व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नव्या सहस्त्रकात शांती?

नव्या सहस्त्रकात शांती?

नव्या सहस्त्रकात शांती?

सप्टेंबर १४, १९९९ रोजी पॅरिस आणि न्यूयॉर्क सिटीमध्ये, संयुक्‍त राष्ट्रसंघाच्या जनरल ॲसेंब्लीने वर्ष २००० हे शांतीच्या संस्कृतीचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले. युनेस्कोचे भूतपूर्व डायरेक्टर जनरल फेडरिको मेयर यांनी तेव्हा सर्वांना, “संपूर्ण विश्‍वभरात शांतीची आणि अहिंसेची संस्कृती निर्माण” करण्याचे आव्हान केले.

युनेस्कोचे एक तत्त्व आहे, की “युद्धाची सुरवात लोकांच्या मनात होत असल्यामुळे, आधी आपण त्यांच्या मनात शांतीची कल्पना निर्माण केली पाहिजे.” या तत्त्वानुसार युनेस्को, “शिक्षण, विचारांची देवाण-घेवाण आणि सहकार्य” यांद्वारे शांतीची संस्कृती निर्माण करायचा प्रयत्न करीत आहे. मेयर यांनी म्हटले की “नुसते शांतीमय किंवा शांतीवादी असणे पुरेसे नाही तर शांती टिकून राहण्याकरता आपण ठोस पावले उचलणे महत्त्वाचे आहे.”

परंतु दुःखाची गोष्ट म्हणजे, वर्ष २००० हे कोणत्याही अर्थाने शांतीचे वर्ष नव्हते. इतिहासाने (यात २००० वर्षांच्या घटना देखील सामील आहेत) हे शाबीत करून दाखवले आहे की अनेक प्रामाणिक प्रयत्न करूनही युद्ध व हिंसा थांबवण्यात मानव असमर्थ ठरला आहे.

परंतु एका गोष्टीकडे आपण लक्ष दिले पाहिजे. ती गोष्ट म्हणजे, शांती खरोखरच शिक्षणाबरोबर संबंधित आहे. संदेष्टा यशयाने सुमारे २,७०० वर्षांआधी भाकीत केले होते की “तुझी सर्व मुले परमेश्‍वरापासून शिक्षण पावतील; तुझ्या मुलांना मोठी शांति प्राप्त होईल.” . (तिरपे वळण आमचे.) (यशया ५४:१३). त्याने हेही पाहिले होते, की एक काळ असा येईल जेव्हा सर्व राष्ट्रांतील लोक यहोवा देवाच्या मार्गांविषयी शिकण्यासाठी त्याच्या शुद्ध उपासनेसाठी येतील. हे लोक काय करतील? “ते आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ करितील, आपल्या भाल्याच्या कोयत्या करितील; यापुढे एक राष्ट्र दुसऱ्‍या राष्ट्रावर तरवार उचलणार नाही; ते इतःपर युद्धकला शिकणार नाहीत.” (तिरपे वळण आमचे.) (यशया २:२-४) या भविष्यवाणीनुसार, यहोवाचे साक्षीदार एका जगव्याप्त शैक्षणिक कार्यात भाग घेऊन लाखो लोकांना आपल्या मनातून राष्ट्रीयतेच्या आणि वांशिक द्वेषाच्या भावना काढून टाकण्यासाठी मदत करत आहेत. बहुतेक युद्धे याच कारणांमुळे होतात.

देवाच्या राज्यात युद्धे होणार नाहीत. पृथ्वीवर चिरकाल शांती व सुरक्षितता असेल. (स्तोत्र ७२:७; दानीएल २:४४) तेव्हा स्तोत्रकर्त्याचे हे शब्दही पूर्ण होतील: “या, परमेश्‍वराची कृत्ये पाहा, त्याने पृथ्वीची कशी नासधूस केली आहे. तो दिगंतापर्यंत लढाया बंद करितो.”—स्तोत्र ४६:८, ९.