निष्ठावान असण्याचा काय अर्थ होतो?
निष्ठावान असण्याचा काय अर्थ होतो?
सा.यु.पू. दुसऱ्या शतकातील यहुदी हशिदीम पंथाचे लोक स्वतःला खरोखर निष्ठावान समजत होते. त्यांचे नाव “निष्ठा” यासाठी असलेल्या खासीद या मूळ इब्री शब्दावरून आले आहे. हा शब्द खेसेद या नामापासून बनला आहे आणि या शब्दाचे “प्रेमदया,” “एकनिष्ठ प्रेम,” “दयाळुपणा,” “चांगुलपणा,” आणि “दया” असे भाषांतर केले जाते. थियॉलॉजिकल डिक्शनरी ऑफ दी ओल्ड टेस्टमेन्ट यानुसार खेसेद हा शब्द “उत्साहपूर्ण, समाजप्रिय आणि टिकाऊ स्वरूपाचा असून केवळ एका मानवी प्रवृत्तीसच नव्हे तर त्या प्रवृत्तीमुळे घडून येणाऱ्या कृतीसही सूचित करतो. ही एक अशी कृती आहे जिच्यामुळे जीवनाचे रक्षण व संवर्धन होते. एखाद्यावर अरिष्ट अथवा संकट आले असता तिला मदत करण्याची ही कृती आहे. ती मैत्रीभाव प्रदर्शित करते.”
साहजिकच, बायबलमध्ये वापरल्याप्रमाणे या इब्री शब्दाच्या सर्व छटा ज्यात सामावल्या असतील असा एक शब्द बऱ्याच भाषांत आढळत नाही. एवढे मात्र आठवणीत ठेवण्याजोगे आहे, की बायबलमध्ये वापरल्यानुसार निष्ठा या शब्दाचा अर्थ केवळ दिलेल्या वचनाचे विश्वासूपणे पालन करणे इतकाच नाही. तर त्यात स्नेहभाव आणि इतरांच्या फायद्याकरता केलेल्या सकारात्मक कृतीचाही समावेश आहे. खऱ्या निष्ठेचा अर्थ समजून घेण्यासाठी, यहोवाने अब्राहाम, मोशे, दावीद, इस्राएल राष्ट्र व सबंध मानवजातीशी व्यवहार करताना हा गुण कशाप्रकारे प्रदर्शित केला हे विचारात घ्या.
यहोवाने दाखवलेली निष्ठा
यहोवाने आपला मित्र अब्राहाम याला सांगितले: “मी तुझी ढाल आहे.” (उत्पत्ति १५:१; यशया ४१:८) यहोवा केवळ बोलण्यासाठी असे बोलत नव्हता. तर त्याने अब्राहामला व त्याच्या घराण्याला फारोपासून व अबीमलेखपासून वाचवले व संकटातून त्यांची सुटका केली. लोटवर चार राजांनी मिळून हल्ला केला व अब्राहाम त्याला मदत करायला गेला तेव्हा यहोवाने अब्राहामाला साहाय्य केले. यहोवाने १०० वर्षांचा अब्राहाम व ९० वर्षांची साराह यांना त्यांची प्रजनन क्षमता परत दिली जेणेकरून प्रतिज्ञात वंश त्यांच्याद्वारे जन्माला येऊ शकेल. यहोवा नियमितपणे अब्राहामशी दृष्टान्त, स्वप्न, व देवदूत यांच्याद्वारे संवाद करत असे. किंबहुना, अब्राहाम जिवंत असताना आणि त्याचा मृत्यू होऊन बराच काळ लोटल्यावरही यहोवाने त्याच्याविषयी निष्ठा प्रदर्शित केली. येणाऱ्या अनेक शतकांत त्याने अब्राहामाच्या वंशजांना, अर्थात इस्राएल राष्ट्राला केलेल्या प्रतिज्ञा (ते त्याच्या मार्गात टिकून राहिले नाही तरीसुद्धा) पूर्ण केल्या. अब्राहामशी असलेला यहोवाचा नातेसंबंध, खरी निष्ठा काय असते ते दाखवून देतो, अर्थात कृतीतून व्यक्त केलेले प्रेम.—उत्पत्ति, अध्याय १२-२५.
“मित्रांशी बोलावे तसे परमेश्वर मोशेशी समोरासमोर बोले” असे म्हणण्यात आले. (तिरपे वळण आमचे.) (निर्गम ३३:११) होय, मोशेचा यहोवाशी जितका घनिष्ट नातेसंबंध होता तितका येशू ख्रिस्ताच्या आधी इतर कोणत्याही संदेष्ट्याशी नव्हता. यहोवा मोशेला कशाप्रकारे निष्ठावान राहिला?
मोशे ४० वर्षांचा असताना, त्याने स्वतःच्याच शक्तीवर व बुद्धीवर भरवसा ठेवून आपल्या प्रेषितांची कृत्ये ७:२३-३०) पण एवढे होऊनही यहोवाने त्याला त्यागले नाही. योग्य वेळ आल्यावर इस्राएलला इजिप्तपासून सोडवण्याकरता मोशेला परत आणण्यात आले.
लोकांना सोडवण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली. पण असे करण्याची वेळ अजून आलेली नव्हती. त्याला आपला जीव वाचवण्यासाठी पळ काढावा लागला. चाळीस वर्षे त्याने मिद्यानात मेंढरे राखण्याचे काम केले. (त्याचप्रकारे, यहोवाने इस्राएलचा सुप्रसिद्ध दुसरा राजा दावीद याला देखील निष्ठा दाखवली. दावीद कोवळ्या वयाचा असतानाच यहोवाने शमुवेल संदेष्ट्याला सांगितले: “ऊठ, त्यास अभिषेक कर, हाच तो आहे.” तेव्हापासून, दावीद सबंध इस्राएलचे राज्यत्व सांभाळण्याकरता परिपक्व होत गेला तसतसे यहोवाने निष्ठावानपणे त्याचे संरक्षण केले व त्याला मार्गदर्शन पुरवले. यहोवाने त्याला “सिंहाच्या व अस्वलाच्या पंजांतून” व पलिष्टी राक्षस गल्याथ याच्यापासूनही सोडवले. त्याने दावीदाला इस्राएलच्या शत्रूंवर एकापाठोपाठ एक विजय मिळवून दिला आणि त्याचा द्वेष करणाऱ्या मत्सरी शौलाच्या भाल्यापासूनही दाविदाचे रक्षण केले.—१ शमुवेल १६:१२; १७:३७; १८:११; १९:१०.
अर्थात, दावीद काही परिपूर्ण नव्हता. किंबहुना त्याने अतिशय घोर पाप केले. पण यहोवाने त्याला सोडून दिले नाही. दाविदाने मनापासून खरा पश्चात्ताप केला तेव्हा यहोवाने त्याच्याप्रती निष्ठावान प्रेम दाखवले. दाविदाच्या सबंध जीवनात यहोवाने वारंवार त्याच्या जीवनाचे संरक्षण व संवर्धन केले. तो संकटात असताना यहोवाने त्याला मदत केली. ही त्याची प्रेमळ कृपाच होती!—२ शमुवेल ११:१–१२:२५; २४:१-१७.
सीनाय पर्वताच्या पायथ्याशी इस्राएल राष्ट्राने मोशेच्या नियमशास्त्रानुसार वागण्यास संमती दर्शवली तेव्हा त्यांचा यहोवासोबत एक खास समर्पित नातेसंबंध जोडला गेला. (निर्गम १९:३-८) त्यामुळे इस्राएल राष्ट्राचे यहोवासोबत वैवाहिक बंधन होते असे त्याविषयी म्हणण्यात आले. इस्राएलविषयी असे म्हणण्यात आले: “बायकोला [बोलवावे] तसे यहोवाने तुला बोलावले आहे.” आणि यहोवाने इस्राएल राष्ट्राला म्हटले: “मी सर्वकाळच्या प्रेमदयेने तुझ्यावर दया करीन.” (यशया ५४:६, ८, पं.र.भा.) यहोवाने या खास नातेसंबंधात कशाप्रकारे निष्ठा दाखवली?
यहोवाने इस्राएल लोकांच्या गरजा भागवण्यासाठी व त्यांच्यासोबत आपला संबंध दृढ करण्यासाठी पुढाकार घेतला. त्याने त्यांना ईजिप्तच्या गुलामीतून सोडवले, एक राष्ट्र या नात्याने त्यांना संघटित केले आणि “दुधामधाचे प्रवाह जेथे वाहत आहेत अशा देशात” त्यांना आणले. (निर्गम ३:८) याजक, लेवी आणि वारंवार संदेष्टे व संदेशवाहक पाठवून यहोवाने त्यांना नियमित आध्यात्मिक मार्गदर्शन पुरवले. (२ इतिहास १७:७-९; नहेम्या ८:७-९; यिर्मया ७:२५) इस्राएल राष्ट्र इतर देवतांची उपासना करू लागल्यास यहोवा त्यांचे ताडन करायचा. त्यांनी पश्चात्ताप केल्यावर तो क्षमा करायचा. इस्राएल राष्ट्र, जिच्यासोबत नांदणे कठीण आहे अशा ‘बायकोसारखे’ होते. तरीसुद्धा, यहोवाने त्याला लगेच त्यागले नाही. अब्राहामला केलेल्या प्रतिज्ञांमुळेच, इस्राएल लोकांसंबंधी आपले उद्देश पूर्ण होईपर्यंत यहोवा त्यांच्याशी एकनिष्ठतेने जडून राहिला. (अनुवाद ७:७-९) आजच्या काळातील विवाहित लोकांकरता हे किती उत्तम उदाहरण आहे!
यहोवा संपूर्ण मानवजातीलाही निष्ठा दाखवत आहे. तो धार्मिक व अधार्मिक अशा सर्व लोकांच्या मूलभूत गरजा भागवतो. (मत्तय ५:४५; प्रेषितांची कृत्ये १७:२५) त्याहून महत्त्वाचे म्हणजे, सबंध मानवजातीला पाप व मृत्यूच्या बंधनातून मुक्त होण्याची संधी मिळावी आणि परादीस पृथ्वीवर परिपूर्ण सार्वकालिक जीवन उपभोगण्याची वैभवी आशा मिळावी म्हणून त्याने आपल्या पुत्राचे खंडणी बलिदान दिले आहे. (मत्तय २०:२८; योहान ३:१६) जीवनाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी खंडणीची तरतूद करणे ही एक सर्वश्रेष्ठ कृती होती. आणि खरोखरच “एखाद्यावर अरिष्ट अथवा संकट आले असता तिला मदत करण्याची” ही कृती होती.
सकारात्मक कृतींतून निष्ठा प्रदर्शित करा
निष्ठा म्हणजेच प्रेमदया आणि यात देवाणघेवाणीची भावना देखील समाविष्ट आहे. तुमच्याशी कोणी प्रेमदयेने वागल्यास, तुमच्याकडूनही तीच अपेक्षा केली जाऊ शकते. निष्ठेची परतफेड निष्ठेनेच केली जाते. खेसेद या शब्दाच्या वेगवेगळ्या अर्थछटा दाविदाला समजल्या होत्या असे आपण त्याच्या पुढील शब्दांवरून म्हणू शकतो: “तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून मी तुझी उपासना करीन . . . तुझ्या नावाचे उपकारस्मरण करीन.” का? “तुझ्या दयेमुळे व तुझ्या सत्यामुळे.” (स्तोत्र १३८:२) यहोवाची प्रेमदया अनुभवलेल्या दाविदाला साहजिकच त्याची उपासना व उपकारस्तुती करण्याची प्रेरणा झाली. त्याचप्रकारे यहोवाने आपल्याला कोणकोणत्याप्रकारे प्रेमदया दाखवली आहे याचा आपण विचार करतो तेव्हा आपल्यालाही तेच करण्याची प्रेरणा होते का? उदाहरणार्थ यहोवाच्या नावावर कोणी लांछन लावल्यास, त्याच्या नावाविषयी असलेला आवेश तुम्हाला त्याचे समर्थन करण्याची आपोआपच प्रेरणा देतो का?
नवीनच सत्यात आलेल्या एका दांपत्याला हाच अनुभव आला. मोटरसायकल अपघातात निधन झालेल्या एक नातलगाच्या अंत्यविधीला ते दोघे गेले होते. ही काही धार्मिक सभा नव्हती, त्यामुळे उपस्थितांपैकी कोणाला मयताबद्दल दोन शब्द बोलायचे असल्यास ते बोलू शकतात असे सांगण्यात आले. एका व्यक्तीने पुढे जाऊन सदर तरुणाच्या मृत्यूसाठी देवाला जबाबदार ठरवले व म्हटले: ‘देवाला तो स्वर्गात हवा होता म्हणून त्याने त्याला नेले.’ आपल्या ख्रिस्ती बांधवाला राहावले नाही. बायबल किंवा काही नोट्स नसतानाही ते सर्वांपुढे गेले. त्यांनी सर्वांना विचारले, “एक दयाळू, सहानुभूतीशील व सर्वसमर्थ देव अशा घटनांना संमती देईल असे तुम्हाला वाटते का?” मग त्याने बायबलमधील काही उतारे उद्धृत करून दहा मिनिटांचे आयत्या वेळी तयार केलेले भाषण दिले; मनुष्य का मरतो, देवाने मानवजातीला मृत्यूपासून सोडवण्याकरता काय तरतूद केली आहे आणि पुनरुत्थान होऊन परादीस पृथ्वीवर सार्वकालिक जीवन उपभोगण्याच्या विलक्षण आशेविषयी त्याने या लहानशा भाषणात समजावून सांगितले. तेथे उपस्थित असलेल्या १०० जणांनी बराच वेळपर्यंत टाळ्या वाजवून कौतुक व्यक्त केले. या घटनेची आठवण सांगताना बंधू म्हणाले: “मला आतून एकप्रकारचा आनंद जाणवत होता जो मी यापूर्वी कधीही अनुभवला नव्हता. यहोवाने आपल्या बुद्धीने मला मार्गदर्शन दिल्याबद्दल आणि त्याच्या पवित्र नावाचे समर्थन करण्याची संधी दिल्याबद्दल मी मनोमन त्याचे आभार मानले.”
यहोवाला निष्ठावान राहणे याचा अर्थ त्याच्या वचनाला अर्थात बायबलला देखील निष्ठावान राहणे. का? कारण आपण कसे जगावे हे यहोवा बायबलमधूनच आपल्याला शिकवतो. त्यातील नियम व तत्त्वे जीवनाकरता असलेल्या सर्वात उत्कृष्ट आणि सर्वात उपयोगी सूचना आहेत. (यशया ४८:१७) इतरांच्या दबावामुळे किंवा स्वतःच्या कमकुवतपणामुळे तुमच्या हातून कधीही यहोवाच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्या. देवाच्या वचनाला निष्ठावान राहा.
देवाला निष्ठावान राहण्याचा अर्थ त्याच्या संघटनेलाही निष्ठावान राहणे. आवश्यकतेनुसार, मागील वर्षांत काही वचनांच्या अर्थबोधाविषयी काही सुधारणा आणि फेरबदल करावे लागले आहेत. पण वस्तूस्थिती अशी आहे की आध्यात्मिकदृष्ट्या आपल्याइतके तृप्त आणखी कोणीही नसेल. (मत्तय २४:४५-४७) यहोवा आपल्या आधुनिक काळातील संघटनेशी जडून राहिला आहे यात शंका नाही. आपणही हेच करू शकत नाही का? याबाबतीत ए. एच. मॅकमिलन यांचा आदर्श आपल्यापुढे आहे. त्यांच्या मृत्यूच्या काही काळाआधी त्यांनी म्हटले: “१९०० साली वयाच्या तेविसाव्या वर्षी माझा बाप्तिस्मा झाला तेव्हापासून देवाच्या अगदी लहानशा संघटनेची वाढ होऊन सत्याच्या आवेशी उद्घोषकांचा जागतिक समाज बनलेला मी पाहिला आहे. . . . पृथ्वीवर देवाची सेवा करण्याचा माझा काळ संपत आला आहे. पण मला कधी नव्हती इतकी आता खात्री पटली आहे की यहोवाने आजपर्यंत आपल्या लोकांचे मार्गदर्शन केले आहे आणि त्यांना यथाकाळी जे आवश्यक होते ते दिले आहे.” २६ ऑगस्ट, १९६६ रोजी त्यांचा मृत्यू होईपर्यंत बंधू मॅकमिलन यांनी विश्वासूपणे व निष्ठावानपणे जवळजवळ ६६ वर्षे यहोवाची सेवा केली. देवाच्या दृश्य संघटनेला निष्ठावान राहण्यात त्यांनी एक उत्कृष्ट उदाहरण आपल्यापुढे ठेवले.
संघटनेला निष्ठावान राहण्यासोबतच आपण एकमेकांनाही निष्ठावान राहू का? निर्घृण छळाला तोंड देण्याचा धोका पत्करून आपण आपल्या बंधू व भगिनींना एकनिष्ठ राहू का? दुसऱ्या जागतिक महायुद्धादरम्यान नेदरलंड येथील आपल्या बांधवांनी याबाबतीत उत्तम उदाहरण मांडले. ग्रोनिन्गन मंडळीचे बंधू क्लास दे राइस यांच्याकडून माहिती काढण्याच्या प्रयत्नात नात्सी गेस्टापोने त्यांना क्रूर व निर्दय वागणूक दिली व त्यानंतर त्यांना एकांतवासाच्या कोठडीत डांबले; येथे त्यांना १२ दिवस फक्त ब्रेड व पाणी देण्यात आले आणि मग पुन्हा त्यांची उलटतपासणी घेतली गेली. त्यांच्यावर बंदूक रोखण्यात आली आणि दोन मिनिटांच्या आत जबाबदार बांधवांविषयी व इतर महत्त्वाच्या गोष्टींविषयी माहिती न दिल्यास मारून टाकले जाईल अशी त्यांना धमकी दिली. क्लास त्यांना केवळ इतकेच उत्तर द्यायचे: “मी काहीही बोलणार नाही . . . मी गद्दारी करणार नाही.” अशाप्रकारे त्यांना तीन वेळा रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवण्यात आला. शेवटी गेस्टापोने हार मानली आणि क्लास यांना दुसऱ्या तुरुंगात डांबण्यात आले. पण त्यांनी कधीच आपल्या बांधवांचा विश्वासघात केला नाही.
आपला ज्याच्याशी सर्वात जवळचा संबंध आहे त्याला, अर्थात आपल्या वैवाहिक सोबत्याला आपण निष्ठावान राहू का? इस्राएल राष्ट्रासोबत असलेल्या कराराच्या नातेसंबंधाचा जसा यहोवाने मान राखला त्याचप्रकारे आपणही आपल्या विवाह शपथांना निष्ठावान राहू का? पूर्णपणे विश्वासू राहण्यासोबतच, तुमच्या वैवाहिक सोबत्याशी घनिष्ठ नातेसंबंध टिकवून ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करा. आपल्या विवाहात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्या. एकमेकांच्या सहवासात वेळ घालवा, एकमेकांशी स्वाभाविकपणे आणि मनमोकळेपणाने बोला, एकमेकांना आधार व प्रोत्साहन द्या, एकमेकांचे ऐकून घ्या; एकमेकांची सुखदुःखे वाटून घ्या, दोघे मिळून मौज करा, समान ध्येये गाठण्याचा जोडीने प्रयत्न करा, एकमेकांना खूष करण्याचा प्रयत्न करा, एकमेकांचे मित्र व्हा. जोडीदाराशिवाय दुसऱ्या व्यक्तीविषयी आकर्षण निर्माण न होऊ देण्याची खास खबरदारी घ्या. इतरांशी परिचय वाढवण्यात आणि घनिष्ठ मैत्री करण्यातही काही चुकीचे नाही, पण प्रणयाच्या भावना केवळ तुमच्या जोडीदारापर्यंतच मर्यादित असाव्यात. तुमच्या व तुमच्या जोडीदाराच्या मध्ये इतर कोणालाही येऊ देऊ नका.—नीतिसूत्रे ५:१५-२०.
विश्वासातील आपल्या स्नेह्यांना आणि आपल्या कुटुंबियांना निष्ठावान राहा. काही वर्षांनंतर त्यांना विसरून जाऊ नका. त्यांच्याशी पत्राद्वारे, दूरध्वनीद्वारे किंवा प्रत्यक्ष भेटीद्वारे संपर्क कायम ठेवा. जीवनाच्या प्रवासात तुमच्या दिशा बदलल्या तरीसुद्धा त्यांना कधीही निराश करू नका. तुमच्यासोबत आपली ओळख किंवा नाते आहे असे त्यांना आनंदाने म्हणता आले पाहिजे. तुम्ही त्यांना निष्ठावान राहिला तर तुम्हाला नेहमी सत्याच्या मार्गावर चालण्याचे सामर्थ्य व प्रोत्साहन मिळेल.—एस्तेर ४:६-१६.
होय खरी निष्ठा दाखवण्यात मौल्यवान नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी केलेल्या सकारात्मक कृतींचा समावेश होतो. यहोवाने दाखवलेल्या प्रेमदयेची परतफेड करण्याचा आपल्या परीने प्रयत्न करा. ख्रिस्ती मंडळीशी, तुमच्या वैवाहिक जोडीदाराशी, कुटुंबियांशी व स्नेह्यांशी व्यवहार करताना यहोवाच्या एकनिष्ठतेचे अनुकरण करा. यहोवाच्या अद्भुत गुणांविषयी तुमच्या शेजाऱ्यांना निष्ठावानपणे सांगा. स्तोत्रकर्त्याने जे म्हटले ते अगदी योग्य होते: “परमेश्वराच्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन; मी आपल्या मुखाने पिढ्यान्पिढ्यांना तुझी सत्यता कळवीन.” (स्तोत्र ८९:१) अशा देवाकडे आपणही आकर्षित होणार नाही का? खरोखर “त्याची दया सनातन आहे.”—स्तोत्र १००:५.
[२३ पानांवरील चित्र]
ए. एच. मॅकमिलन