व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

नबुखद्‌नेस्सर राजाने दूराच्या मैदानात उभारलेल्या मोठ्या मूर्तीपुढे तिघा इब्री तरुणांची परीक्षा घेतली तेव्हा दानीएल कोठे होता?

बायबल याविषयी काहीच सांगत नाही, त्यामुळे त्या परीक्षेदरम्यान दानीएल नेमका कोठे होता हे कोणीही सिद्ध करू शकत नाही.

काहींनी असे सुचवले आहे की, शद्रख, मेशख आणि अबेद्‌नगो यांपेक्षा दानीएलचे अधिकारी पद मोठे होते किंवा नबुखद्‌नेस्सर राजाच्या नजरेत त्याला जास्त महत्त्वाचे स्थान होते; त्यामुळे दूराच्या मैदानात जाणे त्याच्यासाठी सक्‍तीचे नव्हते. दानीएल २:४९ यात हे स्पष्ट होते की, काही काळापर्यंत त्याला त्याच्या तीन सोबत्यांपेक्षा मोठे पद होते. परंतु, यामुळे त्याला इतरांबरोबर मूर्तीपुढे उभे राहणे भाग नव्हते हे आपण सिद्ध करू शकत नाही.

दानीएलाच्या अनुपस्थितीचा खुलासा करण्याचा प्रयत्न करताना इतरांनी म्हटले आहे की, तो कदाचित काही सरकारी कामानिमित्ताने त्या वेळी बाहेर गेला असावा किंवा आजारी असल्यामुळे उपस्थित राहिला नसावा. परंतु, बायबल तसे काही सांगत नाही. दानीएलाच्या अनुपस्थितीचे कारण काहीही असले, तरी दानीएलाने जे काही केले त्याकडे कोणालाही बोट दाखवता आले नसावे. कारण तसे असते तर, त्याचा हेवा करणाऱ्‍या बॅबिलोनी अधिकाऱ्‍यांनी त्याच्याविरोधात त्याचा उपयोग करायला मागेपुढे पाहिले नसते. (दानीएल ३:८) या घटनेच्या आधी आणि नंतरही दानीएलाने स्वतःला निष्ठावान शाबीत केले; हरतऱ्‍हेच्या अडचणीत तो देवाला विश्‍वासू राहिला. (दानीएल १:८; ५:१७; ६:४, १०, ११) त्यामुळे, दानीएल दूरा मैदानात का उपस्थित नव्हता हे जरी बायबलमध्ये सांगितलेले नसले तरी आपण पूर्ण खात्रीने हे म्हणू शकतो की, यहोवाला विश्‍वासू राहण्याच्या बाबतीत त्याने मुळीच हातमिळवणी केली नाही.—यहेज्केल १४:१४; इब्री लोकांस ११:३३.