व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नियमन मंडळाचे नवीन सदस्य

नियमन मंडळाचे नवीन सदस्य

नियमन मंडळाचे नवीन सदस्य

शनिवारी, ऑक्टोबर २, १९९९ रोजी वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ पेन्सिल्व्हानियाच्या वार्षिक सभेच्या समारोपाला एक घोषणा करण्यात आली; ती ऐकून सर्वांना आश्‍चर्य वाटले. यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळात चार नवीन सदस्यांची भर पडली होती; तेथे उपस्थित असलेल्या १०,५९४ लोकांना किंवा टेलिफोनवरून हा कार्यक्रम ऐकणाऱ्‍यांना ही बातमी ऐकून अत्यानंद झाला. हे नवीन सदस्य सगळे अभिषिक्‍त ख्रिस्ती आहेत; त्यांची नावे आहेत सॅम्युएल एफ. हर्ड; एम. स्टीफन लेट; गाय एच. पियर्स; आणि डेव्हिड एच. स्प्लेन.

• सॅम्युएल हर्ड यांनी १९५८ मध्ये पायनियरींग करायला सुरवात केली होती; आणि १९६५ ते १९९७ पर्यंत ते विभागीय आणि प्रांतीय कार्यात होते. त्यानंतर ते आणि त्यांची पत्नी ग्लोरिया दोघेही अमेरिकेतल्या बेथेलमध्ये आले. तेथे बंधू हर्ड सेवा विभागामध्ये कार्य करत होते. सेवा समितीमध्ये ते सहायक म्हणूनही कार्य सांभाळत होते.

• स्टीफन लेट यांनी डिसेंबर १९६६ पासून पायनियरींगला सुरूवात केली; मग १९६७ ते १९७१ पर्यंत ते अमेरिकेतल्या बेथेलमध्ये सेवा करत होते. ऑक्टोबर १९७१ साली त्यांनी सुझनशी विवाह केला आणि त्यानंतर ते दोघे खास पायनियर सेवा करू लागले. त्यांनी १९७९ ते १९९८ पर्यंत विभागीय पर्यवेक्षक म्हणून कार्य केले. एप्रिल १९९८ पासून ते दोघेही अमेरिकेतल्या बेथेलमध्ये कार्य करत होते. तेथे त्यांनी सेवा विभागात कार्य केले आणि शिक्षण समितीमध्ये सहायकाचे कार्य सांभाळले.

• गाय पियर्स यांचे कुटुंब होते; १९८२ सालाच्या एप्रिलपासून त्यांनी आपल्या पत्नीसोबत पायनियरींग करायला सुरवात केली. त्यांनी १९८६ ते १९९७ पर्यंत विभागीय पर्यवेक्षकाचे काम केले आणि नंतर ते आणि त्यांची पत्नी पेनी हे दोघेही ब्रुकलिन बेथेलमध्ये काम करू लागले. बंधू पियर्स कार्यकारी समितीमध्ये सहायकाचे काम करत आहेत.

• डेव्हिड स्प्लेन यांनी सप्टेंबर १९६३ मध्ये पायनियरींग सुरू केली. गिलियडच्या ४२ व्या वर्गातून त्यांनी पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर १९ वर्षे त्यांनी आफ्रिकेच्या सेनेगल येथे मिशनरी कार्य केले आणि मग कॅनडातही विभागीय कार्य केले. ते आपल्या पत्नीसोबत अर्थात लिंडासोबत १९९० पासून अमेरिकेतल्या बेथेलमध्ये कार्य करत आहेत; तेथे बंधू स्प्लेन यांनी सेवा आणि लेखन विभागांमध्ये कार्य केले आहे. १९९८ सालापासून त्यांनी लेखन समितीमध्ये सहायकाचे कार्य केले आहे.

या चार नवीन सदस्यांव्यतिरिक्‍त नियमन मंडळात सध्या सी. डब्ल्यू. बार्बर, जे. इ. बार, एम. जी. हेन्शल, जी. लॉश, टी. झराक, के. एफ. क्लाईन, ए. डी. श्रोडर, एल. ए. स्विंगल, आणि डी. सिडलिक हेही आहेत. जगभरातल्या देवाच्या लोकांच्या कार्याची देखरेख करत असता आणि त्यांचे आध्यात्मिक हित साधत असता या नियमन मंडळाला (आता आणखी भर पडलेल्या) यहोवाने आशीर्वादित आणि बळकट करावे हीच सर्वांची यहोवाच्या चरणी प्रार्थना आहे.