व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रयत्नांती यहोवा परमेश्‍वर!

प्रयत्नांती यहोवा परमेश्‍वर!

प्रयत्नांती यहोवा परमेश्‍वर!

“यहोवा? कोण यहोवा?” हे नाव आठ वर्षांच्या सिलव्हियाला एका दुसऱ्‍या मुलीने तिच्या घरी असलेल्या एका जुन्या अर्मेनियन बायबलमध्ये दाखवले होते; ते बायबल तिच्या कुटुंबाने फार जपून ठेवलेले होते. मग सिलव्हियाने त्या नावाविषयी खूप जणांना विचारले. पण अर्मेनियात ती राहत होती त्या येरेव्हानमध्ये कोणालाही त्याचे स्पष्टीकरण देता आले नाही—तिच्या आईवडिलांना, तिच्या शिक्षकांना आणि चर्चमधील पाळकांनासुद्धा तिला त्याचे उत्तर सांगता आले नाही.

सिलव्हिया मोठी झाली, तिचे शिक्षण पूर्ण झाले, तिला नोकरीसुद्धा मिळाली पण तरी तिला यहोवा कोण आहे हे कळू शकले नाही. तरुण असतानाच तिला अर्मेनियातून पळून जावे लागले; त्यानंतर ती पोलंडमध्ये येऊन पोंहचली. तिथल्या एका लहानशा खोलीत इतर निराश्रित जणांसोबत ती राहू लागली. त्यातील एका मुलीकडे नियमाने काही लोक यायचे. एकदा सिलव्हियाने तिला विचारले, “तुझ्याकडे हे कोण येत असतात?” ती मुलगी म्हणाली, “ते यहोवाचे साक्षीदार आहेत; ते मला बायबल शिकवायला येतात.”

यहोवा हे नाव ऐकताच सिलव्हिया एकदम खुष झाली. शेवटी तिला हवी असलेली माहिती मिळाली. तीसुद्धा यहोवा कोण आहे आणि तो किती प्रेमळ देव आहे याविषयी शिकू लागली. पण, पोलंडमध्ये तिचा जास्त काळ मुक्काम राहिला नाही. तिला तेथूनही पळून जावे लागले. त्यानंतर, तिने बाल्टिक समुद्राच्या पार, डेन्मार्क येथे आश्रय घेतला. तिच्याकडे फार कमी सामान होते. यहोवाच्या साक्षीदारांनी छापलेले बायबल साहित्य मात्र तिने न विसरता आपल्यासोबत घेतले. एका प्रकाशनाच्या मागच्या पानावर वॉचटावर संस्थेच्या शाखा दफ्तरांचे पत्ते दिलेले होते. ही तिच्याजवळची सर्वात मौल्यवान वस्तू होती, कारण या पत्त्यांशिवाय यहोवाविषयी आणखी माहिती मिळवणे अशक्य ठरले असते!

डेन्मार्कमध्ये सिलव्हियाला निराश्रितांच्या एका छावणीत पाठवण्यात आले; तिथे गेल्या गेल्या ती यहोवाच्या साक्षीदारांना शोधू लागली. तिच्याजवळ असलेल्या पत्त्यांवरून तिला ठाऊक होते की, डेन्मार्क येथील शाखा दफ्तर होलबेक शहरात होते. पण होलबेक कोठे होते हे तिला माहीत नव्हते. त्या दरम्यान सिलव्हियाला दुसऱ्‍या एका छावणीत रेल्वेने पाठवण्यात आले. वाटेत होलबेक स्टेशन लागले! पुन्हा तिच्या आनंदाला पारावार राहिला नाही!

त्यानंतर काही दिवसांच्या आतच सिलव्हिया ट्रेन पकडून होलबेकला आली. स्टेशनापासून शाखा दफ्तरापर्यंत ती चालतच गेली. ती आठवून सांगते: “मी तिथे आत गेल्यावर आजूबाजूला सुंदर बगीचा पाहिला; तिथल्या एका बाकावर बसून मी स्वतःलाच म्हटले, ‘हे तर परादीसच आहे!’” शाखा दफ्तरात सगळे तिच्याशी प्रेमाने बोलले आणि शेवटी तिच्यासोबतही बायबलचा अभ्यास सुरू करण्यात आला.

पण त्यानंतरही तिला पुष्कळ ठिकाणे बदलावी लागली. प्रत्येक वेळी ठिकाण बदलल्यावर तिला यहोवाच्या साक्षीदारांना शोधून काढावे लागायचे आणि पुन्हा एकदा बायबल अभ्यास सुरू करावा लागायचा. पण तरीही दोन वर्षांनंतर ती बाप्तिस्मा घेण्याकरता तयार झाली. बाप्तिस्मा झाल्यावर ती लागलीच पूर्ण-वेळेच्या सेवेत उतरली. १९९८ मध्ये डेन्मार्क येथील सरकारने तिला आश्रय देऊ केला.

सिलव्हिया सध्या २६ वर्षांची आहे आणि तिने ज्याला परादीस म्हटले होते त्याच ठिकाणी अर्थात डेन्मार्क येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तरातच ती काम करते. ती म्हणते, “मी काय म्हणावं मला कळत नाही. लहानपणापासून मी यहोवाचा शोध करत होते. आता मला तो मिळाला आहे. त्याच्या सेवेत मी माझं आयुष्य घालवण्याचं स्वप्न पाहिलं होतं आणि आज मी बेथेलमध्ये आहे. पुष्कळ वर्षांपर्यंत मी इथंच राहावं एवढंच देवाकडे माझं मागणं आहे!”