व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नेदरलंडमध्ये हरएक लोकांची मदत करणे

नेदरलंडमध्ये हरएक लोकांची मदत करणे

राज्य घोषकांचा वृत्तान्त

नेदरलंडमध्ये हरएक लोकांची मदत करणे

अब्राहामाचा विश्‍वास असाधारण होता. त्याबद्दल प्रेषित पौल म्हणतो, “अब्राहामाला पाचारण झाल्यावर” त्याने देवाची आज्ञा पाळली आणि “आपण कोठे जातो हे ठाऊक नसताहि तो निघून गेला.” आपले सबंध कुटुंब घेऊन तो ‘परदेशात राहावे त्याप्रमाणे वचनदत्त देशात जाऊन राहिला.’ आपल्या आयुष्याची उरलेली शंभर वर्षे त्याने परक्या गावातच काढली.—इब्री लोकांस ११:८, ९.

त्याचप्रमाणे आजही, अनेक यहोवाच्या साक्षीदारांनी जेथे जास्त गरज आहे तेथे सेवा करण्यासाठी दुसऱ्‍या देशी जाऊन राहण्याचे आव्हान स्वीकारले आहे. इतरांनी, त्यांच्या देशात राहायला आलेल्या परदेशीयांना साक्ष देता यावी म्हणून नवीन भाषा शिकून घेतली आहे. अशाप्रकारच्या उत्साहामुळे नेदरलंडमध्ये (जेथे १ कोटी ५० लाख रहिवाशांपैकी १० लाख रहिवाशी परदेशी आहेत) “मोठे व कार्य साधण्याजोगे द्वार” उघडले गेले आहे हे पुढील उदाहरणांवरून दिसून येईल.—१ करिंथकर १६:९.

◻ मध्यपूर्वेतील एका देशात राहणारा बाराम हा पूर्वी कुंग-फूचे वर्ग शिकवायचा. त्याला बायबलची एक प्रत आणि वॉचटावर संस्थेची काही प्रकाशने मिळाली. एका महिन्यातच बारामला कळून चुकले की त्याला सत्य सापडले आहे. त्याच्यासोबत आणि त्याच्या पत्नीसोबत बायबलचा अभ्यास सुरू झाला. परंतु एक समस्या होती; ती म्हणजे, त्यांचा अभ्यास घेणाऱ्‍या व्यक्‍तीला त्यांची भाषा बोलता येत नव्हती. ते “हातवाऱ्‍याने” एकमेकांशी बोलायचे असे ते आठवून सांगतात. कालांतराने, बाराम आणि त्याच्या पत्नीला त्यांच्या मातृभाषेत चालणाऱ्‍या सभांची माहिती मिळाली व ते त्यास उपस्थित राहू लागले; त्यानंतर मात्र त्यांची प्रगती झपाट्याने झाली. सध्या बाराम हा बाप्तिस्माप्राप्त साक्षीदार आहे.

◻ एक डच साक्षीदार जोडपे, एका सुपरमार्केटसमोर उभ्या असलेल्या एका इंडोनेशियन इसमाकडे जाऊन बोलू लागले. ते दोघे त्याच्या भाषेत बोलत असल्याचे पाहून त्याला आश्‍चर्यच वाटले. त्या इसमाला पुन्हा भेटण्यासाठी योजना करण्यात आली. हा इसम २० वर्षांपासून रशियातच राहत होता आणि त्या दरम्यान तो स्त्रीरोगतज्ज्ञ बनला होता. तो नास्तिक असल्याचा दावा करत होता. परंतु प्रत्येक वेळी जेव्हा तो कोणा स्त्रीचे बाळंतपण करायचा तेव्हा त्याला नेहमीच याचे आश्‍चर्य वाटायचे की, “मानवी शरीरात कोणतीच खोट नाही! केवढा हा चमत्कार!” तो बायबलचा अभ्यास करायला तयार झाला आणि कालांतराने मानवजातीची काळजी वाहणारा एक निर्माणकर्ता आहे यावर त्याचा विश्‍वास बसला. (१ पेत्र ५:६, ७) सध्या तो बाप्तिस्माप्राप्त बांधव आहे आणि ॲमस्टरडॅम येथील इंडोनेशियन मंडळीत आहे.

◻ जगातल्या सर्वात मोठ्या बंदरांमध्ये गणल्या जाणाऱ्‍या रॉटरडॅम येथे, दररोज धक्क्यावर येणाऱ्‍या विविध भाषेच्या लोकांना प्रचार करण्यामध्ये पायनियरांचा एक गट तरबेज झाला आहे. या उत्साही प्रचारकांच्या कार्यामुळे एक कॅप्टन, एक मरीन ऑफिसर, पूर्वी बॉडीगार्ड असलेला एक इसम अशा पुष्कळांनी सत्याचा स्वीकार केला आहे. आता ते देखील देवाच्या राज्याची सुवार्ता जगभर पसरवण्यात हातभार लावत आहेत.—मत्तय २४:१४.

जगातल्या इतर भागांमधील साक्षीदारांप्रमाणे नेदरलंड येथील यहोवाचे साक्षीदारही प्रत्येक राष्ट्र, वंश, भाषा आणि लोक यांना सार्वकालिक सुवार्ता सांगण्यामध्ये भाग घेत आहेत.—प्रकटीकरण १४:६.