व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

स्मारक विधी उचितरीत्या साजरा करा

स्मारक विधी उचितरीत्या साजरा करा

स्मारक विधी उचितरीत्या साजरा करा

सा. यु. ३३ च्या निसान १४ तारखेच्या सायंकाळी येशूने स्मारक विधीची स्थापना केली. * त्याने त्याच्या १२ शिष्यांसमवेत नुकताच वल्हांडण सण साजरा केला होता, म्हणून आपण या तारखेविषयी निश्‍चित असू शकतो. धोकेबाज यहुदाला बाहेर पाठवल्यानंतर, येशूने “भाकर घेऊन व आशीर्वाद देऊन ती मोडिली आणि त्यांस देऊन म्हटले, घ्या, हे माझे शरीर आहे. आणि त्याने प्याला घेतला व उपकारस्तुति करून त्यांना तो दिला; आणि ते सर्व जण त्यातून प्याले. तो त्यांना म्हणाला, हे नवीन करार प्रस्थापित करणारे माझे रक्‍त आहे, हे पुष्कळांकरिता ओतिले जात आहे.”—मार्क १४:२२-२४.

येशूने त्याच्या शिष्यांना, त्याच्या मृत्यूच्या महत्त्वामुळे तो साजरा करण्याची आज्ञा दिली. (लूक २२:१९; १ करिंथकर ११:२३-२६) केवळ त्याचेच बलिदान मानवजातीची वारशाने मिळालेल्या पाप आणि मृत्यू यांच्या शापातून सुटका करू शकत होते. (रोमकर ५:१२; ६:२३) त्याने जी भाकर आणि द्राक्षारस वापरला, ती त्याच्या परिपूर्ण शरीराची प्रतीके होती. मूळ तारीख माहीत असल्यामुळे यहुदी वल्हांडणासाठी केले जात होते त्याचप्रमाणे आपण देखील दर वर्षी त्याच्याशी जुळणाऱ्‍या दिवशी तो प्रसंग साजरा करू शकतो. पण आपण तो उचितपणे साजरा केला पाहिजे. का बरे?

प्रेषित पौलाने म्हटले, की भाकर आणि द्राक्षारस, या चिन्हांना सेवन करणारे “प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा” करत राहतील. (तिरपे वळण आमचे.) (१ करिंथकर ११:२६) तेव्हा तो सण साजरा करण्याचा केंद्रबिंदू, येशूचा मृत्यू आणि मानवजातीसाठी त्याचा काय अर्थ होतो हा असणार होता. हा प्रसंग गंभीर असणार होता, देवाच्या चांगुलपणावर आणि यहोवा व त्याच्या पुत्राबद्दल आपण कदर दाखवण्यावर मनन करण्याचा तो प्रसंग होता. (रोमकर ५:८; तीत २:१४; १ योहान ४:९, १०) यास्तव, पौलाने इशारा दिला: “म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल तो प्रभूचे शरीर व रक्‍त ह्‍यासंबंधाने दोषी ठरेल.”—१ करिंथकर ११:२७.

उचितरीत्या—ते कसे?

आपण जर प्रश्‍नास्पद रीतींच्या आचरणात गोवून किंवा मूर्तीपूजक रूढी स्वीकारून या प्रसंगाला भ्रष्ट केले तर देवाला यामुळे आनंद होणार नाही हे स्पष्ट आहे. (याकोब १:२७; ४:३, ४) यामुळे ईस्टर काळातील जगप्रसिद्ध घटना वगळल्या जातात. “माझ्या स्मरणार्थ हे करा,” या येशूच्या सूचनेचे पालन करताना, त्याने ज्याप्रमाणे स्मारक विधीची स्थापना केली त्याचप्रकारे आपल्याला तो साजरा करण्यास आवडेल. (लूक २२:१९; १ करिंथकर ११:२४, २५) यामुळे, ख्रिस्ती धर्मजगताच्या चर्चनी सणामध्ये ज्या साजशृंगाराची भर घातली आहे त्यांना वगळले जाईल. द न्यू कॅथलिक एन्सायक्लोपिडीआ कबूल करतो की “आजचा मास विधी आणि ख्रिस्त व त्याच्या प्रेषितांनी जो साधा सण साजरा केला त्यामध्ये पुष्कळ विभिन्‍नता आहे.” तसेच मास विधीला वारंवार, होय दररोज साजरा केल्याने ख्रिस्ती धर्मजगत, येशूने जे उद्देशिले होते त्यापासून वळले आहेत व त्यास एक सर्वसाधारण प्रसंग बनवला आहे.

पौलाने करिंथमधील ख्रिश्‍चनांना अनुचितरीत्या स्मारकविधीच्या बोधचिन्हांचे सेवन केल्याबद्दल लिहिले होते, कारण प्रभूच्या सांज भोजनाविषयी मंडळीमध्ये एक समस्या उभी राहिली होती. काहींनी त्याच्या पवित्रतेचा आदर केला नाही. ते त्यांच्यासोबत सायंकाळचे जेवण आणित आणि सभेच्या आधी व नंतर खात. बहुतेकवेळा ते अधाशीपणे खातपित. त्यामुळे ते सुस्त होत व त्यांची बुद्धी मंद होत असे. मानसिक व आध्यात्मिकरीत्या जागृत नसल्यामुळे ते “शरीराचे मर्म” ओळखू शकले नाहीत व अशाप्रकारे “प्रभूचे शरीर व रक्‍त ह्‍यांसंबंधाने दोषी” ठरले. या दरम्यान, ज्यांनी भोजन केले नाही त्यांना भूक लागल्यामुळे तेही विचलित झाले. वस्तुतः, हा सण प्रभूच्या मृत्यूच्या स्मरणार्थ केला जात आहे—अशी त्यांच्यापैकी कोणीही गुणग्राहकतेने व प्रसंगाच्या गांभिर्याला पूर्णपणे ओळखून स्मारकविधीच्या चिन्हांचे सेवन करण्याच्या स्थितीत नव्हता. यामुळे त्यांच्याविरुद्ध न्यायदंड घोषित करण्यात आला कारण ते त्याला अनादर दाखवत होते, आणि त्याला तुच्छ देखील लेखत होते.—१ करिंथकर ११:२७-३४.

समजबुद्धीची आवश्‍यकता आहे

काही जणांनी स्मारकविधीच्या बोधचिन्हांचे सेवन केले, पण त्यांचे असे करणे योग्य नव्हते. स्मारकविधीच्या चिन्हांचे जे उचितपणे सेवन करतात त्यांना देवाने निवडले आहे व त्यासाठी त्यांच्याकडे देवाच्या आत्म्याचा पुरावा आहे. (रोमकर ८:१५-१७; २ करिंथकर १:२१, २२) त्यांच्या व्यक्‍तिगत निर्णयामुळे किंवा निश्‍चयामुळे ते याकरता पात्र ठरत नाहीत. ख्रिस्तासोबत स्वर्गामध्ये राज्य करणाऱ्‍यांची संख्या देवाने १,४४,००० इतकीच मर्यादित ठेवली आहे, ख्रिस्ताच्या खंडणीपासून लाभ घेणाऱ्‍यांच्या संख्येच्या मानाने ही संख्या तुलनात्मकरीत्या अल्प आहे. (प्रकटीकरण १४:१,) ही निवड येशूच्या दिवसांमध्येच चालू झाली, आणि म्हणूनच आज इतके कमी सहभागी हयात आहेत. काही जणांवर मृत्यू ओढवतो तेव्हा ती संख्या कमी झाली पाहिजे.

एखादा चुकून स्मारकविधीच्या चिन्हांचे सेवन का करील? सर्व विश्‍वासू लोक स्वर्गात जातात—कदाचित या गत धार्मिक दृष्टिकोनांमुळे. किंवा, मी इतरांपेक्षा अधिक पात्र आहे—व प्रमुख होण्याची मनसा—कदाचित महत्त्वकांक्षा वा स्वार्थीपणामुळे. एखादी गंभीर समस्या अथवा एखाद्याला पृथ्वीच्या जीवनामधील आस्था गमावण्यास कारणीभूत ठरणारी दुर्घटना यामुळे निर्माण होणाऱ्‍या तीव्र भावनांचा तो परिणाम असेल. किंवा ज्यांना स्वर्गीय बोलावणे आले आहे अशा कोणासोबत गाढ मैत्रीमुळे ते सेवन करतील. आपण सर्वांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की निर्णय घेण्याचा एकमेव हक्क देवाचा आहे आपला नव्हे. (रोमकर ९:१६) पण मग जर एका व्यक्‍तीला ‘आत्मपरीक्षणानंतर’ समजून येते, की तिने खरोखरच स्मारकविधीच्या चिन्हांचे सेवन करायचे नाही तर तिने लागलीच ते घेण्याचे थांबवले पाहिजे.—१ करिंथकर ११:२८.

बहुतेक मानवजातीसमोर देवाने पृथ्वीवरील परादीसमध्ये चिरकालिक जीवनाची आशा ठेवली आहे. वाट पाहण्याजोगा व ज्याच्याकडे आपण सहजरीत्या आकर्षिले जाऊ शकतो असा खरोखरच तो एक महान आशीर्वाद आहे. (उत्पत्ति १:२८; स्तोत्र ३७:९, ११) पृथ्वीवर विश्‍वासू जन त्यांच्या पुनरुत्थित प्रिय जनांसमवेत अब्राहाम, सारा, मोशे, रहाब, दावीद आणि बाप्तिस्मा करणारा योहान—येशूने स्वर्गीय जीवनाचा मार्ग खुला करण्याआधी जे सर्व मृत पावले त्या प्राचीन काळच्या धार्मिक लोकांसमवेत एकत्रित होतील.—मत्तय ११:११; पडताळा १ करिंथकर १५:२०-२३.

पार्थिव आशा असलेले, भाकर आणि द्राक्षारसाचे सेवन करत नसले तरी प्रभूच्या सांज भोजनाला उपस्थित राहून व आदरपूर्वक लक्ष देऊन उचितपणे साजरा करतात. त्यांनाही देवासमोर एक अनुकूल भूमिका घेण्यास शक्य करणाऱ्‍या ख्रिस्ताच्या बलिदानाचा लाभ होतो. (प्रकटीकरण ७:१४, १५) तेथे दिले जाणारे भाषण लक्षपूर्वक ऐकत असताना, पवित्र गोष्टींबद्दलची त्यांची गुणग्राहकता दृढ होते आणि देवाच्या सगळीकडच्या लोकांसोबत ऐक्यतेत राहण्याची त्यांची इच्छा बळावते.

या वर्षी, संपूर्ण पृथ्वीवर यहोवाच्या साक्षीदारांच्या सर्व ७८,००० पेक्षा अधिक मंडळ्यांमध्ये स्मारकविधी मंगळवारी, एप्रिल २ तारखेला सूर्यास्तानंतर साजरा केला जाईल. तुम्ही तेथे उपस्थित असाल का?

[तळटीपा]

^ यहुदी दिवसाची सुरवात सायंकाळी होत असे. आपल्या दिनदर्शिकेनुसार, निसान १४ या दिवसाचा कालावधी ३१ मार्चच्या गुरुवार सायंकाळपासून एप्रिल १ च्या शुक्रवार सायंकाळपर्यंत होता. स्मारक विधीची स्थापना गुरुवारी सायंकाळी करण्यात आली आणि येशूचा मृत्यू त्याच यहुदी दिवशी म्हणजे शुक्रवारी दुपारी घडला. रविवारी पहाटेच म्हणजे तिसऱ्‍या दिवशी त्याचे पुनरुत्थान झाले.

[८ पानांवरील चित्रं]

यहोवाचे साक्षीदार वर्षातून एकदाच स्मारकविधी साजरा करतात