व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

कलस्सैकर १:१६ देवाच्या पुत्राविषयी असे म्हणते की, “सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले आहे.” सर्व काही देवाचा पुत्र, येशू “त्याच्यासाठी” निर्माण करण्यात आले हे कोणत्या अर्थाने?

खुद्द येशूचा अपवाद वगळता इतर सर्व गोष्टी निर्माण करण्यासाठी यहोवाने आपल्या या एकुलत्या एक पुत्राचा कुशल कारागीर म्हणून उपयोग केला. (नीतिसूत्रे ८:२७-३०; योहान १:३) साहजिकच, पुत्राला या कार्यांतून आनंद प्राप्त होतो आणि या अर्थाने ते “त्याच्यासाठी” आहेत.

जन्म दिलेल्या मुलांपासून आनंद मिळण्याची अपेक्षा मानवी पालक करतात आणि सहसा त्यांना आनंद मिळतो. म्हणूनच, बायबलमध्ये “[पित्याच्या] जिवाला हर्ष देणाऱ्‍या” मुलाविषयी सांगितले आहे. (नीतिसूत्रे ३:१२; २९:१७) त्याचप्रमाणे, यहोवा देवाचे इस्राएल लोक त्याला विश्‍वासू होते तेव्हा त्याला आनंद मिळत असे. (स्तोत्र ४४:३; ११९:१०८; १४७:११) आपल्या काळापर्यंत विश्‍वासू असलेल्या निष्ठावान लोकांमुळेही त्याला आनंद मिळतो.—नीतिसूत्रे १२:२२; इब्री लोकांस १०:३८.

अशाचप्रकारे आपला सहकर्मी येशू याने जे काही साध्य केले त्यातून त्याला आनंद मिळावा असे यहोवाला वाटणे योग्यच आहे. नीतिसूत्रे ८:३१ म्हणते की, पुत्र ‘पृथ्वीवर हर्ष करी आणि मनुष्यजातीच्या ठायी आनंद पावे.’ या अर्थी, कलस्सैकर १:१६ म्हणते की: “सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले आहे.” (तिरपे वळण आमचे.)