तुम्हाला आठवते का?
तुम्हाला आठवते का?
तुम्ही वाचलेले अलीकडील टेहळणी बुरूजचे अंक तुम्हाला आवडले का? तर मग, पुढील प्रश्नांची उत्तरे देण्यास जमते का ते पाहा:
• ईयोबाच्या ३८ व्या अध्यायात उल्लेख केलेले प्रश्न आज देखील विचारात घेण्याजोगे का आहेत?
देवाने ईयोबाचे लक्ष ज्या अद्भुत कृत्यांकडे वेधले त्यातील अनेक कृत्ये अद्यापही आधुनिक वैज्ञानिकांना पुरती उमगलेली नाहीत. उदाहरणार्थ, गुरुत्वाकर्षामुळे पृथ्वी कशाप्रकारे आपल्या कक्षेतच राहते, प्रकाश म्हणजे नेमके काय, हिमकणांत विविध रचनेचे असंख्य प्रकार का असावेत, पावसाचे थेंब कसे तयार होतात, गडगडाटी वादळातून ऊर्जा कशी निर्माण होते इत्यादी.—४/१५, पृष्ठे ४-११.
• बायबलमधील कोणती उदाहरणे आपल्याला नकारात्मक भावनांशी झुंजण्यास मदत करतात?
आसाफ, बारूख आणि नामी या तिघांनाही काही काळापर्यंत निरुत्साहीपणाच्या किंवा इतर नकारार्थी भावनांनी सतावले होते; त्यांनी कशाप्रकारे या भावनांवर मात केली याविषयीचा बायबलमधील अहवाल आपल्यालाही मदत करू शकतो.—४/१५, पृष्ठे २२-४.
• ख्रिस्ती विधवांना मदत करण्याचे काही व्यावहारिक मार्ग कोणते आहेत?
जवळचे मित्र दयाळूपणे आणि स्पष्टपणे मदत करण्याविषयी सुचवू शकतात. खरोखर गरजू असलेल्या विधवेला कुटुंबातील सदस्य किंवा इतरजण देखील आर्थिक किंवा भौतिक मदत पुरवू शकतात. ख्रिस्ती बांधव अशा विधवांशी मैत्रिपूर्ण रितीने वागून, आध्यात्मिक साहाय्य व सांत्वन देऊ शकतात.—५/१, पृष्ठे ५-७.
• १ करिंथकर ७:३९ येथे सांगितल्याप्रमाणे “केवळ प्रभूमध्ये” विवाह करणे का महत्त्वाचे आहे?
अविश्वासी व्यक्तींशी लग्न केलेल्यांना सहसा दुःखद परिणाम भोगावे लागतात. शिवाय या सल्ल्याचे पालन करणे यहोवा देवाला निष्ठावान राहण्याशी संबंधित आहे. तसेच, आपण देवाच्या वचनानुसार चालतो तेव्हा आपले मन आपल्याला दोषी ठरवत नाही. (१ योहान ३:२१, २२)—५/१५, पृष्ठे २०-१.
• आपल्या पापांची क्षमा करणारा जर यहोवा आहे, तर मग ख्रिस्ती आपल्या पापांची कबूली मंडळीतल्या वडिलांजवळ का देतात?
होय, ख्रिस्ती व्यक्तीच्या हातून गंभीर पाप घडते तेव्हा तिने यहोवाची क्षमायाचना करणे आवश्यक आहे. (२ शमुवेल १२:१३) पण ज्याप्रकारे संदेष्टा नाथान याने दाविदाला मदत केली होती त्याचप्रकारे मंडळीतील अनुभवी वडीलधारी पुरुष पश्चात्तापी पापी व्यक्तींना मदत करू शकतात. वडिलांजवळ जाणे याकोब ५:१४, १५ येथे दिलेल्या मार्गदर्शनाच्या अनुरूप आहे.—६/१, पृष्ठ ३१.
• गरजू अनाथांची व विधवांची आपण काळजी घेतली पाहिजे यासाठी कोणता पुरावा आहे?
ऐतिहासिक अहवालांवरून दिसून येते की अनाथांची व विधवांची काळजी घेणे प्राचीन इब्री लोकांमध्ये आणि सुरवातीच्या ख्रिश्चनांमध्येही खऱ्या उपासनेचे एक चिन्ह मानले जात होते. (निर्गम २२:२२, २३; गलतीकर २:९, १०; याकोब १:२७) ख्रिश्चनांनी गरजू विधवांची तरतूद करावी याविषयीच्या स्पष्ट सूचना प्रेषित पौलाने शास्त्रवचनांमध्ये समाविष्ट केल्या. (१ तीमथ्य ५:३-१६)—६/१५, पृष्ठे ९-११.
• आनंदी, अर्थपूर्ण जीवनाचे रहस्य काय आहे?
आपला निर्माणकर्ता आणि स्वर्गीय पिता यहोवा याच्यासोबत योग्य नातेसंबंध असणे आवश्यक आहे. असे करण्याचा एक महत्त्वपूर्ण मार्ग म्हणजे बायबलचा अभ्यास करणे.—७/१, पृष्ठे ४-५.
• प्रत्येक मनुष्यात, मृत्यूनंतरही अस्तित्वात राहणारा अमर आत्मा असतो का?
आत्मा अमर असतो असा बऱ्याच लोकांचा विश्वास असला तरीसुद्धा बायबल या विश्वासाला पुष्टी देत नाही. ते स्पष्ट सांगते की मनुष्याचा मृत्यू झाल्यानंतर तो पुन्हा मातीत मिळतो आणि त्याचे अस्तित्व संपुष्टात येते. पण त्या व्यक्तीला पुन्हा जीवन देण्याचे सामर्थ्य केवळ देवाजवळ असल्यामुळे भविष्यात पुनरुत्थानाद्वारे पुन्हा कधी तिला जीवन मिळणे न मिळणे देवाच्या हातात असते. (उपदेशक १२:७)—७/१५, पृष्ठे ३-६.
• दूराच्या मैदानात तिघा इब्री तरुणांची परीक्षा झाली तेव्हा दानीएल कोठे होता?
बायबल याविषयी खुलासा करत नाही. कदाचित दानीएल उच्च अधिकार पदावर असल्यामुळे त्या ठिकाणी जाणे त्याला भाग नसावे किंवा कामानिमित्ताने तो कोठेतरी गेलेला असावा. पण आपण पूर्ण खात्रीने हे म्हणू शकतो की, यहोवाला विश्वासू राहण्याच्या बाबतीत त्याने मुळीच हातमिळवणी केली नाही.—८/१, पृष्ठ ३१.