व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ताडाच्या झाडापासून धडा

ताडाच्या झाडापासून धडा

ताडाच्या झाडापासून धडा

“असाधारण सौंदर्याची डौलदार प्रतिमा.” अशाप्रकारे एका बायबल विश्‍वकोशात खजुराच्या झाडाचे वर्णन केले आहे. बायबलच्या काळात आणि आजही, ईजिप्तमधील नाईल खोरे खुजराच्या झाडांनी नटलेले आहे; त्यांच्यामुळे नेगेव्ह वाळवंटातील ओएसिसभोवती विसाव्यासाठी सावली मिळते.

बहुतेक ताडाच्या जातींप्रमाणे खुजराचे झाडही सरळ वाढते. काही झाडे तर चक्क ३० मीटर उंच होतात आणि १५० वर्षांपर्यंत फळ देत राहतात. होय, खुजराचे झाड डोळ्यांना सुखावह आणि त्याच्या फळाचे उत्पन्‍नही आश्‍चर्यजनक आहे. दरवर्षी त्याला खजुराचे पुष्कळ गुच्छ येतात. एका गुच्छात १,००० पेक्षा अधिक खजूर असू शकतात. खजुरांविषयी एका जाणकार व्यक्‍तीने असे लिहिले: “ज्यांनी . . . फक्‍त दुकानांमध्ये मिळणारे वाळवलेले खजूर खाल्ले आहेत त्यांना ताजे खजूर किती चविष्ट असतात याची कल्पना देखील करता येणार नाही.”

उचितपणे, बायबलमध्ये विशिष्ट मानवांची तुलना ताडाच्या झाडांशी करण्यात आली आहे. देवाच्या नजरेत फलदायी ताडाच्या झाडासारखे संतोषकारक असण्यासाठी एका व्यक्‍तीने सरळ मार्गाने चालावे आणि उत्तम कार्ये करत राहावे. (मत्तय ७:१७-२०) याच कारणास्तव, शलमोनाच्या मंदिरात आणि यहेज्केलाच्या दृष्टान्तातील मंदिरातही ताडाच्या झाडांच्या कोरलेल्या चित्रांनी सजावट केलेली आढळते. (१ राजे ६:२९, ३२, ३५; यहेज्केल ४०:१४-१६, २०, २२) त्यामुळे, एखाद्याची उपासना देवाला स्वीकारणीय असण्यासाठी त्याच्याकडे खजुराच्या झाडासारखे इष्ट गुण असले पाहिजेत. देवाचे वचन म्हणते: “नीतिमान खजुरीसारखा समृद्ध होईल.”—स्तोत्र ९२:१२.