व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बावनकशी सोन्यापेक्षाही टिकाऊ

बावनकशी सोन्यापेक्षाही टिकाऊ

बावनकशी सोन्यापेक्षाही टिकाऊ

सोन्याचे सौंदर्य आणि टिकाऊपणा यांमुळे लोक त्याला बहुमोल समजतात. सोन्याची चमक कधीही कमी होत नाही तसेच त्यावर कधीही डाग पडत नाहीत म्हणून त्याला हे महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण, सोन्यावर पाणी, ऑक्सीजन, सल्फर आणि जवळजवळ इतर कोणत्याही गोष्टीचा फरक पडत नाही. समुद्रात बुडालेल्या जहाजांतून किंवा इतर ठिकाणांहून प्राप्त झालेल्या सोन्याच्या वस्तू कित्येक शेकडो वर्षांनंतरही तशाच चमकदार असतात.

परंतु, बायबलमध्ये असे म्हटले आहे की, ज्या “नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करितात त्या सोन्यापेक्षा मूल्यवान” आणि अधिक टिकाऊ असे काहीतरी आहे. (१ पेत्र १:७) अग्नीने किंवा इतर प्रक्रियांद्वारे “परीक्षा” केलेले किंवा शुद्ध केलेले सोने ९९.९ टक्के शुद्ध असू शकते. परंतु, शुद्ध केलेले सोने देखील अम्लराजाच्या (शाही पाणी)—तीन भाग हायड्रोक्लोरिक आम्ल आणि एक भाग नायट्रिक आम्ल या मिश्रणाच्या—संपर्कात आल्यावर नाश पावते किंवा विरघळून जाते. त्यामुळे, ‘सोने नाशवंत’ आहे असे जे बायबलमध्ये म्हटले आहे ते वैज्ञानिकदृष्ट्या बरोबर आहे.

याच्या उलट, खऱ्‍या ख्रिस्ती विश्‍वासाने ‘जीवाचे तारण’ होते. (इब्री लोकांस १०:३९) अर्थात, मजबूत विश्‍वास असलेल्या एखाद्या व्यक्‍तीला ठार मारले जाऊ शकते; जसे की, येशू ख्रिस्ताला ठार मारण्यात आले. परंतु, खरा विश्‍वास बाळगणाऱ्‍यांना हे वचन दिले आहे: “मरेपर्यंत तू विश्‍वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुगूट देईन.” (प्रकटीकरण २:१०) मरणापर्यंत विश्‍वासू राहणारे लोक देवाच्या स्मरणात राहतात आणि तो त्यांचे पुनरुत्थान करील. (योहान ५:२८, २९) पण जगातले सगळे सोने जरी आपल्याजवळ असले तरी हे साध्य होऊ शकत नाही. या अर्थाने पाहिल्यास, विश्‍वास, सोन्यापेक्षा मूल्यवान आहे. परंतु, उत्कृष्ट मूल्य असलेला हा विश्‍वास देखील परीक्षेद्वारे सिद्ध केला जातो. म्हणूनच पेत्राने म्हटले की, ‘परीक्षेत उतरलेला विश्‍वास’ सोन्यापेक्षा मूल्यवान आहे. खरा देव, यहोवा आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त यांच्याबद्दल तुम्ही दृढ विश्‍वास निर्माण करून तो टिकवून ठेवावा म्हणून यहोवाचे साक्षीदार तुमच्यासोबत बायबलचा अभ्यास करायला तयार आहेत. येशूने सांगितल्याप्रमाणे, “सार्वकालिक जीवन हेच आहे.”—योहान १७:३.