व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“अंतःकरणात आणि मनात उत्सुकतेची आग”

“अंतःकरणात आणि मनात उत्सुकतेची आग”

“अंतःकरणात आणि मनात उत्सुकतेची आग”

“तुमची काळजी वाहणारा निर्माता आहे का? या पुस्तकाचे पान अन्‌ पान मन लावून वाचताना मला किती आनंद होतो आणि उत्साह भरून येतो त्याचे वर्णन मी शब्दांत व्यक्‍त करू शकत नाही. यामुळे अशी इच्छा निर्माण होते—नव्हे, गरज वाटते—की, अधिक जाणून घेतलेच पाहिजे. माझ्या अंतःकरणात आणि मनात उत्सुकतेची आग निर्माण केल्याबद्दल तुमचे आभार मानते.”

उत्तर कॅरोलिना, संयुक्‍त संस्थाने येथील यहोवाची साक्षीदार असलेल्या एका बहिणीला, १९९८/९९ मधील “ईश्‍वरी जीवनाचा मार्ग” प्रांतीय अधिवेशनांमध्ये वॉचटावर संस्थेद्वारे अनावरण केलेल्या पुस्तकाबद्दल असे वाटले. तुमच्याजवळ या पुस्तकाची प्रत नसली, तरी इतरांनी काय प्रतिक्रिया दाखवली ते पाहा.

सॅन डिगो, कॅलिफोर्निया, संयुक्‍त संस्थाने येथील अधिवेशनात याची प्रत मिळालेल्या एका माणसाने काही दिवसाने लिहिले: “हे पुस्तक माझा विश्‍वास मजबूत करणारं आहे असं मला वाटतंय. त्याच्यामुळे, यहोवाच्या निर्मिती कार्यांबद्दल माझ्या मनात गाढ कदर निर्माण होते. मी पृष्ठ ९८ पर्यंत येऊन पोहंचलोय आणि आता लवकरच हे पुस्तक वाचून संपेल याचं मला वाईट वाटतंय! इतका समाधानकारक आनंद मला यातून मिळालाय.”

एका पौर्वात्य स्त्रीने लिहिले: “प्रांतीय अधिवेशनातील वक्‍त्‌याने ‘अनोखे पुस्तक’ असा शब्दप्रयोग वापरला आणि हा शब्दप्रयोग या पुस्तकातील मजकुराला अगदी शोभतो. यात एक उल्लेखनीय गोष्ट अशी आहे की, हे पुस्तक देव अस्तित्वात आहे ही गोष्ट वाचकावर थोपवत नाही पण तरीही वस्तुस्थिती सादर करते.”

या वस्तुस्थितींमध्ये आपल्या विश्‍वाबद्दल, जीवनाबद्दल आणि आपल्याबद्दल काही मनोवेधक वैज्ञानिक शोध समाविष्ट आहेत. यामुळे अनेकजण प्रभावित झाले. “या छोट्याशा पुस्तकाने माझ्यावर केवढा खोल परिणाम केला आहे याचे वर्णन करायला मला शब्द सापडत नाहीत,” असे कॅलिफोर्निया येथील एका स्त्रीने लिहिले. “पुस्तक वाचायला सुरवात केल्यावर मला थांबवावंसं वाटलंच नाही कारण प्रत्येक पानावर आपल्या विश्‍वाबद्दल आणि खुद्द जीवनाबद्दल अधिकाधिक नवीन शोध देण्यात आले होते. मला पुष्कळ शिकायला मिळालं! हे छोटंसं पुस्तक मी खूप जपून ठेवणार आहे आणि होता होईल तितक्या लोकांना यातली माहिती सांगणार आहे.”

या पुस्तकात, निर्मात्याच्या व्यक्‍तिमत्त्वावर भर देऊन बायबलचा सारांश ज्या तऱ्‍हेने देण्यात आला आहे ते पुष्कळांना आवडले. “पुस्तकाच्या मागच्या बाजूला बायबलबद्दल जो सार देण्यात आला आहे तो माझ्या आतापर्यंतच्या वाचण्यात आलेला सर्वात उत्तम भाग आहे,” असे बहुतेकांच्या तोंडून ऐकायला मिळते. न्यूयॉर्क, संयुक्‍त संस्थाने येथील एका अधिवेशनानंतर लागलीच आणखी एका स्त्रीने लिहिले: “तुम्ही छापलेले नवीन पुस्तक सर्वात चित्तवेधक प्रकाशन असले पाहिजे. निर्मात्याच्या अस्तित्वाला सिद्ध करणारे वैज्ञानिक पुरावे पाहून मी तर थक्क झाले. बायबलचा संक्षिप्त सारांशच, त्यात मांडलेल्या मुद्द्‌यांचे स्पष्टीकरण देण्यास आणि आणखी वाचण्याची इच्छा जागवण्यास पुरेसा आहे.”

समजण्यास सोपे असलेले विज्ञान

सुरवातीच्या अध्यायांमध्ये दिलेली वैज्ञानिक माहिती कदाचित खूपच कठीण वाटेल पण त्याबद्दलच्या काही प्रतिक्रिया येथे दिल्या आहेत.

कॅनडा येथील एका गृहस्थाने लिहिले: “तांत्रिक विषयांवरील पुस्तकांपेक्षा हे किती वेगळे आहे; त्यांचे लेखक फक्‍त मोठमोठाले शब्द वापरून लोकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, डीएनए, गुणसूत्रे वगैरे विषय ज्या कौशल्याने तुम्ही आमच्यासाठी सोपे बनवले आहेत त्याची दाद दिली पाहिजे. पुष्कळ वर्षांआधी मी अभ्यास केलेली विद्यापीठाची पाठ्यपुस्तके तुम्हीच लिहिली असती तर किती बरं झालं असतं!”

विद्यापीठातील भौतिकशास्त्राच्या एका प्राध्यापकांनी लिहिले: “क्लिष्ट तांत्रिक माहिती न देता [ते] विषयांची स्पष्ट पद्धतीने मांडणी करते. हे पुस्तक वाचकांसोबत कारणमीमांसा करते आणि त्यात अनेक सुप्रसिद्ध वैज्ञानिकांचे उतारे दिले आहेत. जो कोणी विश्‍वाच्या आणि जीवनाच्या उगमाबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहे—मग तो वैज्ञानिक असो किंवा सर्वसाधारण माणूस असो—त्याने [हे] ‘वाचून काढलेच पाहिजे.’”

नर्सिंगचा कोर्स करत असलेल्या एका तरुणीने म्हटले: “मी चवथा अध्याय काढला आणि त्यात आम्ही आमच्या वर्गात शिकत असलेल्या पुस्तकातला एक उतारा होता हे पाहून मला आश्‍चर्यच वाटले! ते पुस्तक मी आमच्या प्राध्यापकांना दिले आणि त्यातली माहिती त्यांना नक्की आवडेल असे सांगितले. पृष्ठ ५४ वर मेंदूविषयी दिलेली माहिती मी त्यांना दाखवली. त्यांनी ती स्वतः वाचली आणि मग म्हणाले, ‘हे फार मनोरंजक दिसतंय! मी जरूर पाहीन.’”

बेल्जियम येथे संसदच्या एका सदस्याने असे लिहिले: “आधुनिक विज्ञान बायबलमधील एकेश्‍वरवादाच्या दृष्टिकोनाविरुद्ध नाही तर उलट त्याच्याशी सहमत आहे याला आधार देणारी वैज्ञानिक माहिती वाचून मला आश्‍चर्य वाटले आणि माझे लक्ष वेधले गेले. हा अत्यंत महत्त्वाचा दृष्टिकोन आहे.”

निर्मात्याला चांगल्यारीतीने जाणून घेणे

या पुस्तकामुळे अनेक देशांतील लोक देवाला चांगल्यारीतीने जाणून घेऊ शकले आणि त्याच्या समीप असल्यासारखे त्यांना वाटले आहे. जपानच्या फुकुओका शहरातील एका महिला वाचकाने असे निरीक्षिले: “यहोवावर पहिल्याच वेळी जणू सगळं लक्ष केंद्रीत केल्यासारखं वाटत होतं. या पुस्तकात अत्यंत सुरेखपणे खात्री पटवणारी माहिती दिली आहे. मी यहोवाला अशा एका दृष्टिकोनातून जाणून घेऊ शकलो ज्याचा मी आजपर्यंत कधी विचार केला नव्हता.” एल साल्व्हादोर येथील एकाने लिहिले: “देव सदय, कृपाळू, मंदक्रोध आणि दयामय कसा आहे हे तुम्ही फार स्पष्टपणे समजावले. त्याच्या आणि त्याच्या पुत्रासोबत जवळचा नातेसंबंध असण्याकरता आपल्याला अगदी याचीच गरज आहे. हे पहिलेच पुस्तक आहे ज्यात यहोवाच्या भावना आणि त्याचा पुत्र, येशू याच्या मानवी भावना यांचे वर्णन केले आहे.” तसेच झांबियातील एका वाचकाची अशी प्रतिक्रिया होती: “यहोवा मला एक नवीनच व्यक्‍ती वाटला.”

म्हणूनच, यहोवाचे साक्षीदार इतरांसोबत तुमची काळजी वाहणारा निर्माता आहे का? या पुस्तकातली माहिती इतरांना सांगण्यास फार उत्सुक आहेत. एकीने असे निरीक्षण केले: “माझा १० वा अध्याय [“निर्माता काळजी वाहतो तर मग इतके दुःख का?”] वाचून झाल्यावर, ‘अगदी हेच पुस्तक आम्हाला जपानमध्ये हवंय’ असेच उद्‌गार माझ्या तोंडून निघाले! या अध्यायातली माहिती नीट लक्षात ठेवून तिचा क्षेत्र सेवेत अधिकाधिक उपयोग करायला मला आवडेल.” आणखी एक स्त्री एका मुलीसोबत बायबलचा अभ्यास करत आहे; ती मुलगी मठात लहानाची मोठा झाली आहे, तिथे तिचे वडील पुजारी आहेत. “निर्माता अस्तित्वात असण्याची कल्पना स्वीकारायला तिला फार कठीण जातं. या पुस्तकातले स्पष्टीकरण, वाचकावर कोणतेच विचार किंवा कल्पना थोपवत नाही पण त्यात वस्तुस्थिती दिल्या आहेत म्हणून मला वाटतं की बौद्ध लोकांनाही निःसंकोचपणे ते वाचता येऊ शकते. त्याने आपल्याला यहोवाचे प्रेमही अधिक जाणवते.”

इंग्लंडहून या पुस्तकावर अशी टिप्पणी करण्यात आली: “मी एवढ्यातच निर्माता पुस्तक वाचून पूर्ण केले आहे आणि पुन्हा एकदा वाचायला सुरवात करणार आहे. अगदी सुरेख पुस्तक आहे! हे वाचताना मनात यहोवाबद्दलचे प्रेम दाटून येते. मी एक प्रत माझ्या शेजारणीला दिली, तिने तर दोन अध्याय वाचल्यावरच म्हटले, ‘ते पुस्तक एकदा हातात घेतलं की खाली ठेवावंसं वाटतच नाही इतकं उत्सुकता जागवणारं आहे.’ मला याची खात्री आहे की या पुस्तकामुळे लोकांना आपल्या महान निर्मात्याला जाणून त्याच्यावर प्रेम करायला मदत होईल.”

मॅरीलंड, संयुक्‍त संस्थाने येथील एका गृहस्थाने म्हटले: “आध्यात्मिकरित्या हे पुस्तक मला फार उत्तेजन देणारं वाटलं! मला जिथं जिथं काम करावं लागतं तिथल्या सगळ्या लोकांना मी एक प्रत द्यायचं ठरवलंय. काही वेळा या व्यस्त असलेल्या शिक्षित लोकांना साक्ष कशी द्यावी हेच मला कळत नाही. पण या पुस्तकाच्या साहाय्याने मला आता बोलण्याची आकर्षक, प्रभावशाली पद्धत सापडेल.”

स्पष्टतः, तुमची काळजी वाहणारा निर्माता आहे का? या पुस्तकाचा सबंध जगभरातील लोकांवर सकारात्मक प्रभाव पडेल.

[२५ पानांवरील चित्राचे श्रेय]

वरील मुखपृष्ठ छायाचित्र, इगल नेब्युला: J. Hester and P. Scowen (AZ State Univ.), NASA