व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पवित्र जनांसाठी पौल मदतनिधी उभारतो

पवित्र जनांसाठी पौल मदतनिधी उभारतो

पवित्र जनांसाठी पौल मदतनिधी उभारतो

खऱ्‍या ख्रिश्‍चनांना आध्यात्मिक गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत. परंतु, इतरांच्या हिताचीही त्यांना तितकीच चिंता आहे. पुष्कळदा त्यांनी गरजू लोकांची मदत केली आहे. ख्रिश्‍चनांना बंधूप्रीतीमुळे आपल्या गरजवंत बांधवांची मदत करण्याची प्रेरणा मिळते.—योहान १३:३४, ३५.

आपल्या बंधू-बहिणींबद्दल प्रेम असल्यामुळेच प्रेषित पौल अखया, गलती, मासेदोनिया आणि आशियाच्या प्रांतातील मंडळ्यांमधून निधी जमा करण्यासाठी योजना करू शकला. याची काय आवश्‍यकता होती? मदतकार्य कशाप्रकारे संघटित करण्यात आले? त्याला काय प्रतिसाद मिळाला? आणि त्यावेळी जे काही घडले ते जाणून घेणे आपल्यासाठी का महत्त्वाचे आहे?

जेरूसलेममधील मंडळीची स्थिती

सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टनंतर, इतर ठिकाणचे यहुदी आणि यहुदीय-मतानुसारी जे पेन्टेकॉस्ट रोजी शिष्य बनले होते ते खऱ्‍या विश्‍वासाविषयी अधिक शिकण्याकरता काही वेळ जेरूसलेममध्येच राहिले. या काळादरम्यान, सह-उपासकांनी गरज पडल्यावर आपल्या बांधवांची मोठ्या आनंदाने मदत केली. (प्रेषितांची कृत्ये २:७-११, ४१-४४; ४:३२-३७) यहुदी राष्ट्रवादींनी विद्रोह आणि हिंसात्मक कृत्यांना चेतवल्यावर दंगली होऊ लागल्याने बांधवांना मदतीची आणखीच जास्त गरज भासली असेल. ख्रिस्ताचा एकही अनुयायी उपाशीपोटी राहू नये म्हणून गरजवंत विधवांना रोज शिधासामुग्री वाटली जात असे. (प्रेषितांची कृत्ये ६:१-६) हेरोदने ख्रिस्ती मंडळीचा खूप छळ केला आणि सा.यु. ४० चे दशक अर्धे उलटून गेल्यावर यहुदीयात भयंकर दुष्काळ पडला. पौलाने म्हटल्याप्रमाणे, येशूच्या अनुयायांकरता तो ‘दुःख,’ “संकटे” आणि “आपल्या मालमत्तेची हानी” सोसण्याचा काळ होता.—इब्री लोकांस १०:३२-३४; प्रेषितांची कृत्ये ११:२७–१२:१.

सा.यु. ४९ च्या सुमारास परिस्थिती तितकीच चिंताजनक होती. म्हणून, पौलाने मुख्यतः विदेश्‍यांमध्ये प्रचार करावा असे मान्य केल्यावर पेत्र, याकोब आणि योहानाने त्याला ‘गरिबांची आठवण ठेवण्यास’ आर्जवले. आणि पौलाने तेच करण्याचा प्रयत्न केला.—गलतीकर २:७-१०.

मदतनिधी गोळा करण्याची व्यवस्था

यहुदियातील गरीब ख्रिश्‍चनांना मदतनिधी देण्याचे काम पौलाने सांभाळले होते. सा.यु. ५५ च्या सुमारास त्याने करिंथकरांना म्हटले: “पवित्र जनांसाठी जी वर्गणी गोळा करावयाची तिच्याविषयी मी गलतीयातील मंडळ्यांना आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्हीहि करा. आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही प्रत्येकाने जसे आपणाला यश मिळाले असेल त्या मानाने आपणाजवळ द्रव्य जमा करून ठेवावे; . . . [मग] ज्या कोणास तुम्ही पत्रे देऊन मान्यता द्याल त्यांना तुमचा धर्मादाय यरुशलेमेस पोहंचविण्याकरिता मी पाठवीन.” (१ करिंथकर १६:१-३) एका वर्षांनंतर पौलाने सांगितले की मासेदोनिया आणि अखयासुद्धा मदतकार्यात सहभागी होत होते. जमा केलेला पैसा जेरूसलेमला पाठवण्यात आला तेव्हा आशिया प्रांतातले प्रतिनिधी तेथे होते. यावरून हे दिसून येते की, त्या भागातल्या मंडळ्यांनीही वर्गणी दिली होती.—प्रेषितांची कृत्ये २०:४; २ करिंथकर ८:१-४; ९:१, २.

आपल्या ऐपतीपेक्षा जास्त देण्याची जबरदस्ती कोणावरही करण्यात आली नव्हती. तर समानता करण्यात आली होती जेणेकरून जेरूसलेम व यहुदियातील पवित्र जनांची गरज दुसऱ्‍यांच्या वैपुल्यातून पूर्ण केली होती. (२ करिंथकर ८:१३-१५) पौलाने म्हटले, “प्रत्येकाने आपआपल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे; दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये; कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो.”—२ करिंथकर ९:७.

प्रेषित पौलाने करिंथकरांना उदारता दाखवण्यासाठी चांगले कारण दिले. येशू ‘त्यांच्याकरिता दरिद्री झाला, अशा हेतूने की, त्याच्या दारिद्र्‌याने ते आध्यात्मिकरित्या धनवान व्हावेत.’ (२ करिंथकर ८:९) यावरून निश्‍चितच त्यांना येशूच्या उदारतेचे अनुकरण करण्याची प्रेरणा मिळाली असेल. शिवाय, पवित्र जनांच्या गरजा भागवण्यासाठी त्यांनी मदत करणे उचित होते कारण “सर्व प्रकारच्या औदार्यासाठी” देव त्यांना संपन्‍न करत होता.—२ करिंथकर ९:१०-१२.

मदतकार्य करणाऱ्‍यांची मनोवृत्ती

पहिल्या शतकात, पवित्र जनांसाठी मदतकार्य केलेल्या लोकांची मनोवृत्ती पाहून स्वेच्छेने देण्याविषयी आपण पुष्कळ काही शिकू शकतो. हा निधी गोळा केल्यामुळे त्यांच्यासोबत यहोवाची उपासना करणाऱ्‍या बांधवांबद्दल त्यांना चिंता आहे एवढेच फक्‍त दिसून आले नाही तर यहुदी आणि विदेशी ख्रिश्‍चनांमध्ये बंधुत्वाचे बंधन आहे हे सिद्ध झाले. देणगी दिल्याने व स्वीकारल्याने विदेशी आणि यहुदी यांच्यात ऐक्य आणि मैत्री होती हे सूचित झाले. त्यांची मदत आर्थिक स्वरूपाची आणि आध्यात्मिक स्वरूपाची देखील होती.—रोमकर १५:२६, २७.

सुरवातीला पौलाने मासेदोनियातील ख्रिश्‍चनांना देणगी देण्यास सांगितले नसावे कारण ते देखील गरिबीत दिवस कंठत होते. तरीसुद्धा, आपल्याला ‘सहकार्य करू देण्याची कृपा व्हावी असे ते आग्रहपूर्वक मागत राहिले.’ स्वतः “संकटाच्या बिकट परिस्थितीत” असतानाही त्यांनी आत्यंतिक आनंदाने ‘आपल्या शक्‍तिपलीकडे दान दिले’! (२ करिंथकर ८:१-४) रोमी लोकांसाठी निषिद्ध असलेला धर्म ते पाळत होते असा त्यांच्यावर केलेला आरोप, हीसुद्धा एक मोठी परीक्षाच होती. त्यामुळे, अशीच परीक्षा सोसणाऱ्‍या आपल्या यहुदी बांधवांबद्दल त्यांना सहानुभूती का होती हे समजण्याजोगे आहे.—प्रेषितांची कृत्ये १६:२०, २१; १७:५-९; १ थेस्सलनीकाकर २:१४.

सुरवातीला, मासेदोनियातील बांधवांना वर्गणी देण्याचे उत्तेजन देण्याकरता पौलाने करिंथकरांचे आवेशी उदाहरण दिले होते. पण नंतर मात्र करिंथकरांचा आवेश मालवला. मग प्रेषित पौलाने करिंथकरांना उत्तेजन देण्यासाठी मासेदोनियातील बांधवांचे उदाहरण दिले. त्यांनी एक वर्षाआधी सुरू केलेले कार्य पूर्ण करण्याची आता गरज आहे अशी त्यांना आठवण करून देण्याची त्याला गरज भासली. पण नेमके काय झाले होते?—२ करिंथकर ८:१०, ११; ९:१-५.

तीताने करिंथमध्ये वर्गणी गोळा करण्याचे काम सुरू केले होते पण नंतर समस्या निर्माण झाल्याने त्याच्या प्रयत्नांना यश आले नाही. मासेदोनियात असलेल्या पौलाशी सल्ला मसलत केल्यावर करिंथमधील मंडळीला उत्तेजन देण्यासाठी तीत आणखी दोन जणांसह तेथे परतला आणि त्याने वर्गणी गोळा करण्याचे काम पूर्ण केले. पौलाने करिंथकरांकडून पैसा उकळण्याचा प्रयत्न केला असावा असे काहींनी कदाचित सुचवले असावे. कदाचित यासाठीच त्याने तीन जणांना वर्गणी गोळा करण्याचे काम पूर्ण करायला पाठवले आणि त्या प्रत्येकाला शिफारस पत्र दिले. पौल म्हणाला: “आम्हाकडून चालविलेल्या ह्‍या औदार्याच्या कार्यात कोणालाहि आम्हाला दोष लाविता येऊ नये म्हणून तजवीज करण्यात आली आहे; आम्ही ‘प्रभूच्या दृष्टीने जे मान्य,’ इतकेच नव्हे तर ‘मनुष्याच्याहि’ दृष्टीने जे मान्य, ते करण्याची खबरदारी घेतो.”—२ करिंथकर ८:६, १८-२३; १२:१८.

जमा केलेली वर्गणी देणे

सा.यु. ५६ च्या वसंतऋतूपर्यंत जमा केलेली ही वर्गणी जेरूसलेमला घेऊन जाण्याकरता तयार होती. वर्गणी देणाऱ्‍यांनी ते पैसे घेऊन जाण्यासाठी निवडलेल्या लोकांसोबत पौल जाणार होता. प्रेषितांची कृत्ये २०:४ येथे म्हटले आहे: “पुर्राचा मुलगा सोपत्र बिरुयाकर, थेस्सलनीकाकरातले अरिस्तार्ख व सकूंद, गायस दर्बेकर, तीमथ्य आणि आशिया प्रांतातील तुखिक व त्रफिम हे त्याच्याबरोबर आशियापर्यंत गेले.” पुराव्यानुसार असे दिसून येते की, त्यांच्यासोबत लूकही होता; त्याने कदाचित फिलिप्पै येथील ख्रिश्‍चनांचे प्रतिनिधीत्व केले असावे. अशाप्रकारे, कमीत कमी नऊ जण या कामासाठी गेले.

विद्वान डिटर जॉर्जी यांच्या मते, “वर्गणी म्हणून गोळा झालेली रक्कम बरीच मोठी असावी नाहीतर पौलाला आणि इतक्या सर्व प्रतिनिधींना पाठवण्याची तसदी घेण्यात आली नसती आणि तितका खर्चही करण्यात आला नसता.” पौलासोबत इतके सगळे प्रतिनिधी पाठवल्याने रक्कम सुरक्षितपणे नेता आलीच शिवाय कोणाला पौलावर चोरीचा आळ घालता आला नाही. त्याच्यासोबत गेलेले प्रतिनिधी जेरूसलेममधील पवित्र जनांसमोर विदेशी मंडळ्यांचे प्रतिनिधीत्व करत होते.

करिंथपासून सिरियापर्यंत जहाजाने प्रवास करून हे सगळे वल्हांडण सणाच्या वेळी जेरूसलेममध्ये पोहंचले असते. परंतु, पौलाला ठार मारण्याचा कट रचण्यात आला आहे अशी खबर मिळताच त्यांनी आपल्या योजना बदलल्या. (प्रेषितांची कृत्ये २०:३) कदाचित त्याच्या शत्रूंनी समुद्रप्रवासातच त्याचा काटा काढण्याचा विचार केला असावा.

पण पौलाला वेगळीच चिंता लागून होती. ‘यहूदीयात जे अविश्‍वासी आहेत त्यांच्यापासून सुटका व्हावी, आणि यरुशलेमेसाठी त्याची सेवा पवित्र लोकांस मान्य व्हावी’ म्हणून त्याने जाण्याआधी रोममधील ख्रिश्‍चनांना त्याच्यासाठी प्रार्थना करायला सांगितले. (रोमकर १५:३०, ३१, पं.र.भा.) त्याने आणलेल्या वर्गणीबद्दल पवित्र जन मनापासून कदर व्यक्‍त करतील तरीही त्याच्या येण्यामुळे सर्व यहुद्यांमध्ये कशी खळबळ माजेल याची त्याला विशेष चिंता होती.

प्रेषित पौलाने गरिबांनाही ध्यानात ठेवले. ही वर्गणी नेमकी केव्हा देण्यात आली याविषयी शास्त्रवचनांमध्ये काही सांगितलेले नाही तरीपण वर्गणी दिल्यावर एकतेची भावना निर्माण झाली आणि आपल्या यहुदी सह-उपासकांकडून मिळालेल्या आध्यात्मिक धनाची आपल्याला कदर आहे हे दाखवायला विदेशी ख्रिश्‍चनांना संधी मिळाली एवढे मात्र खरे. जेरूसलेममध्ये आल्यावर काही दिवसांनी पौल मंदिरात गेला तेव्हा मोठा दंगा झाला आणि त्यामुळे त्याला अटक करण्यात आली. पण यामुळे नंतर त्याला सुभेदार आणि राजे यांच्यापुढे साक्ष द्यायला संधी मिळाली.—प्रेषितांची कृत्ये ९:१५; २१:१७-३६; २३:११; २४:१–२६:३२.

आपल्या काळातील वर्गण्या

पहिल्या शतकापासून आतापर्यंत बरेच काही बदलले आहे—पण देणगी देण्यामागील तत्त्वे मात्र बदललेली नाहीत. ख्रिश्‍चनांना आजही आर्थिक गरजांविषयी सांगण्यात येते. गरजवंतांसाठी ते दान करतात तेव्हा त्यांनी ते स्वेच्छेने आणि देवाबद्दल व सहमानवांबद्दल प्रेमाने प्रेरित होऊन करावे.—मार्क १२:२८-३१.

पहिल्या शतकातील पवित्र जनांसाठी केलेले मदतकार्य दाखवून देते की, हे काम अत्यंत सुव्यवस्थेने आणि प्रामाणिकपणे हाताळण्यात यावे. यहोवा देवाला आपल्या गरजा ठाऊक आहेतच आणि आपल्या सेवकांना अडीअडचणींमध्ये राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करता यावा म्हणून तो त्यांच्याकरता तरतूदही करतो. (मत्तय ६:२५-३४) तरीपण, आपण सर्वजण यात भाग घेऊ शकतो—मग आपली आर्थिक स्थिती कशीही असो. असे केल्याने, ‘ज्याच्याजवळ फार आहे त्याचे अधिक होणार नाही आणि ज्याच्याजवळ थोडे आहे त्याचे कमी होणार नाही.’—२ करिंथकर ८:१५.