व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रार्थना केल्याने काही फायदा होतो का?

प्रार्थना केल्याने काही फायदा होतो का?

प्रार्थना केल्याने काही फायदा होतो का?

कधी ना कधी तरी, आपल्या सर्वांनाच देवाला प्रार्थना करावीशी वाटली असेल. खरे तर सर्वच धर्माचे लोक प्रार्थना करतात. उदाहरणार्थ, एखादी बौद्ध व्यक्‍ती दिवसांतून हजार वेळा तरी, “मी अमीडा बुद्धावर विश्‍वास ठेवतो,” असा जप करील.

आज लोक भिन्‍नविभिन्‍न समस्यांनी जर्जर झाले आहेत. तेव्हा, लोकांचा प्रार्थना करण्यामागचा काय हेतू असावा? या सर्व प्रार्थनांचा काही फायदा होतोय का? या प्रश्‍नांवर विचार करणे उचित आहे.

लोक प्रार्थना का करतात?

पौर्वात्य देशांत राहणारे पुष्कळ लोक त्यांच्या पूर्वजांना आणि शिंटो किंवा ताओ दैवतांना प्रार्थना करतात. परीक्षेत पास व्हावे, शेतात चांगले पीक यावे किंवा रोगांपासून मुक्‍तता मिळावी म्हणून ते प्रार्थना करतात. बौद्ध लोक प्रबोधन प्राप्त करण्यासाठी प्रार्थना करतात. हिंदू लोक त्यांच्या निवडक देव-देवींना ज्ञान, संपत्ती व सुरक्षा यासाठी अगदी मनोभावे प्रार्थना करतात.

आपल्यामुळे इतर लोकांना फायदा व्हावा म्हणून काही कॅथलिक लोक फादर किंवा नन्स बनून मठात किंवा कॉन्व्हेन्ट्‌समध्ये एकान्तवासात राहून सतत प्रार्थना करत असतात. तर इतर कोट्यवधी कॅथलिक, हातात रोजरी घेऊन मेरीला जप करत राहतात; अशा हेतूने की मेरी त्यांच्यावर कृपा दाखवेल. पौर्वात्य देशांत पुष्कळ लोक प्रार्थना चक्रांचा उपयोग करतात. प्रोटेस्टंट लोक प्रभूची प्रार्थना वारंवार घोकतात. त्यांच्यातील काही जण आपल्या मनचे विचार देखील प्रार्थनेत मांडतात. पुष्कळ यहुदी लोक दूरचा प्रवास करून जेरुसलेममधील वेस्टर्न वॉलकडे प्रार्थना करायला जातात. मंदिराची पुनर्स्थापना व्हावी, नवीन युग शांतीचे व समृद्धीचे असावे म्हणून ते प्रार्थना करतात.

जवळजवळ सर्वच लोक प्रार्थना करत असल्याचे आपण आतापर्यंत पाहिले आहे. तरीपण, दारिद्र्‌य, व्यसन, विस्कळित कुटुंबे, गुन्हेगारी आणि युद्धे यांसारख्या समस्या मानव समाजाला दिवसेंदिवस पछाडत आहेत. याचा अर्थ, हे लोक कदाचित उचित मार्गाने प्रार्थना करत नसावेत का? आणि, आपल्या प्रार्थना खरोखरच कोणी ऐकतो का?

आपल्या प्रार्थना कोणी ऐकतो का?

प्रार्थना ऐकणारा कोणी नसेल तर प्रार्थना करणे व्यर्थ आहे. एखादी व्यक्‍ती प्रार्थना करते तेव्हा तिला हा विश्‍वास असतो की स्वर्गात कोणीतरी आपली प्रार्थना ऐकतो. परंतु, प्रार्थना आवाजाच्या माध्यमाने वर जात नाहीत. पुष्कळ लोकांना वाटते, प्रार्थना ऐकणाऱ्‍याला प्रार्थना करणाऱ्‍या व्यक्‍तीचे विचार देखील कळतात. पण ती व्यक्‍ती असावी तरी कोण?

आपल्या मेंदूच्या प्रमस्तिष्क बाह्‍यांगामधील असंख्य चेताकोशांमध्ये विचार कसे निर्माण होतात हे संशोधकांसमोर अद्याप तरी एक रहस्यच आहे. परंतु ज्याने मेंदूची रचना केली तो हे विचार वाचू शकतो. आणि तो आहे आपला निर्माणकर्ता यहोवा देव. (स्तोत्र ८३:१८; प्रकटीकरण ४:११) त्यामुळे आपण यहोवा देवाला प्रार्थना केल्या पाहिजेत. पण यहोवा देव सर्वच प्रार्थना ऐकतो का?

सर्वच प्रार्थना ऐकल्या जातात का?

प्राचीन इस्राएलचा राजा दावीद सतत यहोवाला प्रार्थना करीत असे. ईश्‍वरप्रेरणेने त्याने असे गायिले: “तू जो प्रार्थना ऐकतोस त्या तुझ्याकडे सर्व मानवजाती येते.” (स्तोत्र ६५:२) आज पृथ्वीवरील हजारो भाषांमधील कोणत्याही भाषेत केलेल्या प्रार्थना यहोवा समजू शकतो. मानवाला हे शक्य नसेल पण यहोवाला मात्र शक्य आहे. जे लोक यहोवाने सांगितलेल्या मार्गाने त्याला प्रार्थना करतात त्या सर्वांच्या प्रार्थना तो निश्‍चितच ऐकतो.

परंतु, देव सर्वच प्रार्थना स्वीकारत नाही हे येशू ख्रिस्ताने दाखवून दिले होते. तोसुद्धा नेहमी यहोवाला प्रार्थना करीत असे. आजच्याप्रमाणे येशूच्या काळातही जप करण्याची पद्धत होती. त्याविषयी येशू म्हणाला: “तुम्ही प्रार्थना करिता तेव्हा परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू नका, आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते.” (मत्तय ६:७) आपण जोपर्यंत आपल्या मनातील इच्छा स्पष्टपणे व्यक्‍त करत नाही तोपर्यंत यहोवा आपल्या प्रार्थना ऐकणार नाही.

काही प्रार्थनांमुळे यहोवा का संतुष्ट होत नाही याविषयी बायबलमधील एका नीतिसूत्रात म्हटले आहे: “धर्मशास्त्र कानी पडू नये म्हणून जो आपला कान बंद करितो त्याची प्रार्थनादेखील वीट आणणारी आहे.” (नीतिसूत्रे २८:९) दुसरे एक नीतिसूत्र म्हणते: “परमेश्‍वर दुर्जनांपासून दूर राहतो, पण तो धार्मिकांची प्रार्थना ऐकतो.” (नीतिसूत्रे १५:२९) एकेकाळी प्राचीन यहुदाच्या दोषी नेत्यांना यहोवा म्हणाला: “तुम्ही हात पसरता तेव्हा मी तुमच्यापुढे डोळे झाकितो; तुम्ही कितीही विनवण्या केल्या तरी मी ऐकत नाही; तुमचे हात रक्‍ताने भरले आहेत.”—यशया १:१, १५.

देवाने आपल्या प्रार्थना न ऐकण्याचे आणखी एक कारण प्रेषित पेत्राने सांगितले. त्याने असे लिहिले: “पतींनो, तसेच तुम्हीही आपल्या [पत्नींबरोबर] त्या अधिक नाजूक व्यक्‍ति आहेत म्हणून सुज्ञतेने सहवास ठेवा; तुम्ही उभयता जीवनरूपी कृपादानाचे समाईक वतनदार आहा, म्हणून तुम्ही त्यांना मान द्या; म्हणजे तुमच्या प्रार्थनांत व्यत्यय येणार नाही.” (१ पेत्र ३:७) पेत्राच्या या सल्ल्याकडे दुर्लक्ष करणाऱ्‍या पतीच्या प्रार्थना कदाचित घरातल्या घरातच राहतील!

आतापर्यंतच्या चर्चेत तुम्हाला हे स्पष्ट झाले असेल, की देवाने आपल्या प्रार्थना ऐकाव्यात असे आपल्याला वाटत असेल तर आपण काही अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत. परंतु पुष्कळ लोकांना हे महत्त्वाचे वाटत नाही. म्हणूनच तर कळकळीने प्रार्थना करूनही जगाची परिस्थिती बदललेली नाही.

तर मग, त्या आवश्‍यक गोष्टी कोणत्या आहेत? या प्रश्‍नाचे उत्तर प्रार्थना करण्याच्या कारणाशीच संबंधित आहे. खरे तर, प्रार्थना केल्याने काही फायदा होतो की नाही हे जाणून घेण्याआधी, प्रार्थना करण्यामागचा हेतू काय आहे हे आधी समजून घेतले पाहिजे. प्रार्थनेद्वारे यहोवाशी बोलण्याची तरतूद त्याने का केली?

[३ पानांवरील चित्राचे श्रेय]

G.P.O., Jerusalem