यहोवाचे साक्षीदार दृढ विश्वासाने पुढे वाटचाल करतात!
यहोवाचे साक्षीदार दृढ विश्वासाने पुढे वाटचाल करतात!
वार्षिक सभेचा अहवाल
सध्याच्या या संशयवादी, अविश्वासू जगात यहोवाचे साक्षीदार दृढ विश्वास असलेले ख्रिस्ती या नात्याने सर्वांपेक्षा वेगळे दिसून येतात. ही गोष्ट शनिवारी ऑक्टोबर ७, २००० रोजी झालेल्या वार्षिक सभेमध्ये स्पष्ट करण्यात आली. वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ पेन्सिल्व्हेनियाची ही वार्षिक सभा यहोवाच्या साक्षीदारांच्या न्यू जर्सीतील जर्सी सिटी संमेलन गृहात संपन्न झाली. *
कार्यक्रमाचे सभाध्यक्ष जॉन ई. बार (यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाचे सदस्य) यांनी या शब्दांत सभेची सुरवात केली: “जगातल्या कोट्यवधी लोकांपैकी केवळ आपण हे जाणतो, नव्हे विश्वास करतो की यहोवाचा प्रिय पुत्र, ख्रिस्त येशू सध्या स्वर्गात राजा आहे आणि आपल्या शत्रुंमध्ये राज्य करीत आहे.” या दृढ विश्वासाची प्रचिती जगभरातल्या निरनिराळ्या भागांतील सहा उत्तेजनात्मक अहवालांवरून मिळाली.
हैटीमध्ये बायबल सत्याद्वारे भूतविद्येवर मात
हैटीमध्ये भूतविद्या, जादूटोणा वगैरे प्रकार फार प्रचलित आहेत. यावर अधिक खुलासा करत हैटीच्या शाखा समितीचे संयोजक जॉन नॉर्मन यांनी म्हटले: “आपले संरक्षण करण्यासाठी लोक सहसा भूतविद्या करतात.” पण, एकदा एका जादूगाराचा अपघात झाला आणि त्यात त्याचा पाय तुटला. तेव्हा तो स्वतःलाच विचारू लागला: “भूतात्मे तर माझं संरक्षण करत होते, मग हे कसं घडलं?” नंतर, यहोवाच्या साक्षीदारांशी त्याची गाठ पडली. त्यांच्याकडूनच तो बायबलचे सत्य शिकू लागला आणि भूतविद्येच्या कचाट्यातून त्याने स्वतःला मुक्त केले. येथे पुष्कळांनी हेच केले आहे. हैटीमध्ये वाढ होण्यास किती वाव आहे याची कल्पना स्मारकविधीच्या उपस्थितीवरून येते. एप्रिल १९, २००० रोजी झालेल्या ख्रिस्ताच्या मृत्यूच्या स्मारक विधीस उपस्थित असलेल्यांची संख्या हैटीतील राज्य प्रचारकांच्या चौपट होती.
कोरियाच्या अफाट क्षेत्रातला आवेश
कोरियातील यहोवाच्या साक्षीदारांपैकी ४० टक्के साक्षीदार पूर्ण-वेळचे सेवक आहेत. “या प्रचंड मोठ्या सैन्यामुळेच ४ कोटी ७० लाख लोकसंख्या असलेल्या आमच्या क्षेत्रात महिन्यातून एकदा कार्य केले जाते,” असे कोरियाच्या शाखा समितीचे संयोजक मिल्टन हॅमिल्टन यांनी म्हटले. कोरियातील साईन लँग्वेज (मूकबधिरांची सांकेतिक भाषा) मंडळ्यांमधली वाढ तर विशेष उल्लेखनीय आहे. एका साईन लँग्वेज विभागात ८०० बायबल अभ्यास चालवले जातात. म्हणजे एका प्रचारकाकडे सरासरी एक बायबल अभ्यास आहे. पण, दुःखाची गोष्ट अशी की आजही तटस्थतेच्या प्रश्नावरून तिथल्या तरुण बांधवांना तुरूंगात डांबले जाते. तरी आनंदाची गोष्ट अशी की या विश्वासू ख्रिश्चनांशी
तुरूंगाचे अधिकारी फार चांगला व्यवहार करतात. आणि भरवशाची कामे त्यांच्यावर सोपवतात.मेक्सिकोतील अंखड वाढीमुळे निर्माण होणाऱ्या गरजा भागवणे
मेक्सिकोत ऑगस्ट महिन्यात दिलेल्या क्षेत्र सेवा अहवालांवरून समजते की प्रचारकांच्या संख्येने ५,३३,६६५ चे शिखर गाठले होते. स्मारक विधीची उपस्थिती याच्या तिप्पट होती. मेक्सिकोच्या शाखा समितीचे सदस्य रॉबर्ट ट्रेसी म्हणाले की, “यंदाच्या वर्षात २४० राज्य सभागृहे बांधण्याचे आमचे ध्येय आहे. खरं म्हणजे आम्हाला त्याहून अधिक राज्य सभागृहांची गरज आहे.”
मेक्सिकोतले तरुण साक्षीदार इतर तरुणांसाठी खरोखरच आदर्श आहेत. एका तरुण साक्षीदाराबद्दल एका कॅथलिक पाळकाने म्हटले: “त्या तरुणासारखा एक जरी माझ्या चर्चमध्ये असला तरी पुरे. त्या लोकांच्या अढळ विश्वासाबद्दल आणि बायबलचा उत्तम वापर करण्याबद्दल मला त्यांचे फार कौतुक वाटते. देवाचे समर्थन करण्यासाठी त्यांनी आपल्या जीवाची देखील पर्वा केली नाही.”
सिएरा लिओनच्या खळबळजनक परिस्थितीतही सचोटी
सन १९९१ च्या एप्रिल महिन्यात सिएरा लिओनमध्ये मुलकी युद्ध सुरू झाले तेव्हा हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागले, कित्येक जखमी झाले आणि अनेकांना कायमचे अपंगत्व आले. तिथल्या शाखा समितीचे समन्वयक बिल कवन यांनी म्हटले: “युद्ध आणि संकटे यांमुळे लोकांच्या विचारसरणीत मोठा बदल झाला आहे. त्यामुळे सुवार्तेकडे दुर्लक्ष करणारे अनेकजण आता मोठ्या आस्थेने राज्याचा संदेश ऐकतात. कित्येक तर न बोलावताच राज्य सभागृहात सभांना येतात. याचे आता आम्हाला मुळीच नवल वाटत नाही. आणि कितीतरी वेळा तर लोक बांधवाना भर रस्त्यात गाठून बायबल अभ्यास करण्याची इच्छा दाखवतात.” सिएरा लिओनमध्ये परिस्थिती इतकी खळबळजनक असूनही राज्य प्रचाराचे कार्य परिणामकारक ठरत आहे.
दक्षिण आफ्रिकेचा प्रचंड मोठा बांधकाम प्रकल्प
दक्षिण आफ्रिकेच्या शाखा दप्तराच्या देखरेखेखाली असलेल्या क्षेत्रात सध्या हजारो राज्य सभागृहांची गरज निर्माण झाली आहे. शेकडो सभागृहे बांधून झाली आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या शाखा समितीचे सदस्य जॉन किकॉट म्हणाले: “आमच्या इथे पूर्वी एखाद्या झोपडीत अथवा झाडाखाली सभा व्हायच्या. पण, आता बसण्याची उत्तम सोय असलेल्या चांगल्या ठिकाणी सभा होतात. यांपैकी बहुतेक राज्य सभागृहे सर्वसाधारण डिझाईनची असली तरी त्या स्थानातल्या सर्वात दिमाखदार इमारती म्हणून त्या उठून दिसतात. काही ठिकाणी असे दिसून आले आहे, की एखादे राज्य सभागृह बांधल्यानंतर पुढच्या वर्षात मंडळीची दुप्पटीहून अधिक वाढ होते.”
युक्रेनमध्ये साक्षीदारांची एक नवीनच पिढी
सन २००० च्या सेवा वर्षात या देशात प्रचारकांच्या संख्येने १,१२,७२० चे शिखर गाठले. यांपैकी ५०,००० हून अधिक जण गेल्या पाच वर्षांच्या काळात बायबलचे सत्य शिकले. “आपल्या नावाची घोषणा करण्याकरता यहोवाने खरोखरच एक नवीन पिढी अर्थात युवकांची पिढी उत्पन्न केली आहे.” असे युक्रेनच्या शाखा समितीचे समन्वयक जॉन डीडर यांनी म्हटले. पुढे ते म्हणाले, की “गेल्या दोन वर्षांदरम्यान आम्ही ५ कोटीहून अधिक मासिके क्षेत्रात दिली. ही संख्या देशाच्या लोकसंख्येइतकी आहे. आणि अधिक माहितीकरता आस्थेवाईक लोकांकडून संस्थेला दर महिन्याला सरासरी एक हजार पत्रे मिळतात.”
कार्यक्रमाची इतर उत्तेजनपर वैशिष्ट्ये
नियमन मंडळाचे सदस्य डॅनियल सिडलिक यांनी एक लक्षवेधक भाषण दिले. “नियमन मंडळ हे कायदेशीर निगमापासून वेगळे कसे” या शीर्षकाचा सदर मासिकात दिलेला लेख त्यांच्या माहितीपूर्ण भाषणावरच आधारित आहे.
नियमन मंडळाचे आणखीन एक सदस्य थिओडर झराक यांनी एक विचार-प्रवर्तक भाषण दिले. भाषणाचा विषय होता: “मंडळीतील पर्यवेक्षक व सेवासेवक ईश्वरशासित पद्धतीने नियुक्त केले जातात.” या मासिकात दिलेला एक लेख याच विषयावर आधारित आहे.
वार्षिक सभेत नियमन मंडळाचे दुसरे एक सदस्य डेव्हिड स्प्लेन यांनी वर्ष २००१ च्या वार्षिक वचनावर एक प्रेरणादायी भाषण दिले. प्रेषित पौलाच्या शब्दांवर आधारित असलेले हे वार्षिक वचन म्हणते: “देवाच्या संपूर्ण इच्छेनुसार तुम्ही परिपूर्ण व दृढनिश्चयी [“दृढ विश्वासानिशी,” NW] असे स्थिर राहावे.” (कलस्सैकर ४:१२) सबंध जगभरात देव-राज्याच्या सुवार्तेचा विश्वासूपणे प्रचार करत असताना जगभरातील यहोवाच्या साक्षीदारांनी प्रेषित पौलाच्या वरील शब्दांचे अनुकरण करण्याचा दृढ संकल्प केला आहे.—मत्तय २४:१४.
[तळटीप]
^ हा कार्यक्रम अनेक ठिकाणी प्रसारित केला होता. त्यामुळे या सभेला उपस्थित असलेल्यांची एकूण संख्या १३,०८२ इतकी होती.