व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

राज्याची सुवार्ता आहे तरी काय?

राज्याची सुवार्ता आहे तरी काय?

राज्याची सुवार्ता आहे तरी काय?

गेल्या वर्षी, जगभरातील २३५ देशांमध्ये, ६०,३५,५६४ अबालवृद्धांनी ही सुवार्ता लोकांना सांगण्यासाठी १,१७,१२,७०,४२५ तास खर्च केले. या सुवार्तेविषयी त्यांनी लोकांना तोंडी माहिती दिली, शिवाय, तिचा प्रसार करण्यासाठी आणि तिचे स्पष्टीकरण देण्यासाठी ७० कोटींहून अधिक पुस्तके, नियतकालिके इत्यादि लोकांपर्यंत पोहंचवले. या व्यतिरिक्‍त, हजारो ऑडियो आणि व्हिडिओ कॅसेटचे वितरण करून त्यांनी ती सुवार्ता जाहीर केली. ही “सुवार्ता” आहे तरी काय?

हीदेवाच्या राज्याची “सुवार्ता” आहे. आज, ‘राज्याच्या या सुवार्तेचा’ मानवी इतिहासात पूर्वी कधीच झाला नव्हता इतक्या मोठ्या प्रमाणात प्रचार केला जात आहे.—मत्तय २४:१४.

जगभरात प्रचाराचे आणि शिकवण्याचे कार्य करणारे हे लोक स्वयंसेवक आहेत. जगाच्या दृष्टीने या कार्यासाठी ते लायक ठरणार नाहीत. मग त्यांना हे कार्य करण्याचे धैर्य आणि यश कसे मिळते? याचे मुख्य कारण म्हणजे राज्याच्या सुवार्तेत असीम सामर्थ्य आहे कारण मानवजातीला प्राप्त होणाऱ्‍या आशीर्वादांची ही वार्ता आहे. हे आशीर्वाद म्हणजे आनंद, गरिबीतून मुक्‍तता, चांगले सरकार, शांती-सुरक्षितता आणि ज्याची कोणी स्वप्नातही कल्पना करणार नाही ते, म्हणजे सार्वकालिक जीवन! हे सर्व आशीर्वाद प्राप्त करण्याची सर्वांना उत्कंठा आहे. जीवनाचा अर्थ आणि उद्देश शोधणाऱ्‍या लोकांकरता ही खरोखर सुवार्ताच आहे. राज्याच्या सुवार्तेला तुम्ही योग्य प्रतिसाद आणि प्रतिक्रिया दाखवली तर हे सगळे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करू शकाल.

हे राज्य काय आहे?

ज्या राज्याची सुवार्ता सांगितली जात आहे ते राज्य काय आहे? “हे आमच्या स्वर्गांतील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छे प्रमाणे होवो,” या सुपरिचित शब्दांमध्ये ज्या राज्याविषयी लाखो लोकांना प्रार्थना करायला शिकवण्यात आले आहे तेच ते राज्य आहे.—मत्तय ६:९, १०.

याच राज्याविषयी सुमारे २५ शतकांआधी इब्री संदेष्टा दानीएल याने असे लिहिले होते: “स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधी भंग होणार नाही; त्याचे प्रभुत्व दुसऱ्‍याच्या हाती कधी जाणार नाही; तर ते या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.”—दानीएल २:४४.

यास्तव, ही सुवार्ता देवाच्या राज्याविषयी किंवा सरकाराविषयी आहे जे सर्व दुष्टाईला काढून या पृथ्वीवर शांतीने राज्य करील. मानवजातीसाठी आणि पृथ्वीसाठी असलेला निर्माणकर्त्याचा मूळ उद्देश ते पूर्ण करील.—उत्पत्ति १:२८.

“स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे”

सुमारे २,००० वर्षांआधी, राज्याच्या सुवार्तेची प्रथमच जाहीर घोषणा करणारा एक समर्पित मनुष्य होता; त्याचा वेश आणि बोलण्याची ढब लक्षवेधक होती. तो मनुष्य होता बाप्तिस्मा करणारा योहान. तो यहुदी याजक जखऱ्‍या आणि त्याची पत्नी अलीशिबा यांचा पुत्र होता. त्याचे वस्त्र उंटाच्या केसांचे होते, त्याच्या कमरेला कातड्याचा कमरबंद होता. त्याचा हा पेहराव त्याला चित्रित करणाऱ्‍या एलीयासारखाच होता. पण लोकांना विशेष आकर्षण होते ते योहानाच्या संदेशाचे. तो म्हणत होता: “पश्‍चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.”—मत्तय ३:१-६.

योहानाचा संदेश ऐकणारे लोक यहुदी होते; ते खरा देव यहोवा याची उपासना करण्याचा दावा करत होते. त्यांच्या राष्ट्राला सुमारे १,५०० वर्षांआधी मोशेच्याद्वारे नियमशास्त्राचा करार देण्यात आला होता. जेरूसलेममध्ये अद्यापही भव्य मंदिर होते आणि तेथे नियमशास्त्रानुसार अर्पणे वाहिली जात होती. देवाच्या नजरेत आपली उपासना एकदम योग्य आहे अशी खात्री यहुद्यांना होती.

परंतु, योहानाचा संदेश ऐकून काहींना जाणीव होऊ लागली की त्यांचा धर्म त्यांना वाटत होता तसा नव्हता. यहुदी धार्मिक शिकवणींमध्ये ग्रीक संस्कृती आणि तत्त्वज्ञानाचा शिरकाव झाला होता. मोशेकरवी देवाकडून मिळालेल्या नियमात आता भेसळ झाली होती; इतकेच नव्हे तर मानव-निर्मित विश्‍वास आणि परंपरा यांनी ते नियमशास्त्र रद्द करण्यात आले होते. (मत्तय १५:६) कठोर, निर्दयी धार्मिक पुढाऱ्‍यांकडून चुकीचे शिक्षण मिळाल्याने बहुतेक लोक देवाची स्वीकारणीय पद्धतीने उपासना करत नव्हते. (याकोब १:२७) देवाविरुद्ध आणि नियमशास्त्राच्या कराराविरुद्ध केलेल्या पापांबद्दल त्यांना पश्‍चात्ताप करण्याची आवश्‍यकता होती.

त्या काळी पुष्कळसे यहुदी, वचनदत्त मशीहा किंवा ख्रिस्त याच्या येण्याची वाट पाहत होते. काहीजण तर योहानाविषयी असा विचार करू लागले की, “हाच ख्रिस्त असेल काय?” परंतु, योहानाने हे मान्य केले नाही आणि त्याने त्यांना दुसऱ्‍या व्यक्‍तीकडे मार्गदर्शित करून त्या व्यक्‍तीविषयी म्हटले: “[त्याच्या] पायतणाचा बंद सोडावयास मी योग्य नाही.” (लूक ३:१५, १६) येशूची ओळख त्याच्या शिष्यांशी करून दिल्यावर योहान म्हणाला: “हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा!”—योहान १:२९.

ही खरोखर एक सुवार्ता होती कारण योहान सर्व लोकांना जीवनाचा व आनंदाचा मार्ग दाखवत होता. अर्थात तो त्यांना येशूकडे निर्देशित करत होता जो “जगाचे पाप हरण करणारा” होता. आदाम आणि हव्वेचे वंशज असल्यामुळे सर्व मानव पाप आणि मृत्यूच्या दास्यत्वात जन्माला आले आहेत. रोमकर ५:१९ म्हणते: “जसे त्या एकाच मनुष्याच्या [आदामाच्या] आज्ञाभंगाने पुष्कळ जण पापी ठरले होते, तसे ह्‍या एकाच मनुष्याच्या [येशूच्या] आज्ञापालनाने पुष्कळ जण नीतिमान ठरतील.” बलिदानासाठी असलेला कोकरा या नात्याने येशू “जगाचे पाप हरण” करणार होता आणि मानवांची दयनीय स्थिती बदलून टाकणार होता. बायबल म्हणते, “पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभु येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे.”—रोमकर ६:२३.

येशूने, परिपूर्ण मनुष्य आणि सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य या नात्याने सुवार्ता सांगण्याचे काम हाती घेतले. मार्क १:१४, १५ येथील बायबल वृत्तान्त सांगतो: “योहानाला अटक झाल्यानंतर येशू देवाची सुवार्ता गाजवीत गाजवीत गालीलात आला व म्हणाला, काळाची पूर्णता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे; पश्‍चात्ताप करा व सुवार्तेवर विश्‍वास ठेवा.”

येशूच्या संदेशाला ज्यांनी प्रतिसाद दिला आणि सुवार्तेवर विश्‍वास ठेवला त्यांना खूप आशीर्वाद प्राप्त झाले. योहान १:१२ म्हणते: “जितक्यांनी [येशूचा] स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्‍वास ठेवणाऱ्‍यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला.” देवाचे पुत्र किंवा मुले असल्यामुळे त्यांना सार्वकालिक जीवनाचे प्रतिफळ मिळणार होते.—१ योहान २:२५.

परंतु, राज्याचे आशीर्वाद प्राप्त करण्याचा विशेषाधिकार केवळ पहिल्या शतकातील लोकांपर्यंतच मर्यादित नव्हता. सुरवातीला सांगितल्याप्रमाणे, देवाच्या राज्याची सुवार्ता आज सबंध जगभरात सांगितली व शिकवली जात आहे. म्हणजेच राज्याचे आशीर्वाद अजूनही मिळत आहेत. हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्ही काय करावे? पुढील लेखात याचे उत्तर तुम्हाला सापडेल.