इशाऱ्याकडे लक्ष द्या!
इशाऱ्याकडे लक्ष द्या!
जून ३, १९९१ रोजी जपानमधील फ्युजेन पर्वताचा उद्रेक होऊन त्यातून स्फोटक वायुलोट व राखेचे फवारे बाहेर पडले. हा तप्त शिलारस पर्वताच्या उतारावरून खाली वाहत आला. या स्फोटात ४३ लोक मृत्युमुखी पडले. मरता मरता वाचलेले पुष्कळजण गंभीररित्या भाजले गेले. “पाणी, पाणी,” असा आक्रोश आसमंतात घुमत होता. त्यांना वाचवण्यासाठी अग्निशामक दल आणि पोलिस स्वतःच्या जिवाची पर्वा न करता धावपळ करत होते.
फ्युजेन पर्वतावर सुमारे दोन आठवड्यांआधी लाव्हा घुमट नजरेस पडला होता; म्हणून अधिकाऱ्यांना आणि तेथील रहिवाशांना सतर्क करण्यात आले होते. या दुर्घटनेच्या एक आठवड्याआधीच तेथील लोकांना त्या भागातून निघून जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. स्फोट होण्याच्या एक दिवस आधी पोलिसांनी पत्रकारांना प्रवेश निषेध असलेल्या भागात जाण्यास मनाई केली होती. एवढे सगळे करूनही दुपारच्या त्या भीषण वेळी ४३ लोक धोक्याच्या क्षेत्रात होते.
इतक्या जणांनी त्या भागात जाण्याची किंवा थांबण्याची जोखीम का पत्करली? आपले घरदार सोडून गेलेले काही शेतकरी त्या दिवशी आपले सामानसुमान आणि शेती पाहायला गेले होते. तीन ज्वालामुखी तज्ज्ञ आणखी जवळून अभ्यास करायला ज्वालामुखीच्या अगदी जवळ जाण्याचा प्रयत्न करत होते. काही पत्रकार आणि फोटोग्राफर धोक्याच्या क्षेत्रात गेले कारण त्यांना ज्वालामुखीच्या स्थितीविषयी माहिती हवी होती. पत्रकार ज्या टॅक्सींमधून आले होते त्या टॅक्सींचे तीन ड्रायव्हरसुद्धा घटनास्थळी होते. पोलिस आणि स्वयंसेवक अग्निशामक दलाचे जवान ड्युटीवर तैनात होते. प्रत्येकजण तेथे वेगवेगळ्या कारणांमुळे होता, पण शेवटी त्यांना आपला जीव गमवावा लागला.
तुम्ही धोक्याच्या क्षेत्रात आहात का?
आपण सगळेच जण अक्षरशः जिवंत ज्वालामुखीच्या जवळ राहत नसू. तथापि, भविष्यात एखादा जागतिक विनाश उभा ठाकला असल्यास काय? लक्षात घ्या तो विनाश जागतिक असल्यामुळे आपण सगळेच धोक्याच्या क्षेत्रात असू. मग काय? भविष्यातील माहितीचे पुस्तक म्हणून सिद्ध झालेल्या एका विश्वसनीय ग्रंथात जगव्याप्त विपत्तीचा इशारा दिला आहे आणि त्याचे असे वर्णन केले आहे: “सूर्य अंधकारमय होईल, चंद्र प्रकाश देणार नाही, तारे आकाशातून पडतील, व आकाशाची बळे डळमळतील. . . . पृथ्वीवरील सर्व जातीचे मत्तय २४:२९, ३०) येथे सांगितल्याप्रमाणे, आकाशात घडणारी ही चिन्हे विश्वभरात दिसतील आणि त्यांचा परिणाम ‘पृथ्वीवरील सर्व जातीच्या लोकांवर होईल.’ दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास, या भविष्यवाणीत सांगितलेल्या विपत्तीचा आपल्या प्रत्येकावर परिणाम होईल.
लोक शोक करितील.” (हे विश्वसनीय भविष्यवाणींचे पुस्तक म्हणजे बायबल होय. वरील शास्त्रवचनांच्या संदर्भात जागतिक आपत्तीच्या आधी घडणाऱ्या घटनांचे सविस्तर वर्णन केले आहे. शिमाबारा शहरात, अधिकाऱ्यांना लाव्हा घुमट आणि ज्वालामुखीची इतर लक्षणे दिसली म्हणून त्यांनी एका विशिष्ट भागाला धोक्याचे क्षेत्र ठरवले. त्याचप्रमाणे, बायबलमध्येही अशी काही कारणे दिली आहेत ज्यामुळे आपण सतर्क राहिले पाहिजे आणि स्वतःच्या बचावासाठी पावले उचलली पाहिजेत. फ्युजेन पर्वताच्या दुर्घटनेतून आपण काही शिकू शकतो आणि भावी घटनांचे महत्त्व जाणू शकतो.
[२ पानांवरील चित्राचे श्रेय]
COVER: Yomiuri/Orion Press/Sipa Press
[३ पानांवरील चित्राचे श्रेय]
Yomiuri/Orion Press/Sipa Press