व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

डोक्यावर सतत टांगती तलवार

डोक्यावर सतत टांगती तलवार

डोक्यावर सतत टांगती तलवार

“आपण दररोज जे काही करतो त्यापैकी कोणतेही काम निर्धोक नाही. त्यामुळे जीवनातली कोणतीही गोष्ट—अगदी झोपसुद्धा—आपल्या आयुष्याची शेवटची गोष्ट ठरू शकते.” —डिस्कव्हर मासिक.

जीवनात मृत्यू किंवा अपघात कधी सांगून येत नसतात. म्हणूनच मनुष्याच्या जीवनाची तुलना सुरुंग पेरलेल्या क्षेत्रावरून चालण्याशी केली आहे. निरनिराळ्या देशांत निरनिराळ्या प्रकारचे धोके दिसून येतात. काही ठिकाणी वाहन अपघातांचा धोका, तर काही ठिकाणी मुलकी युद्धांचा; काही ठिकाणी दुष्काळाचा तर काही ठिकाणी एड्‌स, कॅन्सर, हृदयविकारसारख्या रोगांचा. अशा अनेक गोष्टींचा धोका आज जाणवतो. उदाहरणार्थ, आफ्रिकेच्या उप-सहारा विभागात एड्‌सचा रोग सगळ्यात मोठा जीवघेणा रोग बनला आहे. यु.एस. न्यूस ॲण्ड वर्ल्ड रिपोर्टने दिलेल्या माहितीनुसार, “गेल्या वर्षी या जीवघेण्या रोगाने २२ लाख लोकांचा बळी घेतला. ही संख्या, आफ्रिकेतील एकूण मुलकी युद्धांत मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या १० पट अधिक आहे.”

त्यामुळे आजाराचा आणि अपंगत्वाचा धोका कमी करून लोकांचे आयुष्य वाढवण्यासाठी लोक पाण्यासारखा पैसा ओतत आहेत. आणि यातून समोर आलेल्या कल्पना (खाण्या-पिण्याच्या उत्तम सवयी आणि व्यायाम) काही प्रमाणात परिणामकारक ठरू शकतात. पण, जीवनाच्या प्रत्येक महत्त्वपूर्ण पैलूविषयी भरवशालायक माहिती देणारे आणि अधिक सुरक्षित व निश्‍चिंत जीवन जगण्यास मदत करणारे एक माहितीसूत्र सर्वांसाठी उपलब्ध आहे. ते माहितीसूत्र म्हणजे बायबल. आपल्या आरोग्याशी

आणि कल्याणाशी संबंधित अनेक पैलूंवर ते मार्गदर्शन करते. अर्थात, मानवाच्या प्रत्येक समस्येवर बायबलमध्ये काटेकोर माहिती दिलेली नाही. पण, बायबलमध्ये खाण्या-पिण्याच्या सवयी, आरोग्य, मनोवृत्ती, सेक्स तसेच मद्यपान, तंबाखू, अंमली पदार्थांचे सेवन आणि इतर असंख्य गोष्टींसंबंधी आपल्या मार्गदर्शनाकरता उत्कृष्ट सिद्धान्त दिले आहेत.

हल्ली अनेकजण आर्थिकरित्या सुरक्षित नाहीत. अशा लोकांसाठी देखील बायबलमध्ये उपयुक्‍त मार्गदर्शन दिले आहे. पैशाबद्दल आणि खर्चाबद्दल डोळस दृष्टिकोन राखण्याचे उत्तेजन तर बायबल देतेच; पण, त्याशिवाय, एक चांगला कर्मचारी किंवा एक चांगला मालक कसा बनता येईल याबद्दलही बायबल बरेच काही शिकवते. थोडक्यात सांगायचे तर बायबल एक उत्तम मार्गदर्शक आहे. केवळ आर्थिक सुरक्षितता आणि आरोग्य यांसाठीच नव्हे, तर संपूर्ण जीवनासाठीच. जीवनात बायबल किती परिणामकारक आहे हे तुम्हाला पाहायचे का? मग, पुढचा लेखही वाचून पाहा.