व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“सर्वात उत्कृष्ट कार्यसिद्धी”

“सर्वात उत्कृष्ट कार्यसिद्धी”

संपूर्ण आणि दृढनिश्‍चयी असे स्थिर राहा

“सर्वात उत्कृष्ट कार्यसिद्धी”

यहोवाच्या साक्षीदारांच्या आधुनिक काळातील इतिहासाच्या अगदी सुरवातीपासूनच त्यांना येशू ख्रिस्ताच्या एका भविष्यवाणीबद्दल खास आस्था होती. ती भविष्यवाणी होती: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.” (मत्तय २४:१४) १९१४ हे वर्ष अर्थात ‘शेवटला काळ’ जवळ आला तसे प्रामाणिक बायबल विद्यार्थ्यांनी दृढ निश्‍चयाने पवित्र शास्त्रावर आधारित एक अभूतपूर्व जागतिक शिक्षणाची मोहीम हाती घेतली.—२ तीमथ्य ३:१.

सबंध जगभर सुवार्तेची घोषणा करण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी यहोवाच्या सेवकांनी एक नवीन, साहसी आणि आकर्षक पद्धत उपयोगात आणली. त्याविषयी आणखी जाणण्यासाठी आपण त्या काळातच जाऊ या.

सुवार्तेची घोषणा करण्याचा नवीन मार्ग

वर्ष १९१४ आणि जानेवारी महिना आहे. न्यूयॉर्क शहरातल्या एका अंधाऱ्‍या सभागृहात ५,००० लोकांसोबत तुम्ही बसला आहात असा विचार करा. समोर चल-चित्रपटाचा मोठा पडदा आहे. पडद्यावर केस पिकलेली आणि लांब कोट परिधान केलेली एक व्यक्‍ती अवतरते. या आधी तुम्ही बरेच मूकपट पाहिले होते. पण या चित्रपटातली व्यक्‍ती चक्क बोलत आहे, आणि ते तुम्हाला ऐकायला देखील येत आहे. हा तंत्रज्ञानाचा एक नवीन शोध आहे आणि त्याच्या पहिल्याच शोला तुम्ही उपस्थित आहात. त्यातला संदेशही एकदम निराळा आहे. आणि त्या पडद्यावरची व्यक्‍ती आहे वॉच टावर संस्थेचे पहिले अध्यक्ष, चार्ल्झ टेझ रस्सल. आणि तेथे “फोटो-ड्रामा ऑफ क्रिएशन” सादर केला जात आहे.

लोकांपर्यंत पोहंचण्यासाठी चलचित्रपट उत्तम साधन ठरतील हे सी. टी. रस्सल यांना माहीत होते. म्हणून १९१२ साली त्यांनी “फोटो-ड्रॉमा ऑफ क्रिएशन” हा चलचित्रपट तयार करायला सुरवात केली. तो आठ तासांचा रंगीत आणि ध्वनीसहित चलचित्रपट होता.

“फोटो-ड्रामा”चे चार भाग होते; निर्मितीपासून मानवी इतिहास आणि ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राजवटीच्या शेवटी पृथ्वी व मानवजातीसंबंधी यहोवा देवाचा उद्देश पूर्णत्वास येईल येथपर्यंतची माहिती त्यात होती. याच तंत्रज्ञानामध्ये व्यावसायिकदृष्ट्या यश मिळवायला कित्येक वर्षे लागणार होती. परंतु, “फोटो-ड्रामा ऑफ क्रिएशन” लोकांना विनामूल्य दाखवण्यात आले!

“फोटो-ड्रामा”साठी उत्तम प्रतीचे संगीत रेकॉर्डिंग्स आणि फोनोग्राफ रेकॉर्डवरील ९६ भाषणे तयार करण्यात आली. जगिक इतिहासाचे वर्णन करणाऱ्‍या चित्रांचा उपयोग करून स्टिरिओप्टिकोन स्लाईड्‌स तयार करण्यात आल्या. तसेच, शेकडो नवीन चित्र आणि रेखाटलेली चित्रे देखील तयार करावी लागली. काही रंगीत स्लाईड्‌स आणि फिल्म्स हाताने रंगवाव्या लागल्या; हे अत्यंत मेहनतीचे काम होते. आणि तेही एक-दोन स्लाईड्‌स किंवा फिल्म्स नाही तर अशा असंख्य फिल्म्स बनवाव्या लागल्या, कारण कालांतराने प्रत्येकी चार भागांचे २० संच तयार करण्यात आले. पण त्यामुळे, “फोटो-ड्रामा”चा एक भाग ८० वेगवेगळ्या शहरांमध्ये कोणत्याही एका दिवशी दाखवणे शक्य झाले!

पडद्यामागे

“फोटो-ड्रामा”चे प्रदर्शन चालत असताना पडद्यामागे काय चालायचे? बायबल विद्यार्थी ॲलिस हॉफमन म्हणाल्या, “सुरवातीला बंधू रस्सलचे चित्र पडद्यावर दाखवले जायचे. मग त्यांचे ओठ हलू लागले की, एक फोनोग्राफ सुरू केला जायचा. . . . त्यांचा आवाज ऐकायला आम्हाला फार आनंद व्हायचा.”

टाईम-लॅप्स फोटोग्रॅफीविषयी सांगताना झोला हॉफमन म्हणाल्या: “निर्मितीच्या दिवसांविषयी दाखवताना तर मी चाटच पडले. कारण त्यात फुलं अक्षरशः उमलताना दाखवली होती.”

संगीत प्रेमी आणि यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाचे सदस्य कार्ल एफ. क्लाईन म्हणाले: “चित्रपट चालत असताना नार्सिसस आणि ह्‍यूमोरेस्केसारख्या सुरेख पार्श्‍वसंगीताची धुन वाजत होती.”

इतरही काही संस्मरणीय घटना घडल्या. क्लेटन जे. वुडवर्थ जुनियर म्हणाले, “काही वेळा गंमतीदार घटना घडायच्या. एकदा असे झाले की, ‘डोंगराकडे झेप घे रे पाखरा’ हे गीत रेकॉर्डवर चालत होते आणि पडद्यावर प्रलयपूर्व काळातील एका अजस्त्र डायनॉसरचे चित्र आले”!

“फोटो-ड्रामा ऑफ क्रिएशन” व्यतिरिक्‍त “युरेका ड्रामा” देखील होते. (पेटी पाहा.) यांतील एकामध्ये रेकॉर्ड केलेली भाषणे आणि संगीत होते. तर दुसऱ्‍यात रेकॉड्‌र्स आणि स्लाईड्‌स होत्या. “युरेका ड्रामा”मध्ये चलचित्र नव्हते तरी कमी लोकसंख्या असलेल्या ठिकाणी दाखवण्यासाठी ते फार फायदेकारक ठरले.

साक्षकार्याचे प्रभावशाली साधन

एकोणीसशे चवदाच्या शेवटापर्यंत, उत्तर अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलियातील ९०,००,००० पेक्षा अधिक श्रोत्यांना “फोटो-ड्रामा” दाखवण्यात आला होता. त्या काळी बायबल विद्यार्थ्यांची संख्या फार कमी होती तरीही या नवीन साधनाद्वारे सुवार्तेची घोषणा करण्याचा त्यांचा ठाम निश्‍चय होता. “फोटो-ड्रामा”चे सादरीकरण करण्यासाठी त्यांनी स्वेच्छेने दान देऊन उचित सभागृहे भाड्याने घेतली होती. अशाप्रकारे, “फोटो-ड्रामा ऑफ क्रिएशन”ने प्रेक्षकांना देवाचे वचन आणि त्याच्या उद्देशांविषयी माहिती देण्यात मोठा हातभार लावला.

सी. टी. रस्सल, यांना लिहिलेल्या पत्रात एका व्यक्‍तीने म्हटले: “तुमच्या ड्रामाने माझे जीवन पार बदलून टाकले (किंवा बायबलविषयी माझे ज्ञान पार बदलून टाकले असे म्हटले तरी चालेल).” दुसऱ्‍या एका व्यक्‍तीने म्हटले: “गेल्या वर्षी उन्हाळ्यात येथे दाखवलेल्या तुमच्या ‘फोटो-ड्रामा ऑफ क्रिएशन’मुळे मी विवाहबाह्‍य संबंधांमध्ये फसता फसता वाचले. . . . मला आता जी शांती मिळाली आहे ती मला जगाकडून कधीच मिळू शकत नाही. जगातली सगळी धनसंपत्ती मिळाली तरीही मी ही शांती त्यागणार नाही.”

संस्थेच्या मुख्यालयाचे एक फार जुने सदस्य, डेमेट्रियस पापाजॉर्ज म्हणाले: “त्या काळी बायबल विद्यार्थ्यांची संख्या फार कमी होती आणि त्यांच्याकडे फार जास्त पैसासुद्धा नव्हता हे जर लक्षात घेतले तर ‘फोटो-ड्रामा’ ही सर्वात उत्कृष्ट कार्यसिद्धी म्हणावी लागेल. त्यामागे खरोखरच यहोवाचा आत्मा होता!”

[८, ९ पानांवरील चौकट/चित्रे]

“यूरेका ड्रामा”

“फोटो-ड्रामा”चा प्रिमीयर दाखवून आठ महिने झाल्यावर त्याची दुसरी एक आवृत्ती अर्थात “यूरेका ड्रामा” तयार करण्याची गरज भासली. संपूर्ण “फोटो-ड्रामा” हा मोठमोठ्या शहरांमध्ये दाखवला जात असताना, “यूरेका”चे भाग छोट्या गावांमध्ये आणि ग्रामीण भागांमध्ये दाखवले जात होते. त्यातला संदेश मात्र तोच होता. “यूरेका ड्रामा”ची एक आवृत्ती तर प्रचारामध्ये “बहिणींसाठी सर्वात उत्तम” होती असे म्हटले गेले. का तर, त्याच्या फोनोग्राफ रेकॉड्‌र्सचे वजन फक्‍त १४ किलोग्रॅम होते. शोसाठी मात्र फोनोग्राफ देखील घ्यावा लागत असे.