व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वार्षिक सभा ऑक्टोबर ६, २००१

वार्षिक सभा ऑक्टोबर ६, २००१

वार्षिक सभा ऑक्टोबर ६, २००१

वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ पेन्सिल्व्हेनियाच्या सदस्यांची वार्षिक सभा ऑक्टोबर ६, २००१ रोजी, असेंब्ली हॉल ऑफ जेहोवाज विटनेसेस, २९३२ केनडी बाउलिवर्ड, जर्सी सिटी, न्यू जर्सी येथे आयोजित करण्यात आली आहे. प्रथम सकाळी ९:१५ वाजता फक्‍त सदस्यांची सभा होईल. त्यानंतर लगेच १०:०० वाजता सामान्य वार्षिक सभा सुरू होईल.

अधिकृत मंडळाच्या सदस्यांनी, त्यांच्या पोस्टाच्या पत्त्यात काही फेरबदल झाला असेल तर तो सचिवाच्या कार्यालयाला लगेच कळवावा जेणेकरून नोटीस आणि नेहमीची मुखत्यार पत्रे त्यांना जुलैदरम्यान मिळू शकतील.

वार्षिक सभेच्या नोटीससोबतच मुखत्यारपत्रे देखील सदस्यांना पाठवण्यात येतील; ही मुखत्यारपत्रे संस्थेच्या सचिवाच्या कार्यालयास ऑगस्ट १ पर्यंत पोहंचली पाहिजेत. प्रत्येक सदस्याने स्वतःचे मुखत्यारपत्र भरून परत पाठवावे आणि या सभेला व्यक्‍तिशः उपस्थित राहणार किंवा कसे हे त्यात कळवावे. प्रत्येक मुखत्यार पत्रातील ही माहिती निश्‍चित स्वरूपाची असली पाहिजे कारण याच आधारावर, सभेला व्यक्‍तिशः कोण उपस्थित राहतील हे ठरविले जाईल.

अशी अपेक्षा केली जाते की बिझनेस सभा व रिपोर्टसहित संपूर्ण कार्यक्रम दुपारी १:०० वाजेपर्यंत समाप्त होईल. दुपारी कार्यक्रम असणार नाही. मर्यादित जागा असल्यामुळे तिकिटांशिवाय प्रवेश मिळणार नाही. तसेच वार्षिक सभेचा कार्यक्रम टेलिफोनद्वारे इतर सभागृहांना जोडण्याची योजना केली जाणार नाही.