देवाला संतोषविणारे यज्ञ
देवाला संतोषविणारे यज्ञ
“प्रत्येक प्रमुख याजक दाने व यज्ञ अर्पावयास नेमिलेला असतो.”—इब्री लोकांस ८:३.
१. मनुष्य देवाकडे केव्हा वळतो?
अल्फ्रेड एडरशाइम या बायबल अभ्यासकाने असे लिहिले: “मनुष्यांच्या बाबतीत यज्ञ अर्पण करणे हे देवाला प्रार्थना करण्याइतकेच स्वाभाविक आहे. अर्पण देण्याद्वारे तो स्वतःच्या भावना व्यक्त करतो, तर प्रार्थना करण्याद्वारे तो देवाविषयीच्या त्याच्या भावना व्यक्त करतो.” या जगात पाप आल्यापासून मनुष्य परमेश्वरापासून दुरावला आहे. त्याच्यात दोषीपणाची भावना निर्माण झाली आहे. यातून त्याला सुटका हवी आहे पण सुटका करून घेणे त्याच्या हातात नाही. अशा निरुपाय स्थितीत मनुष्याने मदतीकरता देवाकडे वळणे अगदी साहजिक आहे.—रोमकर ५:१२.
२. बायबलमध्ये आपण कोणत्या अर्पणांविषयी वाचतो?
२ बायबलमध्ये यज्ञांचा पहिला उल्लेख काईन व हाबेल यांच्या संदर्भात आढळतो. बायबल त्यांच्याविषयी असे सांगते: “काही काळ लोटल्यावर असे झाले की काइनाने परमेश्वराला शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण आणिले. हाबेलानेहि आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यातून, म्हणजे त्यातल्या पुष्टांतून काही अर्पण आणले.” (उत्पत्ति ४:३, ४) यानंतर, जलप्रलयात एका सबंध दुष्ट पिढीचा नाश झाल्यानंतर त्यातून बचावलेल्या नोहाने “परमेश्वरासाठी वेदी बांधिली आणि सर्व शुद्ध पशु व सर्व शुद्ध पक्षी यातले काही घेऊन त्या वेदीवर त्याचे होमार्पण केले.” (उत्पत्ति ८:२०) देवाचा विश्वासू सेवक आणि मित्र अब्राहाम याने देखील देवाच्या प्रतिज्ञांबद्दल आणि आशीर्वादांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बऱ्याचदा “परमेश्वराची वेदी बांधिली आणि परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली.” (उत्पत्ति १२:८; १३:३, ४, १८) नंतर, अब्राहामाच्या जीवनात अत्यंत कठीण अशी परीक्षा आली. परमेश्वराने त्याला त्याच्या मुलास अर्थात इसहाकास अर्पण करायला सांगितले. (उत्पत्ति २२:१-१४) वरील सर्व वृत्तान्तांवरून आपल्याला यज्ञ, अर्पण किंवा बलिदान या विषयांवर बरेच काही शिकायला मिळते.
३. उपासनेत यज्ञ का दिले जातात?
३ या आणि अशा इतर वृत्तान्तांवरून एक गोष्ट स्पष्ट होते. ती म्हणजे, बलिदाने देण्याविषयी यहोवाने कोणतेही सुस्पष्ट नियम देण्याआधीच बलिदान देण्याच्या प्रथेचा उपासनेत समावेश झाला होता. एका ग्रंथात “यज्ञ” या शब्दाची व्याख्या पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे: “देवाची मर्जी संपादन करण्यासाठी, त्याच्या मर्जीत राहण्यासाठी किंवा अवज्ञा केल्यानंतर पुन्हा देवाशी समेट करण्यासाठी त्याला एखादी वस्तू अर्पण करण्याचा धार्मिक विधी.” या विषयासंबंधी आपल्या मनात बरेच प्रश्न असतील, जसे: उपासनेत यज्ञाची गरज का आहे? कोणत्या प्रकारची अर्पणे देवाला संतोषवितात? आणि प्राचीन काळात दिल्या जाणाऱ्या बलिदानांचा आपल्या उपासनेशी काही संबंध आहे का?
यज्ञाची गरज का उद्भवली?
४. आदाम व हव्वा यांनी पाप केल्यामुळे काय परिणाम झाला?
४ आदामाने जाणूनबुजून पाप केले. देवाची आज्ञा माहीत असूनही त्याने चांगल्यावाईटाचे ज्ञान देणाऱ्या झाडाचे फळ घेतले व खाल्ले. आणि या पापाची शिक्षा मृत्यू होती. कारण उत्पत्ति २:१७) आदाम व हव्वा यांना पापाचे वेतन मिळाले—ते दोघेही कालांतराने मरण पावले.—उत्पत्ति ३:१९; ५:३-५.
देवाने आधीच अगदी स्पष्टपणे सांगितले होते: “ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील.” (५. आदामाच्या संततीला मदत करण्यासाठी यहोवाने का पुढाकार घेतला आणि त्याने त्यांच्याकरता काय केले?
५ पण आदामाच्या संततीविषयी काय? आदामापासून त्यांनाही पाप व अपरिपूर्णता वारशाने मिळाली. त्याअर्थी ते देखील देवापासून दूरावले. त्यांना भविष्यात कसलीही आशा उरली नाही. पहिल्या जोडप्याप्रमाणे शेवटी त्यांचा देखील मृत्यू होणार होता. (रोमकर ५:१४) पण यहोवा देव न्यायी आणि सामर्थ्यशालीच नव्हे तर तो एक प्रेमळ देव देखील आहे. (१ योहान ४:८, १६) आणि या प्रेमामुळेच त्याने आपल्यापासून दुरावलेल्या मानवजातीशी पुन्हा समेट करण्यासाठी पुढाकार घेतला. म्हणूनच “पापाचे वेतन मरण आहे,” असे सांगितल्यानंतर बायबल पुढे असे म्हणते: “पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे.”—रोमकर ६:२३.
६. आदामाच्या पापामुळे मानवजातीला झालेली हानी भरून काढण्यासाठी यहोवाने कोणती तरतूद केली?
६ मानवांना हे कृपादान मिळण्याकरता यहोवा देवाने आदामाच्या पापामुळे झालेली हानी भरून काढण्याची तरतूद केली. हिब्रू भाषेत प्रायश्चित्त असे भाषांतर केलेल्या काफार या शब्दाचा अर्थ “झाकणे” किंवा “पुसून टाकणे” असाही होतो. * त्याअर्थी, यहोवाने आदामापासून आलेले पाप झाकून टाकण्याची व त्याच्यामुळे झालेले नुकसान भरून काढण्याची व्यवस्था केली. यामुळे सार्वकालिक जीवनाच्या कृपादानास पात्र असणाऱ्यांना पापाच्या व मृत्यूच्या विळख्यातून मुक्त होण्याची संधी मिळाली.—रोमकर ८:२१.
७. (अ) देवाने सैतानाला दिलेल्या शापामुळे मानवांना कोणती आशा मिळाली? (ब) पाप व मृत्यू यांपासून मानवांना मुक्त करण्यासाठी कोणती किंमत देणे जरूरीचे होते?
७ आदाम व हव्वा यांनी पाप केल्यानंतर लगेच पाप व मृत्यूच्या दास्यत्वातून मुक्त होण्याच्या आशेचा अप्रत्यक्षरित्या उल्लेख करण्यात आला. सैतानाला शिक्षा देताना यहोवाने म्हटले: “तू व स्त्री, तुझी संतति व तिची संतति यांमध्ये मी परस्पर वैर स्थापीन; ती तुझे डोके फोडील, व तू तिची टाच फोडिशील.” (उत्पत्ति ३:१५) या भविष्यसूचक प्रतिज्ञेवर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना आशेचा किरण मिळाला होता. पण पाप व मृत्यूपासून मुक्तता मिळण्याकरता किंमत मोजावी लागणार होती. देवाने प्रतिज्ञा केलेली संतती थेट सैतानाचा नाश करू शकत नव्हती; आधी संततीची टाच फोडली जाणार होती. म्हणजेच या संततीला मरावे लागणार होते, पण तिचा कायमचा नाश होणार नव्हता.
८. (अ) स्त्रीची संतती काईन नव्हता हे कशाप्रकारे स्पष्ट झाले? (ब) देवाने हाबेलाचा यज्ञ का स्वीकारला?
८ वचनयुक्त संतती कोण असेल याविषयी आदाम व हव्वा यांनी नक्कीच विचार केला असेल. हव्वेने काईन या तिच्या पहिल्या पुत्राला जन्म दिला तेव्हा ती म्हणाली: “परमेश्वराच्या सहाय्याने मला पुरुषसंतान लाभले आहे.” (उत्पत्ति ४:१) आपला पुत्रच पुढे भाकीत केलेली संतती ठरेल असे तर तिला वाटत नसेल? कदाचित वाटलेही असेल, पण काईन ती संतती नव्हता हे पुढे स्पष्ट झाले. त्याचे अर्पण स्वीकारले गेले नाही. दुसरीकडे पाहता, त्याचा भाऊ हाबेल याने देवाच्या प्रतिज्ञेवर विश्वास ठेवला आणि त्यामुळे आपल्या कळपातले एक मेंढरू यहोवाला यज्ञ करावेसे त्याला वाटले. बायबलमध्ये हाबेलाबद्दल असे म्हटले आहे: “विश्वासाने हाबेलाने काइनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला केला, तेणेकरून तो नीतिमान आहे अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली.”—इब्री लोकांस ११:४.
९. (अ) हाबेलाने कशावर विश्वास ठेवला आणि हा विश्वास त्याने कशाप्रकारे व्यक्त केला? (ब) हाबेलाच्या बलिदानामुळे काय साध्य झाले?
९ हाबेलला केवळ देव आहे असा विश्वास असल्यामुळे त्याला नीतिमान म्हणण्यात आले नाही. देवाच्या अस्तित्वावर काईनालाही विश्वास होता. पण हाबेलला देवाच्या प्रतिज्ञेवर विश्वास होता. एका संततीद्वारे विश्वासू मानवांना तारण मिळेल या प्रतिज्ञेवर त्याचा विश्वास होता. पण ही प्रतिज्ञा कशाप्रकारे पूर्ण होईल हे तोपर्यंत देवाने मानवांना कळवले नव्हते. त्या संततीची टाच फोडली जाईल हे मात्र हाबेलाला माहीत होते. रक्त सांडणे, म्हणजेच बलिदान देणे आवश्यक आहे हे हाबेलाला कळले असावे. हाबेलाने जीवनदात्या उत्पत्ति ४:४; इब्री लोकांस ११:१, ६.
परमेश्वराला जीवन व रक्ताचे बलिदान दिले. यहोवाच्या प्रतिज्ञेच्या पूर्णतेची आपण आतूरतेने वाट बघत आहोत हे हाबेलाने याद्वारे व्यक्त केले. त्याच्या या विश्वासामुळेच यहोवाने हाबेलाचा यज्ञ स्वीकारला. त्याच्या या यज्ञातून बलिदानाचा खरा अर्थ काही प्रमाणात स्पष्ट झाला. पापी मनुष्यांनी यहोवाच्या कृपेची याचना करण्याचे ते एक माध्यम बनले.—१०. यहोवाने अब्राहामाला इसहाकाचे बलिदान देण्याची आज्ञा दिल्यामुळे बलिदानाचा अर्थ कशाप्रकारे स्पष्ट झाला?
१० यहोवाने अब्राहामाला त्याच्या पुत्राचा म्हणजे इसहाकाचा होमबली करण्याची आज्ञा दिली तेव्हा बलिदानाचा अर्थ अगदीच स्पष्ट झाला. अर्थात हे बलिदान खरोखर देण्यात आले नाही. तरीसुद्धा, भविष्यात यहोवा देव कशाप्रकारे आपल्या पुत्राचे सर्वश्रेष्ठ बलिदान देऊन मानवांना सार्वकालिक जीवन जगण्याची संधी देईल हे यातून चित्रित करण्यात आले. (योहान ३:१६) मोशेच्या नियमशास्त्रात वेगवेगळ्या प्रकारची बलिदाने देण्याची आज्ञा देण्यात आली होती. ही बलिदाने भविष्यसूचक होती. यांद्वारे देवाने त्याच्या लोकांना, पापांची क्षमा होण्यासाठी व तारण मिळण्यासाठी त्यांनी काय केले पाहिजे हे शिकवले. या बलिदानांवरून आपल्याला काय शिकायला मिळते?
यहोवाला संतोषविणारी बलिदाने
११. इस्राएलातील प्रमुख याजक कोणत्या दोन प्रकारची अर्पणे द्यायचे आणि या बलिदानांचा काय उद्देश होता?
११ प्रेषित पौलाने म्हटले: “प्रत्येक प्रमुख याजक दाने व यज्ञ अर्पावयास नेमिलेला असतो.” (इब्री लोकांस ८:३) “दाने” व “यज्ञ” म्हणजेच “पापाबद्दल यज्ञ,” अशा दोन अर्पणांचा पौलाने उल्लेख केला. (इब्री लोकांस ५:१) भेटवस्तू ही सहसा आपले प्रेम व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच मैत्री वाढवण्यासाठी दिली जाते. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीची मर्जी संपादन करण्यासाठी किंवा कोणाची स्वीकृती मिळण्यासाठी बलिदाने दिली जातात. (उत्पत्ति ३२:२०; नीतिसूत्रे १८:१६) नियमशास्त्रात जी बलिदाने देण्याची आज्ञा करण्यात आली होती, ती एका दृष्टीने यहोवाची मर्जी संपादन करण्यासाठी किंवा त्याची स्वीकृती मिळवण्यासाठी दिलेल्या भेटवस्तूंप्रमाणेच होती. * नियमशास्त्रातील आज्ञांचे उल्लंघन करणाऱ्यांना त्यांच्या पापांची नुकसानभरपाई करावी लागत असे. आणि यासाठी “पापाबद्दल यज्ञ” द्यावे लागत. बायबलच्या पहिल्या पाच पुस्तकांत, खासकरून निर्गम, लेवीय व गणना या पुस्तकांत वेगवेगळ्या प्रकारच्या बलिदानांविषयी बरीच सविस्तर माहिती दिली आहे. त्यातल्या सर्वच बारीकसारीक गोष्टी आपल्याला लक्षात ठेवता येणार नाहीत, पण या वेगवेगळ्या प्रकारच्या बलिदानांसंबंधाने काही मुख्य मुद्दे आपण आठवणीत ठेवू शकतो.
१२. नियमशास्त्रात ज्या बलिदानांविषयी किंवा अर्पणांविषयी आज्ञा देण्यात आली होती त्यांविषयी आपण बायबलमध्ये कोठे वाचतो?
१२ लेवीय १ ते ७ या अध्यायांत पाच मुख्य प्रकारच्या अर्पणांविषयी सांगितले आहे—होमार्पणे, अन्नार्पणे, शांत्यार्पणे, पापार्पणे आणि दोषार्पणे. या सात अध्यायांत या सर्व प्रकारच्या अर्पणांतील प्रत्येक अर्पणाविषयी सविस्तर वर्णन केले आहे. यांतील काही अर्पणे एकाचवेळी केली जात. या अध्यायांत दोन वेळा, वेगवेगळ्या गोष्टी स्पष्ट करण्यासाठी या अर्पणांचे वर्णन आढळते. उदाहरणार्थ, लेवीय १:२ ते ६:७ च्या वृत्तान्तात कोणत्या वस्तूंचे अर्पण करावे याविषयी सांगण्यात आले आहे, तर लेवीय ६:८ ते ७:३६ पर्यंत अर्पणांतील कोणता हिस्सा याजकांना दिला जावा आणि कोणता हिस्सा अर्पण करणाऱ्याला दिला जावा याविषयी सांगण्यात आले आहे. यानंतर गणना २८ व २९ या अध्यायांत कोणती अर्पणे केव्हा दिली जावीत याचे जणू एक वेळापत्रकच दिले आहे. दररोज, दर आठवड्याला, दर महिन्याला आणि वार्षिक उत्सवांच्या वेळी कोणती अर्पणे द्यावीत हे या अध्यायांत सांगितले आहे.
१३. स्वेच्छेने दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या अर्पणांचे वर्णन करा.
लेवीय १:३, ४, ९; उत्पत्ति ८:२१.
१३ आपल्यावर देवाची कृपा व्हावी म्हणून काही जण स्वेच्छेने अर्पण द्यायचे. ही अर्पणे याप्रमाणे होती: होमार्पणे, अन्नार्पणे आणि शांत्यर्पणे. काही अभ्यासकांचे असे मत आहे, की “होमार्पण” असे भाषांतर केलेल्या मूळ इब्री शब्दाचा अर्थ “चढवावयाचे अर्पण” किंवा “चढणारे अर्पण” असा होता. हा अर्थ योग्यच होता कारण होमार्पणात, अर्पण केलेल्या पशूचे वेदीवर होम केले जात असे. या होमार्पणातून येणारा सुवास जणू स्वर्गापर्यंत चढायचा. होमार्पणाचे एक वैशिष्ट्य असे होते की अर्पण केलेल्या पशूचे रक्त वेदीभोवती शिंपडल्यानंतर तो सबंध पशू देवाला अर्पण केला जात असे. याजकांना अशी आज्ञा देण्यात आली होती की “त्या सगळ्याचा वेदीवर होम करून ते अर्पावे; ते परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय.”—१४. अन्नार्पण कशाप्रकारे दिले जायचे?
१४ लेवीय या पुस्तकाच्या दुसऱ्या अध्यायात अन्नार्पणांविषयी वर्णन केले आहे. अन्नार्पणे देखील ऐच्छिक अर्पणांपैकी होती. या अर्पणांत सहसा तेलात मळलेले पीठ व ऊद दिला जात असे. “मूठभर सपीठ, तेल व सगळा धूप घेऊन याजकाने स्मारकभाग म्हणून वेदीवर त्याचा होम करावा. हे परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय.” (लेवीय २:२) निवासमंडपात असलेल्या धूपवेदीवर व मंदिरात जो धूप वापरला जायचा, तो बऱ्याच सुवासिक वस्तूंपासून तयार केला जात असे. त्यांपैकी एक वस्तू म्हणजे ऊद. (निर्गम ३०:३४-३६) म्हणूनच दावीद राजाने परमेश्वराला अशी प्रार्थना केली: “माझी प्रार्थना, तुझ्यासमोर धुपाप्रमाणे [“धुपाप्रमाणे तयार केलेली,” NW] माझे हात उभारणे संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे, सादर होवो.”—स्तोत्र १४१:२.
१५. शांत्यार्पणाचा उद्देश काय होता?
१५ आणखी एक ऐच्छिक बलिदान म्हणजे शांत्यार्पण. या अर्पणांबद्दल लेवीयच्या तिसऱ्या अध्यायात सविस्तर वर्णन आहे. या अर्पणांना “शांती अर्पणांचे बलिदान” असेही म्हटले जाते. हिब्रू भाषेत “शांती” या शब्दाचा वापर केवळ युद्ध किंवा इतर प्रकारची अशांतता नसण्याच्या स्थितीला सूचित करण्यासाठी वापरला जात नाही. स्टडीज इन द मोसाइक इंस्टिट्यूशन्स या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे, देवासोबत लेवीय ३:१७; ७:१६-२१; १९:५-८) लाक्षणिकरित्या अर्पण करणारा, याजक आणि यहोवा देव सर्वजण जणू एकाच मेजावर जेवत आहेत आणि त्याअर्थी त्यांच्यात शांतीचे संबंध आहेत असे यावरून सूचित होत असे.
शांतीचे संबंध, समृद्धी, सुख व आनंद सूचित करण्यासाठी देखील हा शब्द वापरला जातो. शांत्यार्पणे ही देवासोबत शांतीसंबंध प्रस्थापित करण्यासाठी दिली जात नव्हती. उलट ज्यांचे आधीपासूनच देवासोबत शांतीचे संबंध आहेत ते देवाला आभार व्यक्त करण्यासाठी किंवा त्याच्या आशीर्वादांबद्दल व कृपेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही अर्पणे देत असत. अर्पण केलेल्या पशूचे किंवा पक्षाचे रक्त व चरबी यहोवाला हवन केल्यानंतर याजक व अर्पण करणारा या दोघांना त्या अर्पणातील काही भाग मिळायचा. (१६. (अ) पापार्पणे व दोषार्पणे यांचा काय उद्देश होता? (ब) ही अर्पणे होमार्पणांपासून कशी वेगळी होती?
१६ पापार्पणे व दोषार्पणे ही पापाबद्दल क्षमा होण्यासाठी किंवा नियमशास्त्रातील आज्ञांचे उल्लंघन केल्यावर त्याचे प्रायश्चित्त करण्यासाठी दिली जायची. या अर्पणांचेही वेदीवर होम केले जात होते; पण ही अर्पणे होमार्पणांपेक्षा वेगळी होती कारण या अर्पणातील सबंध पशू नव्हे तर फक्त चरबी आणि पशूच्या शरीराचे काही भागच यहोवाला अर्पण केले जायचे. इतर भाग छावणीच्या बाहेर फेकले जायचे किंवा काहीवेळा याजकांना दिले जायचे. ही एक अर्थपूर्ण बाब होती. होमार्पण हे देवाची कृपा व्हावी म्हणून स्वेच्छेने दिलेले अर्पण किंवा देवाला दिलेले दान होते त्यामुळे ते पूर्णपणे यहोवाला दिले जायचे. आणखी एक खास गोष्ट म्हणजे, सहसा होमार्पण देण्याआधी पापार्पण किंवा दोषार्पण दिले जायचे. याचा अर्थ असा होता, की पापाची क्षमा झाल्यानंतरच त्या व्यक्तीचे ऐच्छिक बलिदान यहोवाकडून स्वीकारले जायचे.—लेवीय ८:१४, १८; ९:२, ३; १६:३, ५.
१७, १८. पापार्पणांची तरतूद कशासाठी करण्यात आली होती आणि दोषार्पणांचा काय उद्देश होता?
१७ पापार्पण हे नियमशास्त्राच्या विरुद्ध अजाणतेत झालेल्या किंवा मनुष्याच्या स्वाभाविक अपरिपूर्णतेमुळे झालेल्या पापांसाठीच दिले जायचे. “परमेश्वराने निषिद्ध ठरविलेल्या कृत्यांपैकी एखादे कृत्य चुकून केल्याने कोणाकडून पाप घडले,” तर त्याला त्याच्या ऐपतीप्रमाणे पापार्पण द्यावे लागायचे. (लेवीय ४:२, ३, २२, २७) पण जाणूनबुजून पाप करणाऱ्यांना अर्थात, पश्चात्ताप न करणाऱ्यांना ठार मारले जाई. त्यांच्याकरता कोणतेच अर्पण देण्याची तरतूद नव्हती.—निर्गम २१:१२-१५; लेवीय १७:१०; २०:२, ६, १०; गणना १५:३०; इब्री लोकांस २:२.
१८ दोषार्पणांचा उद्देश लेवीय या पुस्तकातील ५ व्या व ६ व्या अध्यायात स्पष्ट केला आहे. एका व्यक्तीकडून अजाणतेत पाप झाले असेल. पण त्याच्या त्या पापामुळे जर आणखी कोणाच्या किंवा यहोवा देवाच्या हक्कांचे उल्लंघन झाले असेल तर त्याला आपली चूक सुधारणे भाग होते. अशा बऱ्याच पापांचा उल्लेख करण्यात आला आहे. यांत अशी देखील काही पातके होती ज्यांमुळे कोणाचे नुकसान झाले नव्हते. (५:२-६) काही पातके ‘परमेश्वराच्या पवित्र वस्तूंच्या’ संदर्भात होती. (५:१४-१६) तर इतर काही अशी पातके होती जी पूर्णपणे अजाणतेत नाही तरी चुकीच्या इच्छांमुळे किंवा शारीरिक दुर्बलतेमुळे झाली होती (६:१-३). एखाद्या व्यक्तीला तिचे पाप कबूल करण्याव्यतिरिक्त, झालेल्या नुकसानाची भरपाई करावी लागायची आणि यानंतर यहोवाला दोषार्पण सादर करावे लागायचे.—लेवीय ६:४-७.
भविष्यात येणाऱ्या चांगल्या गोष्टींची छाया
१९. नियमशास्त्र आणि बलिदानांची तरतूद असूनही इस्राएल राष्ट्रावर देवाची कृपादृष्टी का झाली नाही?
१९ मोशेचे नियमशास्त्र व त्यातील अनेक यज्ञ व अर्पणे इस्राएली लोकांना यासाठी देण्यात आली होती की वचनयुक्त संतान येईपर्यंत त्यांना देवाची उपासना करता यावी, व त्यांच्यावर देवाची कृपा व आशीर्वाद राहावा. प्रेषित पौल जो स्वतः यहुदी होता, त्याने म्हटले: “नियमशास्त्र आपल्याला गलतीकर ३:२४) दुःखाची गोष्ट म्हणजे इस्राएल राष्ट्राने या बालरक्षकाकडून मिळालेल्या ज्ञानाचा अवलंब केला नाही, उलट त्यांना मिळालेल्या विशेष हक्काचा त्यांनी गैरफायदा घेतला. यामुळे त्यांची अनेक बलिदाने व यज्ञ यहोवाला घृणास्पद वाटू लागले. यहोवाने म्हटले: “तुमचे बहुत यज्ञबलि माझ्या काय कामाचे? मेंढराचे होम, पुष्ट वासरांची वपा यांनी माझी अति तृप्ति झाली आहे; बैल, कोकरे व बोकड यांच्या रक्ताने मला संतोष होत नाही.”—यशया १:११.
ख्रिस्ताकडे पोंहचविणारे बालरक्षक होते.” (२०. सा.यु. ७० साली काय घडले आणि नियमशास्त्र व बलिदानांवर याचा कसा प्रभाव पडला?
२० सा.यु. ७० साली यहुदी धार्मिक व्यवस्था, जेरूसलेमेतील मंदिर, याजकगण सर्वकाही संपुष्टात आले. त्यानंतर, नियमशास्त्रात सांगितल्यानुसार अर्पण देण्याची प्रथा आपोआपच बंद झाली. पण नियमशास्त्रात ज्यांना इतके महत्त्व होते त्या बलिदानांना आज देवाच्या सेवकांकरता काहीच अर्थ नाही का? याविषयी पुढच्या लेखात चर्चा केली जाईल.
[तळटीपा]
^ परि. 6 वॉचटावर बायबल ॲन्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित केलेल्या इन्साईट ऑन द स्क्रिपचर्स या प्रकाशनात प्रायश्चित्त या शब्दाचा खुलासा करण्यात आला आहे. “बायबलमध्ये ‘प्रायश्चित्त’ हा शब्द ‘झाकण’ किंवा ‘भरपाई’ या अर्थाने मुख्यतः वापरण्यात आला आहे. भरपाईसाठी किंवा झाकण्यासाठी जे दिले जाते ते, ज्यासाठी ते दिले जाते त्याच्या समतुल्य किंवा समान असले पाहिजे.” आदाम परिपूर्ण असल्यामुळे त्याने जे गमवले त्याचे प्रायश्चित देण्यासाठी समतुल्य भरपाई म्हणजेच एका परिपूर्ण मानवी जीवनाचे बलिदान देणे आवश्यक होते.”
^ परि. 11 “अर्पण” असे भाषांतर केलेला मूळ हिब्रू शब्द कोर्बान आहे. शास्त्री व परूशी यांच्या एका अशास्त्रवचनीय प्रथेविषयी येशूने त्यांची कशाप्रकारे निंदा केली याबद्दल वर्णन करताना मार्कने “कुर्बान” या शब्दाचा अर्थ ‘देवाला अर्पण केले आहे’ असा सांगितला.—मार्क ७:११.
तुम्ही सांगू शकता का?
• जुन्या काळातील देवाच्या विश्वासू सेवकांनी त्याला अर्पणे का वाहिली?
• बलिदानांची गरज का उद्भवली?
• नियमशास्त्रात कोणती मुख्य अर्पणे देण्याची आज्ञा होती आणि या अर्पणांचा काय उद्देश होता?
• पौलाने सांगितल्यानुसार नियमशास्त्राचा आणि बलिदानांचा काय उद्देश होता?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१४ पानांवरील चित्र]
यहोवाने हाबेलचे बलिदान स्वीकारले कारण त्याद्वारे यहोवाच्या अभिवचनांवरील त्याचा विश्वास व्यक्त झाला
[१५ पानांवरील चित्र]
या दृश्याची अर्थसूचकता तुम्हाला समजली आहे का?