भारत—“वैविध्यात एकता”
राज्य घोषकांचा वृत्तान्त
भारत—“वैविध्यात एकता”
भाताच्या राष्ट्रीय एकात्मतेचे वर्णन करताना “वैविध्यात एकता,” हे सुप्रसिद्ध घोषवाक्य वापरले जाते. परंपरा, भाषा, धर्म, वांशिक पाळंमुळं, वेशभूषा आणि खाणेपिणे याबाबतीत कमालीची विविधता असलेल्या भारतासारख्या अवाढव्य देशात एकता आणणे साधीसुधी गोष्ट नाही. पण, यहोवाच्या साक्षीदारांच्या व्यवस्थापन कार्यालयात मात्र ही एकता स्पष्टपणे दिसून येते. तिथे काम करणारे स्वयंसेवक निरनिराळ्या भाषा बोलत असले आणि विविध राज्यांतून आणि केंद्रशासित प्रदेशांतून आले असले तरी ते मिळूनमिसळून राहतात आणि खांद्याला खांदा लावून काम करतात.
• ही आहे राजराणी. भारताच्या वायव्येच्या टोकाकडील पंजाबमधील एक तरूणी. ती शाळेत असताना तिची एक मैत्रिण यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करत होती. ही मुलगी राजराणीला बायबलबद्दल सांगण्याचा नेहमी प्रयत्न करत असे. या मुलीला इंग्रजी भाषेचे इतके ज्ञान नव्हते; शिवाय, त्यावेळी द वॉचटावर हे मासिकसुद्धा पंजाबी भाषेत नव्हते. त्यामुळे ती राजराणीकडून मासिकातल्या मजकुराचे पंजाबी भाषेत अनुवाद करून घ्यायची. त्या मासिकातील मजकुराचा राजराणीच्या मनावर असा गहिरा प्रभाव पडू लागला, की घरच्यांच्या विरोधाला न जुमानता तिने यहोवा देवाला आपले जीवन समर्पित करण्याइतकी प्रगती केली. ज्या गोष्टीने तिला सत्याची ओळख करून दिली तेच काम ती आज करते. होय, भारतातील बेथेल कुटुंबात ती बायबलच्या प्रकाशनांचे पंजाबी भाषेत भाषांतर करते!
• आता बिजोची गोष्ट ऐका. तो भारताच्या नैऋत्येकडील केरळ राज्यातून आला आहे. राष्ट्रीयवादी कार्यक्रमांत तटस्थ भूमिका घेतल्याबद्दल बिजोला शाळेतून काढून टाकण्यात आले होते. त्याचे प्रकरण न्यायालयात गेले. खटला दीर्घकाळ चालला आणि त्यामध्ये शुद्ध भक्तीचा लक्षणीय विजय होऊन त्याला पुन्हा शाळेत प्रवेश मिळाला. * पुढे तो कॉलेजातही जाऊ लागला. पण, कॉलेजमधील नीतिभ्रष्ट वातावरण त्याला खटकू लागले. त्यामुळे त्याने अर्ध्यातूनच कॉलेज सोडून दिले. आज बेथेलमध्ये दहा वर्षे राहिल्यानंतर त्याला असे वाटते, की उच्च शिक्षण प्राप्त करण्याऐवजी वैविध्यपूर्ण परंतु अंतर्यामी एकात्म असलेल्या बेथेल कुटुंबाचा सदस्य असल्यामुळे त्याला नक्कीच अधिक फायदा झाला आहे.
• नॉर्मा आणि लिली या दोघींनी सत्तरी ओलांडली आहे; त्या अनेक वर्षांपासून विधवा आहेत. पूर्ण-वेळेच्या सेवेत त्यांनी प्रत्येकी ४० हून अधिक वर्षे घालवली आहेत. लिली सुमारे २० वर्षांपासून शाखेत तामीळ भाषेच्या भाषांतराचे काम करत आहेत. नॉर्मा यांचे पती मरण पावल्यावर, म्हणजे १३ वर्षांआधी त्या बेथेलमध्ये आल्या. मेहनती आणि प्रामाणिक असण्याखेरीज त्या दोघीही संपूर्ण बेथेल कुटुंबाला एकोप्याने राहण्यासाठी प्रभावित करतात. पाहुणचार करायला त्यांना फार आवडते. तसेच कुटुंबातल्या तरुण लोकांशी सहवास ठेवायला व कित्येक वर्षांच्या ख्रिस्ती जीवनात आलेल्या आनंददायक अनुभवांविषयी सांगायलाही त्यांना खूप आवडते. तरुण लोकही त्यांच्यासोबत काही वेळ घालवायला त्यांना आपल्या घरी बोलवतात आणि गरज असेल तेव्हा त्यांची मदत करतात. खरोखरच कौतुकास्पद उदाहरणे!
जीवनाच्या वाटचालीमध्ये संघर्ष निर्माण करणाऱ्या भेदभावांवर मात केल्याने, भारतातील संयुक्त बेथेल कुटुंबाचे सदस्य म्हणून इतरांची सेवा करताना हे स्वयंसेवक अत्यंत एकोप्याने काम करतात.—स्तोत्र १३३:१.
[तळटीप]
^ टेहळणी बुरूज मासिकाच्या नोव्हेंबर १, १९८७ अंकातील पृष्ठ २१ पाहा.
[८ पानांवरील चित्राचे श्रेय]
पार्श्वभूमी: Mountain High Maps® Copyright © १९९७ Digital Wisdom, Inc.