शवली व लिहिले: “सूर्य, ग्रह आणि धुमकेतु यांची सर्वात भव्य संस्था कोणा ज्ञानवंत आणि शक्तिशाली व्यक्तीच्या उद्देशामुळे व सार्वभौमत्वामुळे येऊ शकते.”
५. बुद्धीच्या उगमाबद्दल यशया आणि पौलाने काय लिहिले?
५ सार्वभौम प्रभू यहोवा ज्याचा ‘आकाश व नभोमंडळ यांत देखील समावेश’ होऊ शकत नाही तो चिरकालिक आहे याचे ज्ञान होणे केवढे नमविणारे असेल. (१ राजे ८:२७) “आकाशाचा उत्पन्नकर्ता . . . पृथ्वीचा घडणारा व कर्ता,” असे यशया ४५:१८ मध्ये वर्णन केलेला यहोवा, मर्त्य मानवांचे मेंदू जितका ठाव घेऊ शकतात त्याच्या कितीतरी पटीने विस्तृत बुद्धीचा स्रोत आहे. १ करिंथकर १:१९ मध्ये ठळकपणे सांगितल्याप्रमाणे यहोवा म्हणाला: “मी ज्ञान्यांचे ज्ञान नष्ट करीन, व बुद्धिमंतांची बुद्धि व्यर्थ करीन.” त्यावर प्रेषित पौलाने २० व्या वचनात म्हटले: “ज्ञानी कोठे राहिले? शास्त्री कोठे राहिले? ह्या युगाचे वाद घालणारे कोठे राहिले? देवाने जगाचे ज्ञान मूर्खपणाचे ठरविले की नाही?” होय, ३ ऱ्या अध्यायाच्या १९ व्या वचनात पौल पुढे म्हणाला, “ह्या जगाचे ज्ञान देवाच्या दृष्टीने मूर्खपण आहे.”
६. “आदिपासून अंतापर्यंतचा” याच्याबद्दल उपदेशक ३:११ काय सूचित करते?
६ आकाशातील घनवस्तू त्या सृष्टीचा भाग आहेत ज्याच्याबद्दल शलमोन राजाने असे म्हटले: “आपआपल्या समयी होणारी हरएक वस्तु त्याने सुंदर बनविली आहे; त्याने मनुष्याच्या मनात अनंतकालाविषयीची कल्पना उत्पन्न केली आहे; तरी देवाचा आदिपासून अंतापर्यंतचा कार्यक्रम मनुष्याला उमगत नाही.” (उपदेशक ३:११) खरेच, “आदिपासून अंतापर्यंतचा” म्हणजे सनातनतेचा अर्थ शोधण्याची कल्पना माणसाच्या हृदयातच बिंबवली आहे. पण तो अशाप्रकारचे ज्ञान प्राप्त करू शकेल का?
जीवनाची आश्चर्यकारक आशा
७, ८. (अ) मानवजातीसमोर जीवनाची कोणती विस्मयकारक आशा आहे, व ती कशी प्राप्त करता येईल? (ब) ईश्वरी शिक्षण चिरकालासाठी असेल याबद्दल आपण आनंद का करावा?
७ येशू ख्रिस्त प्रार्थनेमध्ये यहोवाला म्हणाला: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.” (योहान १७:३) आपण अशाप्रकारचे ज्ञान कसे प्राप्त करू शकतो? आपण देवाचे वचन पवित्र बायबल याचा अभ्यास केला पाहिजे. त्यामुळे आपण देवाच्या महान उद्देशांचे अचूक ज्ञान प्राप्त करू शकतो, ज्यामध्ये परादीस पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनासाठी त्याच्या पुत्राद्वारे त्याने केलेली तरतूद समाविष्ट आहे. ते १ तीमथ्य ६:१९ मध्ये उल्लेखलेले “खरे जीवन” असेल. हे, “युगादिकालाचा संकल्प [देवाने] आपल्या प्रभु ख्रिस्त येशूमध्ये सिद्धीस नेला,” असे इफिसकर ३:११ मध्ये ज्याचे वर्णन केले आहे त्याच्यानुसार असेल.
८ होय, आपण पापी मानव ईश्वरी शिक्षण आणि येशूच्या खंडणी बलिदानावर विश्वास ठेवण्याद्वारे सार्वकालिक जीवन प्राप्त करू शकतो. हे शिक्षण किती काळासाठी चालेल? ते चिरकालासाठी असेल कारण मानवजातीला प्रगतीशीलपणे आपल्या सृष्टीकर्त्याच्या ज्ञानात प्रशिक्षण दिले जात आहे. यहोवाच्या ज्ञानाला सीमा नाही. हे ओळखून प्रेषित पौल म्हणाला: “अहाहा, देवाच्या बुद्धिची व ज्ञानाची संपत्ति किती अगाध आहे! त्याचे निर्बंध किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत!” (रोमकर ११:३३) यास्तव, १ तीमथ्य १:१७ यहोवाला ‘सनातन राजा’ असे संबोधते ते खरेच किती उचित आहे!
यहोवाचे सर्जनशील ज्ञान
९, १०. (अ) यहोवाने मानवजातीला बक्षीस म्हणून दिलेल्या पृथ्वीला तयार करताना त्याने कोणकोणती महान कार्ये साध्य केली? (ब) यहोवाची सर्वोत्कृष्ट बुद्धी त्याच्या सृष्टीमधून कशी प्रकट होते? (चौकोन पाहा.)
९ सनातन राजाने आम्हा मानवांसाठी पुरवलेल्या भव्य वारशाचा अंमळ विचार करा. स्तोत्र ११५:१६ आपल्याला सांगते: “स्वर्ग तर परमेश्वराचा [यहोवाचा] आहे; पण पृथ्वी त्याने मानवजातीला दिली आहे.” ती खरोखरच एक विस्मयकारक मालमत्ता आहे असे तुम्हाला वाटत नाही का? नक्कीच! शिवाय, वसुंधरेला आपले वास्तव्य बनवण्यात सृष्टीकर्त्याच्या उल्लेखनीय दूरदृष्टीची आपण किती कदर करतो!—स्तोत्र १०७:८.
१० उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायातील सहा सर्जनशील “दिवसांमध्ये” पृथ्वीवर आश्चर्यकारक वाढ झाली, प्रत्येक दिवस हजारो वर्षांच्या कालावधीचा होता. देवाची ही सृष्टी कालांतराने संपूर्ण वसुंधरेला, हिरवागार गवताळ गालिछा, भव्य जंगले आणि रंगीबेरंगी फुलांनी आच्छादणार होती. तिच्यावर ‘आपआपल्या जातीच्या प्राण्यांना उत्पन्न करणारे पुष्कळ आकर्षक समुद्र प्राणी, दिमाखदार पंखाच्या पक्ष्यांचे थवे, पाळीव व हिंस्र प्राण्यांचा अफाट समूह देखील राहणार होता. स्त्री आणि पुरुषाच्या सृष्टीच्या वर्णनानंतर उत्पत्ति १:३१ आपल्याला सांगते: “आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले.” त्या पहिल्या मानवांच्या सभोवतालचे वातावरण किती रम्य होते! या सर्व सृष्टींमधून आपल्याला आपल्या प्रेमळ निर्माणकर्त्याचे ज्ञान, दूरदृष्टी आणि प्रेम समजून येत नाही का?—यशया ४५:११, १२, १८.
११. शलमोनाने यहोवाच्या सर्जनशील बुद्धीची स्तुती कशी केली?
११ शलमोन, सनातन राजाची बुद्धी पाहून अचंबित झाला. त्याने वारंवार सृष्टीकर्त्याच्या बुद्धीकडे लक्ष आकर्षित केले. (नीतिसूत्रे १:१, २; २:१, ६; ३:१३-१८) शलमोन आपल्याला खात्री देतो, की “पृथ्वीच कायती सदा कायम राहते.” आपल्या पृथ्वीला तजेला देण्यासाठी पर्जन्य मेघ जी भूमिका निभावतात त्याच्यासोबत सृष्टीच्या अनेक आश्चर्यांचे महत्त्व त्याने जाणले. म्हणूनच त्याने लिहिले: “सर्व नद्या सागराला जाऊन मिळतात तरी सागर भरून जात नाही; ज्या स्थली त्या जाऊन मिळतात तेथेच त्या पुनः पुनः वाहत राहतात.” (उपदेशक १:४, ७) अशाप्रकारे वर्षा आणि नद्या यांनी, पृथ्वीला ताजे केल्यानंतर त्यांच्यातील पाणी सागरांतून पुन्हा मेघांमध्ये परत जाते. हे शुद्धीकरण आणि पाण्याचे चक्र नसते तर ही पृथ्वी कशी असती आणि आपण कोणत्या स्थितीत असतो?
१२, १३. देवाच्या सृष्टीबद्दल आपण गुणग्राहकता कशी दाखवू शकतो?
१२ सृष्टीतील समतोलपणाबद्दल आपण दाखवत असलेल्या गुणग्राहकतेला आपल्या कृत्यांचा आधार असला पाहिजे; त्याबद्दल शलमोन राजाने उपदेशकाच्या शेवटल्या शब्दांमध्ये असे म्हटले की, “आता सर्व काही तुम्ही ऐकले; सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ; मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे. सगळ्या बऱ्यावाईट गुप्त गोष्टींचा न्याय करिताना देव सगळ्या कृत्यांची झाडाझडती घेईल.” (उपदेशक १२:१३, १४) देवाला नापसंत असलेले कोणतेही कार्य करण्याची आपल्याला भीती वाटली पाहिजे. उलट, आदरयुक्त भीतीने आपण त्याच्या अधीन राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
१३ निश्चितच, आपण सनातन राजाच्या सृष्टीच्या वैभवी कार्यांसाठी त्याची स्तुती करण्यास इच्छा बाळगली पाहिजे. स्तोत्र १०४:२४ असे घोषित करते: “हे परमेश्वरा, [यहोवा] तुझी कृत्ये किती विविध आहेत! ती सर्व तू सूज्ञतेने केली; तुझ्या समृद्धीने पृथ्वी भरलेली आहे.” तेव्हा आपण स्वतःला आणि इतरांना या स्तोत्राचे शेवटले वचन मान्य करून आनंदाने म्हणू या: “हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. परमेश्वराचे स्तवन करा.”
परम पार्थिव सृष्टी
१४. मानव ही देवाची सृष्टी प्राण्यांपेक्षा सर्वोत्कृष्ट कशी आहे?
१४ यहोवाची सर्व सृष्टी अत्युकृष्ट आहे. पण सर्वात उल्लेखनीय पार्थिव सृष्टी म्हणजे, आपण—मानवजात आहोत. यहोवाच्या निर्मिती काळाच्या सहाव्या दिवसाच्या कळसास आदाम आणि मग हव्वेला निर्माण करण्यात आले—मासे, पक्षी आणि प्राण्यांपेक्षा किती तरी पटीने सर्वोत्कृष्ट अशी सृष्टी! या सृष्टीतील अनेकांना उपजत बुद्धी असली तरी, मानवजातीला तर्क करण्याची शक्ती, बरोबर आणि चूक यांच्यातील फरक करू शकणारा विवेक, भवितव्यासाठी योजना बनवण्याची क्षमता आणि उपासना करण्याची स्वाभाविक इच्छा बहाल करण्यात आली आहे. हे सर्व काही कशा प्रकारे अस्तित्वात आले बरे? निर्बुद्ध पशूंपासून उत्क्रांती होण्याऐवजी मानवाला देवाच्या प्रतिरूपात निर्माण करण्यात आले होते. म्हणूनच तर केवळ मनुष्य आपल्या सृष्टीकर्त्याचे गुण प्रतिबिंबित करू शकतो. “परमेश्वर, [यहोवा] परमेश्वर, दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर,” अशा प्रकारे या सृष्टीकर्त्याने स्वतःची ओळख करून दिली आहे.—निर्गम ३४:६.
१५. आपण यहोवाची स्तुती लीनतेने का केली पाहिजे?
१५ आपल्या शरीराच्या असाधारण रचनेसाठी आपण यहोवाची स्तुती करू व आभार मानू या. जीवनासाठी आवश्यक असलेला रक्त प्रवाह दर ६० सेकंदांना संपूर्ण शरीरात वाहतो. अनुवाद १२:२३ म्हणते त्याप्रमाणे, ‘रक्त हे जीव’—आपले जीवन देवाच्या नजरेत बहुमूल्य आहे. बळकट हाडे, लवचीक स्नायू आणि प्रतिसादात्मक चेतासंस्था यांच्यावर एक मेंदू आहे जो कोणत्याही प्राण्याच्या मेंदूपेक्षा सर्वोत्कृष्ट आहे व ज्याच्या क्षमता गगनचुंबी इमारतीच्या आकाराच्या संगणकामध्ये सुद्धा मावणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला लीन असल्यासारखे वाटत नाही का? असे वाटले पाहिजे. (नीतिसूत्रे २२:४) शिवाय यांचा देखील विचार करा: कोणत्याही हजारो मानवी भाषा बोलण्यासाठी आपली फुफ्फुसे, कंठ, जीभ, दात, तोंड परस्परांमध्ये कार्य करतात. दाविदाने उचितपणे यहोवाला हे गीत गायिले: “भयप्रद व अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे; म्हणून मी तुझे उपकारस्मरण करितो; तुझी कृत्ये अद्भुत आहेत हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे.” (स्तोत्र १३९:१४) दाविदासह आपणही आपला विलक्षण रचनाकार आणि देव, यहोवा याची आभारप्रदर्शनासह स्तुती करू या!
१६. एका प्रसिद्ध संगीतकाराने यहोवाची स्तुती करण्यासाठी कोणते गीत रचले व कोणत्या प्रेरक आमंत्रणाला आपण प्रतिसाद देऊ शकतो?
१६ जोसफ हेडनद्वारे १८ व्या शतकात धर्मविषयक गीतांच्या एका पुस्तकात यहोवाच्या स्तुतीत असे म्हटले आहे: “आश्चर्यकारक असलेल्या त्याच्या कार्यांसाठी त्याचा धन्यवाद करा! त्याचा सन्मान, त्याचे वैभव गा, त्याच्या नावाची स्तुती व महिमा करा! यहोवाची स्तुती सर्वकाळ राहील, आमेन, आमेन!” याहूनही अधिक मधुर म्हणजे स्तोत्रसंहितेत वारंवार उल्लेखलेल्या प्रेरित अभिव्यक्ती आहेत, जसे की १०७ व्या स्त्रोतात चार वेळेस दिलेले आमंत्रण: “परमेश्वराच्या [यहोवाच्या] दयेबद्दल व त्याने मनुष्यांसाठी केलेल्या अद्भुतकृत्याबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत.” तुम्ही देखील या स्तुतीत भाग घेत आहात का? तुम्ही घेतला पाहिजे, कारण खरोखरच अस्तित्वात असलेल्या सर्व सुंदर गोष्टीचा उगम यहोवा, सनातन राजा आहे.
आणखी शक्तिशाली कार्ये
१७. कशाप्रकारे ‘मोशेचे आणि कोकऱ्याचे गीत’ यहोवाची महिमा करते?
१७ गेल्या सहा हजार वर्षांदरम्यान सनातन राजाने शक्तिशाली कार्ये देखील केली आहेत. बायबलच्या शेवटल्या पुस्तकात म्हणजे प्रकटीकरण १५:३, ४ मध्ये आपण दुरात्मिक शत्रुंवर विजय मिळवणाऱ्या स्वर्गातील लोकांबद्दल वाचतो: “ते देवाचा दास मोशे ह्याचे गीत व कोकऱ्याचे गीत गाताना म्हणतात; हे प्रभू देवा हे सर्वसमर्था, तुझी कृत्ये थोर व आश्चर्यकारक आहेत; हे राष्ट्राधिपते, तुझे मार्ग नीतीचे व सत्य आहेत; हे प्रभो तुला कोण भिणार नाही? तुझ्या नावाला कोण महिमा देणार नाही? कारण तूच मात्र पवित्र आहेस; आणि तुझी न्यायकृत्ये प्रगट झाली आहेत, म्हणून सर्व राष्ट्रे तुझ्यासमोर येऊन तुला नमन करितील.” या गीताला ‘मोशेचे आणि कोकऱ्याचे गीत’ का म्हटले आहे बरे? चला पाहू या.
१८. निर्गम १५ व्या अध्यायातील गीतात कोणत्या महान कार्याचे स्मरण करण्यात आले आहे?
१८ सुमारे ३,५०० वर्षांआधी, फारोचे बलाढ्य सैन्य लाल समुद्रात नाश पावले तेव्हा इस्राएलांनी गीताद्वारे यहोवाची आभारप्रदर्शनासह स्तुती केली. निर्गम १५:१, १८ मध्ये आपण असे वाचतो: “तेव्हा मोशे आणि इस्राएल लोक ह्यांनी परमेश्वराला [यहोवाला] हे गीत गायिले; ते म्हणाले: मी परमेश्वराला गीत गाईन, कारण तो विजयी होऊन उन्नत झाला आहे; घोडा व स्वार त्याने समुद्रात टाकून दिले आहेत. परमेश्वर युगानुयुग राज्य करील.” या सनातन राजाचे धार्मिक नियम, त्याच्या सार्वभौमत्वाला नाकारणाऱ्या त्यांच्या शत्रूंचा न्याय करून त्यांचा नाश करताना प्रकट झाले.
१९, २०. (अ) यहोवाने इस्राएल राष्ट्र का तयार केले? (ब) कोकरा आणि इतरांनी सैतानाच्या आव्हानाला कसे उत्तर दिले आहे?
१९ हे इतके आवश्यक का झाले होते? एदेन बागेत एका कावेबाज सर्पाने आपल्या पहिल्या पालकांना पाप करण्यास लावले. यामुळे सर्व मानवजातीला पापमय अपरिपूर्णता मिळाली. परंतु, सनातन राजाने त्याच्या मूळ उद्देशानुरुप त्वरित पावले उचलली ज्यामुळे पृथ्वीवरून त्याच्या सर्व शत्रूंचे उच्चाटन आणि परादीसमय परिस्थितीची पुनर्स्थापना होणार होती. सनातन राजाने इस्राएल राष्ट्र तयार केले व तो हे कसे साध्य करणार याचे पूर्वचिन्ह दाखवण्यासाठी त्याचे नियमशास्त्र दिले.—गलतीकर ३:२४.
२० परंतु, कालांतराने इस्राएल राष्ट्र अविश्वासू झाले व ही दयनीय स्थिती तेव्हा कळसास पोहंचली जेव्हा त्या राष्ट्राच्या नेत्यांनी देवाच्या एकुलत्या एका पुत्राला, त्याचा वाईटरीतीने छळ करण्यासाठी आणि त्याला ठार मारण्यासाठी रोमी लोकांच्या स्वाधीन केले. (प्रेषितांची कृत्ये १०:३९; फिलिप्पैकर २:८) परंतु, बलिदान करावयाचा “देवाचा कोकरा” या नात्याने येशूने, मृत्यूपर्यंत सचोटी राखल्यामुळे, कठीण परीक्षेत असताना पृथ्वीवरील कोणी मानव देवाला विश्वासू राहू शकत नाही असे देवाचा जुना शत्रू, सैतान याने जे आव्हान केले होते त्याचे उल्लेखनीयरीत्या खंडन केले. (योहान १:२९, ३६; ईयोब १:९-१२; २७:५) आदामाकडून अपरिपूर्णता वारशाने मिळालेली असली तरी, लाखो इतर देव-भीरु मानवांनी सैतानाच्या हल्ल्यांना तोंड देताना सचोटी राखून येशूच्या पावलांचे अनुकरण केले आहे.—१ पेत्र १:१८, १९; २:१९, २१.
२१. प्रेषितांची कृत्ये १७:२९-३१ च्या अनुषंगाने पुढे कशाची चर्चा केली जाईल?
२१ त्या विश्वासू जनांना प्रतिफळ देण्याचा आणि सत्य व धार्मिकतेच्या सर्व शत्रूंचा न्याय करण्याचा यहोवाचा दिवस जवळ आला आहे. (प्रेषितांची कृत्ये १७:२९-३१) ते कसे होईल? आमचा पुढील लेख त्याच्याबद्दल सांगेल.
उजळणी चौकोन
◻ यहोवाला ‘सनातन राजा’ असे उचितपणे का म्हटले आहे?
◻ यहोवाची बुद्धी सर्व सृष्टीमध्ये कशा प्रकारे व्यक्त होते?
◻ कोणत्या मार्गांनी मानवजात सृष्टीची सर्वोत्कृष्ट कृती आहे?
◻ कोणती कार्ये ‘मोशेच्या आणि कोकऱ्याच्या गीताची’ मागणी करतात?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१५ पानांवरील चौकट]
यहोवाचे श्रेष्ठ ज्ञान
सनातन राजाची बुद्धी कितीतरी मार्गांनी पृथ्वीवरील त्याच्या निर्मितीद्वारे प्रतिबिंबित होते. आगुराच्या शब्दांकडे लक्ष द्या: “ईश्वराचे प्रत्येक वचन शुद्ध आहे; त्याचा आश्रय करणाऱ्यांची तो ढाल आहे.” (नीतिसूत्रे ३०:५) मग आगुर, मोठ्या आणि छोट्या अशा देवाच्या अनेक जिवंत सृष्टींचा उल्लेख करतो. उदाहरणार्थ, २४ ते २८ वचनात तो असे वर्णन करतो: “लहान व अत्यंत शहाणे असे चार प्राणी पृथ्वीवर आहेत.” ते प्राणी म्हणजे मुंगी, बॅजर, टोळ आणि पाल हे आहेत.
‘उपजतच शहाणे’—होय, प्राण्यांना असेच निर्माण केले आहे. ते मानवांप्रमाणे तर्क करत नसले तरी पण जन्मापासून मिळालेल्या बुद्धीवर अवलंबून राहतात. याबद्दल तुम्हाला कधी आश्चर्य वाटले आहे का? किती शिस्तबद्ध सृष्टी आहे ती! उदाहरणार्थ, मुंग्या वसाहत करून राहतात, ज्यामध्ये राणी मुंग्या, कामकरी मुंग्या आणि नर मुंग्या असतात. काही जातींमध्ये तर कामकरी मुंग्या, त्यांनी तयार केलेल्या बागांमध्ये भाजीपाल्याच्या पानावरील कीडिची निगा देखील राखतात. तेथे ते त्या कीडिची जोपासना करतात तर शिपाई मुंग्या वारुळात प्रवेश करू पाहणाऱ्या शत्रूला पिटाळून लावतात. नीतिसूत्रे ६:६ येथे आपल्याला अशाप्रकारे सूचना दिली जाते: “अरे आळशा, मुंगीकडे जा; तिचे वर्तन पाहून शहाणा हो.” अशा प्रकारच्या उदाहरणांनी आम्हा मानवांना ‘प्रभूमध्ये असलेले पुष्कळ काम’ करण्यास प्रवृत्त करू नये का?—१ करिंथकर १५:५८.
मानवाने भली मोठी विमाने तयार केली आहेत. पण त्यापेक्षा, पक्षी कितीतरी पटीने अष्टपैलू आहेत ज्यामध्ये ३० ग्रॅमहून कमी वजन असलेल्या हमिंग पक्ष्याचा समावेश होतो! एका बोईंग ७४७ विमानाला १,८०,००० लिटर इंधन लागते, त्याला चालवण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी वर्ग लागतो आणि सागराच्या पलीकडे जाण्यासाठी क्लिष्ट नौपरिवहन व्यवस्था बनवाव्या लागतात. पण एक चिमुकला हमिंग पक्षी, उत्तर अमेरिकेपासून, मेक्सिकोचे आखात ओलांडून मग दक्षिण अमेरिकेत उड्डाण करताना केवळ एक ग्रॅम चरबीच्या इंधनावर अवलंबून असतो. टाकीभरून इंधन लागत नाही, नौपरिवहनाचे प्रशिक्षण नाही, की क्लिष्ट सागरी नकाशे किंवा संगणक नाहीत! ही सर्व क्षमता उत्क्रांतीच्या आकस्मिक प्रक्रियेमुळे आली का? मुळीच नाही! हा चिमुकला पक्षी उपजतच बुद्धिमान आहे, आणि त्याच्या सृष्टिकर्त्याने म्हणजे यहोवा देवाने त्याची तशी निर्मिती केली आहे.
[१० पानांवरील चित्रं]
‘सनातन राजाची’ वैविध्यपूर्ण सृष्टी त्याचे वैभव वाखाणते
[१५ पानांवरील चित्रं]
ज्याप्रमाणे मोशे आणि सर्व इस्राएलांनी यहोवाने तांबड्या समुद्राजवळ मिळवलेल्या विजयाचा आनंदोत्सव साजरा केला त्याचप्रमाणे हर्मगिदोनानंतर देखील मोठा आनंद असेल