व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला आठवते का?

तुम्हाला आठवते का?

तुम्हाला आठवते का?

तुम्ही वाचलेले अलीकडील टेहळणी बुरूजचे अंक तुम्हाला आवडले का? तर मग, पुढील प्रश्‍नांची उत्तरे देण्यास जमते का ते पाहा:

रोमकर ५:३-५ येथे, प्रेषित पौलाने आशेचा उल्लेख सर्वात शेवटी का केला?

ख्रिश्‍चनांच्या जीवनात येणाऱ्‍या काही गोष्टींची पौलाने एक यादी दिली—संकट, धीर, शील आणि आशा. ही “आशा” म्हणजे बायबलमधून सुरवातीला प्राप्त होते ती आशा नाही, तर ती कालांतराने एखाद्या ख्रिश्‍चनाला प्राप्त होणारी दृढ, पक्की व जीवनाच्या प्रत्येक पैलूवर परिणाम करणारी आशा आहे.—१२/१५, पृष्ठे २२-३.

प्राचीन ग्रीसमधील खेळांविषयी आज एखाद्या ख्रिश्‍चनाला रुची का असावी?

त्या खेळांचे स्वरूप आणि रीतीरिवाज समजून घेतल्याने पुष्कळशा बायबल वचनांबद्दल समज मिळू शकते. त्यातील काही वचनांमध्ये, ‘नियमांप्रमाणे मल्लयुद्ध करणे,’ ‘सर्व भार टाकणे व येशूकडे पाहणे,’ ‘धाव संपवणे’ आणि मुकूट किंवा बक्षीस प्राप्त करणे याविषयी उल्लेख केला आहे. (२ तीमथ्य २:५; ४:७, ८; इब्री लोकांस १२:१, २; १ करिंथकर ९:२४, २५; १ पेत्र ५:४)—१/१, पृष्ठे २८-३०.

जानेवारी १९१४ मध्ये सुवार्ता घोषित करण्याची दुसरी कोणती नवीन पद्धत सुरू झाली?

त्या वेळी “फोटो-ड्रामा ऑफ क्रिएशन” हा नवीन चलचित्रपट सादर करण्यात आला. हे, चलचित्र आणि शेकडो रंगीत काचेच्या स्लाईड्‌सचे चार भागांचे सादरीकरण होते; यांच्यासोबतच स्पष्टीकरणात्मक भाषणांचे फोनोग्राफ रेकॉर्डिंग्स होते. या नाटकाचे वीस संच तयार करून लोकांना बायबलमधील संदेश शिकवण्यासाठी त्यांचा व्यापक प्रमाणात उपयोग करण्यात आला.—१/१५, पृष्ठे ८-९.

नियमन मंडळ हे कायदेशीर निगमापासून वेगळे कसे?

कायदेशीर निगमाच्या संचालकांची निवड निगमाचे सदस्य करतात परंतु नियमन मंडळ कोणाही मनुष्याकरवी नियुक्‍त केले जात नाही तर येशू ख्रिस्ताकरवी नियुक्‍त केले जाते. यहोवाच्या साक्षीदारांच्या विविध निगमांच्या संचालकांनी नियमन मंडळाचे सदस्य असावे अशी काही गरज नाही. वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ पेन्सिल्व्हानियाच्या अलीकडील वार्षिक सभेत, संचालक आणि अधिकारी पदी असलेल्या नियमन मंडळाच्या सदस्यांनी आपणहून राजीनामा दिला. त्यांची जागा ‘दुसऱ्‍या मेंढरांतील’ प्रौढ बांधवांनी घेतली. (योहान १०:१६) अशाप्रकारे, नियमन मंडळ आध्यात्मिक भोजन तयार करण्यासाठी व जागतिक बंधुवर्गाच्या आध्यात्मिक गरजांकडे लक्ष देण्यासाठी अधिक वेळ देऊ शकतात.—१/१५, पृष्ठे २९, ३१.

निराशेवर मात करण्याविषयी बायबलमधील कोणती दोन उदाहरणे आपण पाहू शकतो?

एक आहे शमुवेलाची आई हन्‍ना हिचे उदाहरण. इस्राएलचा मुख्य याजक एली याला तिच्याविषयी गैरसमज झाला तेव्हा ती निराश होऊ शकली असती. त्या उलट, तिने त्याला स्पष्टपणे परंतु आदराने खरी हकीकत सांगितली. शिवाय, हन्‍नाने एलीच्या विरुद्ध मनात राग बाळगला नाही. दुसरे उदाहरण आहे मार्कचे. त्याला आपल्यासोबत एका मिशनरी यात्रेवर नेण्याची प्रेषित पौलाची इच्छा नव्हती तेव्हा तो निराश झाला असावा. पण, आपल्याला हा सुहक्क मिळाला नाही म्हणून एकदम खचून जाण्याऐवजी तो सेवेत सक्रिय राहिला आणि बर्णबासोबत ठिकठिकाणी जात राहिला.—२/१, पृष्ठे २०-२.

ख्रिश्‍चनांनी कम्प्युटर सॉफ्टवेअर प्रोग्रॅमच्या प्रती इतरांना देण्याविषयी किंवा इतरांकडून असे प्रोग्रॅम्स घेण्याविषयी सावध का असावे?

बहुतेक कम्प्युटरच्या प्रोग्रॅम्ससाठी (गेम्ससुद्धा) परवाना काढावा लागतो आणि त्यामुळे प्रोग्रॅम विकत घेणारा किंवा वापरणारा केवळ एकाच कम्प्युटरमध्ये तो प्रोग्रॅम घालू शकतो. सहसा, इतरांसाठी एखाद्या प्रोग्रॅमच्या प्रती बनवल्याने (मोफत दिल्या तरीसुद्धा) सर्वाधिकाराच्या नियमाचे उल्लंघन होत असते. ख्रिश्‍चनांना ‘कैसराचे ते कैसराला द्या’ या नियमाचे पालन करायचे आहे. (मार्क १२:१७)—२/१५, पृष्ठे २८-९.

सिरिल आणि मेथोडियस कोण होते आणि बायबलचा अभ्यास सुलभ करण्यामध्ये त्यांनी काय योगदान केले?

नवव्या शतकात, ग्रीसच्या थेस्सलनायका येथे जन्मलेले हे दोन भाऊ होते. त्यांनी स्लाव्ह भाषांसाठी वर्णमाला तयार केली आणि स्लाव्ह भाषेत बायबलचे बऱ्‍याचशा भागांचे भाषांतर केले.—३/१, पृष्ठे २८-९.

“आत्म्याचे चिंतन” करणे म्हणजे काय?—रोमकर ८:६.

त्याचा अर्थ, यहोवाच्या कार्यकारी शक्‍तीच्या नियंत्रणात असणे, अधीन असणे आणि या शक्‍तीच्या प्रेरणेने विचार व कार्य करणे. बायबलचे वाचन व अभ्यास, त्याच्या नियमांचे मनापासून पालन आणि देवाच्या पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना केल्याने देवाचा आत्मा आपल्यावर कार्य करू लागेल.—३/१५, पृष्ठे १५.

आपल्याविषयी कोणाला गैरसमज झाला असल्यास आपण काय करू शकतो?

तो गैरसमज प्रेमाने दूर करण्याचा प्रयत्न करणे फार महत्त्वाचे आहे. पण तसे करूनही काही फायदा होत नसेल तर निराश होऊ नका. यहोवाकडे समज आणि मदत मागा कारण तो “अंतःकरणे तोलून पाहणारा” आहे. (नीतिसूत्रे २१:२; १ शमुवेल १६:७)—४/१, पृष्ठे २१-३.