व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

दारिद्र्‌याविरुद्धचा लढा अयशस्वी लढा?

दारिद्र्‌याविरुद्धचा लढा अयशस्वी लढा?

दारिद्र्‌याविरुद्धचा लढा अयशस्वी लढा?

न्यूयॉर्क सिटीमधील संयुक्‍त राष्ट्र भवन पाहायला येणारे पर्यटक इकॉनॉमिक ॲण्ड सोशियल कौन्सिल चेंबर पाहतात तेव्हा त्यांना सार्वजनिक गॅलरीवरील छप्परातील पाईप आणि विजेच्या तारा स्पष्टपणे दिसतात. पर्यटकांना मार्गदर्शन देणारा मार्गदर्शक म्हणतो: “छप्पराचे ‘अर्धवट’ राहिलेले हे काम लाक्षणिकपणे याची आठवण करून देते की संयुक्‍त राष्ट्राचे आर्थिक व सामाजिक कार्य कधीच पूर्ण होत नाही; जगातील लोकांच्या राहणीमानाच्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी नेहमीच काही ना काही करण्याचे बाकी असेल.”

सर्वांना उच्च दर्जाचे राहणीमान मिळण्यास प्रोत्साहन देण्याचे या कौन्सिलचे काम आहे खरे, पण ही कामगिरी कधी पूर्ण होईल असे वाटत नाही. सामान्य युगाच्या पहिल्या शतकामध्ये येशू ख्रिस्त पृथ्वीवर सेवा करीत होता तेव्हा त्याने म्हटले होते: “परमेश्‍वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दीनास सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला.” (लूक ४:१८) त्याने कोणती “सुवार्ता” सांगितली? “दुर्बलास दुर्ग” असलेला यहोवा देव एक राज्य स्थापन करील ज्याचा राजा येशू ख्रिस्त असेल, ही सुवार्ता त्याने सांगितली. हे राज्य काय करील? यशयाने याविषयी असे भाकीत केले होते: “सेनाधीश परमेश्‍वर . . . सर्व राष्ट्रांसाठी मिष्टान्‍नाची मेजवानी, राखून ठेवलेल्या द्राक्षारसाची मेजवानी करीत आहे; उत्कृष्ट मिष्टान्‍नाची व राखून ठेविल्यावर गाळलेल्या द्राक्षारसाची मेजवानी करीत आहे. तो मृत्यु कायमचा नाहीसा करितो, प्रभु परमेश्‍वर सर्वांच्या चेहऱ्‍यावरील अश्रु पुशितो.”—यशया २५:४-६,.

देवाचे राज्य ‘जगातील लोकांच्या राहणीमानाच्या परिस्थितींत कायमचीच सुधारणा’ कशी करेल याविषयी तुम्हाला आणखी माहीत करून घ्यायचे आहे का? या विषयावर बायबल काय म्हणते याची माहिती देण्याकरता एखाद्या प्रशिक्षित शिक्षकाने तुमची मदत करावी अशी तुमची इच्छा असल्यास काय करावे यासाठी खालील माहिती वाचा आणि त्यानुसार कार्य करा.