व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

द्वेषाची आग शमवण्याचा एकमेव मार्ग

द्वेषाची आग शमवण्याचा एकमेव मार्ग

द्वेषाची आग शमवण्याचा एकमेव मार्ग

“द्वेष भीतीमुळे निर्माण होतो . . . आपल्याला ज्याची भीती वाटते त्याचा आपण द्वेष करतो. तेव्हा, जोपर्यंत आपल्या मनात भीती असते तोपर्यंत द्वेषही मनात घर करून राहतो.”—सीरील कॉन्‍नली, संपादक आणि संमिक्षक.

मानवी समाजाचा अभ्यास करणाऱ्‍या तज्ज्ञांचे मत आहे की द्वेष एखाद्याच्या मनात इतक्या खोलवर मुळावलेला असतो की त्या व्यक्‍तीला त्याची कल्पनासुद्धा नसते. राजकीय शास्त्राचा अभ्यास करणाऱ्‍या एका शास्त्रज्ञानेसुद्धा असे म्हटले: “द्वेष मनुष्याच्या जीवनाचा एक भाग आहे आणि त्याची मुळे इतकी मजबूत असतात की ती कधीच उखडली जाऊ शकत नाही.”

मानवी स्वभावाचा अभ्यास केल्यानंतर तज्ज्ञ या निष्कर्षावर का पोहंचले असतील हे समजण्याजोगे आहे. कारण बायबल असे म्हणते की प्रत्येक मनुष्यामध्ये ‘अन्याय’ आणि ‘पाप’ असते. (स्तोत्र ५१:५, पं.र.भा.) याच कारणामुळे हजारो वर्षांपूर्वी मनुष्याच्या निर्माणकर्त्याने असे म्हटले: “पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार आहे, त्याच्या मनातील येणाऱ्‍या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात.”—उत्पत्ति ६:५.

मनुष्य हा पापी आणि स्वार्थी आहे. (अनुवाद ३२:५) त्यामुळे त्याच्यामध्ये भेदभाव व द्वेष यांसारखे गुण असतात आणि त्यामुळेच तो नेहमी इतरांविषयी गैरसमज करून घेतो. आणि याच कारणामुळे आजपर्यंत कोणतेही सरकार किंवा संस्था मनुष्याच्या मनातील दुष्ट भावनांचे उच्चाटन करू शकले नाही. एक विदेशी बातमीदार जोहान्‍ना मेगिरी यांनी असे म्हटले: “बॉस्निया, सोमालिया, लायबीरिया, काश्‍मीर, कॉकेशस यांसारख्या ठिकाणी द्वेषामुळे जे रक्‍ताचे पाट वाहिले त्यास जगातले सगळ्यात कार्यक्षम पोलीस देखील रोखू शकले नाही.”

तर मग प्रश्‍न आहे, की द्वेषाची ही आग कशी काय शमवली जाऊ शकते? ते जाणण्याआधी द्वेषाच्या मागे मुख्यतः कोणती कारणे आहेत ती आपण जाणून घेऊ या.

भीती

तसे पाहायला गेले तर द्वेषाचे एक नव्हे बरेच चेहरे आहेत. लेखक अँड्रू सुल्लीवन यांनी द्वेषाच्या वेगवेगळ्या रूपाचे अतिशय चोख वर्णन केले आहे. त्यांनी म्हटले: “द्वेषाचे एक कारण आहे भय. तर दुसरे कारण, इतरांना तुच्छ लेखणे; एक प्रकारचा द्वेष प्रबळतेमुळे जन्म घेतो तर दुसरा निर्बलतेमुळे; एकात सूड घेण्याची भावना असते तर दुसऱ्‍यात हेवा करण्याची. . . .  अत्याचार करणाऱ्‍यांच्या मनात द्वेष असतो आणि अत्याचार सहन करणाऱ्‍यांच्या मनातही द्वेष असतो. एक प्रकारचा द्वेष वर्षानुवर्षे आतल्या आत खदखदत असतो तर एकाची आग हळूहळू विझायला लागते. एका प्रकारचा द्वेष अचानक भडकतो तर दुसरा कधी पेटतच नाही.”

आज लोकांच्या मनात खदखदणाऱ्‍या द्वेषाचे एक खास कारण म्हणजे पैसा आणि लोकांचे राहणीमान. उदाहरणार्थ, काही देशातील लोकांचे विदेशी लोकांविषयी आधीपासूनच बरेच गैरसमज असतात. त्यामुळे विदेशी लोक त्यांच्या देशात राहायला येतात आणि श्रीमंत होऊ लागतात तेव्हा तेथे राहणारे लोक त्यांचा द्वेष करू लागतात. कधी कधी काही ठिकाणी बाहेरचे लोक तेथे आल्यामुळे लोकांचे राहणीमान खालावते त्यामुळे देखील लोकांच्या मनात द्वेष निर्माण होतो.

ते कदाचित असा विचार करतील, की विदेशी लोक कमीतकमी पगारात देखील काम करण्यासाठी तयार होतील आणि त्यामुळे आपल्या नोकरीचे आबाळ होतील. किंवा मग ते असा विचार करतील की या विदेशी लोकांमुळे आपल्या देशातील राहण्याचे स्तर खालावतील व आपल्या इथले दर कमी होतील. त्यांची ही भीती रास्त आहे की नाही ही वेगळी गोष्ट आहे. पण एक गोष्ट मात्र खरी आहे, की आर्थिक स्थिती ढासळण्याची भीती आणि जीवन स्तर खालावण्याची भीती लोकांच्या मनात भेदभाव आणि द्वेष उत्पन्‍न करते.

तर मग द्वेषाची ही मुळे उपटून काढण्यासाठी प्रथम काय करण्यास हवे? त्यासाठी प्रथम आपल्याला आपली विचारसरणी बदलण्यास हवी.

विचारसरणीत बदल करणे

मेगगिरी यांनीही तेच म्हटले: “द्वेषाची मूळे उपटून काढण्यासाठी प्रथम मनुष्याच्या विचारसरणीत बदल करणे आवश्‍यक आहे.” पण, मनुष्याच्या विचारसरणीत बदल घडवून आणणे शक्य आहे का? होय, निश्‍चित शक्य आहे. देवाचे वचन बायबल, हे लोकांच्या मनातून द्वेषाचे समूळ उच्चाटन करण्यात सर्वात परिणामकारक आणि शक्‍तिशाली माध्यम असल्याचे सिद्ध झाले आहे. “कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याहि दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण असून, जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्‍यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू ह्‍यांचे परीक्षक असे आहे.”—इब्री लोकांस ४:१२.

अर्थात, द्वेषभाव आणि गैरसमज यांचे रातोरात समूळ उच्चाटन होणार नाही; शिवाय, या गोष्टी आपोआप दूर होणार नाहीत हेही खरे आहे. परंतू हे अशक्य मुळीच नाही. येशू ख्रिस्त पृथ्वीवर होता तेव्हा बऱ्‍याच लोकांनी आपल्या मनातून द्वेष काढून टाकला होता. येशूच्या शिक्षणात इतके सामर्थ्य होते की ते लोकांच्या मनाला भिडायचे आणि त्यांचा संपूर्ण दृष्टिकोनच बदलून जायचा. आपल्या दिवसांतही असे लाखो लोक आहेत जे येशूचा सल्ला जीवनात लागू करण्यात यशस्वी झाले: “तुम्ही आपल्या वैऱ्‍यांवर प्रीति करा आणि जे तुमचा छळ करितात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.”—मत्तय ५:४४.

येशू केवळ प्रेमाने जीवन जगण्याची शिकवण देत नव्हता तर त्यानुसार तो स्वतः देखील जीवन जगत होता. त्याने अशा लोकांशी देखील मैत्री केली ज्यांचा यहुदी समाज कमालीचा द्वेष करत होते. उदाहरणार्थ, यहुदी लोक ज्याला अतिशय तुच्छ लेखायचे त्या कर घेणाऱ्‍या मत्तयाला देखील त्याने आपला जीवलग मित्र बनवले. (मत्तय ९:९; ११:१९) या शिवाय, येशूने अशा एका शुद्ध उपासनेची सुरवात केली ज्यात कोणत्याही जाती-धर्माचे लोक एकत्र येऊन देवाची उपासना करू शकत होते. (गलतीकर ३:२८) आणि पहिल्या शतकात असे अनेकजण येशूचे शिष्य बनले जे निरनिराळ्या जातीचे होते. (प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५) त्यांच्यातील प्रेमामुळे ते फार विख्यात झाले. (योहान १३:३५) कारण त्यांनी आपल्या वैऱ्‍यांचा देखील द्वेष केला नाही. काही लोकांनी द्वेषामुळे येशूचा शिष्य, स्तेफन याला दगडमार करून ठार मारले तेव्हा स्तेफनाचे शेवटचे शब्द होते: “हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नको.” होय, स्तेफनाने त्याला ठार मारणाऱ्‍या लोकांचेही हितच चिंतीले.—प्रेषितांची कृत्ये ६:८-१४; ७:५४-६०.

अशाच प्रकारे आजही खरे ख्रिस्ती येशूचा सल्ला मानतात आणि ते केवळ आपल्या बंधु-बहिणींचेच नव्हे तर आपला द्वेष करणाऱ्‍यांचेही हित चिंतितात. (गलतीकर ६:१०) खरे ख्रिस्ती आपल्या मनातून द्वेषाचे उच्चाटन करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. मनुष्याच्या मनात कोणत्या कारणामुळे द्वेष उत्पन्‍न होतो हे ते जाणतात आणि आपल्या मनात द्वेषाला कोणतेही स्थान मिळू नये म्हणून आपल्या मनात प्रेमाचे बीज पेरतात. प्राचीन काळी एका बुद्धिमान व्यक्‍तीने म्हटले त्याप्रमाणे: “द्वेष कलह उत्पन्‍न करितो; प्रीति सर्व अपराधांवर झाकण घालिते.”—नीतिसूत्रे १०:१२.

प्रेषित पौलाने म्हटले: “जो कोणी आपल्या बंधूंचा द्वेष करितो तो नरहिंसक आहे; आणि कोणाहि नरहिंसकाच्या ठायी सार्वकालिक जीवन राहत नाही, हे तुम्हांस माहीत आहे.” (१ योहान ३:१५) या गोष्टीवर यहोवाच्या साक्षीदारांचा पूर्ण विश्‍वास आहे. ते निरनिराळ्या भाषा बोलणारे आहेत, निरनिराळ्या जातीतून, धर्मातून आणि संस्कृतीतून आले आहेत आणि संपूर्ण जगभरात विखुरलेले आहेत. असे असले तरीही कुटुंबात असते तशी एकता आणि प्रेम त्यांच्यात आहे. आणि त्यांच्यामध्ये द्वेषाला कसलाही थारा नाही.—सोबत दिलेल्या दोन पेट्या पाहा.

भविष्यात द्वेषाचे समूळ उच्चाटन

तुम्ही कदाचित म्हणाल: “काही लोक द्वेषाचे समूळ उच्चाटन करण्यात यशस्वी झाले आहेत ही फार चांगली गोष्ट आहे.” पण, जगभरातले सगळेच लोक बदलत नाहीत तोपर्यंत द्वेषाची आग कशी काय शमणार? हे खरे की एखाद्या व्यक्‍तीच्या मनात द्वेषाची भावना नसली तर ती आणखी कोणाच्या तरी द्वेषेचा बळी ठरू शकते. तेव्हा, द्वेषाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आपण यहोवाची आस धरणे जरूरीचे आहे.

पृथ्वीवरून द्वेषाचे नामोनिशान मिटून टाकण्याची खूणगाठ देवाने मनाशी बांधली आहे. देवाचे राज्य स्वर्गातून पृथ्वीवर राज्य करील तेव्हा देव असे करेल. याच राज्याविषयी येशूने अशाप्रकारे प्रार्थना करण्यास शिकवले होते: “हे आमच्या स्वर्गांतील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छे प्रमाणे होवो.”—मत्तय ६:९, १०.

देवाचे राज्य येईल तेव्हा, आपल्या मनात द्वेष निर्माण करणारी कोणतीही कारणे अस्तित्वात राहणार नाहीत. होय, खोट्या गोष्टींचा लवलेशही राहणार नाही कारण तेथे सर्वांना सत्य शिकवले जाईल. तेथे चौफेर धार्मिक लोक असल्यामुळे पक्षपाताची भावना नसेल. मनात गैरसमज नसतील कारण तेव्हा सर्व लोक देवाच्या ज्ञानाच्या प्रकाशात चालतील. या शिवाय, देवाने असे आश्‍वासन दिले आहे की त्यावेळी तो आपल्या “डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्‍यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत.”—प्रकटीकरण २१:१-४.

आणखीन एक आनंदाची बातमी! या पृथ्वीवरून द्वेषाचे समूळ उच्चाटन केल्यानंतर एक नवीन जग लवकरच येईल. तेथे लोकांमध्ये खरे प्रेम असेल कारण तेव्हा मानवजातीला परिपूर्ण केले जाईल. (लूक २३:४३; २ पेत्र ३:१३) आपण असे पूर्ण खात्रीने म्हणू शकतो कारण आपण ‘शेवटल्या काळात’ जगत आहोत याचे अनेक पुरावे आपल्याजवळ आहेत.—२ तीमथ्य ३: १-५; मत्तय २४:३-१४.

परंतु तोपर्यंत तुम्हाला वाट पाहात राहणे आवश्‍यक आहे. खरे तर आजही आपल्याला ती परिस्थिती पाहायला मिळते. तुम्ही अशा लोकांशी मैत्री करू शकता ज्यांच्यामध्ये प्रेम आहे. आणि तुम्ही या लेखासोबत दिलेल्या खऱ्‍या घटनांविषयी वाचाल तेव्हा तुमची पक्की खात्री होईल की येशूच्या प्रेमाने खरोखर बऱ्‍याच लोकांच्या मनात घर केले आहे. या बंधुसमाजाचा एक भाग बनण्यासाठी आम्ही तुमचे मनस्वी स्वागत करत आहोत!

[५ पानांवरील चौकट]

“आमच्या जागी येशू असता तर त्याने काय केलं असतं?”

जून १९९८ मध्ये अमेरिकेतील टेक्सास शहरात तीन श्‍वेतवर्णीयांनी जेम्स बर्ड ज्युनियर या कृष्णवर्णीय माणसाची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. प्रथम त्यांनी त्याला अतिशय दूर एकाकी ठिकाणी नेले आणि त्याचे पाय बांधून त्याला बेदम मारले. त्यानंतर त्याला ट्रकच्या मागे बांधले आणि ते ट्रक चालवू लागले. त्यांनी पाच किलोमीटरपर्यंत त्याला फरफटत नेले. तो अगदी रक्‍तबंबाळ झाला. शेवटी, तो काँक्रीटच्या एक पाइपवर आदळला आणि तिथेच जीवानिशी गेला. १९९० च्या दशकात घडलेली ही हिंसा खरं तर वांशिक द्वेषामुळेच घडली.

जेम्स बर्डच्या तीन बहिणी यहोवाच्या साक्षीदार आहेत. आपल्या भावाची इतक्या क्रूरपणे हत्या करणाऱ्‍या त्या खतरनाक अपराध्यांविषयी त्यांना काय वाटते असे त्यांना विचारले तेव्हा त्यांनी म्हटले: “त्या निर्दयी खुन्यांनी आमच्या जिवलग, निर्दोष भावाला जनावरासारखं मारलं तेव्हा आम्हाला कसं वाटलं ते आम्ही शब्दांत सांगू शकत नाही. आणि त्या अपराध्यांविषयी सांगायचं तर त्यांचा सूड घेण्याचा किंवा शिवीगाळ करण्याचा तिळमात्र विचारही आमच्या मनात नाही. आम्ही फक्‍त हाच विचार केला की आमच्या जागी येशू असता तर त्याने काय केलं असतं?’ तो शांती आणि आशेविषयी बोलला असता यात कोणतीही शंका नाही.”

बायबलचे वचन त्या तिघ्या बहिणींच्या मनांत अशाप्रकारे बिंबवले होते की द्वेष करण्याचा विचारही त्यांच्या मनाला शिवला नाही. रोमकर १२:१७-१९ मध्ये प्रेषित पौलाने लिहिले त्याप्रमाणे: “वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. . . . शक्य तर सर्व माणसांबरोबर तुम्हाकडून होईल तितके शांतीने राहा. प्रिय जनहो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या; कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन,’ असे प्रभु म्हणतो.”

या बहिणी पुढे म्हणाल्या: “आमच्या संस्थेच्या पुस्तकांत किती खरं सांगितलेलं आहे, की जेव्हा कुणावर घोर अपराध होतो तेव्हा त्यांच्या मनात क्रोधाची आग भडकायला लागते. अशा वेळी अपराधी व्यक्‍तीला मनापासून क्षमा करणे सोपे नसते. पण, त्या अपराधाविषयी सतत विचार करत राहणेही चांगले नाही. कारण त्यामुळे मनःशांती भंग होते आणि तब्येतीवरही विपरीत परिणाम होऊ शकतो. तेव्हा, त्या अपराधाला विसरून जाण्याचा प्रयत्न करणेच सगळ्यात चांगले राहील.” या बहिणींच्या उदाहरणावरून हे सिद्ध होत नाही का, की बायबलमध्ये द्वेषाचे समूळ उच्चाटन करण्याची जबरदस्त शक्‍ती आहे?

[६ पानांवरील चौकट]

द्वेषाचे रुपांतर प्रेमात झाले

अलीकडील काही वर्षांत जगभरातील हजारो लोक नोकरी-धंद्याच्या निमित्ताने ग्रीसमध्ये येऊन स्थायिक झाले आहेत. परंतु हल्ली ग्रीकमधील बिकट आर्थिक परिस्थितीमुळे नोकरी मिळणे फार मुश्‍कील झाले आहे. यामुळे तिथे राहायला आलेल्या निरनिराळ्या जाती-धर्माच्या लोकांमध्ये द्वेषभाव निर्माण झाला आहे. खासकरून अल्बेनिया आणि बल्गेरियाच्या लोकांमध्ये तर कमालीची दुश्‍मनी आहे. ग्रीसमध्ये अनेक ठिकाणी या दोन गटांमध्ये कमालीची चढाओढ झाली आहे.

ग्रीसच्या किआटो शहरात राहणाऱ्‍या लूलीस नावाच्या एका अल्बेनियन माणसाने आणि आयवन नावाच्या एका बल्गेरियन माणसाने आपल्या कुटुंबांसह यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करण्यास सुरवात केली. यामुळे त्यांची एकमेकांशी ओळख झाली. आणि बायबलचे सिद्धान्त त्यांना समजू लागले तसा त्यांच्या मनातला द्वेषभाव कमी होऊ लागला. सुरवातीला त्यांना एकमेकांच्या देशांविषयी जो द्वेष वाटायचा तो हळूहळू नाहीसा होऊ लागला. इतकेच नव्हे तर एकमेकांचा जीव घेण्याऐवजी ते एकमेकांना जीव लावू लागले. अशाप्रकारे द्वेषाचे रुपांतर मैत्रीत झाले. आयवनने लूलीसला आपल्या शेजारीच घर घेण्यास मदत केली. ह्‍या दोन्ही कुटुंबांचा एकमेकांशी फार चांगला घरोबा आहे. आज आयवन आणि लूलीसचा बाप्तिस्मा झाला आहे. त्यामुळे प्रचाराचे कामही ते सोबतच करतात. खरेच, या ख्रिश्‍चनांमधील मैत्री शेजाऱ्‍यापाजाऱ्‍यांच्या नजरेतून सुटली नाही.

[७ पानांवरील चित्र]

देवाच्या राज्यात या पृथ्वीवर द्वेषाचा लवलेशही राहणार नाही