रक्तहीन शस्त्रक्रियेची “वैद्यकीय क्षेत्रात वाढती लोकप्रियता”
रक्तहीन शस्त्रक्रियेची “वैद्यकीय क्षेत्रात वाढती लोकप्रियता”
“‘रक्तहीन’ शस्त्रक्रिया” या शीर्षकाखाली मॅक्लिन्स मासिकाने म्हटले, की कॅनडाच्या डॉक्टरांनी “अशी काही तंत्रे विकसित केली आहेत ज्यामुळे गेल्या पाचएक वर्षांपासून रक्तहीन शस्त्रक्रियेला वैद्यकीय क्षेत्रात वाढती लोकप्रियता मिळत आहे.” विनिपेग्स हेल्थ सायन्स सेंटरचे अनेस्थेसियोलॉजिस्ट, ब्रायन म्यूरहेड या डॉक्टरांपैकी एक आहेत. पण, कोणत्या गोष्टीने डॉ. ब्रायन म्यूरहेडना पर्यायी रक्तहीन उपचार पद्धतीचा शोध लावण्यास प्रवृत्त केले?
सन १९८६ मध्ये डॉ. म्यूरहेड यांनी ७० वर्षांच्या एका गृहस्थावर रक्ताविना शस्त्रक्रिया करण्याची जोखीम पत्करली. या गृहस्थाला रक्तस्रावी अल्सर झाला होता. पण, तो पेशन्ट यहोवाचा साक्षीदार असल्यामुळे आपल्या बायबल-आधारित विश्वासांना अनुसरुन त्याने डॉक्टरांना रक्तहीन उपचार पद्धतीची विनंती केली. (प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९) त्यामुळे डॉ. म्यूरहेड यांनी “क्वचितच वापरल्या जाणाऱ्या पद्धतीचा उपयोग केला. या उपचारात रुग्णाचा रक्तदाब वाढवण्यासाठी त्याच्या शरीरात सलाईन सोल्यूशन संक्रमित केले जाते,” असा अहवाल मॅक्लिन्स या मासिकाने दिला. “ही पद्धत यशस्वी ठरली. यामुळे म्यूरडेड यांचा विश्वास अधिकच बळावला आणि ते म्हणाले, की ‘रक्तसंक्रमणाच्या बाबतीत आपण फारच अतिरेक करत आहोत. आता मात्र पर्यायी उपचार पद्धती शोधून काढणे अनिवार्य आहे असे मला वाटते.’”
आज रक्तहीन शस्त्रक्रियेची गरज दोन गोष्टींमुळे निर्माण होते. एक म्हणजे भविष्यात, दान केलेल्या रक्ताचा पुरेसा साठा आपल्याकडे असेल की नाही अशी चिंता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दूषित रक्तसंक्रमणातून रुग्णाला होणाऱ्या इतर संसर्गाची भीती.” रक्तहीन उपचार पद्धतीचा केवळ यहोवाच्या साक्षीदारांनाच नव्हे तर इतर असंख्य लोकांना देखील फायदा झाला आहे. अशा रक्तहीन उपचार पद्धतींचा शोध लावणाऱ्या डॉक्टरांचे आपण किती आभारी आहोत! “या उपचार पद्धतीत रक्तसंक्रमणाचा प्रश्नच निर्माण होत नाही. शिवाय, या पद्धतीत दूषित रक्तामुळे रुग्णाला प्रादुर्भाव होण्याची शक्यताही फार कमी असते,” असे मॅक्लिन्स हे मासिक म्हणते. पण, कधीकधी “अगदी शुद्ध” रक्तसुद्धा रुग्णाची रोग-प्रतिबंधक क्षमता तात्पुरती कमकुवत किंवा निकामी करू शकते. आणि त्यामुळे रुग्णाला प्रादुर्भाव होण्याचा धोका संभवू शकतो.
पण, पर्यायी रक्तहीन उपचार पद्धतीवरील यहोवाच्या साक्षीदारांच्या अढळ विश्वासाचे कारण काय? याचे उत्तर, रक्ताने तुमचे जीवन कसे वाचू शकते? या माहितीपत्रकात दिलेले आहे. हे माहितीपत्रक वाचण्याची तुमची इच्छा असल्यास यहोवाचे साक्षीदार तुमची मदत करण्यास सदैव तयार असतील.