व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सात्विकतेने का चालावे?

सात्विकतेने का चालावे?

सात्विकतेने का चालावे?

कुनिहितो हे पन्‍नाशीच्या आसपास असलेले एक जपानी गृहस्थ अलीकडेच अमेरिकेत स्थायिक झाले. * त्यानंतर काही आठवड्यांनीच त्यांना अशा प्रसंगाला तोंड द्यावे लागले ज्यामुळे कदाचित त्यांचे करियर खराब झाले असते. कुनिहितो म्हणतात: “एकदा माझ्या बॉसनी मला विचारलं, ‘तू हे काम करशील का?’ ते काम मी करू शकतो याची मला पूर्ण खात्री होती. पण, लहानपणापासून विनम्रता हे सात्विकतेचे लक्षण आहे असे शिकवल्यामुळे, मी म्हणालो, ‘हे मला नक्की जमेल का ते ठाऊक नाही, पण मी प्रयत्न करीन.’ माझे बॉस अमेरिकन होते, त्यामुळे त्यांना माझं उत्तर ऐकून असं वाटलं की ते काम मला जमणार नाही आणि माझ्यात इतका आत्मविश्‍वास नाही. त्यांना काय वाटतं ते कळाल्यावर मला जाणवलं की मला माझ्यात बदल करावा लागेल.”

न्यूयॉर्क सिटीत राहणारी मरिया एक हुशार विद्यार्थिनी होती. ती नेहमी आपल्या वर्गसोबत्यांना अभ्यासात मदत करायची. ह्वेन हा तिच्या वर्गात होता आणि तोसुद्धा मरियाची मदत घ्यायचा. पण त्याला मरिया आवडायची म्हणून तो तिला पटवण्याचा प्रयत्न करू लागला. मरियाला आपले चारित्र्य शुद्ध ठेवायचे होते, पण ती स्वतःवर नियंत्रण ठेवू शकली नाही आणि शेवटी त्याच्यासोबत लैंगिक संबंध ठेवू लागली.

विविध संस्कृती असलेल्या या जगात नैतिकता मुळात राहिलेलीच नाही. अशा परिस्थितीत सात्विकतेने चालणे फार कठीण आहे. पण मग, सात्विकतेने का चालावे? कारण चांगले वर्तन देवाला संतुष्ट करते आणि आपल्यापैकी पुष्कळजण त्याला संतुष्ट करू इच्छितात.

देवाचे वचन अर्थात बायबल, सात्विकतेने चालण्यास उत्तेजन देते. उदाहरणार्थ, प्रेषित पौलाने लिहिले: “जो काही सद्‌गुण (सात्विक वर्तन), जी काही स्तुति, त्यांचे मनन करा.” (फिलिप्पैकर ४:८) प्रेषित पेत्रानेही असेच उत्तेजन दिले; तो म्हणाला, “आपल्या विश्‍वासात सात्विकतेची” भर घाला. (२ पेत्र १:५) पण सात्विकता म्हणजे काय? एखाद्या वर्गात बसून ती शिकता येते का? सात्विकतेने कसे चालता येईल?

[तळटीप]

^ काही नावे बदलण्यात आली आहेत.