व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

समवयस्कांच्या दबावाचा ते कसा सामना करतात

समवयस्कांच्या दबावाचा ते कसा सामना करतात

समवयस्कांच्या दबावाचा ते कसा सामना करतात

आपण वाळीत टाकले जाऊ नये म्हणून अनेकजण समवयस्कांच्या आचारविचारांचे अनुकरण करतात. खासकरून तरुणांना ड्रग्ज किंवा अनैतिकतेसारख्या हानीकारक गोष्टींसाठी आपल्या साथीदारांना नकार देण्याचे धैर्य असले पाहिजे. हे धैर्य त्यांना कोठून मिळू शकते?

पोलंडमधील दोन तरुणींनी अलीकडेच असे लिहिले: “आमच्या वयाच्या मुलामुलींमध्ये आम्हाला जगाचा आत्मा स्पष्टपणे दिसतो. परीक्षेच्या वेळी ते कॉपी करतात, शिवीगाळ करतात, वाटेल तसा पेहराव करतात, वाटेल तसे वागतात, अनैतिक संगीत ऐकतात. पण तुम्ही आमच्यासारख्या तरुणांसाठी लेख लिहून, असमाधानी व बंडखोर किशोरवयीनांपासून आमचा बचाव करता त्यामुळे आम्ही तुमचे खूप आभार मानतो!

“टेहळणी बुरूज मधील लेखांबद्दल आम्हाला वाटणारी कृतज्ञता आम्ही शब्दांत व्यक्‍त करू शकत नाही. आम्हा तरुणांची कोणाला तरी आवश्‍यकता आहे, कोणी तरी आमची कदर करते असे या लेखांमुळे आम्हाला वाटू लागले. यहोवाला संतुष्ट करणाऱ्‍या मार्गाने चालण्यासाठी बायबलमधील सल्ल्याने आम्हाला मदत केली आहे. विश्‍वासूपणे यहोवाची सेवा करणेच जीवनाचा सर्वोत्तम मार्ग आहे याची आम्हाला खात्री पटली आहे.”

तरुण लोकही समवयस्कांच्या दबावाचा सामना करू शकतात. आपल्या “ज्ञानेंद्रियांना” प्रशिक्षण देण्याद्वारे ख्रिस्ती तरुण सुज्ञ निर्णय घेतात. या त्यांच्या निर्णयांवरून “जगाचा आत्मा नव्हे” तर “देवापासून निघणारा आत्मा” प्रदर्शित होतो.—इब्री लोकांस ५:१४; १ करिंथकर २:१२.