व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अदृश्‍य देवासोबत जवळचा नातेसंबंध शक्य आहे का?

अदृश्‍य देवासोबत जवळचा नातेसंबंध शक्य आहे का?

अदृश्‍य देवासोबत जवळचा नातेसंबंध शक्य आहे का?

तुम्ही कदाचित म्हणाल: “मी ज्याला पाहू शकत नाही त्याच्याशी जवळीक कशी साधू शकतो?” प्रश्‍न चांगला आहे. पण, या गोष्टीचा देखील विचार करा:

एखाद्याशी मैत्री करण्यासाठी किंवा त्याच्याशी एक अतूट नातेसंबंध जोडण्यासाठी त्याला प्रत्यक्ष पाहणे कितपत महत्त्वाचे असते? आपण ज्या गोष्टी पाहू शकत नाही त्यांनाही तितकेच, किंबहुना त्याहून अधिक महत्त्व नसते का? निश्‍चित! त्यामुळेच तर काही लोक केवळ पत्र-व्यवहाराच्या माध्यमातून एकमेकांचे जिवलग मित्र बनतात. पत्रांद्वारे ते आपली ओळख करून देतात; म्हणजे आपल्या आवडी-निवडी, आपली ध्येये, आपली तत्वे, आपली गुणलक्षणे, आपले छंद इतकेच नव्हे तर आपला विनोदी स्वभाव देखील ते पत्रांतून एकमेकांना कळवतात.

होय, मैत्री करण्यासाठी दृष्टीला महत्त्व नसते. ज्या लोकांना दिसत नाही अशा लोकांनी देखील ही गोष्ट सिद्ध करून दाखवली आहे. एडवर्ड आणि ग्वैन नावाच्या एका विवाहित जोडप्याचेच उदाहरण घ्या. * दोघेही अंध आहे. एका अंध-शाळेत ते एकत्र शिकायचे. हळूहळू एडवर्ड ग्वेनकडे आकर्षित होऊ लागला. पण, एडवर्ड तर तिला पाहू शकत नव्हता मग तो कसा काय तिच्यावर भाळला? ग्वेनचे निष्कपट बोलणे, तिची उत्तम वागणूक आणि कामाबद्दलचा तिचा दृष्टिकोन जाणल्यावर एडवर्डला ती आवडली होती. मग ग्वेन एडवर्डकडे का आकर्षित झाली? ती म्हणते: “एखाद्या व्यक्‍तीमध्ये कोणते गुण असणे अत्यंत जरूरीचे आहे हे लहानपणापासूनच मला शिकवलं होतं; आणि हे सर्व गुण मला एडवर्डमध्ये आढळले.” होय, एकमेकांमधील चांगल्या गुणांमुळेच ते एकमेकांकडे आकर्षित झाले होते. मग, त्यांच्या गाठी-भेटी वाढल्या आणि तीन वर्षांनंतर त्यांनी विवाह केला.

एडवर्ड म्हणतो, “एकमेकांचे विचार जुळत असतील तर मैत्री करण्यासाठी डोळे नसले तरी काही फरक पडत नाही. हे खरे की डोळ्यांशिवाय आपण एकमेकांना पाहू शकत नाही. पण, एकमेकांच्या भावना तरी आपण समजू शकतो.” आज ५७ वर्षांनंतर देखील एडवर्ड आणि ग्वेन एकमेकांवर तितकेच प्रेम करतात. आपल्या या मधूर आणि अतूट बंधनाचे रहस्य ते सांगतात. पहिली गोष्ट: एकमेकांचे गुण जाणून घेणे. दुसरी: त्या गुणांचा विचार करणे जेणेकरून आपण त्या व्यक्‍तीकडे आकृष्ट होऊ. तिसरी: चांगले दळणवळण राखणे आणि चवथी: एकत्र कामे करणे.

कोणत्याही नातेसंबंधासाठी या चार गोष्टी अत्यंत जरूरीच्या आहेत. मग, तो नातेसंबंध मित्रांमधला असो, पती-पत्नीमधला असो अथवा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मानव आणि देव यांच्यातला असो. आपण देवाला पाहू शकत नसलो तरी या चार गोष्टी लागू करून देवाशी एक जवळचा आणि अतूट नातेसंबंध कसा जोडता येईल हे पुढच्या लेखात आपण पाहणार आहोत. *

[तळटीपा]

^ परि. 4 नावे बदलली आहेत.

^ परि. 6 देवासोबत नातेसंबंध जोडण्यात आणि एखाद्या मनुष्यासोबत नातेसंबंध जोडण्यात एक खास फरक आहे. देवाच्या बाबतीत पाहता, तो अस्तित्वात आहे या विश्‍वासावर आधारितच आपण त्याच्याशी जवळचा नातेसंबंध जोडू शकतो. (इब्री लोकांस ११:६) देवासोबत एक अतूट नातेसंबंध कसा जोडता येईल या विषयावर वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ इंडियाने प्रकाशित केलेल्या पुस्तकात सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. सदर पुस्तकाचे नाव, तुमची काळजी वाहणारा निर्माणकर्ता अस्तित्वात आहे का? (इंग्रजी) असे आहे.