राज्याचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊ शकतात
राज्याचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊ शकतात
ख्रिस्ती प्रेषित पौलाला त्याच्या काळातील काही मुख्य भाषा अस्खलितपणे बोलता येत होत्या. त्याने घेतलेले शिक्षण आजच्या काळातील विद्यापीठ शिक्षणाच्या दर्जाचे होते. रोमन नागरिकाला मिळणारे सर्व फायदे आणि हक्क त्याला होते. (प्रेषितांची कृत्ये २१:३७-४०; २२:३, २८) या सर्व पात्रतांमुळे त्याला धन आणि प्रसिद्धी मिळवता आली असती. परंतु तो म्हणाला: “ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे; . . . आणि त्या केरकचरा अशा लेखतो; ह्यासाठी की, मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा.” (फिलिप्पैकर ३:७, ८) पौल असे का म्हणाला?
तार्सकर शौल आणि ‘मार्ग अनुसरणाऱ्यांचा’ छळ करणारा असा पूर्वी ओळखला जाणारा पौल पुनरुत्थित आणि गौरवलेल्या येशूचा दृष्टान्त पाहिल्यावर त्याचा अनुयायी बनला. (प्रेषितांची कृत्ये ९:१-१९) दिमिष्काला जाणाऱ्या रस्त्यावर पौलाला आलेल्या या अनुभवामुळे येशू हाच वाग्दत्त मशीहा किंवा ख्रिस्त आहे आणि वाग्दत्त राज्याचा भावी राजा आहे याबद्दल त्याच्या मनात जरासुद्धा शंका उरली नाही. या अनुभवामुळे पौलाच्या जीवनातही एक नाट्यमय बदल घडून आला आणि हे वर उद्धृत केलेल्या त्याच्या जोरदार वाक्यावरून दिसून येते. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास, पौल प्रांजळ आणि प्रामाणिक अंतःकरणाचा असल्यामुळे त्याने पश्चात्ताप केला.—गलतीकर १:१३-१६.
प्रेषितांची कृत्ये ३:१९; प्रकटीकरण २:५) दिमिष्काकडे जाणाऱ्या रस्त्यावर पौलाला आलेला अविस्मरणीय अनुभव केवळ भावनेच्या भरात झालेला किंवा नुसता एक आध्यात्मिक अनुभव नव्हता. तर त्या वेळी त्याचे डोळे उघडले आणि ख्रिस्ताबद्दल अज्ञानात राहून आपले पूर्वीचे जीवन व्यर्थ होते हे त्याला कळाले. त्याने हे देखील ओळखले की, ख्रिस्ताविषयी नुकतेच प्राप्त झालेल्या ज्ञानाचा फायदा करून घेण्यासाठी आपल्या जीवनात बदल करणे आवश्यक आहे.—रोमकर २:४; इफिसकर ४:२४.
बायबलमध्ये, “पश्चात्ताप” या क्रियापदाचे भाषांतर सहसा “पश्चातज्ञान” असा शब्दशः अर्थ होणाऱ्या ग्रीक शब्दातून केले जाते ज्याचा विरुद्धार्थी शब्द “पूर्वज्ञान” हा आहे. यास्तव, पश्चात्तापामध्ये एखाद्याच्या मनात, मनोवृत्तीत किंवा उद्देशात बदल होणे आणि आधीची वाटचाल असमाधानकारक असल्यामुळे तिचा त्याग करणे, या गोष्टी सामील होतात. (आशीर्वाद आणविणारा बदल
सुरवातीला, पौलाला देवाविषयीचे ज्ञान परुशांच्या पंथाकडून मिळाले होते कारण तो त्या पंथाचा एक सदस्य होता. त्यांचे विश्वास बहुतेककरून मानवी तत्त्वज्ञान आणि परंपरेवर आधारलेले होते. धार्मिक पूर्वग्रहांमुळे पौल चुकीची ध्येये साध्य करण्यासाठी फार आवेशी आणि प्रयत्नशील होता. आपण देवाची सेवा करत आहोत असे त्याला वाटत होते परंतु खरे तर तो देवाचा विरोध करत होता.—फिलिप्पैकर ३:५, ६.
ख्रिस्ताविषयी आणि देवाच्या उद्देशातील त्याच्या भूमिकेविषयी अचूक ज्ञान मिळाल्यावर, पौलासमोर निवड होती: परुशी राहून आपले पद आणि प्रतिष्ठा कायम ठेवायची किंवा आपले जीवन बदलून देवाची कृपापसंती मिळवण्यासाठी जे आवश्यक ते करू लागायचे. पण पौलाने योग्य निवड केली, कारण तो म्हणाला: “मला सुवार्तेची लाज वाटत नाही; कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला—प्रथम यहूद्याला मग हेल्लेण्याला—तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे.” (रोमकर १:१६) ख्रिस्त आणि देवाचे राज्य या सुवार्तेचा पौल आवेशी प्रचारक बनला.
अनेक वर्षांनंतर पौलाने आपल्या सह-ख्रिश्चनांना सांगितले: “मी अद्यापि ते आपल्या कह्यात घेतले असे मानीत नाही; तर मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून, ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण त्यासंबंधीचे बक्षिस मिळविण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो; हेच एक माझे काम.” (फिलिप्पैकर ३:१३, १४) पौलाला सुवार्तेचा लाभ झाला कारण देवापासून दूर नेणाऱ्या गोष्टी त्याने स्वतःहून सोडून दिल्या आणि देवाच्या उद्देशानुरूप असलेल्या मार्गावर तो मनापासून चालला.
तुम्ही काय कराल?
कदाचित तुम्ही अलीकडेच राज्याची सुवार्ता ऐकली असेल. परिपूर्ण परादीसात सर्वकाळ जगण्याची प्रत्याशा तुम्हाला हवीहवीशी वाटते का? साहजिकच वाटत असेल, कारण आपल्या सर्वांना जिवंत राहण्याची आणि शांती-सुरक्षिततेत जगण्याची नैसर्गिक इच्छा आहे. बायबल म्हणते की, देवाने आपल्या मनात “अनंतकालाविषयीची कल्पना” उत्पन्न केली आहे. (उपदेशक ३:११) त्यामुळे, शांती-सुखात सर्वकाळ राहता येईल त्या काळाची आशा बाळगणे मानवांसाठी स्वाभाविक आहे. राज्याची सुवार्ता हीच आशा देते.
परंतु ती आशा वास्तवात अनुभवण्यासाठी तुम्हाला परीक्षण करून ही सुवार्ता नेमकी काय आहे हे जाणून घ्यावे लागेल. प्रेषित पौलाने असे उत्तेजन दिले: “देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे.” (रोमकर १२:२) पौलाप्रमाणे, ज्ञान व समज प्राप्त केल्यावर तुम्ही निवड केली पाहिजे.
दुसऱ्या बाजूला पाहिले तर, भविष्याबद्दल तुमचे काही विश्वास असतीलच. लक्षात असू द्या की, प्रेषित पौल बनण्याआधी शौलालाही देवाच्या इच्छेबद्दल काही कल्पना होत्या. पण, देव आपल्याला त्याची इच्छा चमत्कारिकपणे प्रकट करील अशी अपेक्षा करण्याऐवजी वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून याचा विचार करणे बरे राहील. स्वतःला विचारा: ‘मानवजातीविषयी आणि पृथ्वीविषयी देवाची काय इच्छा आहे हे मला खरेच ठाऊक आहे का? मी माझा विश्वास कसा सिद्ध करू शकतो? देवाच्या वचनाच्या अर्थात बायबलच्या उजेडात परीक्षण केल्यावर माझा विश्वास खरा असल्याचे सिद्ध होईल का? आपल्या धार्मिक विश्वासांचे अशाप्रकारे परीक्षण करण्यात काही नुकसान नाही. उलट, असे परीक्षण करण्याची तुम्हाला इच्छा असली पाहिजे कारण बायबल आपल्याला असे आर्जवते: “सर्व गोष्टींची १ थेस्सलनीकाकर ५:२१) शेवटी, देवाची कृपापसंती मिळवणे हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट नाही का?—योहान १७:३; १ तीमथ्य २:३, ४.
पारख करा; चांगले ते बळकट धरा.” (धार्मिक पुढारी कदाचित आपल्यापुढे अनंतकाळच्या भवितव्याची प्रत्याशा ठेवतील; परंतु ती प्रत्याशा बायबलच्या शिकवणींनुसार नसेल तर आपल्याला देवाच्या राज्याचे आशीर्वाद प्राप्त करता येणार नाहीत. डोंगरावरील आपल्या सुप्रसिद्ध प्रवचनात येशूने अशी जोरदार ताकीद दिली: “मला प्रभुजी, प्रभुजी, असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही; तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल.”—मत्तय ७:२१.
पित्याच्या इच्छेप्रमाणे वागल्यावरच देवाच्या राज्यातील आशीर्वाद प्राप्त होऊ शकतील यावर येशूने कसे जोर देऊन सांगितले ते लक्षात घ्या. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, धार्मिकतेचे स्वरूप असलेल्या सर्वच गोष्टी देवाला मान्य असतीलच असे नाही. येशूने पुढे असेही म्हटले: “त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, ‘प्रभो, प्रभो, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भुते घालविली, व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्ये केली नाहीत काय?’ तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की, मला तुमची कधीच ओळख नव्हती; अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्यापुढून निघून जा.” (मत्तय ७:२२, २३) म्हणजे, राज्याची सुवार्ता काय आहे हे प्रथम नीट समजून घेणे महत्त्वाचे आहे आणि मग त्यानुसार वागणे आवश्यक आहे.—मत्तय ७:२४, २५.
मदत उपलब्ध आहे
यहोवाचे साक्षीदार गेल्या १०० हून अधिक वर्षांपासून देवाच्या राज्याची सुवार्ता लोकांना सांगत आहेत. देवाचे राज्य काय आहे, ते कोणकोणते आशीर्वाद आणील तसेच ते आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी काय केले पाहिजे याचे अचूक ज्ञान यहोवाचे साक्षीदार छापील प्रकाशनांच्या साहाय्याने आणि तोंडीसुद्धा जगभरातील लोकांना देत आहेत.
यहोवाचे साक्षीदार जो संदेश देत आहेत त्याला प्रतिसाद देण्यास आम्ही तुम्हाला प्रोत्साहन देतो. सुवार्ता ऐकून तिच्यानुसार कार्य केल्याने, सध्या आणि भवितव्यामध्येही देवाचे राज्य या सबंध पृथ्वीवर राज्य करील तेव्हा तुम्ही भव्य आशीर्वाद प्राप्त करू शकाल.—१ तीमथ्य ४:८.
आताच कार्य करा कारण देवाच्या राज्यातील आशीर्वाद मिळण्यास फार अवकाश नाही!
[७ पानांवरील चित्रे]
यहोवाचे साक्षीदार छापील प्रकाशनांच्या साहाय्याने आणि तोंडीसुद्धा देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करतात