यहोवावर प्रेम करणारे त्याच्या नजरेत मौल्यवान आहेत
राज्य घोषकांचा वृत्तान्त
यहोवावर प्रेम करणारे त्याच्या नजरेत मौल्यवान आहेत
अगदी बायबल काळापासूनच लेबनन हा सुपीक देश आहे. (स्तोत्र ७२:१६; यशया ६०:१३) आकाशासोबत स्पर्धा करणारे तेथील सीडर वृक्ष फार मोलवान समजले जायचे. कारण ते सुंदर, सुंगधी आणि टिकावू आहेत. या वृक्षाच्या लाकडापासून अनेक गोष्टी बनवल्या जातात. पण पहिल्या शतकात येथे सीडरपेक्षा मौल्यवान काही तरी होते आणि त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली होती. ते होते यहोवावर प्रेम करणारे लोक. मार्कच्या शुभवर्तमानात म्हटले आहे, की लेबननच्या प्राचीन क्षेत्रातून अर्थात सोर आणि सिदोन यातून “मोठा समुदाय . . . [येशूविषयी] ऐकून त्याच्याकडे आला.”—मार्क ३:८.
आजही लेबननमध्ये देवावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या संख्येत विलक्षण वाढ होत आहे. पुढील उदाहरणांवरून ते तुम्हाला समजेल.
• विसम यहोवाचा साक्षीदार आहे. त्याला शाळेत त्याच्या वर्गात ३० मिनिटांचे भाषण देण्याकरता सांगण्यात आले. आपल्या संपूर्ण वर्गाला साक्ष देण्याची ही उत्तम संधी आहे, असा त्याने विचार केला. म्हणून त्याने लाईफ हाऊ डिड इट गेट हिअर? बाय एव्होल्यूशन ऑर बाय क्रिएशन? या पुस्तकातून काही माहिती घेऊन उत्पत्ती या विषयावर एक भाषण तयार केले. त्याच्या शिक्षकाने त्याच्या भाषणाचा विषय पाहून म्हटले, की हा फार महत्त्वाचा विषय आहे; त्यामुळे त्याने या विषयावर ४५ मिनिटे बोलावे.
विसमने त्याचे भाषण सुरू केले, पण तेवढ्यात त्याच्या शिक्षकांनी थांबवले आणि शाळेच्या मुख्याध्यापिकेला बोलावणे पाठवले. मुख्याध्यापिका आल्यानंतर त्याने आपले भाषण पुन्हा सुरू केले. विसमने त्याच्या भाषणाच्या सुरवातीला काही प्रश्न विचारले. त्यामुळे मुख्याध्यापिकेची उत्सुकता वाढली आणि त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला त्या भाषणाची एक प्रत द्यायला सांगितले.
थोड्या वेळानंतर, आणखी एक शिक्षक वर्गाच्या शेजारून चाललेले होते. वर्गात काय चाललेले आहे असे त्यांनी विचारले. विसम भाषण देत आहे, असे त्यांना सांगितल्यावर ते म्हणाले, की विसम काय शाबीत करू पाहतोय: मनुष्याला देवाने बनवले की प्राण्यापासून त्याची उत्पत्ती झाली. त्यांना उत्तर मिळाले: “मनुष्याला देवाने बनविले.” विसम हा यहोवाचा एक साक्षीदार आहे हे कळल्यावर त्या शिक्षकाने संपूर्ण वर्गाला म्हटले: “त्याच्या भाषणावरून तुम्हाला समजेल, की विज्ञानही हेच सांगते, की मनुष्याला बनवण्यात आले आहे. त्यांची प्राण्यांपासून उत्पत्ती झाली नाही.”
त्या शिक्षकाकडे क्रिएशन पुस्तक होते व ते युनिव्हर्सिटीत लेक्चर देण्याकरता त्याचा उपयोग करत होते. आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांनी देखील विसमचे भाषण ऐकावे, अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी आपल्या विद्यार्थ्यांना तेथे आणण्याकरता त्यांनी मुख्याध्यापिकेची परवानगी मागितली. त्यामुळे विसमला यहोवाची साक्ष देण्याकरता आणखी एक संधी मिळाली!
• बावीस वर्षांच्या नीनाला सत्य शिकण्याची उत्सुकता होती. एकदा तिच्या आतेभावाने तिला बायबल दिले आणि तो तिला पेन्टेकॉस्टल चर्चला घेऊन गेला. नीनाने आवडीने बायबल वाचायला सुरवात केली. ख्रिश्चनांनी प्रचार केला पाहिजे हे तिने वाचले तेव्हा ती तिच्या ओळखीच्या सर्व लोकांना बायबलविषयी सांगू लागली. ती ज्यांच्याशी बोलायची ते सर्व लोक तिला विचारू लागले, की “तू यहोवाची साक्षीदार आहेस का?” यहोवाचे साक्षीदार कोण आहेत, हे तिला माहीत नसल्यामुळे ती गोंधळून गेली.
सहा वर्षांनंतर यहोवाचे साक्षीदार तिच्या घरी आले आणि त्यांनी तिला देवाच्या राज्याबद्दल सांगितले. पहिल्यांदा तिने त्यांच्या शिकवणींमध्ये चुका शोधण्याचा प्रयत्न केला. पण तिला समजले की त्यांची उत्तरे बुद्धीला पटणारी होती आणि विशेष म्हणजे ती बायबलवर आधारित होती.
देवाचे नाव यहोवा आहे, त्याच्या राज्याद्वारे तो मानवजातीला आशीर्वाद देणार आहे वगैरे गोष्टी ती शिकली. हेच सत्य असल्याची तिची खात्री पटली. तिने यहोवाला आपले जीवन समर्पित केले आणि बाप्तिस्मा घेतला. गेल्या सात वर्षांपासून ती पूर्ण वेळेची सेवा करत आहे. खरेच, यहोवावर प्रेम करणाऱ्यांना तो आशीर्वाद देतो.—१ करिंथकर २:९.