झाडांचे वैरी
झाडांचे वैरी
बायबल काळांत, झाडांना मौल्यवान समजले जायचे. उदाहरणार्थ अब्राहाम, आपली प्रिय पत्नी सारा हिला पुरण्यासाठी जमीन विकत घेत असताना, त्या जागेवरील झाडांचे देखील त्याने पैसे मोजले.—उत्पत्ति २३:१५-१८.
तसेच आजही, झाडांना बरेच मौल्यवान समजले जाते व आंतरराष्ट्रीय पातळीवर जंगलांच्या संरक्षणावर लक्ष केंद्रित केले जाते. जगाची दशा १९९८ (इंग्रजी), हे पुस्तक म्हणते: “उत्तरेकडील देशांतील लोकांना उष्णप्रदेशांतील जंगलांविषयी चिंता असली तरी त्यांना हे माहीत नसेल, की त्यांच्याच देशांतील समशीतोष्ण प्रदेशांतील जंगले वेगवेगळ्या ठिकाणी आहेत व सर्व प्रकारच्या जंगलांतील वृक्षांवर हानीकारक प्रभाव होत आहे.” युरोप व उत्तर अमेरिकेसारख्या उत्तरेकडील देशांतील जंगलांना कशापासून धोका आहे? पुष्कळ लोक, मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वृक्षतोडीला जबाबदार ठरवत असले तरी, अशी अनेक कारणे आहेत ज्यांमुळे झाडे हळूहळू नष्ट होत आहेत. ही कोणती कारणे आहेत? हवेतील प्रदूषण आणि ॲसिडचा पाऊस. प्रदूषण वाढवणाऱ्या या दोन गोष्टींमुळे झाडे हळूहळू इतकी कमकुवत होतात की त्यांच्यात कीड व रोगांपासून संरक्षण करण्याची शक्तीच उरत नाही.
अनेक दशकांपासून, पर्यावरणवादी आणि संबंधित इतर नागरिक, पृथ्वीच्या परिस्थितीकीचे संरक्षण करण्याची अत्यंत गरज असल्याचा इशारा देत आले आहेत. १९८० च्या दशकात, जर्मनीतील वैज्ञानिकांनी पर्यावरणावर, हवेचे प्रदुषण आणि ॲसिडचा पाऊस यांच्या दुष्परिणामांचा अभ्यास केल्यावर असा निष्कर्ष काढला, की ‘वर्ष २००० पर्यंत काही ठोस पावले उचलण्यात आली नाहीत तर लोक, फक्त फोटोंमध्ये व चित्रपटांमध्येच जंगले पाहू शकतील.’ परंतु पृथ्वीत पुनर्जीवनाची क्षमता असल्यामुळेच ती आतापर्यंत भाकीत केलेल्या संकटांमध्येही टिकून राहू शकली.
परंतु फार लवकर देव, आपल्या परिस्थितीकीचे संरक्षण करण्यासाठी पावले उचलणार आहे. “तो आपल्या माड्यांवरून पर्वतांवर जलसिंचन करितो” व “जनावरांसाठी गवत आणि मनुष्याच्या उपयोगासाठी वनस्पति उगवितो.” आणि, “पृथ्वीची नासाडी करणाऱ्यांचा नाश” करण्याचे त्याने वचन दिले आहे. (स्तोत्र १०४:१३, १४; प्रकटीकरण ११:१८) पृथ्वीवरील रहिवाश्यांना प्रदुषण मुक्त जगात अनंतकाळ जगण्याची संधी मिळेल तेव्हा तो खराच सुकाळ असेल!—स्तोत्र ३७:९-११.