व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“तुझ्या देहाला [बेंबीला] आरोग्य”

“तुझ्या देहाला [बेंबीला] आरोग्य”

“तुझ्या देहाला [बेंबीला] आरोग्य”

असे मानले जाते की, बहुतेक आजारांमागे भीती, दुःख, हेवा, संताप, द्वेष आणि दोषी भावना ही कारणे असतात. हे लक्षात घेता, “परमेश्‍वराचे भय,” “तुझ्या बेंबीला आरोग्य व तुझ्या हाडांस मज्जा होईल” हे बायबलचे वाक्य आपल्याला किती सांत्वन देते!—नीतिसूत्रे ३:७, ८, पं.र.भा., तळटीप.

हाडे शरीराला आधार देणारा सापळा असतात. त्यामुळे, एखाद्या व्यक्‍तीला सूचित करण्यासाठी खासकरून गहिऱ्‍या भावना असल्याचे दाखवण्यासाठी बायबलमध्ये ‘हाडे’ या शब्दाचा लाक्षणिकरित्या वापर केला आहे. परंतु, यहोवाचे भय “बेंबीला आरोग्य” कसे देईल?

या उताऱ्‍यात ‘बेंबीचा’ उल्लेख कशासाठी केला आहे याविषयी बायबल विद्वानांचे वेगवेगळे मत आहे. एका टीकाकाराच्या मते, ‘बेंबी’ ही शरीराच्या मध्यभागी असल्यामुळे ती सर्व महत्त्वपूर्ण अवयवांचे सूचक आहे. दुसऱ्‍या विद्वानाच्या मते, ‘बेंबी’ या शब्दाचा अर्थ, यहेज्केल १६:४ मध्ये वापरल्यानुसार नाळ असा होऊ शकतो. असे असल्यास, नीतिसूत्रे ३:८ हे दाखवून देत असेल की, एखादे असहाय अर्भक जसे आपल्या आईवर पोषणासाठी पूर्णपणे विसंबून असते तसेच आपणही देवावर पूर्णपणे विसंबून असल्याशिवाय चालणार नाही. दुसरे एक मत असे आहे की, येथे ‘बेंबीचा’ अर्थ शरीराचे स्नायू आणि कंडरा असा होऊ शकतो. या वचनाचा संदर्भ पाहिल्यास, कदाचित यांची तुलना ‘हाडांशी’ अर्थात शरीराच्या दणकट भागांशी केली जात असेल.

याचा नेमका अर्थ कोणताही असला तरी एक गोष्ट मात्र निश्‍चित आहे: यहोवाविषयी आदरयुक्‍त भय बाळगण्यातच शहाणपण आहे. देवाच्या दर्जांनुरूप राहणे सध्या आपल्या आरोग्यासाठी चांगले असेल. त्याहून महत्त्वाचे म्हणजे, यहोवाची कृपादृष्टी आपल्यावर असेल ज्यामुळे आपल्याला त्याच्या नवीन दुनियेत शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या परिपूर्ण आरोग्याचे अनंतकालिक जीवन मिळेल.—यशया ३३:२४; प्रकटीकरण २१:४; २२:२.

[३२ पानांवरील चित्राचे श्रेय]

Dr. G. Moscoso/SPL/Photo Researchers