देवाने परवानगी दिलेल्या दुःखमय काळाचा अंत जवळ आहे
देवाने परवानगी दिलेल्या दुःखमय काळाचा अंत जवळ आहे
हे जग दुःखाने ग्रासलेले आहे. काही जण स्वतःच स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतात. स्वतःच्याच चुकांमुळे त्यांना लैंगिकरित्या संक्रमित होणारे रोग होतात. किंवा अंमली पदार्थांचे सेवन करून अथवा दारूचे किंवा धूम्रपानाचे व्यसन लावून ते त्याचे दुष्परिणाम भोगत राहतात. नाहीतर, अनुचित आहार घेऊन आजारपण ओढवून घेतात. परंतु, पुष्कळसे दुःख सामान्य माणसाच्या हाताबाहेरील कारणांचा परिणाम आहे; जसे की, युद्ध, जातीय हिंसा, गुन्हेगारी, दारिद्र्य, दुष्काळ, रोग इत्यादी. मानवांच्या हाताबाहेरील आणखी एक दुःखाचे कारण वार्धक्य आणि मृत्यूशी संबंधित आहे.
बायबल आपल्याला आश्वासन देते की, “देव प्रीति आहे.” (१ योहान ४:८) तर मग, अशा प्रेममय देवाने कित्येक शतकांपासून या दुःखाला परवानगी का दिली आहे? ही परिस्थिती तो केव्हा बदलेल? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याकरता मानवांबद्दल देवाचा काय उद्देश आहे हे जाणून घेण्याची गरज आहे. मग आपल्याला समजेल की, देवाने दुःखाला का परवानगी दिली आणि त्यावर तो काय उपाययोजना करणार आहे.
इच्छा स्वातंत्र्याचे दान
देवाने पहिल्या मानवाची निर्मिती केली तेव्हा त्याने केवळ मेंदू असलेले एक शरीर तयार केले नाही. शिवाय, देवाने आदाम-हव्वेला कठपुतळ्यांसारखे बुद्धिहीन बनवले नाही. तर इच्छा स्वातंत्र्याच्या क्षमतेसह त्याने त्यांना निर्माण केले. आणि हे एक उत्तम दान होते कारण “आपण उत्पत्ति १:३१) होय, “त्याची कृति परिपूर्ण आहे.” (अनुवाद ३२:४) इच्छा स्वातंत्र्याचे हे दान आपल्या सर्वांना बहुमोल वाटते कारण आपल्याला विचार करण्याची मुभा न देता प्रत्येक गोष्ट कशी करावी आणि का करावी हे दुसऱ्यांनी सांगितलेले आपल्याला आवडणार नाही.
केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले.” (परंतु, इच्छा स्वातंत्र्याचा अनियंत्रित उपयोग करायचा होता का? प्रारंभिक ख्रिश्चनांना दिलेल्या सूचनांनुसार, देवाचे वचन म्हणते: “दुष्टपणा झाकण्यासाठी आपल्या स्वतंत्रतेचा उपयोग न करिता तुम्ही स्वतंत्र, तरी देवाचे दास, असे राहा.” (१ पेत्र २:१६) सर्वांच्या कल्याणाकरता मर्यादा घालणे आवश्यक आहे. म्हणूनच, इच्छा स्वातंत्र्याला नियमांचे बंधन राहणार होते. नाहीतर, अराजकता माजली असती.
पण कोणाच्या नियमाचे बंधन?
स्वातंत्र्य किती प्रमाणात योग्य आहे हे कोणाचा नियम ठरवणार? या प्रश्नाचे उत्तर, देवाने दुःखाला परवानगी का दिली त्याच्या मूलभूत कारणाशी संबंधित आहे. देवाने मनुष्यांना निर्माण केल्यामुळे, स्वतःच्या व इतरांच्या भल्याकरता कोणत्या नियमांचे पालन करण्याची गरज आहे हे त्यालाच सर्वात जास्त माहीत आहे. बायबल त्याविषयी असे म्हणते: “तुला जे हितकारक ते मी परमेश्वर तुझा देव तुला शिकवितो; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो.”—यशया ४८:१७.
एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे: देवापासून स्वतंत्र राहण्याकरता मनुष्याला बनवण्यात आले नव्हते. त्याचे यश आणि आनंद देवाच्या नीतिमान नियमांचे पालन करण्यावर अवलंबून असेल अशाच तऱ्हेने त्याला निर्माण करण्यात आले होते. देवाचा संदेष्टा यिर्मया म्हणाला: “हे परमेश्वरा, मला ठाऊक आहे की मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही, पावले नीट टाकणे हे चालणाऱ्या मनुष्याच्या हाती नाही.”—यिर्मया १०:२३.
देवाने मानवांवर गुरुत्वाकर्षण शक्तीसारख्या भौतिक नियमांचे बंधन घातले. त्याचप्रमाणे, सामाजिक एकतेला कारणीभूत ठरणाऱ्या त्याच्या नैतिक नियमांचे बंधनही त्याने मानवांवर घातले. त्यामुळे देवाचे वचन, आपल्या भल्याकरताच असे आर्जवते: “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको.”—नीतिसूत्रे ३:५.
याच कारणास्तव, देवाच्या शासनाविना चालण्यात मानवजातीला कधीच यश मिळणार नव्हते. त्याच्यापासून स्वतंत्र होण्याच्या प्रयत्नात लोक नानाप्रकारच्या परस्परविरोधी सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि धार्मिक व्यवस्था निर्माण करणार होते आणि ‘एक मनुष्य दुसऱ्यावर सत्ता चालवून त्याचे नुकसान करणार होता.’—उपदेशक ८:९.
मग काय चुकले?
देवाने आपल्या पहिल्या पालकांना अर्थात आदाम आणि हव्वेला परिपूर्णतेतच निर्माण केले होते. त्यांचे शरीर व मन परिपूर्ण होते आणि त्यांना राहायला परादीसमय बाग दिली होती. ते देवाच्या नियमाच्या अधीन राहिले असते तर ते परिपूर्ण आणि आनंदी राहिले असते. कालांतराने, ते परादीसमय पृथ्वीवर उत्पत्ति १:२७-२९; २:१५.
राहणाऱ्या परिपूर्ण आनंदी मानवी कुटुंबाचे पालक बनले असते. मानवजातीसाठी हाच देवाचा उद्देश होता.—परंतु, आपल्या मूळ पूर्वजांनी त्यांच्या इच्छा स्वातंत्र्याचा गैरवापर केला. देवापासून स्वतंत्र होऊन आपण यशस्वी होऊ शकतो असा त्यांनी चुकीचा विचार केला. स्वतःच्या इच्छा स्वातंत्र्याच्या बळावर त्यांनी देवाच्या नियमांची सीमा पार केली. (उत्पत्ति, अध्याय ३) त्यांनी त्याचा अधिकार झिडकारल्यामुळे, त्यांना परिपूर्ण अवस्थेत ठेवण्यास तो बांधील नव्हता. ‘ते बिघडले, ते त्याचे पुत्र राहिले नाहीत, हा त्यांचा दोष होता.’—अनुवाद ३२:५.
देवाच्या नियमांचा आज्ञाभंग केल्यापासून आदाम आणि हव्वा यांच्या शरीराचा आणि मनाचा हळूहळू ऱ्हास होऊ लागला. यहोवाजवळ जीवनाचा झरा आहे. (स्तोत्र ३६:९) यहोवासोबत आपला नातेसंबंध तोडल्यामुळे पहिले मानवी जोडपे अपरिपूर्ण होऊन शेवटी मरण पावले. (उत्पत्ति ३:१९) जननिक वारशाच्या नियमांनुसार, पालकांकडे असलेल्या गोष्टींचाच वारसा त्यांच्या संततीला मिळणार होता. आणि तो वारसा काय होता? तो अपरिपूर्णता आणि मृत्यूचा वारसा होता. म्हणून प्रेषित पौलाने लिहिले: “एका माणसाच्या [आदामाच्या] द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले; आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले.”—रोमकर ५:१२.
सर्वात महत्त्वाचा प्रश्न—सार्वभौमत्व
आदाम व हव्वेने देवाविरुद्ध बंड केले तेव्हा, त्यांनी देवाच्या सार्वभौमत्वाला अर्थात राज्य करण्याच्या त्याच्या अधिकाराला आव्हान दिले. यहोवा त्यांचा नाश करू शकला असता आणि दुसऱ्या एका जोडप्याला निर्माण करू शकला असता; पण असे केल्याने कोणाचे शासन योग्य व लोकांच्या भल्याचे आहे हा प्रश्न जसाचा तसाच राहिला असता. त्या उलट, मानवांना त्यांच्या मनानुसार कारभार चालवू दिल्यामुळे देवापासून स्वतंत्र असलेले शासन यशस्वी ठरते की नाही हे एकदम स्पष्टपणे सिद्ध झाले असते.
हजारो वर्षांचा मानवी इतिहास आपल्याला काय सांगतो? या सर्व शतकांमध्ये, मानवांनी नानाप्रकारच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि धार्मिक व्यवस्था चालवून पाहिल्या. पण, दुष्टाई आणि दुःख यात काहीच फरक पडला नाही. उलट, आपल्या काळात ‘दुष्ट माणसे दुष्टपणात अधिक सरसावली आहेत.’—२ तीमथ्य ३:१३.
विसाव्या शतकात, विज्ञान आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये कमालीची प्रगती झाली. परंतु, सबंध मानवजातीच्या इतिहासात सर्वाधिक दुःखाचा अनुभव देखील याच शतकाने घेतला. आणि वैद्यकीय क्षेत्राने कितीही प्रगती केली असली तरीही देवाचा नियम काही बदलला नाही: देवापासून—जीवनाच्या झऱ्यापासून—दुरावलेले मानव आजारी पडतात, वृद्ध होतात व मरण पावतात. मानव आपली ‘पावले नीट टाकू शकत नाहीत’ हे किती स्पष्टपणे सिद्ध झाले आहे!
देवाच्या सार्वभौमत्वाचे समर्थन
देवापासून स्वतंत्र राहण्याच्या या भयंकर प्रयोगाने एकदाचे हे दाखवून दिले आहे की, त्याच्या अधिकाराला न जुमानता केलेले शासन कधीही यशस्वी ठरू शकत नाही. केवळ देवाचे शासन आनंद, ऐक्य, आरोग्य आणि जीवन देऊ शकते. शिवाय, यहोवा देवाचे खात्रीलायक वचन अर्थात पवित्र बायबल दाखवते की, आपण देवापासून स्वतंत्र असलेल्या मानवी शासनाच्या ‘शेवटल्या काळात’ जगत आहोत. (२ तीमथ्य ३:१-५) या सर्व कारभाराला, दुष्टाईला आणि दुःखाला परवानगी दिलेल्या काळाचा अंत जवळ आला आहे.
लवकरच देव मानवी कारभारांमध्ये हस्तक्षेप करणार आहे. शास्त्रवचने आपल्याला सांगतात की: “त्या राजांच्या [सध्या राज्य करत असलेले मानवी शासक] अमदानीत स्वर्गीय देव एका राज्याची [स्वर्गात] स्थापना करील, त्याचा कधी भंग होणार नाही; त्याचे प्रभुत्व दुसऱ्याच्या हाती कधी जाणार नाही [मानवांना शासन करायला कधीही परवानगी दिली जाणार नाही]; तर ते या सर्व राज्यांचे [सध्या राज्य करणाऱ्या शासनांचे] चूर्ण करून त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.”—दानीएल २:४४.
स्वर्गीय राज्याकरवी यहोवा देवाचा सर्वाधिकार योग्य मत्तय २४:१४.
आहे हे सिद्ध करून दाखवणे हाच बायबलचा विषय आहे. हीच येशूची मुख्य शिकवण होती. तो म्हणाला: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.”—मानवी शासनाऐवजी देव शासन करू लागेल तेव्हा कोण जिवंत राहतील व कोण राहणार नाहीत? नीतिसूत्रे २:२१, २२ येथे आपल्याला अशी हमी मिळते: “सरळ जनच [देवाच्या शासनाचे समर्थन करणारे] देशांत वस्ती करितील; सात्विक जन त्यांत राहतील. दुर्जनांचा [देवाच्या शासनाचे समर्थन न करणाऱ्यांचा] देशांतून उच्छेद होईल.” ईश्वरी प्रेरणेने स्तोत्रकर्त्याने गायिले: “थोडक्याच अवधीत दुर्जन नाहीसा होईल; . . . पण लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील. नीतिमान् पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करितील.”—स्तोत्र ३७:१०, ११, २९.
अद्भुत नवे जग
देवाच्या राज्य शासनाखाली, सध्याच्या व्यवस्थीकरणाच्या शेवटातून बचावणाऱ्यांना दुष्टाई व दुःखापासून मुक्त असलेल्या पृथ्वीवर राहण्याची संधी दिली जाईल. मानवजातीला देव सूचना देईल आणि कालांतराने, “सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल.” (यशया ११:९) या उभारणीकारक, उत्तेजनात्मक शिकवणीमुळे शांतिमय व संयुक्त मानवी समाज निर्माण होईल. अशाप्रकारे, युद्ध, खून, हिंसा, बलात्कार, चोरी किंवा इतर कोणतेही गुन्हे होणार नाहीत.
देवाच्या नवीन जगात राहणाऱ्या आज्ञाधारक मानवांना अद्भुत शारीरिक आशीर्वाद प्राप्त होतील. देवाच्या शासनाविरुद्ध बंडाळी केल्याने झालेले सर्व दुष्परिणाम मिटवण्यात येतील. अपरिपूर्णता, आजारपण, वार्धक्य आणि मृत्यू या गोष्टी गतकाळात जमा होतील. बायबल असे आश्वासन देते: “मी रोगी आहे असे एकहि रहिवासी म्हणणार नाही.” शिवाय, शास्त्रवचने असे अभिवचन देतात की: “तेव्हा अंधांचे नेत्र उघडतील, बहिऱ्याचे कान खुले होतील. तेव्हा लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारील, मुक्याची जीभ गजर करील.” (यशया ३३:२४; ३५:५, ६) दररोज चैतन्यमय जीवन जगणे किती उत्साहदायक असेल—आणि तेही सर्वकाळापर्यंत!
देवाच्या प्रेमळ मार्गदर्शनाखाली, त्या नवीन जगातील रहिवासी संपूर्ण पृथ्वीला परादीसमय बनवण्यासाठी आपल्या शक्तीचा आणि कौशल्यांचा उपयोग करतील. दारिद्र्य, उपासमार आणि बेघरपणासारख्या समस्या कायमच्या मिटवल्या जातील कारण यशयाची भविष्यवाणी म्हणते: “ते घरे बांधून त्यात राहतील. द्राक्षाचे मळे लावून त्यांचे फळ खातील. ते घरे बांधतील आणि त्यात दुसरे राहतील, ते लावणी करितील आणि फळ दुसरे खातील, असे व्हावयाचे नाही.” (यशया ६५:२१, २२) तर “ते सगळे आपापल्या द्राक्षीखाली व अंजिराच्या झाडाखाली बसतील, कोणी त्यांस घाबरविणार नाही.”—मीखा ४:४.
देवाच्या आणि आज्ञाधारक मानवजातीच्या प्रेमळ काळजीने पृथ्वी बहरेल. हे आश्वासन आपल्याला शास्त्रवचनांतून मिळते: “अरण्य व रुक्ष भूमि ही हर्षतील; वाळवंट उल्लासेल व कमलाप्रमाणे यशया ३५:१, ६) ‘भूमीत भरपूर पीक येईल, पर्वतांच्या शिखरांवर ते डोलेल.’—स्तोत्र ७२:१६.
फुलेल. . . . रानांत जलप्रवाह, वाळवंटात झरे फुटतील.” (पण मरण पावलेल्या अब्जावधी लोकांचे काय होईल? देवाच्या स्मरणात असलेल्यांना पुन्हा जिवंत केले जाईल कारण “नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल.” (प्रेषितांची कृत्ये २४:१५) होय, मृत लोकांना जिवंत केले जाईल. देवाच्या शासनासंबंधीच्या अद्भुत सत्यांविषयी त्यांना शिकवले जाईल आणि परादीसात सर्वकाळ राहण्याची संधी दिली जाईल.—योहान ५:२८, २९.
या मार्गांनी, हजारो वर्षांपासून मानवजातीवर वर्चस्व केलेल्या दुःखाच्या, आजारपणाच्या आणि मृत्यूच्या भयानक परिस्थितीला यहोवा देव कायमचे बदलून टाकील. आजारपण नसेल! अपंगत्व नसेल! मृत्यू देखील नसेल! देव “त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या” असतील.—प्रकटीकरण २१:३, ४.
अशातऱ्हेने देव दुःखाचा अंत करील. तो या भ्रष्ट जगाचा नाश करून “ज्यामध्ये नीतिमत्त्व वास” करते असे नवीन व्यवस्थीकरण आणील. (२ पेत्र ३:१३) किती आनंदाची ही वार्ता! त्या नवीन जगाची आपल्याला अत्यंत गरज आहे. आणि त्यासाठी आपल्याला आता फार थांबावे लागणार नाही. बायबलमधील भविष्यवाण्यांच्या पूर्णतेवरून आपल्याला समजते, की नवीन जग जणू अगदी उंबरठ्यावर आहे आणि देवाने परवानगी दिलेल्या दुःखाचा लवकरच अंत होणार आहे.—मत्तय २४:३-१४.
[८ पानांवरील चौकट]
मानवी शासनाचे अपयश
मानवी शासनाविषयी, भूतपूर्व जर्मन चान्सलर, हेल्मुट श्माईट म्हणाले: “आम्हा मानवांनी या जगावर संपूर्ण राज्य कधी केलेच नाही आणि पुष्कळदा आपले शासन अयशस्वी ठरले आहे. . . . पूर्ण शांतीने आम्ही कधीच शासन केले नाही.” मानवी विकास अहवाल १९९९ म्हणतो: “सामाजिक रचनेचा ऱ्हास होऊन सामाजिक अनावस्था, गुन्हेगारी व कौटुंबिक हिंसा यांचे प्रमाण वाढत आहे असे वृत्त सर्व राष्ट्रांमधून मिळते. . . . जागतिक धोक्यांचे प्रमाण इतके वाढत आहे की हे धोके आटोक्यात आणायला राष्ट्रे असमर्थ ठरत आहेत व आंतरराष्ट्रीय पातळीवरही नियंत्रण ठेवण्यात त्यांना यश आलेले नाही.”
[८ पानांवरील चित्रे]
“ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील.” —स्तोत्र ३७:११
[५ पानांवरील चित्राचे श्रेय]
वरून तिसरे, आई व मूल: FAO photo/B. Imevbore; खाली, स्फोट: U.S. National Archives photo