व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

संघीय संविधान न्यायालयात विजय

संघीय संविधान न्यायालयात विजय

संघीय संविधान न्यायालयात विजय

जर्मनीतील यहोवाच्या साक्षीदारांना कार्ल्सरू येथील संघीय संविधान कोर्टात अनन्यसाधारण विजय प्राप्त झाला. अशाप्रकारे, मान्यता मिळण्याच्या संदर्भात त्यांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

यहोवाचे साक्षीदार जर्मनीत, १०० हून अधिक वर्षांपासून सक्रिय आहेत. २० व्या शतकातील दोन हुकूमशाहींत—राष्ट्रीय समाजवादी आणि कम्युनिस्ट राजवटीत—त्यांना अतिशय भयंकर छळ सहन करावा लागला. १९९० पासून यहोवाचे साक्षीदार सार्वजनिक कायद्याची संस्था या नात्याने कायदेशीर मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करत होते. न्यायालयाने साक्षीदारांच्या बाजूने दोन निकाल आणि एक उलट निकाल दिल्यावर त्यांनी संघीय संविधान कोर्टात अपील केले आणि डिसेंबर १९, २००० रोजी कोर्टाने निकाल जाहीर केला.

यहोवाच्या साक्षीदारांच्या बाजूने सर्वसंमत निर्णय

कोर्टातल्या सर्व सात न्यायाधीशांनी साक्षीदारांच्या बाजूने निकाल दिला. संघीय प्रशासकीय कोर्टाने १९९७ साली सुनावलेला निकाल न्यायाधीशांनी फेटाळून लावला आणि साक्षीदारांचा अर्ज विचारात घेण्यास त्या कोर्टाला सूचना दिली.

संघीय संविधान कोर्टाने या प्रसंगी, सरकार आणि धार्मिक गटांमधील मूलभूत नातेसंबंधाविषयी भाष्य केले. खरे तर, कोणत्याही धर्माचे स्थान “त्याच्या विश्‍वासांच्या आधारे नव्हे तर त्याच्या वागणुकीवरून ठरवले जाते.”

कोर्टाने असेही निरीक्षण केले की, साक्षीदार “ख्रिस्ती तटस्थता” राखतात याचा अर्थ ते “लोकशाही तत्त्वावर आक्रमण करत नाहीत” आणि “लोकशाही सरकार उलथून दुसरे एखादे सरकार आणण्याचा विचार” करत नाहीत. यास्तव, राजकीय मतदानात भाग न घेणे हा साक्षीदारांना कायदेशीर मान्यता देण्याविरुद्ध पुरावा समजला जाऊ नये.—योहान १८:३६; रोमकर १३:१.

कोर्टाने पुढे असे म्हटले, की काही वेळा सरकारच्या अपेक्षा आणि धर्माच्या अपेक्षा विरोधात येतात तेव्हा एखाद्या धर्माचा अनुयायी—मग तो साक्षीदार असो अथवा इतर कोणत्याही धर्माचा असो—कोंडीत सापडतो. अशा वेळी जर एखाद्याने आपल्या विवेकानुसार “कायद्यापेक्षा धार्मिक विश्‍वासांचे पालन केले” तर हे योग्य आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या सीमेमध्ये आहे असे राष्ट्र समजू शकते.—प्रेषितांची कृत्ये ५:२९.

कोर्टाचा निकाल ठळक बातम्यांमध्ये झळकला. जर्मनीत असे एकही वृत्तपत्र नव्हते ज्यामध्ये या प्रकरणाची बातमी छापून आली नव्हती. शिवाय, टीव्ही आणि रेडिओच्या सर्व प्रसिद्ध वाहिन्यांवरून याबद्दलचे वृत्त किंवा मुलाखती सादर करण्यात आल्या. जर्मनीत यहोवाच्या नावाला इतकी प्रसिद्धी या आधी कधीच मिळाली नव्हती!

[८ पानांवरील चित्राचे श्रेय]

AP Photo/Daniel Maurer