व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

उत्कृष्टतेचे प्रमाणपत्र

उत्कृष्टतेचे प्रमाणपत्र

उत्कृष्टतेचे प्रमाणपत्र

काँगोच्या लोकतांत्रिक प्रजासत्ताकात, हे बक्षीस, विकासासाठी काँगोलियन आणि आफ्रिकन पत्रकारांच्या संघटनेद्वारे (एजेओसीएडी) “[काँगोतील] विकासाला अनोख्या पद्धतीने हातभार लावणाऱ्‍या व्यक्‍तींना किंवा सामाजिक संघटनांना” दिले जाते.

नोव्हेंबर १७, २००० रोजी, यहोवाचे साक्षीदार “आपल्या प्रकाशनांतील शिक्षण आणि शिकवण [यांद्वारे] काँगोलियन व्यक्‍तीचा विकास करण्यात हातभार लावत असल्यामुळे” उत्कृष्टतेचे प्रमाणपत्र त्यांना बहाल करण्यात आले.

या सन्मानाविषयी सांगताना, ला फार या किन्सहासा बातमीपत्राने म्हटले: “असा एकही काँगोलीज व्यक्‍ती नाही ज्याला टेहळणी बुरूज आणि सावध राहा! मासिके किंवा यहोवाच्या साक्षीदारांची इतर प्रकाशने देण्यात आलेली नाहीत. या मासिकांमध्ये जीवनाच्या सर्व पैलूंविषयी [चर्चा] केली जाते.” त्या लेखात असेही म्हटले होते की, “आजच्या समस्यांना कसे तोंड द्यावे” आणि “सद्य घटनांमागील खरा अर्थ” काय आहे ही माहिती देखील या प्रकाशनांतून मिळते. सावध राहा! मासिकाचा प्रत्येक अंक “राजकारणात तटस्थ राहतो आणि एका जातीला दुसऱ्‍या जातीपेक्षा श्रेष्ठ दाखवत नाही.” शिवाय, “सद्याच्या दुष्ट, अधर्मी व्यवस्थीकरणाचा अंत करून एक शांतीमय व सुरक्षित जग प्रस्थापित होईल या निर्माणकर्त्याच्या अभिवचनावर [ही प्रकाशने] भरवसा” वाढवतात.

एजेओसीएडीने निरीक्षण केल्याप्रमाणे, यहोवाच्या साक्षीदारांची प्रकाशने काँगोलियन लोकसंख्येतील पुष्कळांना फायदेकारक ठरली आहेत. ही प्रकाशने शेकडो भाषांमध्ये उपलब्ध असून त्यांतील आशादायक संदेश तुम्हालाही फायदेकारक ठरू शकतो.

ती प्रकाशने तुम्ही कशी प्राप्त करू शकता त्यासाठी खालील माहिती पाहा.