व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

एकेकाळी आम्ही लांडगे होतो—आता मेंढरे आहोत!

एकेकाळी आम्ही लांडगे होतो—आता मेंढरे आहोत!

एकेकाळी आम्ही लांडगे होतो—आता मेंढरे आहोत!

सकीना आणि मी लहान होतो तेव्हा आम्ही शेजारी शेजारी राहायचो. सकीना उंच आणि धडधाकट होती, मी मात्र बुटकीशी आणि सडपातळ होते. आम्ही बऱ्‍याचदा भांडायचो, पण एकदा मात्र आमचे जोरदार भांडण झाले. त्या दिवसापासून आम्ही एकमेकींशी बोलायचे सोडून दिले, एकमेकींना बघून आम्ही हसायचो देखील नाही. नंतर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी राहायला गेलो आणि मग आमचा संपर्कच तुटला.

१९९४ साली मी यहोवाच्या साक्षीदारांसोबत अभ्यास करण्यास सुरवात केली आणि हळूहळू माझे व्यक्‍तिमत्त्व बदलू लागले. चार वर्षांनी जेव्हा मी बुरुण्डी येथील बुजुम्बारा शहरात खास संमेलन दिवसाला गेले होते, तेव्हा अचानक सकीनाला तेथे पाहून मला खूप आश्‍चर्य वाटले. ती देखील संमेलनाला आली होती याचा मला मनोमन आनंद झाला, पण आम्ही एकमेकींशी मनमोकळेपणाने बोललो नाही. त्याच दिवशी नंतर जेव्हा मी सकीनाला बाप्तिस्मा घेणाऱ्‍या उमेदवारांत पाहिले तेव्हा मला विश्‍वासच बसेना! तीसुद्धा खूप बदलली होती. मी जिच्याशी नेहमी भांडायचे तशी ती आता भांडखोर राहिली नव्हती. पाण्याचा बाप्तिस्मा घेऊन देवाला केलेल्या समर्पणाचा सर्वांसमोर पुरावा देणाऱ्‍या सकीनाला पाहून मला अतिशय आनंद झाला!

ती पाण्यातून वर आली तेव्हा मी लगेच जाऊन तिला मिठी मारली आणि तिच्या कानात हळूच म्हणाले: “आपण कशा भांडायचो, आठवतं?” ती म्हणाली “हो, आठवतं. पण त्या जुन्या गोष्टी विसरून जा. आता मी एक नवीन व्यक्‍ती आहे.”

लोकांचे सर्व भेद दूर करणारे बायबल सत्य आम्हाला मिळाले आणि एकेकाळची आमची लांडग्यांसारखी व्यक्‍तिमत्त्वे बदलून आता आम्ही महान मेंढपाळ यहोवा देव याची मेंढरे बनलो आहोत याचा आम्हा दोघींना खूप आनंद वाटतो. खरोखर बायबलमधील सत्य लोकांचे जीवन बदलून टाकते.