“ख्रिस्ताचे मन” जाणून घ्या
“ख्रिस्ताचे मन” जाणून घ्या
“‘प्रभूचे मन असे कोणी ओळखले आहे की त्याने त्याला शिकवावे?’ आपल्याला तर ख्रिस्ताचे मन आहे.”—१ करिंथकर २:१६.
१, २. येशूच्या संदर्भात आपल्या वचनात काय प्रगट करणे यहोवाला अधिक श्रेयस्कर वाटले?
येशू दिसायला कसा होता? सावळा की गोरा? त्याच्या केसांचा, डोळ्यांचा रंग कसा होता? तो उंच होता की ठेंगणा? लठ्ठ की सडपातळ? कितीतरी शतकांपासून आजपर्यंत येशूची असंख्य चित्रे, प्रतिमा इत्यादी बनवण्यात आल्या आहेत; यांत कलाकारांनी आपापल्या कल्पनेनुसार येशूचे रूप साकारले. काहींनी उंचपुऱ्या, धिप्पाड तेजस्वी पुरूषाच्या रूपात त्याला दाखवले तर इतरांनी त्याचे दुर्बल, निस्तेज रूप रेखाटले.
२ बायबलमध्ये मात्र, येशूच्या बाह्य स्वरूपाचे फारसे वर्णन केलेले नाही. त्याऐवजी, दुसरे काही प्रगट करणे यहोवाला अधिक श्रेयस्कर वाटले आणि ते म्हणजे येशूचे आंतरिक व्यक्तिमत्त्व, त्याचे गुण. मत्तय, मार्क, लूक व योहान या चारही पुस्तकांत केवळ येशूने काय काय केले आणि तो काय काय बोलला याचेच वर्णन केलेले नाही, तर त्याच्या कृतींतून आणि त्याच्या शब्दांतून व्यक्त होणाऱ्या त्याच्या उत्कट भावनांवर आणि त्याच्या विचारसरणीवरही प्रकाश टाकण्यात आला आहे. देवाने प्रेरित केलेले हे चारही अहवाल आपल्याला जणू, पौलाच्या शब्दांत “ख्रिस्ताचे मन” जाणून घ्यायला साहाय्य करतात. (१ करिंथकर २:१६) आणि असे करणे, अर्थात, येशूचे विचार, त्याच्या भावना आणि त्याचे व्यक्तिमत्त्व जाणून घेणे महत्त्वाचे आहे. का? दोन कारणांमुळे.
३. ख्रिस्ताचे मन जाणून घेतल्यामुळे आपल्याला कोणते सूक्ष्मज्ञान प्राप्त होईल?
लूक १०:२२) म्हणजे दुसऱ्या शब्दांत येशू असे म्हणत होता की, ‘यहोवाला जाणून घ्यायचे असेल, तर माझ्याकडे पाहा.’ (योहान १४:९) त्याअर्थी, चार शुभवर्तमानांतून येशूच्या विचारांचा आणि भावनांचा आपण बारकाईने अभ्यास करतो तेव्हा आपण एका अर्थाने यहोवाचे विचार आणि त्याच्या भावना जाणून घेत असतो. यहोवाविषयीचे हे ज्ञान आपल्याला त्याच्या आणखी जवळ आणते.—याकोब ४:८.
३ पहिले कारण असे की, ख्रिस्ताचे मन जणू यहोवा देवाच्या मनात डोकावण्याचा एक झरोका आहे. येशू आपल्या पित्याला किती चांगल्याप्रकारे ओळखत होता याची त्याच्या पुढील शब्दांवरूनच कल्पना येते: “पुत्र कोण आहे हे पित्यावांचून कोणाला ठाऊक नाही; आणि पिता कोण आहे हे पुत्रावांचून व ज्याला तो प्रगट करावयाची पुत्राची इच्छा असेल त्याच्यावांचून कोणाला ठाऊक नाही.” (४. खऱ्या अर्थाने, ख्रिस्तासारखे वागण्याची इच्छा असल्यास आपण आधी काय केले पाहिजे आणि का?
४ येशूचे मन जाणून घेण्याचे आणखी एक कारण म्हणजे, हे आपल्याला “त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून” चालायला मदत करील. (१ पेत्र २:२१) येशूच्या पावलांवर पाऊल ठेवून चालण्यासाठी केवळ त्याच्या शब्दांची पुनरुक्ती करणे किंवा त्याच्या कृत्यांचे अनुकरण करणे इतकेच पुरेसे नाही. शब्दांवर आणि कृत्यांवर मुळात माणसाच्या विचारांचा आणि भावनांचा प्रभाव असतो; त्यामुळे, येशूच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्यासाठी त्याची “चित्तवृत्ति” किंवा मनोवृत्ती आपल्याला आत्मसात करावी लागेल. (फिलिप्पैकर २:५) दुसऱ्या शब्दांत, जर आपल्याला खरोखर ख्रिस्ताप्रमाणे वागायचे असेल तर आधी आपल्याला त्याच्यासारखा विचार करायला आणि त्याच्यासारख्या भावना व्यक्त करायला शिकावे लागेल; अर्थात अपरिपूर्ण असल्यामुळे आपल्याला हे पूर्णपणे तर साध्य करता येणार नाही, पण शक्य होईल तितका प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. हाच उद्देश डोळ्यांपुढे ठेवून, आता चार शुभवर्तमान लेखकांच्या मदतीने आपण ख्रिस्ताच्या मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न करू. सुरवातीला, येशूच्या विचारांवर आणि त्याच्या भावनांवर कोणत्या गोष्टींचा प्रभाव पडला याकडे लक्ष देऊ या.
पृथ्वीवर येण्याआधीचे त्याचे जीवन
५, ६. (अ) आपण ज्यांच्या सहवासात राहतो त्यांचा आपल्यावर कसा परिणाम होतो? (ब) पृथ्वीवर येण्याआधी देवाच्या ज्येष्ठपुत्राला स्वर्गात कोणाचा सहवास लाभला आणि याचा त्याच्यावर कसा परिणाम झाला?
५ आपण ज्यांच्या सहवासात राहतो त्यांचा आपल्या विचारांवर, भावनांवर आणि कृतींवर प्रभाव पडतोच; एकतर चांगला नाहीतर वाईट. * (नीतिसूत्रे १३:२०) या पृथ्वीवर येण्याआधी स्वर्गात येशू कोणाच्या सहवासात होता याचा विचार करा. योहानाच्या शुभवर्तमानात सांगितल्याप्रमाणे पृथ्वीवर मनुष्याच्या रूपात येण्याआधी येशू स्वर्गात “शब्द,” अर्थात देवाच्या प्रवक्त्याच्या भूमिकेत अस्तित्वात होता. योहान म्हणतो: “प्रारंभी शब्द होता, आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता.” (योहान १:१, २) यहोवा देवाला प्रारंभ नाही, त्यामुळे “प्रारंभी” शब्द देवासह होता याचा असा अर्थ होतो की देवाने सृष्टीच्या निर्मितीस प्रारंभ केला तेव्हापासून येशू देवासह होता. (स्तोत्र ९०:२) येशू हा “सर्व उत्पत्तींत ज्येष्ठ आहे.” याचा अर्थ, इतर कोणताही आत्मिक प्राणी अस्तित्वात येण्याआधी किंवा या विश्वाची निर्मिती होण्याआधी तो अस्तित्वात होता.—कलस्सैकर १:१५; प्रकटीकरण ३:१४.
६ काही वैज्ञानिकांच्या अंदाजानुसार हे विश्व कमीतकमी १२ अब्ज वर्षांपासून अस्तित्वात आहे. या अंदाजात काही तथ्य असलेच, तर आदामाच्या निर्मितीपर्यंत देवाच्या प्रथमपुत्राला कितीतरी युगे आपल्या पित्याच्या निकट सहवासात राहायला मिळाले असेल. (पडताळा मीखा ५:२.) यामुळे साहजिकच त्या दोघांत अत्यंत जवळचा असा प्रेमळ संबंध जुळला. नीतिसूत्राच्या पुस्तकात बुद्धी या गुणाच्या रूपात, देवाचा ज्येष्ठपुत्र पृथ्वीवर येण्याआधी स्वर्गात असताना असे म्हणतो: “मी त्याला नित्य आनंददायी [प्रिय] होते; त्याच्यासमोर मी सर्वदा हर्ष पावत असे.” (नीतिसूत्रे ८:३०) निश्चितच, प्रेमाचा उगम यहोवा याच्या निकट सहवासात अगणित युगे राहिल्यानंतर त्याच्या पुत्रावर याचा फार मोठा प्रभाव पडला असेल! (१ योहान ४:८) आणि म्हणूनच इतर कोणाहीपेक्षा देवाच्या पुत्राने आपल्या पित्याची विचारसरणी, त्याच्या भावना अधिक चांगल्याप्रकारे आत्मसात केल्या आणि स्वतःच्या व्यक्तिमत्त्वातून त्या प्रगटही केल्या.—मत्तय ११:२७.
पृथ्वीवरील जीवन आणि प्रभाव पाडणाऱ्या परिस्थिती
७. ज्या कारणांमुळे देवाच्या ज्येष्ठपुत्राला पृथ्वीवर यावे लागले त्यांपैकी एक कारण कोणते आहे?
७ देवाच्या पुत्राला आणखी बरेच काही शिकायचे होते; देवाच्या उद्देशानुसार त्याचा पुत्र मानवांचा प्रमुख याजक बनणार होता, एक दयाळू प्रमुख याजक ज्याला ‘आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी सहानुभूती वाटेल.’ (इब्री लोकांस ४:१५) येशूचे पृथ्वीवर एका मनुष्याच्या रूपात येण्याचे हे देखील एक कारण होते. पृथ्वीवर हाडामांसाच्या मनुष्याच्या रूपात त्याला अशा अनेक परिस्थितींचा प्रत्यक्ष अनुभव आला ज्या पूर्वी त्याने केवळ स्वर्गातून पाहिल्या होत्या; आणि या अनुभवलेल्या सर्व गोष्टींचा त्याच्यावर प्रभाव पडत गेला. तो मनुष्याच्या भावना, त्याची सुखदुःखे स्वतः अनुभवू लागला. थकवा, तहान, भूक काय असते हे त्याला अनुभवायला मिळाले. (मत्तय ४:२; योहान ४:६, ७) याहीपेक्षा त्याला नाना प्रकारच्या संकटांना आणि दुःखांना तोंड द्यावे लागले. या सर्व अनुभवांतून तो “आज्ञाधारकपणा शिकला.” प्रमुख याजकाची भूमिका यशस्वीपणे पार पाडण्यासाठी तो पूर्णपणे तयार झाला.—इब्री लोकांस ५:८-१०.
८. येशूच्या बालपणाविषयी आपल्याजवळ कोणती माहिती आहे?
८ येशूला बालपणी कोणते अनुभव आले? त्याच्या बालपणाविषयी फारच त्रोटक माहिती सापडते. किंबहुना, मत्तय आणि लूक या दोघांनीच केवळ त्याच्या जन्माबद्दल आणि त्यानंतरच्या घटनांबद्दल माहिती दिली आहे. शुभवर्तमान लेखकांना येशूच्या पृथ्वीवर येण्याआधीच्या स्वर्गातील अस्तित्वाविषयी माहीत होते. मानव स्वरूपात येण्याआधीच्या स्वर्गातील वास्तव्यामुळेच येशू सर्वश्रेष्ठ पुरूष बनला. पण तरीसुद्धा येशू हा पूर्णपणे मानवांसारखा होता. परिपूर्ण असला तरीसुद्धा जन्मापासून बाल्यावस्थेत आणि पौगंडावस्थेतून प्रौढावस्थेत त्याचाही चारचौघांसारखाच विकास झाला; आणि या सबंध काळात तो नवनवीन गोष्टी शिकत होता. (लूक २:५१, ५२) बायबलमध्ये काही गोष्टींचा उल्लेख केला आहे, ज्यांचा येशूच्या व्यक्तिमत्त्वावर त्याच्या संस्कारक्षम वयात निश्चितच प्रभाव पडला असेल.
९. (अ) येशूचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता हे कशावरून सूचित होते? (ब) येशू कशाप्रकारच्या परिस्थितीत लहानाचा मोठा झाला असावा?
९ येशूचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला यात शंका नाही. त्याच्या जन्मानंतर ४० दिवसांनी योसेफ व मरीया यांनी मंदिरात आणलेल्या अर्पणावरून हे स्पष्ट होते. होमार्पणासाठी एक वर्षाचा मेंढा आणि पापार्पणासाठी पारव्याचे पिलू किंवा होला आणण्याऐवजी त्यांनी “होल्यांचा जोडा किंवा पारव्यांची दोन पिले” आणली. (लूक २:२४) मोशेच्या नियमशास्त्रानुसार ही गरिबांसाठी एक खास सवलत होती. (लेवीय १२:६-८) हळूहळू हे गरीब कुटुंब वाढले. येशूच्या चमत्कारिक जन्मानंतर योसेफ व मरीया यांना नैसर्गिकरित्या कमीतकमी सहा मुले झाली. (मत्तय १३:५५, ५६) अशारितीने येशू एका मोठ्या, पण आर्थिक परिस्थिती बेताचीच असलेल्या कुटुंबात लहानाचा मोठा झाला.
१०. मरीया व योसेफ हे दोघेही देवभीरू होते हे कशावरून दिसून येते?
१० येशूचे आईवडील देवभीरू होते. त्यांनी मोठ्या प्रेमाने येशूला लहानाचे मोठे केले. येशूची आई मरीया हिच्यावर देवाची खास कृपा होती. गब्रीएल स्वर्गदूताने तिला अभिवादन करताना काय म्हटले होते हे कदाचित तुम्हाला आठवत असेल: “हे कृपा पावलेल्या स्त्रिये, कल्याण असो; प्रभु तुझ्याबरोबर असो.” (लूक १:२८) मरीयेप्रमाणे योसेफ देखील धार्मिक प्रवृत्तीचा माणूस होता. दरवर्षी तो १५० किलोमीटरचा प्रवास करून जेरूसलेमला वल्हांडणासाठी न चुकता जात असे. या सणाला जाण्याची आज्ञा तशी फक्त पुरुषांसाठीच होती, पण मरीया देखील योसेफासोबत नेमाने जायची. (निर्गम २३:१७; लूक २:४१) एकदा जेरूसलेमला गेलेले असताना योसेफ व मरीया यांना १२ वर्षांचा येशू, खूप शोधल्यानंतर मंदिरात गुरूजनांमध्ये बसलेला आढळला. काळजीत पडलेल्या आपल्या आईवडिलांना येशू म्हणाला: “माझ्या पित्याच्या घरात मी असावे हे तुमच्या ध्यानात आले नाही काय?” (लूक २:४९) ‘पिता’ या शब्दाचा बालक येशूच्या मनात एक खास अर्थ असावा. त्याचा खरा पिता यहोवा आहे हे त्याला निश्चितच सांगण्यात आले असावे. शिवाय, योसेफ देखील येशूच्या दत्तकपित्याची आपली जबाबदारी अतिशय प्रेमाने पार पाडत असेल, असे आपण म्हणू शकतो. कारण यहोवाने आपल्या प्रिय पुत्राला लहानाचे मोठे करण्याची जबाबदारी कोणा कठोर, निष्ठुर मनुष्यावर सोपवणे शक्यच नव्हते!
११. येशूने कोणते कौशल्य संपादन केले आणि बायबलच्या काळात या व्यवसायात कोणत्या प्रकारची कामे केली जायची?
११ नासरेथ येथे राहात असताना येशूने सुतारकाम शिकून मार्क ६:३) बायबलच्या त्या प्राचीन काळात सुतार घर बांधणे, टेबल, खुर्च्या किंवा बाक यांसारख्या लाकडी वस्तू तयार करणे किंवा शेतीला उपयोगी पडणारी साधने बनवणे, यांसारखी कामे करीत. डायलॉग विथ ट्राइफो नावाच्या ग्रंथात, सा.यु. दुसऱ्या शतकाचे लेखक जस्टिन मार्टिअर येशूच्या संदर्भात असे लिहितात: “मनुष्यांत राहात असताना तो सुताराचे काम करीत असे, नांगर आणि जू बनवीत असे.” हे काम सोपे नव्हते, कारण त्या काळात सुतारांना लाकूड विकत आणून काम करण्याची सोय नव्हती. अगदी, एखादे झाड निवडून ते तोडण्यापासून सुरवात करावी लागायची. पोट भरण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टांची येशूला जाणीव होती; वेगवेगळ्या प्रकारच्या ग्राहकांशी व्यवहार करण्याचा, घर चालवण्याचा त्याला अनुभव होता.
घेतले; कदाचित त्याच्या दत्तकपित्याने, योसेफानेच त्याला हे काम शिकवले असावे. पण, येशू हे काम इतक्या कुशलतेने करू लागला की त्यालाही लोक “सुतार” म्हणून ओळखू लागले. (१२. योसेफाचा मृत्यू येशूच्या आधी झाला असावा हे कशावरून सूचित होते आणि यामुळे येशूवर कोणती जबाबदारी आली असेल?
१२ भावंडांत सर्वात मोठा असल्यामुळे कुटुंबाची देखभाल करण्यात येशूला हातभार लावावा लागत असेल; शिवाय, काही गोष्टींवरून असे सूचित होते की योसेफ येशूच्या आधीच मरण पावला होता, तेव्हा येशूची जबाबदारी आणखीनच वाढली असेल. * १९०० सालच्या झायन्स वॉच टावरच्या जानेवारी १ च्या अंकात असे म्हटले होते: “परंपरागत अहवालांनुसार येशू लहान असतानाच योसेफचा मृत्यू झाला आणि त्यामुळे येशूने सुतारकाम करून कुटुंबाचे पालनपोषण केले. बायबलमधील वृत्तान्त देखील या गोष्टीला पुष्टी देतात कारण यांत येशूलाच सुतार म्हटले आहे, शिवाय, त्याच्या आईचा आणि भावांचा उल्लेख आहे पण योसेफचा उल्लेख मात्र आढळत नाही. (मार्क ६:३) . . . त्यामुळे [लूक २:४१-४९ येथे दिलेल्या] घटनेपासून येशूच्या बाप्तिस्म्यापर्यंतच्या १८ वर्षांच्या कालावधीत प्रभू [येशूने] जीवनातल्या सर्वसामान्य जबाबदाऱ्या पार पाडल्या असाव्यात.” मरीया आणि तिच्या मुलांना (यात येशूही आलाच) आपल्या प्रिय पतीच्या आणि पित्याच्या मृत्यूचे दुःख काय असते हे माहीत असेल.
१३. येशूने आपले सेवाकार्य सुरू केले तेव्हा इतर कोणत्याही मानवाजवळ नव्हते अशाप्रकारचे ज्ञान, सूक्ष्मदृष्टी आणि संवेदनशीलता त्याच्याजवळ होती असे का म्हणता येईल?
१३ साहजिकच, येशूचे जीवन ऐषारामाचे नव्हते. सर्वसाधारण लोकांच्या जीवनात येणाऱ्या अडचणी, समस्या त्यानेही अनुभवल्या. सा.यु. २९ साली देवाने त्याच्यावर सोपवलेली जबाबदारी पार पाडण्याची वेळ आली. त्या वर्षी येशूचा पाण्याने बाप्तिस्मा झाला आणि तेव्हा देवाच्या आत्मिक पुत्राच्या रूपात त्याचा जन्म झाला. बाप्तिस्मा झाल्यानंतर “आकाश उघडले गेले;” पृथ्वीवर मानवाच्या रूपात येण्याआधी स्वर्गातले त्याचे जीवन व तेव्हाचे त्याचे विचार व भावना यांची त्याला जाणीव झाली असे यावरून कदाचित सूचित होत असावे. (लूक ३:२१, २२) त्याअर्थी, येशूने आपल्या सेवाकार्याला आरंभ केला तेव्हा त्याच्याजवळ जे ज्ञान, सूक्ष्मदृष्टी आणि संवेदनशीलता होती ती आणखी कोणत्याही मानवाजवळ असणे शक्य नव्हते. म्हणूनच शुभवर्तमानांच्या लेखकांनी आपल्या पुस्तकांत अधिककरून येशूच्या सेवाकार्याबद्दलच लिहिले आहे. तरीसुद्धा त्याने बोललेल्या आणि केलेल्या सर्व गोष्टी ते लिहू शकले नाहीत. (योहान २१:२५) पण देवाने त्यांना जी काही माहिती लिहिण्यास प्रेरित केले, ती आज आपल्याला इतिहासातल्या सर्वश्रेष्ठ मनुष्याचे मन जाणून घेण्यास साहाय्य करते.
येशूचे व्यक्तिमत्त्व
१४. येशूला इतरांबद्दल प्रेम आणि मनस्वी कळकळ वाटायची हे शुभवर्तमानाच्या पुस्तकांतून आपल्याला कसे कळून येते?
१४ शुभवर्तमानाच्या पुस्तकांत येशूविषयी वाचताना, इतरांबद्दल प्रेम आणि मनस्वी कळकळ वाटणाऱ्या माणसाची छबी समोर येते. येशूने व्यक्त केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या भावनांबद्दल आपल्याला या पुस्तकांत वाचायला मिळते; एका कुष्टरोग्याला पाहून त्याला त्याचा कळवळा आला (मार्क १:४०, ४१); त्याच्या शिकवणुकींना प्रतिसाद न देणाऱ्या लोकांविषयी त्याला दुःख झाले (लूक १९:४१, ४२); तर मंदिरात व्यापार करू पाहणाऱ्या सराफांवर तो रास्तपणे क्रोधित झाला. (योहान २:१३-१७) इतरांचे दुःख स्वतःही अनुभवण्याची कुवत येशूजवळ होती, प्रसंगी तो रडला देखील; तो आपल्या भावना लपवत नसे. त्याच्या प्रिय मित्राचा, लाजराचा मृत्यू झाला तेव्हा लाजराची बहीण मरीया हिला रडताना पाहून येशूला इतके दुःख झाले की तो स्वतः देखील, सर्वांच्या देखत रडला.—योहान ११:३२-३६.
१५. येशू ज्याप्रकारे लोकांबद्दल विचार करायचा आणि ज्याप्रकारे त्यांच्याशी वागायचा त्यावरून त्याला त्यांच्याबद्दल वाटणारे प्रेम कशाप्रकारे दिसून येते?
१५ येशू ज्याप्रकारे लोकांबद्दल विचार करायचा आणि ज्याप्रकारे त्यांच्याशी वागायचा त्यावरून त्याला त्यांच्याबद्दल वाटणारे प्रेम आणि कळकळ स्पष्ट दिसून यायची. गरिबांना आणि कष्टी लोकांना पाहिल्यावर त्यांना मदत केल्याशिवाय त्याला रहावायचे नाही; तो त्यांच्या “जिवास विसावा” द्यायचा. (मत्तय ११:४, ५, २८-३०) त्रासात असलेल्यांचे दुःख हलके करायला सदैव तयार असायचा; मग ती गर्दीत त्याच्या वस्त्रांना शिवणारी, रक्तस्रावाने पिडीत असलेली स्त्री असो किंवा सर्वांनी धमकावल्यावरही ओरडून ओरडून मदतीची याचना करणारा आंधळा भिकारी असो. (मत्तय ९:२०-२२; मार्क १०:४६-५२) येशू लोकांच्या चांगल्या गुणांकडे पाहायचा आणि त्यांची प्रशंसाही करायचा; पण आवश्यकता भासल्यास कोणाची कानउघाडणी करायलाही तो मागेपुढे पाहात नसे. (मत्तय १६:२३; योहान १:४७; ८:४४) त्या काळात स्त्रियांना समाजात फार कमी हक्क होते, पण येशूला मात्र स्त्रियांबद्दल आदर होता. (योहान ४:९, २७) म्हणूनच की काय, काही स्त्रियांनी स्वखुषीने येशूची सेवा केली.—लूक ८:३.
१६. जीवनाबद्दल आणि भौतिक संपत्तीबद्दल येशूचा समतोल दृष्टिकोन होता हे कशावरून दिसून येते?
१६ जीवनाबद्दल येशूने समतोल दृष्टिकोन बाळगला. पैशाला, संपत्तीला त्याने सर्वात जास्त महत्त्व कधीही दिले नाही. किंबहुना, स्वतःचे म्हणण्यालायक फारसे काही त्याच्याजवळ नव्हतेच. आपल्याला “डोके टेकावयास ठिकाण नाही,” असे त्याने स्वतः म्हटले होते. (मत्तय ८:२०) पण तरीसुद्धा येशूने लोकांचा आनंद द्विगुणित केला. एका लग्नाच्या मेजवानीला तो गेल्याचे तुम्हाला आठवत असेल. अशा मेजवान्यांत लोक हमखास नाचगाण्यांतून आपला आनंद व्यक्त करत असत. येशूने तेथे जाऊन सर्वांच्या आनंदावर विरजण घातले नाही, उलट याच प्रसंगी त्याने आपला पहिला चमत्कार दाखवला. द्राक्षारस संपल्यामुळे त्याने पाण्यापासून उत्तम द्राक्षारस, “मनुष्याचे अंतःकरण आनंदित करणारा द्राक्षारस” तयार केला. (स्तोत्र १०४:१५; योहान २:१-११) अशारितीने विवाहाच्या सोहळ्यात व्यत्यय आला नाही आणि वरवधूलाही लोकांसमोर मान खाली घालावी लागली नाही. पण मौजमजा आणि आध्यात्मिक गोष्टी यांत येशूने संतुलन साधले; म्हणूनच अशा सोहळ्यांना येशू उपस्थित राहिल्याच्या वृत्तान्तांपेक्षा त्याने देवाच्या सेवेत कशाप्रकारे अधिक वेळ आणि शक्ती खर्च केली याविषयीचे वृत्तान्त आपल्याला जास्त वाचायला मिळतात.—योहान ४:३४.
१७. येशू हा सर्वोत्कृष्ट शिक्षक होता हे आश्चर्याचे का नाही आणि त्याच्या शिकवणुकींतून त्याने काय प्रकट केले?
१७ येशू उत्तम शिक्षक होता. आपल्या शिकवणुकींतून त्याने बऱ्याचदा दररोजच्या जीवनातील वस्तुस्थितींवर प्रकाश टाकला; जीवनाच्या या वास्तविकतांशी तो चांगल्याप्रकारे परिचित होता. (मत्तय १३:३३; लूक १५:८) त्याची शिकवण्याची पद्धत अतुलनीय होती—स्पष्ट, समजण्याजोगी आणि अतिशय व्यवहार्य. पण शिकवण्याच्या पद्धतीपेक्षा त्याने काय शिकवले ते सर्वात महत्त्वाचे आहे. लोकांनी यहोवाचे विचार, त्याच्या भावना आणि त्याचे मार्ग आत्मसात करावेत अशी येशूची मनस्वी इच्छा होती आणि म्हणून त्यांना शिकवताना तो याच दिशेने प्रयत्न करायचा.—योहान १७:६-८.
१८, १९. (अ) कोणत्या सजीव शब्दचित्रांच्या साहाय्याने येशूने आपल्या पित्याचे वर्णन केले? (ब) पुढच्या लेखात कशाविषयी चर्चा केली जाईल?
१८ येशू सहसा दृष्टान्त देऊन बोलायचा. वर्णन करताना तो ऐकणाऱ्यांच्या मनात सजीव चित्र उभे करायचा; अशा या अविस्मरणीय शब्दचित्रांच्या साहाय्याने येशूने लोकांना यहोवाला अधिक चांगल्याप्रकारे जाणून घेण्यास मदत केली. उदाहरणार्थ, एकदा तो देवाच्या दयेविषयी सांगत होता. हा विषय समजावून सांगणे तसे कठीण नाही; पण येशूने यहोवाची तुलना एका क्षमाशील पित्याशी केली, जो घरी परत आलेल्या आपल्या मुलाला पाहिल्यावर ‘धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून मुके घेतो.’ एक अतिशय परिणामकारी दृष्टान्त. (लूक १५:११-२४) येशूने त्याच्या काळातल्या कर्मठवादी संस्कृतीला जुमानले नाही; त्या काळात धार्मिक पुढारी सामान्य लोकांना तुच्छ लेखायचे पण येशूने स्पष्ट केले की त्याचा पिता हा त्यांच्यासारखा नव्हता. सामान्य लोकही त्याला प्रार्थना करू शकत होते; किंबहुना, फुशारकी मारणाऱ्या परुश्यापेक्षा एका विनम्र जकातदाराची प्रार्थना त्याला अधिक भावली. (लूक १८:९-१४) येशूने आपल्या शिकवणुकींतून लोकांना जाणीव करून दिली की यहोवा एक प्रेमळ पिता आहे; तो जमिनीवर पडणाऱ्या लहानशा चिमणीचीही दखल घेतो. म्हणूनच त्याने आपल्या शिष्यांना असे म्हणून धीर दिला, की “भिऊ नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे.” (मत्तय १०:२९, ३१) साहजिकच, लोक “[येशूच्या] शिक्षणावरून” थक्क व्हायचे आणि त्याच्याकडे आकर्षित व्हायचे. (मत्तय ७:२८, २९) एकप्रसंगी तर “लोकांचा मोठा समुदाय” तब्बल तीन दिवस त्याच्याबरोबर राहिला आणि तेसुद्धा त्यांच्याजवळ खायला काहीही नसताना!—मार्क ८:१, २.
१९ आपण यहोवाचे आभार मानतो की त्याने आपल्या वचनातून ख्रिस्ताचे मन आपल्यासमोर प्रगट केले आहे! पण इतरांसोबत व्यवहार करताना आपण ख्रिस्ताच्या मनोवृत्तीचे कशाप्रकारे अनुकरण करू शकतो? पुढच्या लेखात याविषयी चर्चा केली जाईल.
[तळटीपा]
^ परि. 5 आत्मिक प्राण्यांवरही सहवासाचा परिणाम होतो हे प्रकटीकरण १२:३, ४ येथे दिलेल्या वृत्तान्तात सुचवले आहे. यात सैतानाचे एका अशा ‘अजगराच्या’ रूपात वर्णन केले आहे जो आपल्या प्रभावाने ‘ताऱ्यांना’ किंवा स्वर्गदूतांना देवाच्या विरोधात जाण्यासाठी आपल्याकडे ओढून घेतो.—पडताळा ईयोब ३८:७.
^ परि. 12 योसेफचा सरळ उल्लेख शेवटच्या वेळी येशू १२ वर्षांचा असताना मंदिरात सापडला होता त्या घटनेच्या वृत्तान्तात आढळतो. येशूच्या सेवाकार्याच्या सुरवातीला, काना येथे झालेल्या लग्नाच्या मेजवानीत योसेफ उपस्थित असल्याचा उल्लेख आढळत नाही. (योहान २:१-३) सा.यु. ३३ साली येशूला वधस्तंभावर खिळण्यात आले तेव्हा त्याने मरीयेची जबाबदारी आपला प्रिय प्रेषित योहान याच्यावर सोपवली. योसेफ जिवंत असता तर त्याने कदाचित असे केले नसते.—योहान १९:२६, २७.
तुम्हाला आठवते का?
• “ख्रिस्ताचे मन” जाणून घेणे महत्त्वाचे का आहे?
• पृथ्वीवर मनुष्याच्या रूपात येण्याआधी येशू कोणाच्या सहवासात होता?
• पृथ्वीवर असताना, कशाप्रकारच्या अनुभवांतून आणि परिस्थितींतून येशूला जावे लागले?
• येशूच्या व्यक्तिमत्त्वाविषयी शुभवर्तमानांतून आपल्याला कोणती माहिती मिळते?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१० पानांवरील चित्र]
आर्थिक परिस्थिती बेताचीच असलेल्या एका मोठ्या कुटुंबात येशू लहानाचा मोठा झाला
[१२ पानांवरील चित्रे]
बारा वर्षांच्या येशूचे ज्ञान पाहून आणि त्याची उत्तरे ऐकून धर्मगुरू थक्क झाले