योग्य निर्णय कसे घ्यावेत
योग्य निर्णय कसे घ्यावेत
इच्छा स्वातंत्र्य हे देवाकडील एक दान आहे. ते नसते तर आपण जवळजवळ यंत्र मानवांसारखेच असतो; आपल्या कार्यांवर आपले काहीच नियंत्रण राहिले नसते. परंतु, ते आपल्याजवळ असल्यामुळे आपल्याला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. इच्छा स्वातंत्र्यामुळे जीवनात आपल्याला अनेक निर्णय घ्यावे लागतात.
अर्थात, काही निर्णय अगदी क्षुल्लक असतात. परंतु, कोणते करिअर निवडावे, लग्न करावे की नाही यांसारख्या निर्णयांचा आपल्या संपूर्ण भविष्यावर परिणाम होऊ शकतो. आणि असेही काही निर्णय असतात ज्यांचा इतर लोकांवर परिणाम होतो. पालकांच्या काही निर्णयांमुळे मुलांवर गहिरा प्रभाव पडतो. शिवाय, पुष्कळशा निर्णयांसाठी आपल्याला देवाला हिशेब द्यायचा आहे.—रोमकर १४:१२.
साहाय्याची आवश्यकता
निर्णय घेण्याच्या बाबतीत मानवांचा आतापर्यंतचा अनुभव फारसा दिलासा देणारा नाही. सर्वात पहिला नोंदलेला मानवी निर्णय विनाशकारी ठरला. देवाने स्पष्टपणे मना केलेले फळ खाण्याचा हव्वेने निर्णय घेतला. स्वार्थाने प्रवृत्त होऊन ही निवड केल्यामुळे तिच्या पतीनेही तिच्यासोबत देवाची अवज्ञा केली आणि परिणामस्वरूप मानवजातीला त्याचे दुःखद परिणाम भोगावे लागले. पुष्कळदा, मानव अजूनही योग्य तत्त्वांनुरूप नव्हे तर स्वतःच्या स्वार्थी इच्छांनुसार काही निर्णय घेतात. (उत्पत्ति ३:६-१९; यिर्मया १७:९) आणि गंभीर निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा सहसा आपल्याला आपल्या मर्यादांची जाणीव असते.
म्हणूनच, महत्त्वाचे निर्णय घेताना पुष्कळजण मानवांपेक्षा श्रेष्ठ असलेल्या स्रोतांकडून मदत घेतात यात नवल नाही. बायबलमध्ये एका प्रसंगाचा वृत्तान्त आहे जेव्हा नबुखदनेस्सरला युद्ध सुरू असताना एक निर्णय घ्यायचा होता. राजा असूनही तो “शकुन पाहण्यासाठी” अर्थात भुतांकडे विचारणा करण्यासाठी थांबला. म्हणूनच त्या वृत्तान्तात असे म्हटले आहे: “तो भात्यातले बाण हलवून प्रश्न पाहात आहे, तेराफीमास कौल लावीत आहे, यज्ञपशूच्या काळजावरून शकुन पाहात आहे.” (यहेज्केल २१:२१) त्याचप्रमाणे आजही, अनेकजण भविष्य सांगणारे आणि ज्योतिषी यांचा सल्ला घेतात व इतर मार्गांनी भुतांची मदत घेतात. पण, हे फसवे आणि चुकीचा मार्ग दाखवणारे स्रोत आहेत.—लेवीय १९:३१.
एका व्यक्तीवर मात्र आपण पूर्णपणे भरवसा ठेवू शकतो आणि संपूर्ण इतिहासात या व्यक्तीने मानवांना योग्य निर्णय घेण्यामध्ये साहाय्य केले आहे. ती व्यक्ती म्हणजे यहोवा देव. उदाहरणार्थ, प्राचीन काळी, देवाने आपल्या राष्ट्राला अर्थात इस्राएलला उरीम व थुम्मीम दिले होते; कदाचित हे पवित्र समजले जाणारे फासे होते आणि इस्राएल राष्ट्रासमोर महत्त्वाचे प्रसंग आल्यावर ते टाकले जात होते. उरीम आणि थुम्मीमद्वारे यहोवा प्रश्नांची थेट उत्तरे देत होता आणि इस्राएलच्या वडिलांचे निर्णय त्याच्या इच्छेनुरूप आहेत याची खात्री करायला मदत करत होता.—निर्गम २८:३०; लेवीय ८:८; गणना २७:२१.
दुसरे एक उदाहरण पाहा. गिदोनला मिद्यानाविरुद्ध इस्राएलच्या सैन्याचे नेतृत्व करायला बोलावण्यात आले तेव्हा इतका मोठा बहुमान स्वीकारावा की नाही हा निर्णय त्याला घ्यायचा होता. यहोवा आपल्याला साहाय्य करील असे आश्वासन गिदोनला हवे होते म्हणून त्याने एक शास्ते ६:३३-४०; ७:२१, २२.
चमत्कारिक चिन्ह मागितले. त्याने अशी प्रार्थना केली की, रात्री बाहेर ठेवलेल्या लोकरीवर दहिंवर पडावे पण जमीन कोरडी राहावी. दुसऱ्या रात्री, लोकर कोरडी राहावी पण जमीन दहिंवराने भिजावी असे त्याने मागितले. यहोवाने गिदोनवर दया करून त्याने मागितलेली चिन्हे त्याला दिली. परिणामस्वरूप, गिदोनाने योग्य निर्णय घेतला आणि देवाच्या पाठिंब्याने इस्राएलच्या शत्रुंचा पराभव केला.—आज काय?
आजही, आपल्या सेवकांना महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतात तेव्हा यहोवा त्यांना मदत करतो. कशाप्रकारे? गिदोनाप्रमाणे, ‘लोकरीच्या परीक्षा’ किंवा कोणता निर्णय योग्य असेल यासाठी यहोवाकडे चिन्ह मागावे का? एका दांपत्याला राज्य प्रचारकांची जास्त गरज असलेल्या क्षेत्रात सेवा करण्यास आपण जावे की नाही हा प्रश्न होता. हे ठरवण्यासाठी त्यांनी एक परीक्षा घेतली. त्यांनी एका विशिष्ट किंमतीला आपले घर विकायला काढले. विशिष्ट तारखेपर्यंत आपण दिलेल्या किंवा जास्त किंमतीत विकले गेले तर आपण स्थलांतर करावे अशी देवाची इच्छा आहे, आणि जर घर विकले गेले नाही तर देवाची इच्छा नाही असे समजायचे त्यांनी ठरवले.
त्यांचे घर काही विकले गेले नाही. मग, या दांपत्याने जास्त गरज आहे तेथे जाऊन सेवा करावी अशी देवाची इच्छा नव्हती असे समजावे का? यहोवा आपल्या सेवकांसाठी काय करतो आणि काय करत नाही याविषयी काही निश्चित विधान करण्याचा आपल्यापैकी कोणालाही हक्क नाही. आजच्या काळात यहोवा आपल्याला त्याची इच्छा कळवण्यासाठी कधीच हस्तक्षेप करत नाही असे आपण म्हणू शकत नाही. (यशया ५९:१) परंतु, आपल्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये अशाप्रकारे हस्तक्षेप व्हावा, किंवा देवाने आपल्याकरता निर्णय घ्यावा अशी अपेक्षा करण्याचा अधिकार आपल्याला नाही. गिदोनाने देखील, आपल्या जीवनातले बहुतेक निर्णय घेतले तेव्हा त्याला यहोवाकडून कसल्याप्रकारची चमत्कारिक चिन्हे दिली नव्हती!
तरीही, देव मार्गदर्शन देतो असे बायबल म्हणते. आपल्या काळाविषयी ते म्हणते: “हाच मार्ग आहे; याने चला, अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल; मग तुम्हाला उजवीकडे जावयाचे असो किंवा डावीकडे जावयाचे असो.” (यशया ३०:२१) महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतात तेव्हा आपले निर्णय देवाच्या इच्छेनुरूप आहेत आणि त्यातून त्याची श्रेष्ठ बुद्धी प्रकट होते हे पाहणे अगदी योग्य आहे. हे कसे करता येईल? त्याच्या वचनाचे मार्गदर्शन घेऊन आणि त्या वचनाला ‘आपल्या पावलांकरता दिवा आणि मार्गावर प्रकाश’ बनवून. (स्तोत्र ११९:१०५; नीतिसूत्रे २:१-६) हे करण्यासाठी, बायबलमधून अचूक ज्ञान घेण्याची सवय आपण स्वतःला लावली पाहिजे. (कलस्सैकर १:९, १०) आणि निर्णय घ्यायचा असतो तेव्हा, त्या विषयासंबंधी बायबलमधील सर्व तत्त्वांचे काळजीपूर्वक संशोधन केले पाहिजे. अशा संशोधनामुळे आपल्याला ‘जे श्रेष्ठ ते पसंत करता’ येईल.—फिलिप्पैकर १:९, १०.
आपण प्रार्थनेत यहोवाशी बोलले पाहिजे, ही खात्री बाळगून की तो आपले अवश्य ऐकेल. आपल्याला कोणता निर्णय घ्यायचा आहे आणि आपल्यासमोर कोणते पर्याय आहेत हे आपल्या प्रेमळ देवाला सांगणे किती सांत्वनदायक आहे! मग, योग्य निर्णय घेण्यासाठी आपण आत्मविश्वासाने मार्गदर्शन मागू शकतो. सहसा, पवित्र आत्मा आपल्याला समर्पक बायबल तत्त्वांची आठवण करून देईल किंवा आपल्या परिस्थितीला लागू होणारे एखादे शास्त्रवचन अधिक स्पष्टपणे समजण्यास मदत करील.—याकोब १:५, ६.
इफिसकर ४:११, १२) काहीजण सगळ्यांकडून सल्ला घेतात पण जी व्यक्ती त्यांच्या मनाप्रमाणे बोलते तिचेच ते ऐकतात; असे आपण करू नये. अशा लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे सल्ला मिळाल्यावर ते तो सल्ला ऐकतात. तसेच, आपण रहबामाच्या उदाहरणावरून शिकायला मिळणारा धडा देखील लक्षात ठेवला पाहिजे. त्याला एक महत्त्वपूर्ण निर्णय घ्यायचा होता तेव्हा त्याच्या पित्याची सेवा केलेल्या वडिलधाऱ्या पुरुषांकडून त्याला उत्तम सल्ला मिळाला. पण त्यांचा सल्ला ऐकण्याऐवजी त्याने त्याच्या वयाच्या तरुणांचा सल्ला घेतला. त्यांचा सल्ला घेऊन त्याने चुकीचा निर्णय घेतला आणि याचा परिणाम असा झाला की, त्याला आपल्या राज्याचा एक मोठा भाग गमवावा लागला.—१ राजे १२:१-१७.
आपल्या निर्णयांची चर्चा करण्यासाठी यहोवाने मंडळीत प्रौढ लोकांचीही तरतूद केली आहे. (सल्ला घेताना, शास्त्रवचनांचे चांगले ज्ञान असलेल्या व योग्य तत्त्वांचा आदर करणाऱ्या अनुभवी लोकांचा सल्ला घ्या. (नीतिसूत्रे १:५; ११:१४; १३:२०) जमल्यास, त्यामध्ये गोवलेल्या तत्त्वांवर आणि तुम्ही जमा केलेल्या सर्व माहितीवर मनन करा. यहोवाच्या वचनाच्या प्रकाशात तुम्ही तुमच्या परिस्थितीकडे पाहू लागता तेव्हा योग्य निर्णय कोणता आहे हे कदाचित अधिक स्पष्ट दिसू लागेल.—फिलिप्पैकर ४:६, ७.
आपण घेत असलेले निर्णय
काही निर्णय अगदी सोपे असतात. प्रेषितांना साक्षकार्य थांबवण्याचा आदेश मिळाल्यावर येशूविषयी प्रचार करत राहिले पाहिजे हे त्यांना ठाऊक होते आणि त्यामुळे त्यांनी तत्क्षणी न्यायसभेला आपला निर्णय सांगितला की मनुष्यांपेक्षा आम्ही देवाची आज्ञा मानू. (प्रेषितांची कृत्ये ५:२८, २९) इतर निर्णय घेण्यासाठी कदाचित जास्त विचार करावा लागेल कारण बायबलमध्ये त्या विषयाशी संबंधित काही स्पष्ट विधान नसेल. तरीही, सर्वात योग्य निर्णय घेण्यासाठी सहसा बायबलमधील तत्त्वे मदतदायी ठरतील. उदाहरणार्थ, आज पाहायला मिळणारे मनोरंजनाचे अनेक प्रकार येशूच्या काळी नव्हते; तरीपण यहोवाला काय पसंत आहे आणि काय नापसंत आहे याबद्दल बायबलमध्ये स्पष्ट विधाने सापडतात. अशाप्रकारे, कोणतीही ख्रिस्ती व्यक्ती हिंसा, अनैतिकता किंवा बंडाळीला प्रोत्साहन देणाऱ्या मनोरंजनात भाग घेऊ लागली तर तिने चुकीचा निर्णय घेतला असेल.—स्तोत्र ९७:१०; योहान ३:१९-२१; गलतीकर ५:१९-२३; इफिसकर ५:३-५.
काही वेळा, दोन वेगळे निर्णयही योग्य असू शकतात. अधिक गरज आहे तेथे सेवा करणे हा फार मोठा सुहक्क आहे आणि त्यामुळे अनेक आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात. परंतु, काही कारणामुळे जर एखाद्याने असे न करण्याचे ठरवले तरी तो आपल्या मंडळीत राहूनही उत्तम कार्य करू शकतो. काही वेळा, आपल्याला असा निर्णय घ्यावा लागेल ज्यावरून यहोवाबद्दल आपली किती ईश्वरनिष्ठा आहे किंवा आपल्या जीवनात सर्वात महत्त्वाचे काय आहे हे दाखवून देण्याची संधी मिळेल. अशाप्रकारे, आपल्या अंतःकरणात नेमके काय आहे हे प्रकट करायला इच्छा स्वातंत्र्याचा उपयोग करण्याची मुभा यहोवा देतो.
बहुतेकदा, आपल्या निर्णयांचा परिणाम इतरांवर होतो. उदाहरणार्थ, पहिल्या शतकातील ख्रिश्चनांना नियमशास्त्राच्या अनेक निर्बंधांपासून सुटका मिळाल्याचा फार आनंद झाला. उदाहरणार्थ, नियमशास्त्राधीन अशुद्ध मानले जाणारे अन्न त्यांना स्वीकारता येत होते किंवा नाकारताही येत होते. तरीही, या स्वातंत्र्याचा उपयोग करताना इतरांच्या विवेकांचा विचार करण्याचे उत्तेजन त्यांना देण्यात आले. या १ करिंथकर १०:३२) इतरांना अडखळविणारे न होण्याची इच्छा पुष्कळदा निर्णय घेण्यात आपल्याला मदत करील. शेवटी, शेजाऱ्यावर प्रेम करणे ही सर्वात महत्त्वाची दुसरी आज्ञा आहे.—मत्तय २२:३६, ३९.
बाबतीत पौलाने उद्गारलेले शब्द आपण घेत असलेल्या अनेक निर्णयांच्या बाबतीत लागू होऊ शकतात: “कोणालाहि अडखळविणारे होऊ नका.” (आपल्या निर्णयांचा परिणाम
चांगल्या विवेकाने आणि बायबलच्या तत्त्वांनुरूप घेतलेल्या निर्णयांचा दीर्घकाळात चांगलाच परिणाम होईल. अर्थात, अल्पकालावधीत त्यासाठी आपल्याला काही व्यक्तिगत त्याग करावे लागतील. येशूविषयी प्रचार करत राहण्याचा निर्णय प्रेषितांनी न्यायसभेला सांगितला तेव्हा त्यांची सुटका करण्याआधी त्यांना मारहाण करण्यात आली. (प्रेषितांची कृत्ये ५:४०) शद्रख, मेशख आणि अबेदनगो या तीन इब्री तरुणांनी नबुखदनेस्सरच्या सुवर्ण मूर्तीला दंडवत न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी आपला प्राण धोक्यात घातला. त्यांच्या तत्त्वांवर आधारित निर्णयांमुळे मृत्यू देखील पत्करण्याची त्यांची तयारी होती. पण त्यांना ठाऊक होते की, त्यांना देवाची संमती आणि आशीर्वाद मिळेल.—दानीएल ३:१६-१९.
विचारपूर्वक निर्णय घेतल्यावरही आपल्याला अडचणी आल्या तर आपला निर्णय चुकीचा होता असा आपण विचार करू नये. चांगल्या हेतूने घेतलेल्या निर्णयांचे परिणामही ‘समय व प्रसंगामुळे’ विपरीत असू शकतात. (उपदेशक ९:११) शिवाय, काही वेळा यहोवा आपल्या निष्ठेची परीक्षा घेण्यासाठी प्रतिकूल परिस्थितींना परवानगी देतो. आशीर्वाद मिळण्याआधी याकोबाला संपूर्ण रात्रभर देवदूताशी झगडावे लागले. (उत्पत्ति ३२:२४-२६) काही वेळा आपण योग्यप्रकारे वागत असूनही आपल्याला प्रतिकूल परिणामांशी झगडावे लागू शकते. पण, देवाच्या इच्छेच्या एकवाक्यतेत आपले निर्णय असल्यास तो आपल्याला तग धरून राहण्यास मदत करील आणि शेवटी आशीर्वादित करील अशी शाश्वती आपण बाळगू शकतो.—२ करिंथकर ४:७.
यास्तव, महत्त्वपूर्ण निर्णय घेताना आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नका. बायबलमधील समर्पक तत्त्वे शोधा. त्या विषयाबद्दल यहोवाशी प्रार्थनेत बोला. शक्य असल्यास, प्रौढ सह-ख्रिश्चनांचा सल्ला घ्या. धैर्य एकवटा. देवाने दिलेल्या इच्छा स्वातंत्र्याचा जबाबदारीने उपयोग करा. योग्य निर्णय घ्या आणि तुमचे अंतःकरण सरळ आहे हे यहोवाला प्रकट करा.
[२८ पानांवरील चित्र]
महत्त्वाचे निर्णय घेण्याआधी देवाच्या वचनाचे मार्गदर्शन घ्या
[२८, २९ पानांवरील चित्रे]
तुम्हाला घ्याव्या लागणाऱ्या निर्णयांविषयी यहोवाशी प्रार्थनेत बोला
[३० पानांवरील चित्र]
प्रौढ ख्रिश्चनांसोबत तुम्ही आपल्या महत्त्वपूर्ण निर्णयांविषयी चर्चा करू शकता