लवकरच दुःख व निराशेपासून मुक्त जग
लवकरच दुःख व निराशेपासून मुक्त जग
जीवनात रोज नवीन आव्हाने, नवीन दुःखे येतात. कधीकधी मनुष्य इतका निराश होतो, की त्याचा भावनांवर ताबा राहात नाही. कधीकधी तर अत्यंत आशावादी मनोवृत्तीचे लोक देखील अतिशय दुःखित झालेले आढळतात! खालील उदाहरणांचा विचार करा.
प्राचीन काळांत, संदेष्टा मोशे एकदा इतका हताश झाला की त्याने देवाला विनवणी केली: “माझ्यावर तुझी कृपादृष्टि असल्यास मला एकदाचा मारून टाक म्हणजे माझी दुर्दशा मला पाहावी लागणार नाही.” (गणना ११:१५) भविष्यवक्ता एलिया देखील एकदा आपल्या शत्रूंपासून जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असताना निराश होऊन म्हणाला: “हे परमेश्वरा, आता पुरे झाले, माझा अंत कर.” (१ राजे १९:४) तर भविष्यवक्ता योनाने म्हटले: “हे परमेश्वरा, माझी विनंति ऐक, माझा प्राण घे, कारण जगण्यापेक्षा मला मरण बरे वाटते.” (योना ४:३) पण मोशे, एलिया किंवा योना यांपैकी कोणीही आत्महत्या केली नाही. “खून करू नको,” अशी देवाची आज्ञा आहे हे त्यांना माहीत होते. (निर्गम २०:१३) त्यांचा देवावर पूर्ण विश्वास असल्यामुळे त्यांना माहीत होते की जीवन ही देवाने दिलेली एक देणगी आहे आणि जीवनात कोणतीही परिस्थिती आली तरी आपण आशा बाळगू शकतो.
पण आज आपल्याला तोंड द्याव्या लागणाऱ्या समस्यांविषयी काय? भावनिक दुःख आणि शारीरिक समस्यांव्यतिरिक्त कधीकधी कुटुंबीयांकडून, शेजाऱ्यांकडून किंवा सहकाऱ्यांकडून आपल्याला वाईट वागणूक सहन करावी लागते. आजच्या काळातल्या लोकांबद्दल बायबल असे म्हणते की हे लोक ‘सर्व रोमकर १:२८-३१) दररोज अशा लोकांसोबत उठबस करावी लागत असल्यामुळे काहींना जीवन नकोसे वाटू लागते. मग, सांत्वन व शांतीची आस धरणाऱ्या या लोकांना आपण कशी मदत करू शकतो?
प्रकारची अनीति, दुष्टपणा, लोभ, वाईटपणा ह्यांनी भरलेले असून, हेवा, खून, कलह, कपट, कुबुद्धि ह्यांनी पुरेपुर भरलेले आहेत. ते चहाडखोर, निंदक, देवाला तिटकारा असलेले, उद्धट, गर्विष्ठ, बढाईखोर, कुकर्मकल्पक, मातापितरांची अवज्ञा करणारे, निर्बुद्ध, वचनभंग करणारे, ममताहीन, निर्दय असे आहेत.’ (त्यांचे ऐकून घ्या
जीवनात वारंवार संकटे व दुःख सहन करावे लागल्यास हळूहळू व्यक्तीचे मानसिक संतुलन बिघडू लागते. बुद्धिमान शलमोनाने म्हटले: “जुलूम केल्याने शहाणा वेडा बनतो.” (उपदेशक ७:७) म्हणूनच, आत्महत्येच्या गोष्टी करणाऱ्या व्यक्तीकडे कधीही दुर्लक्ष करू नये. त्या व्यक्तीला असणाऱ्या समस्यांकडे, मग त्या भावनिक असोत, शारीरिक, मानसिक किंवा आध्यात्मिक असोत, त्यांकडे लगेच लक्ष दिले पाहिजे. अर्थात काहींना वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक असते; पण आज कित्येक प्रकारच्या उपचारपद्धती उपलब्ध असल्यामुळे कोणता उपचार घ्यावा हा एक वैयक्तिक निर्णय आहे.—गलतीकर ६:५.
एखाद्या व्यक्तीला आत्महत्या का करावीशी वाटते यामागे बरीच कारणे असू शकतात. पण त्या व्यक्तीच्या भावना समजून घेणारी, सहानुभूती दाखवणारी भरवशाची व्यक्ती तिला सापडल्यास या व्यक्तीच्या मानसिकतेत बराच फरक पडू शकतो. याबाबतीत कुटुंबातील सदस्य किंवा मित्रमैत्रिणी मदत करू शकतात. सहानुभूतीने व दयाळूपणे वागण्याव्यतिरिक्त ते देवाच्या वचनातील विचारांच्या साहाय्याने या व्यक्तीला दिलासा देण्याचा प्रयत्न करू शकतात.
दुःखी व्यक्तीला आध्यात्मिक मदत देणे
बायबलचे वाचन केल्यामुळे एखाद्या व्यक्तीला किती उत्तेजन मिळू शकते याची कदाचित तुम्हाला कल्पनाही नसेल. अर्थात, बायबल हे काही मानसिक आरोग्याविषयी सल्ला देणारे पुस्तक नाही. पण बायबल आपल्याला जीवनाची कदर करण्यास शिकवू शकते. शलमोन राजाने म्हटले: “मनुष्यांनी आमरण सुखाने राहावे व हित साधावे यापरते इष्ट त्यास काही नाही हे मला कळून आले आहे. तरी प्रत्येक मनुष्याने खावे, प्यावे, व आपला सर्व उद्योग करून सुख मिळवावे हीहि देवाची देणगी आहे.” (उपदेशक ३:१२, १३) जीवनात अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या आपल्याला आनंद देऊ शकतात. आपल्या आवडीचे काम, किंवा अगदी साध्या साध्या गोष्टी देखील, उदाहरणार्थ स्वच्छ हवा, कोवळे ऊन, रंगीबेरंगी फुले, हिरवीगार वृक्षे, पक्षांचे मंजूळ गाणे आणि अशा कितीतरी गोष्टी देवाने आपल्या आनंदाकरता पुरवल्या आहेत.
आणखी दिलासा देणारी गोष्ट म्हणजे, यहोवा देव व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त यांना आपली काळजी आहे असे बायबल आपल्याला आश्वासन देते. (योहान ३:१६; १ पेत्र ५:६, ७) म्हणूनच स्तोत्रकर्त्याने म्हटले: “प्रभु धन्यवादित असो, तो प्रतिदिनी आमचा भार वाहतो; देव आमचे तारण आहे.” (स्तोत्र ६८:१९) आपण कदाचित स्वतःला अगदी क्षुद्र, अपात्र समजत असू, पण यहोवा मात्र आपल्या प्रार्थना ऐकण्याचे आश्वासन देतो. नम्रतेने व प्रांजळ अंतःकरणाने त्याच्या मदतीची याचना करणाऱ्या कोणालाही तो तुच्छ लेखणार नाही याची आपण खात्री बाळगू शकतो.
जीवनात समस्या तर येतीलच. (ईयोब १४:१) पण आत्महत्या करणे हा निश्चितच समस्या सोडवण्याचा उचित मार्ग नाही. बायबलमधील सत्य जाणून घेतल्यावर बऱ्याच जणांना याची जाणीव होते. प्रेषित पौलाने एका बंदिशाळेच्या नायकाला कशाप्रकारे मदत केली ते पाहा. “नायकाने जागे होऊन बंदिशाळेचे दरवाजे उघडे पाहिले; आणि बंदिवान पळून गेले आहेत असा तर्क करून तो तरवार उपसून आपला घात करणार होता.” आपले कर्तव्य योग्यप्रकारे न केल्यामुळे नंतर सर्वांसमोर लाजिरवाणे होऊन मरण्यापेक्षा त्याक्षणीच आपला जीव घेणे बरे असे त्या नायकाने ठरवले. प्रेषित पौलाने त्याला मोठ्याने ओरडून म्हटले: “तू स्वतःला काही अपाय करून घेऊ नकोस. कारण आम्ही सर्व जण येथेच आहोत!” इतकेच म्हणून पौल थांबला नाही, तर त्याने व सीलाने त्याचे सांत्वन केले. नायकाने त्यांना विचारले: “महाराज, माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहिजे?” तेव्हा त्यांनी त्याला उत्तर दिले: “प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल.” मग त्यांनी त्याला व त्याच्या घरातील सर्वांना यहोवाचे वचन सांगितले. परिणाम असा झाला की “तेव्हाच त्याने व त्याच्या घरच्या सर्व माणसांनी बाप्तिस्मा घेतला.” बंदिशाळेच्या नायकाला व त्याच्या घराण्यातल्या सर्वांच्या जीवनाला एक नवीन अर्थ मिळाला होता.—प्रेषितांची कृत्ये १६:२७-३५.
आज सर्वत्र दिसणाऱ्या दुष्टाईला देव जबाबदार नाही, हे सत्य आपण जाणतो. देवाचे वचन एका दुष्ट आत्मिक व्यक्तीबद्दल सांगते “जो दियाबल व सैतान म्हटलेला आहे.” तोच “सर्व जगाला ठकविणारा” आहे. पण आता त्याचा फार थोडा काळ उरला आहे. (प्रकटीकरण १२:९, १२) लवकरच, सैतानाने व त्याच्या दुरात्म्यांनी या पृथ्वीवर आणलेले दुःख व संकटे देव कायमची नष्ट करेल. त्यानंतर देवाच्या अभिवचनानुसार त्याच्या नीतिमान नव्या जगात तो लोकांना निराश होण्यास व आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्या सर्व गोष्टी कायमच्या नाहीशा करेल.—२ पेत्र ३:१३.
मदतीसाठी याचना करणाऱ्यांना सांत्वन
जीवनात निराश झालेले लोक आज देखील बायबलमधून सांत्वन मिळवू शकतात. (रोमकर १५:४) स्तोत्रकर्त्या दाविदाने एका स्तोत्रात असे म्हटले: “हे देवा, भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस.” (स्तोत्र ५१:१७) जीवनात परीक्षा तर येतीलच; शिवाय, आपल्या अपरिपूर्णतेमुळेही बऱ्याचदा आपण स्वतःवर दुःख ओढवतो. पण आपल्या दयाळू, प्रेमळ आणि समजूतदार स्वर्गीय पित्याविषयीचे अचूक ज्ञान घेतल्याने आपल्याला हे जाणून दिलासा मिळतो की त्याला आपली किंमत आहे. आपण यहोवा देवाला आपला सर्वात जवळचा मित्र व शिक्षक बनवू शकतो. त्याच्याशी आपण जवळचा नातेसंबंध जोडला तर तो कधीही आपल्याला सोडणार नाही. तो स्वतः आपल्याला याची हमी देतो: “तुला जे हितकारक ते मी परमेश्वर तुझा देव तुला शिकवितो; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो.”—यशया ४८:१७.
देवावर विसंबून राहायला शिकल्यामुळे बऱ्याच जणांना साहाय्य मिळाले आहे. मारा नावाच्या एका स्त्रीचे उदाहरण विचारात घ्या. ती बऱ्याच काळापासून डिप्रेशनने ग्रस्त होती. त्यातच, तिच्या एकुलत्या एका मुलाचा दुर्घटनेत मृत्यू झाला. * तिच्यावर जणू आभाळच कोसळले, दुःखामुळे ती जणू वेडी झाली. तिने स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. पण आज मात्र ती सावरली आहे. रोज पहाटे उठून ती घरची सगळी कामे करते. तिला संगीत ऐकायला आवडते आणि ती आपला बराच वेळ इतरांना मदत करण्यासाठी खर्च करते. “नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल” या आशेमुळे तिला तिच्या लाडक्या मुलाच्या मृत्यूचे दुःख सहन करायला मदत झाली आहे. शिवाय देवावरचा तिचा विश्वास देखील मजबूत झाला आहे. (प्रेषितांची कृत्ये २४:१५) माराला स्वर्गात जाऊन स्वर्गदूतांप्रमाणे होण्याची कधीच इच्छा नव्हती, त्यामुळे स्तोत्र ३७:११ या वचनात “लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील” असे तिने वाचले तेव्हा तिला मनापासून आनंद झाला.
सॅन्ड्रा नावाच्या आणखी एका ब्राझिलियन स्त्रीचे उदाहरण पाहा. ती तीन मुलांची आई आहे. आपल्या मुलांचे संगोपन करताना आपल्या हातून कोणतीच चूक होऊ नये याची ती काळजी घेते. पण ती सांगते: “मी आपल्या जीवनात अगदी व्यस्त असतानाच, माझ्या वडिलांचा अचानक मृत्यू झाला आणि जवळजवळ त्याच वेळेस माझ्या पतीचा दुसऱ्या एका स्त्रीसोबत संबंध
असल्याचे मला कळले. मी अत्यंत दुःखी झाले, पण देवाला प्रार्थना करण्याचा, त्याच्या मदतीची याचना करण्याचा विचारही माझ्या मनात आला नाही.” हे दुःख असह्य झाल्याने सॅन्ड्राने आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला तिच्या दुःखातून सावरण्यास कशामुळे मदत झाली? आध्यात्मिक गोष्टींचे ज्ञान मिळाल्यामुळे. ती सांगते, “रोज रात्री झोपण्याआधी मी बायबल वाचते; ज्या व्यक्तींविषयी वाचले त्यांच्या ठिकाणी स्वतःला ठेवून मी विचार करते. टेहळणी बुरूज व सावध राहा! या पत्रिका देखील मी वाचते. यात प्रकाशित होणाऱ्या जीवनकथा मला विशेष आवडतात कारण त्यामुळे मला माझ्या स्वतःच्या परिस्थितीत समाधानी राहण्यास मदत होते.” सॅन्ड्राने यहोवाला आपला सर्वात जवळचा मित्र बनवले आहे. ती आपल्या सर्व चिंता यहोवासमोर स्पष्टपणे मांडते.दुःख व निराशेपासून मुक्त जीवन
मनुष्याचे दुःख लवकरच नाहीसे होईल हे जाणणे खरच किती सांत्वनदायक आहे! गुन्हेगारी, अन्याय, भेदभाव यांसारख्या गोष्टींना बळी पडलेले सर्व अबालवृद्ध देवाच्या राज्यात जीवनाचा आनंद उपभोगतील. एका स्तोत्रात केलेल्या भविष्यवाणीप्रमाणे, यहोवाचा नियुक्त राजा, येशू ख्रिस्त “धावा करणारा दरिद्री, दीन व अनाथ, ह्यांना . . . सोडवील.” तसेच, “दुबळा व दरिद्री ह्यांच्यावर तो दया करील, दरिद्रयांचे जीव तो तारील. जुलूम व जबरदस्ती ह्यांपासून त्यांचे जीव तो मुक्त करील; आणि त्याच्या दृष्टीने त्यांचे रक्त अमोल ठरेल.”—स्तोत्र ७२:१२-१४.
या शब्दांची पूर्तता होण्याचा काळ फार जवळ आला आहे. अशा आनंदी परिस्थितीत सार्वकालिक जीवनाचा उपभोग घेण्याच्या विचाराने तुम्हाला आनंद होत नाही का? हा आनंद उपभोगण्यासाठी, देवाकडून मिळालेल्या जीवनाच्या देणगीची कदर करा. इतरांनाही बायबलमधील देवाच्या सांत्वनदायक प्रतीज्ञांविषयी सांगा. कारण असे केल्यामुळे या निर्दय, कठोर जगात अगतिकपणे मदतीची याचना करणाऱ्यांच्याही जीवनात तुम्ही आनंद आणू शकता.
[तळटीप]
^ परि. 15 काही नावे बदलण्यात आली आहेत.
[६ पानांवरील चित्र]
आजही जीवनात बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला आनंद देऊ शकतात
[७ पानांवरील चित्र]
हे जग दुःख व निराशेपासून मुक्त होईल त्या दिवसाची तुम्ही वाट पाहता का?