व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुमचे जीवन अधिक सुखकर होऊ शकते का?

तुमचे जीवन अधिक सुखकर होऊ शकते का?

तुमचे जीवन अधिक सुखकर होऊ शकते का?

अमेरिकेत, १०,००० डॉलरची नोट ही आजवर छापण्यात आलेली सगळ्यात जास्त किंमतीची नोट आहे. पण, गंमत म्हणजे ज्या चिटोऱ्‍यावर ही मोठी रक्कम लिहिलेली आहे तो कागद चार आण्याचासुद्धा नसेल.

कागदाच्या या चिटोऱ्‍यामुळे तुम्हाला खरे सुख आणि समाधान मिळेल का? बऱ्‍याच लोकांना तसे वाटते. अशा लोकांसाठी पैसा म्हणजे सगळे काही. त्यामुळे पैसा कमावण्यासाठी ते रात्रंदिवस राबून रक्‍ताचे पाणी करतात. त्यांना त्यांच्या तब्येतीची काळजी नसते, त्यांच्या मित्रांची पर्वा नसते इतके नव्हे तर घरच्या लोकांचा देखील ते विचार करत नाहीत. पण, एवढी धडपड करूनही काही फायदा होतो का? पैशाने सुखसोयी मिळवता येतात पण खरे सुख मिळवता येईल का?

संशोधकांच्या मते पैशाच्या बळावर सुख-समाधान मिळवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे मृगजळामागे धावण्यासारखे आहे. अल्फी कोन नावाचा एक पत्रकार असे म्हणतो, “शांती-समाधान बाजारात विकत मिळत नाही. . . . आणि पैशालाच सर्व काही मानणाऱ्‍या लोकांना अनेक गोष्टींची चिंता असते; ते निराश असतात आणि सुख त्यांच्या हाती कधीच लागत नाही.”—इंटरनॅशनल हेरल्ड ट्रिब्यून.

जीवनात खरे सुख-समाधान मिळवण्यासाठी फक्‍त पैसा असून चालत नाही हे संशोधकांच्या आता लक्षात आले आहे. पण अनेक लोकांना तसे वाटत नाही. कारण आज लोकांवर जाहिरातींचा सतत भडिमार होत आहे. या जाहिरातींमधून लोकांच्या मनावर हेच बिंबवले जाते की जोपर्यंत जाहिरातींत दाखवली जाणारी प्रत्येक वस्तू—मग ती कार असो किंवा चॉकलेट असो—तुम्ही विकत घेत नाही तोपर्यंत ‘तुमच्या जीवनाला काही अर्थ नाही.’

अशा वस्तू खरेदी करण्यास सतत बढावा दिल्यामुळे काय होते? लोकांच्या जीवनात आध्यात्मिक गोष्टींना कोणतेही स्थान राहत नाही. अलीकडेच जर्मनीतील कोलोन शहराच्या आर्चबिशपने न्यूजवीक या पत्रिकेत असे म्हटले: “लोक देवाला केव्हाच विसरून गेले आहेत.”

कदाचित तुमचाही बहुतेक वेळ आणि श्रम केवळ उपजीविका चालवण्यातच जात असेल. तुम्ही कदाचित म्हणाल, बाकीचे काही करायला माझ्याकडे सवड तरी कोठे आहे? तरीसुद्धा तुमच्या मनात कधी ना कधी हा प्रश्‍न डोकावत असेलच की घाण्याला जुंपलेल्या जनावराप्रमाणे मरेपर्यंत राबत राहणे हाच जीवनाचा उद्देश आहे का? जीवनात काहीतरी चांगले निश्‍चितच असले पाहिजे.

मग, तुम्हाला जीवनात खरे सुख कसे मिळवता येईल? जीवनात आध्यात्मिक गोष्टींकडे अधिक लक्ष दिल्यास तुम्हाला खरा आनंद मिळेल का?