यहोवाचे सामर्थ्य आपल्याला सांत्वन देते
यहोवाचे सामर्थ्य आपल्याला सांत्वन देते
“माझे मन अनेक चिंतांनी व्यग्र होते तेव्हा तुझ्यापासून लाभणारे सांत्वन माझ्या जिवाचे समाधान करिते.”—स्तोत्र ९४:१९.
दवर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडीया यात असे म्हटले आहे, की “असंख्य लोकांना दुःखात, निराशेत असताना बायबलमधून सांत्वन व आशा मिळाली; त्यांच्या जीवनाला बायबलने दिशा दिली.” बायबल लोकांना सांत्वन देते. पण बायबलच का?
कारण बायबल हे आपल्या प्रेमळ निर्माणकर्त्याने प्रेरित केले आहे; यात त्याचे विचार आहेत. आणि तो “सांत्वनदाता” असल्यामुळे ‘आपल्यावरील सर्व संकटात तो आपले सांत्वन करतो.’ (२ करिंथकर १:३, ४) तो “धीर व उत्तेजन देणारा देव” आहे. (रोमकर १५:५) सर्व मनुष्यांचे दुःख कायमचे संपुष्टात आणण्याची यहोवाने तजवीज केली आहे. त्याचा एकुलता एक पुत्र, ख्रिस्त येशू याला पृथ्वीवर पाठवून त्याने आपल्याला आशा व सांत्वन दिले आहे. येशूनेही हेच शिकवले: “देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” (योहान ३:१६) बायबल यहोवाचे वर्णन करताना म्हणते, “तो प्रतिदिनी आमचा भार वाहतो; देव आमचे तारण आहे.” (स्तोत्र ६८:१९) देवाला भिऊन वागणारे सर्वजण अगदी आत्मविश्वासाने म्हणू शकतात: “मी आपल्यापुढे परमेश्वराला नित्य ठेविले आहे; तो माझ्या उजवीकडे आहे, म्हणून मी ढळणार नाही.”—स्तोत्र १६:८.
या सर्व शास्त्रवचनांवर आपण विचार करतो तेव्हा यहोवा देवाचे आपल्यावर किती प्रेम आहे याची जाणीव झाल्याशिवाय राहात नाही. आपले सर्व दुःख आणि कष्ट नाहीसे करण्याची यहोवाची मनापासून इच्छा आहे आणि असे करण्याचे सामर्थ्य देखील त्याच्याजवळ आहे. “तो भागलेल्यास जोर देतो, निर्बलास विपुल बल देतो.” (यशया ४०:२९) मग यहोवाच्या सामर्थ्यातून सांत्वन मिळण्याकरता आपल्याला काय करावे लागेल?
स्वतः यहोवाकडून मिळणारे सांत्वन
दाविदाने लिहिले: “तू आपला भार परमेश्वरावर टाक म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल; नीतिमानाला तो कधीहि ढळू देणार नाही.” (स्तोत्र ५५:२२) यहोवाला आपली काळजी आहे. पहिल्या शतकातल्या ख्रिस्ती बांधवांचे सांत्वन करताना प्रेषित पेत्र म्हणाला: “तो [देव] तुमची काळजी घेतो.” (१ पेत्र ५:७) देवाला मनुष्यांची किती कदर आहे हे येशूनेही उदाहरण देऊन स्पष्ट केले. त्याने म्हटले: “पाच चिमण्या दोन दमड्यांस विकतात की नाही? तरी त्यापैकी एकीचाहि देवाला विसर पडत नाही. फार तर काय, तुमच्या डोक्याचे सर्व केसहि मोजलेले आहेत. भिऊ नका; तुम्ही अनेक चिमण्यांपेक्षा मूल्यवान आहा.” (लूक १२:६, ७) आपल्याला देव इतके मूल्यवान समजतो, की आपल्या जीवनातल्या अगदी लहानातल्या लहान गोष्टीचीही तो दखल घेतो. आपल्याला स्वतःबद्दल माहीत नसतील अशा गोष्टी यहोवाला माहीत आहेत कारण त्याचे आपल्यावर प्रेम आहे.
आधीच्या लेखात स्वेतलाना या वेश्याव्यवसाय करणाऱ्या तरुणीचा उल्लेख केल्याचे तुम्हाला आठवत असेल. तिला या गोष्टीची जाणीव झाली की यहोवाला आपल्या प्रत्येकाची काळजी आहे; या जाणिवेने तिला खूप सांत्वन मिळाले. तिने आत्महत्या करण्याचा निश्चय केला होता, पण त्याच दरम्यान तिला यहोवाचे साक्षीदार भेटले. ती बायबलचा अभ्यास करायला तयार झाली. अभ्यासातून तिला यहोवा देवाची ओळख झाली; देव खरोखरच अस्तित्वात असून त्याला आपल्याबद्दलही काळजी आहे याची तिला खात्री पटली. या ज्ञानामुळे जीवनाबद्दल तिचा दृष्टिकोन पार बदलला; आपली वाईट कृत्ये सोडून नव्याने जीवन सुरू करावे असे तिला मनापासून वाटू लागले. तिने आपले जीवन देवाला समर्पित करण्याचा निर्णय घेतला. तिच्या मनात असलेल्या दोषीपणाच्या भावना हळूहळू निघून गेल्या. आणि यामुळे तिच्यासमोर येणाऱ्या सर्व समस्यांना धैर्याने तोंड द्यायला आणि सर्व परिस्थितींत जीवनाबद्दल आशावादी राहायला तिला मदत मिळाली. ती आता म्हणते, “यहोवा मला कधीही सोडणार नाही, याची मला पूर्ण खात्री आहे. १ पेत्र ५:७ या वचनातल्या शब्दांची सत्यता मला पटली आहे; त्यात म्हटले आहे: ‘[यहोवावर] तुम्ही आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी घेतो.’”
बायबलच्या आशेतून मिळणारे सांत्वन
यहोवा ज्याद्वारे आपले सांत्वन करतो असा एक खास मार्ग म्हणजे त्याचे वचन, बायबल. बायबलमधून भविष्याची एक उज्ज्वल आशा आपल्याला मिळते. प्रेषित पौलाने लिहिले: “धीराच्या व शास्त्रापासून मिळणाऱ्या उत्तेजनाच्या योगे आपण आशा धरावी म्हणून जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपल्या शिक्षणाकरिता लिहिले.” (रोमकर १५:४) या आशेकरवी कशाप्रकारे आपल्याला सांत्वन मिळू शकते हे पौलाने स्पष्ट केले. तो म्हणतो, “ज्याने आपल्यावर प्रीती करून युगानुयुगाचे सांत्वन व चांगली आशा कृपेने दिली तो देव आपला पिता, तुमच्या मनाचे सांत्वन करो, आणि प्रत्येक चांगल्या कृतीत व उक्तीत तुम्हास स्थिर करो.” (२ थेस्सलनीकाकर २:१६, १७) “चांगली आशा” ही आहे, की लवकरच आपल्याला सर्व दुःखांपासून मुक्त असे आनंदपूर्ण चिरकालिक जीवन मिळेल.—२ पेत्र ३:१३.
याआधी उल्लेख केलेला पांगळा लायमानिस, दारूच्या पेल्यात आपले दुःख बुडवायचा प्रयत्न करत होता; पण सार्वकालिक जीवनाच्या याच उज्ज्वल व विश्वासार्ह आशेने त्याला एक नवी उमेद दिली. यहोवाच्या साक्षीदारांच्या बायबलविषयक साहित्यात जेव्हा त्याने देवाच्या राज्याबद्दल वाचले, त्या यशया ३५:५, ६) देवाच्या नव्या जगात जगण्याची इच्छा असल्यास प्रत्येकाने देवाच्या काही अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत. लायमानिसला हे कळले तेव्हा त्याने आपल्या जीवनात अनेक बदल केले. त्याने दारू कायमची सोडून दिली; लायमानिस किती बदलला आहे हे पाहून शेजारपाजारच्या लोकांना आणि नातेवाईकांना खूप आनंद वाटला. आज लायमानिस इतरांनाही बायबलची सांत्वनदायक आशा देत आहे. तो अनेक लोकांसोबत बायबलचा अभ्यास करतो.
राज्यात त्याचे अपंगत्व पूर्णपणे दूर होईल हे त्याला समजले तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही. बायबलमध्ये सर्वांकरता ही उज्ज्वल आशा आहे, की देवाच्या राज्यात सर्व प्रकारचे आजार बरे केले जातील आणि अपंगत्व दूर केले जाईल; बायबल म्हणते: “तेव्हा अंधांचे नेत्र उघडतील, बहिऱ्याचे कान खुले होतील. तेव्हा लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारील, मुक्याची जीभ गजर करील.” (प्रार्थनेमुळे मिळणारे सांत्वन
काही कारणास्तव जेव्हा आपण दुःखी असतो तेव्हा यहोवाला प्रार्थना केल्यामुळे आपल्याला सांत्वन मिळते. प्रार्थना केल्यामुळे आपल्या मनावरचे ओझे हलके होते. यहोवाला विनवणी केल्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या सांत्वनदायक शास्त्रवचनांची आठवण होते. याचे चांगले उदाहरण म्हणजे बायबलमधले सर्वात मोठे स्तोत्र. हे अतिशय सुंदर स्तोत्र एखाद्या प्रार्थनेसारखेच आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो: “हे परमेश्वरा, तुझे पुरातन निर्णय आठवून माझे समाधान झाले आहे.” (स्तोत्र ११९:५२) बऱ्याच समस्या अशा असतात की ज्यांवर उपाय सहजासहजी सापडत नाही; उदाहरणार्थ, एखादा गंभीर आजार. अशा प्रकारच्या अतिशय कठीण समस्यांना तोंड देताना, कधीकधी आपण आपल्या बुद्धीने योग्य निर्णय घेऊ शकत नाही. अशावेळी आपल्या परीने होईल तितके केल्यानंतर देवाला प्रार्थना करून बाकीचे त्याच्या हाती सोपून द्यावे. असे केल्यामुळे आपल्याला खूप सांत्वन मिळते आणि कधीकधी तर आपण कल्पनाही केली नसेल अशा मार्गाने उपाय देखील सुचतो. अनेकांना असा अनुभव आला आहे.—१ करिंथकर १०:१३.
पॅटचेच उदाहरण घ्या. तिला तातडीने हॉस्पिटलच्या इमर्जेन्सी रूममध्ये न्यावे लागले त्यावेळी प्रार्थनेतून किती सांत्वन मिळते याचा तिला अनुभव आला. बरी झाल्यानंतर तिने सांगितले: “मी सतत यहोवाला प्रार्थना करत होते; मला जाणीव झाली होती की मला माझं जीवन त्याच्या हाती सोपून द्यायचं होते, त्याच्यावर भरवसा ठेवून त्याची जी काही इच्छा असेल त्यानुसार वागायचं होतं. हे सर्व घडत असताना माझं मन अगदी शांत होतं, फिलिप्पैकर ४:६, ७ मध्ये देवाच्या शांतीचा उल्लेख केला आहे ती शांती मी प्रत्यक्ष अनुभवत होते.” ही वचने खरोखर आपल्या सर्वांसाठीच अतिशय सांत्वनदायक आहेत. येथे पौल आपल्याला असा सल्ला देतो, की “कशाविषयीहि चिंताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा; म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांति तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.”
पवित्र आत्म्यायोगे मिळणारे सांत्वन
मृत्यू होण्याआधी, येशूने आपल्या प्रेषितांना स्पष्ट सांगितले की लवकरच तो त्यांना सोडून जाणार आहे. त्यामुळे प्रेषितांना अतिशय दुःख झाले. (योहान १३:३३, ३६; १४:२७-३१) येशूने ओळखले की त्यांना पुढेही सांत्वनाची आवश्यकता पडेल आणि म्हणून त्याने त्यांना आश्वासन दिले: “मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी [किंवा, सांत्वन करणारा] म्हणजे सत्याचा आत्मा देईल; अशासाठी की, त्याने तुम्हाबरोबर सदासर्वदा राहावे.” (योहान १४:१६; तळटीप, NW) याठिकाणी, येशू देवाच्या पवित्र आत्म्याच्या संदर्भात बोलत होता. येशूच्या मृत्यूनंतर प्रेषितांवर निरनिराळ्या प्रकारच्या कठीण परीक्षा आल्या तेव्हा देवाच्या आत्म्याने प्रेषितांना खूप सांत्वन दिले. तसेच, पवित्र आत्म्यामुळेच त्यांना देवाची इच्छा पूर्ण करत राहण्याचे सामर्थ्य देखील मिळाले.—प्रेषितांची कृत्ये ४:३१.
ॲन्जीचा याआधी उल्लेख केला होता. एका गंभीर अपघातानंतर तिचे पती अक्षरशः मृत्यूशी झुंज देत होते; पण या अतिशय दुःखाच्या प्रसंगाला ती यशस्वीपणे तोंड देऊ शकली. हे कसे शक्य झाले याविषयी ती स्वतःच सांगते: “यहोवाच्या पवित्र आत्म्याच्या मदतीशिवाय आम्ही त्या कठीण प्रसंगातून निभावलो नसतो. पण पवित्र आत्म्याने आम्हाला खंबीर राहायला मदत केली. आम्ही दुबळे असलो तरी यहोवाचं सामर्थ्य किती मोठं आहे याची आम्हाला खात्री पटली, आमच्या दुःखात यहोवाच आमचा पाठिराखा होता.”
बांधवांकडून मिळणारे सांत्वन
सर्वांची परिस्थिती वेगळी असते; कधीकधी एखाद्यावर अचानक दुःखद प्रसंग ओढावतो. पण या सर्व परिस्थितींत यहोवाच्या मंडळीत असलेले बंधुभगिनी एकमेकांना सांत्वन आणि दिलासा देतात. मंडळीच्या सभांना येणाऱ्या सर्वांनाच आध्यात्मिक साहाय्य आणि आधार मिळतो. मंडळीतल्या बांधवांना एकमेकांबद्दल प्रेम २ करिंथकर ७:५-७.
आणि कळकळ वाटत असल्यामुळे, एखाद्यावर दुःखाचा प्रसंग ओढवतो तेव्हा सर्वजण त्याच्या मदतीला धावून येतात आणि त्याचे सांत्वन करतात.—ख्रिस्ती मंडळीच्या सदस्यांना “सर्वांचे व विशेषतः विश्वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे [करण्यास]” शिकवले जाते. (गलतीकर ६:१०) बायबलमधून मिळणाऱ्या शिक्षणामुळे आपोआपच ते आपल्या बांधवांशी प्रेमाने वागण्यास व त्यांची सुखदुःखे वाटून घेण्यास प्रेरित होतात. (रोमकर १२:१०; १ पेत्र ३:८) मंडळीतल्या आध्यात्मिक भाऊबहिणींना एकमेकांशी दयाळूपणे वागण्याची, एकमेकांचे सांत्वन करण्याची आज्ञा देण्यात आली आहे.—इफिसकर ४:३२.
ज्यो व रिबेका यांच्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर मंडळीतल्या बांधवांनी त्यांना खूप आधार दिला. ते सांगतात: “आमच्यावर आभाळ कोसळलं होतं. पण यहोवा व मंडळीतले प्रेमळ भाऊबहिणी आमच्या पाठीशी होते. सांत्वनदायक संदेश लिहिलेले असंख्य कार्ड व पत्र, तसेच टेलिफोन दररोज येत होते. आपल्याला एकमेकांची किती गरज आहे हेच यावरून कळून येतं. आमच्या दुःखामुळे आम्हाला कशाचीच शुद्ध राहिली नव्हती, पण मंडळीतले कितीतरी जण आमच्या मदतीला धावून आले. स्वयंपाक, घराची साफसफाई सर्वकाही ते करत होते.”
यहोवाच्या पंखांखाली आश्रय घ्या!
भयंकर वादळाप्रमाणे जेव्हा एखादा दुःखद प्रसंग आपल्या जीवनात येतो आणि समस्यांचा सतत मारा होत राहतो, तेव्हा देव आपल्यावर पाखर घालतो. यहोवा कशाप्रकारे दुःखी कष्टी लोकांना सांत्वन व आश्रय देतो याविषयी एका स्तोत्रात अशाप्रकारे सांगितले आहे: “तो तुझ्यावर पाखर घालील, त्याच्या पंखांखाली तुला आश्रय मिळेल; त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे.” (स्तोत्र ९१:४) याठिकाणी कदाचित गरुडाबद्दल सांगितलेले असावे. धोक्याची चाहूल लागताच आपल्या पिलांना पंखाखाली घेणाऱ्या पक्षिणीचे चित्र डोळ्यापुढे उभे राहते. पक्षिणीला पिलांची जितकी काळजी असते त्यापेक्षा कितीतरी पटीने यहोवाला आपली काळजी आहे व त्याची आस धरणाऱ्या सर्वांना तो खऱ्या अर्थाने आश्रय देतो.—स्तोत्र ७:१.
तुम्हाला देवाबद्दल, त्याच्या गुणांबद्दल, त्याच्या उद्देशांबद्दल आणि सांत्वन देण्याच्या त्याच्या सामर्थ्याबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा असल्यास त्याच्या वचनाचा अभ्यास करा असे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो. यहोवाचे साक्षीदार याकरता तुम्हाला आनंदाने मदत करतील. मग तुम्हाला देखील यहोवाच्या सामर्थ्याकरवी सांत्वन मिळेल!
[७ पानांवरील चित्र]
बायबलमध्ये दिलेली आशा सांत्वनदायक आहे