व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ज्यांच्यापर्यंत पोचणे कठीण अशांना भेटणे

ज्यांच्यापर्यंत पोचणे कठीण अशांना भेटणे

राज्य घोषकांचा वृत्तान्त

ज्यांच्यापर्यंत पोचणे कठीण अशांना भेटणे

यहोवाचे साक्षीदार शक्यतो सर्वांना राज्याचा संदेश सांगण्याचा प्रयत्न करतात. जे सहसा घरी नसतात अशा लोकांना भेटण्यासाठी कधीकधी फार प्रयत्न करावा लागतो. (मार्क १३:१०) या संदर्भात दक्षिण अमेरिकेतील एका देशात खास पायनियर म्हणून सेवा करणाऱ्‍या बांधवाने पुढील अनुभव सांगितला.

“मला व माझ्या पत्नीला ज्या क्षेत्रात नेमण्यात आले होते त्या भागाला राज्यपाल भेट देणार असल्याचे एकदा माझ्या ऐकण्यात आले. ते निश्‍चितच अशा लोकांपैकी होते जे सहसा घरी नसतात. म्हणून, मी त्यांना एक पत्र लिहिले आणि त्यासोबत देव आपल्याकडून काय अपेक्षितो? हे माहितीपत्रक, तसेच मानवांनी केलेला देवाचा शोधसार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान ही पुस्तके देखील पाठवली. शिवाय या प्रत्येक प्रकाशनाचा काय उद्देश आहे हे मी माझ्या पत्रात स्पष्ट केले.

“ती प्रकाशने वाचल्यानंतर राज्यपालांची काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घेण्याच्या कुतूहलापोटी मी त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची विनंती केली. काही आठवड्यांनंतर मला त्यांना भेटण्याची परवानगी मिळाली. मी आपल्यासोबत जेहोवाज विटनेसेस—दी ऑर्गनायझेशन बिहाइन्ड द नेम ही व्हिडिओ कॅसेट देखील नेली. आमची भेट दोन तास चालली. राज्यपालांसोबत व्हिडिओ पाहिल्यानंतर मी त्यांना त्यांचे मत व्यक्‍त करण्याची विनंती केली. त्यांनी उत्तर दिले: ‘पृथ्वीवर तुमच्यासारखी दुसरी संस्था नाही. माझे सरकारी प्रकल्प पूर्ण करण्यास मला तुमच्यासारख्या लोकांचे साहाय्य मिळाले असते तर किती बरे झाले असते!’ मग त्यांनी, मी कधी आपल्या संस्थेच्या जागतिक मुख्यालयाला भेट दिली आहे का असे विचारले. मी त्यांना सांगितले की मी चौदा वर्षांचा असल्यापासून ते माझ स्वप्न होते; पण आजपर्यंत ब्रुकलिन, न्यू यॉर्क येथील जागतिक मुख्यालयाला भेट देण्याचा योग मला आलेला नव्हता. कारण, हे स्वप्न पुरे करणे थोडे कठीणच होते. ते क्षणभर माझ्याकडे टक लावून पाहात राहिले. मग ते म्हणाले की माझे स्वप्न पूर्ण व्हावे अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी आम्हाला कायदेशीर परवाना इत्यादी मिळवून दिला आणि विमानची तिकीटे भेट म्हणून दिली!

“राज्यपालांना नियमितपणे टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिके पाठवली जात आहेत. आम्हाला लवकरच त्यांच्यासोबत बायबल अभ्यास सुरू करता येईल अशी आम्ही आशा करतो.”