‘ते तर प्रेमाच्या आणि चांगल्या गोष्टींबद्दल बोलतात’
‘ते तर प्रेमाच्या आणि चांगल्या गोष्टींबद्दल बोलतात’
गेल्या काही वर्षांत फ्रान्समध्ये यहोवाचे साक्षीदार लोकांच्या बदनामीचे शिकार बनले आहेत. त्यासाठी काही लोक त्यांच्याबद्दलच्या काही खऱ्या-खोट्या गोष्टींना तिखटमीठ लावून लोकांपुढे मांडत आहेत. यासाठी यहोवाच्या साक्षीदारांनी काय केले? मागच्या वर्षी त्यांनी फ्रान्सचे लोकहो, तुम्हाला फसवले जात आहे! या पत्रिकेच्या १ कोटी २० लाख प्रती वाटल्या. पत्रिकेत खोटे आरोप उघडकीस आणून सत्य काय ते सांगितले होते.
पत्रिका वाटल्याच्या काही दिवसांनंतर, डॉक्टर आणि संसदेच्या सदस्यपदी काम करणारे श्री. जॉन बॉनॉम यांनी आपल्या स्थानिक वृत्तपत्रास एक पत्र लिहिले. त्यात त्यांनी म्हटले होते: “यहोवाचे साक्षीदार प्रचार करण्यासाठी माझ्याही घरी येतात. आणि ते चांगल्या गोष्टींविषयी आणि प्रेमाने जीवन जगण्याविषयी बोलतात. पण, त्यांनी केव्हाही त्यांचे विचार माझ्यावर थोपवण्याचा प्रयत्न केला नाही. ते नेहमी अत्यंत आदराने बोलतात आणि माझे विचार त्यांच्यापेक्षा फार वेगळे असले तरी अगदी शांतपणे ते माझे बोलणे ऐकतात.”
यहोवाच्या साक्षीदारांना देवावर किती प्रेम आहे हे पाहून श्री. जॉन बॉनॉम लिहितात: “काही लोक असा विचार करतात की देशाच्या शांती-सुरक्षेसाठी साक्षीदार एक धोका आहेत. पण, हा त्यांचा गैरसमज आहे. मला तर वाटते, की काही नेतेच समाजाच्या शांती-सुरक्षेसाठी एक मोठा धोका आहेत.”