“परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धि देतो”
“परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धि देतो”
आपण सर्व जण आशीर्वादाची इच्छा करतो. द अमेरिकन हेरिटेज कॉलेज डिक्शनरी म्हणते, की आशीर्वादामुळे “आनंद मिळतो, एखाद्याचे कल्याण होते, समृद्धता प्राप्त होते.” यहोवा “प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान” देणारा आपला प्रेमळ निर्माणकर्ता असल्यामुळे, प्रत्येक खरा व चिरकाल आशीर्वाद त्याच्याकडूनच येतो. (याकोब १:१७) तो सर्व मानवजातीवर, त्याला ओळखत नसलेल्या लोकांवरही आशीर्वादांचा वर्षाव करतो. येशू आपल्या पित्याविषयी असे म्हणाला: “तो वाइटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगवितो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडितो.” (मत्तय ५:४५) परंतु, जे त्याच्यावर प्रेम करतात अशांची यहोवाला खास काळजी आहे.—अनुवाद २८:१-१४; ईयोब १:१; ४२:१२.
स्तोत्रकर्त्याने लिहिले: “जे सात्विकपणे चालतात त्यांना उत्तम दिल्यावाचून [यहोवा] राहणार नाही.” (स्तोत्र ८४:११) होय, यहोवाची सेवा करणाऱ्यांचे जीवन अर्थपूर्ण असते. “परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धि देतो, तिच्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही” याची त्यांना खात्री पटलेली आहे. बायबलमध्ये असेही म्हटले आहे, की “ज्यांना त्याचा आशीर्वाद प्राप्त होतो ते पृथ्वीचे वतन पावतील.” (नीतिसूत्रे १०:२२; स्तोत्र ३७:२२, २९) होय, केवढा तो महान आशीर्वाद असेल!
आपण यहोवाचे आशीर्वाद कसे मिळवू शकतो? एक गोष्ट म्हणजे, आपण त्याला संतुष्ट करणारे गुण स्वतःमध्ये विकसित केले पाहिजेत. (अनुवाद ३०:१६, १९, २०; मीखा ६:८) प्राचीन काळच्या यहोवाच्या तीन सेवकांच्या उदाहरणावरून आपण हे पाहू शकतो.
यहोवा आपल्या सेवकांना आशीर्वादित करतो
नोहा देवाचा उल्लेखनीय सेवक होता. उत्पत्ति ६:८ येथे आपण असे वाचतो: “नोहावर परमेश्वराची कृपादृष्टि होती.” का? कारण नोहा आज्ञाधारक होता. त्याच्याविषयीचा अहवाल सांगतो, की “नोहा देवाबरोबर चालला.” नोहाने यहोवाच्या धार्मिक तत्त्वांचे अनुकरण केले व त्याच्या आज्ञांचे पालन केले. नोहाच्या काळातील जग हिंसा आणि दुष्टपणा करण्यात गुंगले होते परंतु ‘नोहा, देवाने त्याला जे काही सांगितले ते करत होता.’ ‘त्याने तसेच केले.’ (उत्पत्ति ६:९, २२) यामुळे, “आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी” एक जहाज बांधायला यहोवाने नोहाला सांगितले. (इब्री लोकांस ११:७) अशाप्रकारे, नोहा आणि त्याचे कुटुंब—आणि त्यांच्याद्वारे उत्पन्न झालेला मानववंश—त्या पिढीच्या नाशापासून बचावला. पृथ्वीवरील परादीसात अनंतकालिक जीवनाची आशा मनी बाळगून नोहा मरण पावला. त्याला किती समृद्ध आशीर्वाद मिळाले!
अब्राहामकडे देखील यहोवाला संतोषविणारे गुण होते. यांतील प्रमुख गुण होता, विश्वास. (इब्री लोकांस ११:८-१०) ऊर आणि मग हारान येथील सुखासीन जीवन अब्राहामने सोडून दिले कारण, तुझी संतती द्विगुणित होईल आणि तिच्याद्वारे सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळतील या यहोवाने दिलेल्या आशीर्वादावर त्याचा विश्वास होता. (उत्पत्ति १२:२, ३) अनेक वर्षांच्या त्याच्या विश्वासाच्या परिक्षेनंतर त्याला इसहाक नावाचा पुत्र झाला तेव्हा त्याला त्याच्या विश्वासाचे प्रतिफळ मिळाले. इसहाकाद्वारे अब्राहाम देवाचे निवडलेले राष्ट्र इस्राएलाचा व कालांतराने मशिहाचा पूर्वज बनला. (रोमकर ४:१९-२१) शिवाय, जे ‘विश्वास ठेवतात, त्या सर्वांचा तो पिता’ आहे आणि त्याला “देवाचा मित्र” असेही संबोधण्यात आले आहे. (रोमकर ४:११; याकोब २:२३; गलतीकर ३:७, २९) किती अर्थपूर्ण जीवन तो जगला आणि किती समृद्ध आशीर्वाद त्याला मिळाले!
इब्री लोकांस ११:२७) मिद्यानात ४० वर्ष राहिल्यानंतर तो ईजिप्तला परतला तोपर्यंत तो वयोवृद्ध झाला होता. ईजिप्तमध्ये त्या काळी, शक्तिशाली फारोसमोर उभे राहून त्याने आपल्या भाऊबंदांच्या सुटकेची मागणी केली. (निर्गम ७:१-७) त्याने दहा पीडा, लाल समुद्र दुभंगणे आणि फारोच्या सैन्याचा नाश पाहिला होता. इस्राएल राष्ट्राला नियमशास्त्र देण्याकरता आणि नवीन राष्ट्राबरोबर करार करताना मध्यस्थ होण्याकरता यहोवाने त्याचा उपयोग केला. मोशेने ४० वर्ष इस्राएल राष्ट्राचे रानात नेतृत्त्व केले. त्याच्या जीवनात अस्सल उद्देश होता आणि यहोवाच्या सेवेतील समृद्ध व अद्भुत आशीर्वाद त्याला अनुभवायला मिळाले.
विश्वासू पुरुष मोशे याच्या उदाहरणाचाही विचार करा. आध्यात्मिक गोष्टींबद्दल कदर बाळगणे, हा त्याच्या गुणांतील एक प्रमुख गुण होता. मिसरातील ऐषारामाला त्याने लाथाडले आणि “जो अदृश्य आहे त्याला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला.” (आधुनिक दिवसांतील आशीर्वाद
वरील अहवालांवरून हे स्पष्ट झाले, की यहोवाची सेवा करणाऱ्यांचे जीवन खरोखरच अर्थपूर्ण होते. यहोवाचे लोक, आज्ञाधारकपणा, विश्वास, आध्यात्मिक गोष्टींबद्दल कदर यांसारखे गुण विकसित करतात तेव्हा त्यांना समृद्ध आशीर्वाद मिळतात.
आपल्याला कोणत्याप्रकारे आशीर्वाद मिळतात? ख्रिस्ती धर्मजगतातील कोट्यवधी लोकांची आध्यात्मिक उपासमार चालली असताना, आपण मात्र ‘परमेश्वराच्या उपयुक्त वरदानांनी’ तृप्त होऊ शकतो. (यिर्मया ३१:१२) ‘जीवनाकडे जाणाऱ्या मार्गावर’ टिकून राहण्यास आपल्याला मदत व्हावी म्हणून यहोवाने, येशू ख्रिस्त आणि ‘विश्वासू व बुद्धिमान दास’ यांच्याद्वारे विपुल प्रमाणात आध्यात्मिक अन्न पुरवले आहे. (मत्तय ७:१३, १४; मत्तय २४:४५; योहान १७:३) आपल्या ख्रिस्ती बंधूभगिनींबरोबर आपण जो सहवास करतो तोही आणखी एक समृद्ध आशीर्वाद आहे. सभा व इतर प्रसंगी प्रेम दाखवत असलेल्या व ‘नवे मनुष्यत्व’ धारण करण्याचा सतत प्रयत्न करत असलेल्या सहउपासकांच्या सान्निध्यात राहिल्याने देखील आपल्याला मोठा आनंद मिळू शकतो. (कलस्सैकर ३:८-१०; स्तोत्र १३३:१) परंतु, यहोवा देवाबरोबर व्यक्तिगत नातेसंबंध प्रस्थापित करण्याचा आणि त्याचा पुत्र, येशू ख्रिस्त याच्या पावलांवर पाऊल ठेवून त्याचे अनकुरण करण्याचा अमूल्य विशेषाधिकार हा आपल्याला मिळालेला सर्वात मोठा आशीर्वाद आहे.—रोमकर ५:१, ८; फिलिप्पैकर ३:८.
या आशीर्वादांचे मंथन केल्यावर आपल्याला याची जाणीव होईल की आपण करत असलेली देवाची सेवा खरोखरच किती मौल्यवान आहे. येशूने मोलवान मोत्यांच्या शोधात निघालेल्या व्यापाऱ्याचा जो दाखला दिला त्याची कदाचित आपल्याला या संदर्भात आठवण होईल. येशू या मनुष्याविषयी म्हणाला: ‘त्याला एक अति मोलवान मोती आढळला; मग त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि तो विकत घेतला.’ (मत्तय १३:४६) खरेच, देवाबरोबरचा आपला नातेसंबंध, त्याची सेवा करण्याची आपल्याला मिळालेली संधी, आपले ख्रिस्ती बंधूभगिनी, आपली ख्रिस्ती आशा आणि आपल्या विश्वासाशी निगडीत असलेल्या सर्व आशीर्वादांबद्दल आपल्यालाही या मनुष्याप्रमाणेच वाटत नाही का? या सर्व गोष्टींपेक्षा मौल्यवान आपल्या जीवनात दुसरे काहीच नाही.
यहोवाच्या उपकारांची परतफेड करणे
प्रत्येक उत्तम देणगीचा दाता यहोवाच आहे हे जाणल्यामुळे आपण, आपल्याला मिळालेल्या आशीर्वादांबद्दलची मत्तय २८:१९) हे करण्यासाठी यहोवाचे साक्षीदार २३० पेक्षा अधिक राष्ट्रांमध्ये सर्व लोकांना भेटी देतात. असे करत असताना, ‘सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहोचण्यास’ मदत करण्याकरता ते त्यांची मर्यादित साधने—वेळ, शक्ती, पैसा—खर्च करतात.—१ तीमथ्य २:४.
गुणग्राहकता व्यक्त करण्यास प्रवृत्त होतो. कोणकोणत्या मार्गांनी आपण हे व्यक्त करू शकतो? एक मार्ग म्हणजे इतर लोकांनीही या आशीर्वादांचा अनुभव घ्यावा म्हणून त्यांना मदत करणे. (अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील ग्लेन्डेल येथे राहणाऱ्या पायनियरांचा विचार करा. दर शनिवारी सकाळी ते सरकारी तुरुंगात जातात. तेथे जायला व यायला त्यांना जवळजवळ १०० किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. दर खेपेला ते कैद्यांना भेटतात. त्यांना जास्त वेळ मिळत नाही तरीपण ते निराश होत नाहीत. त्यांच्यापैकी एक जण म्हणतो: “या आगळ्यावेगळ्या क्षेत्रात सेवा करणे अतिशय प्रतिफलदायी आहे. आम्ही अगदी आनंदाने या क्षेत्रात सेवा करत आहोत. आम्हाला इतके आस्थेवाईक जण भेटले आहेत की सर्वांना भेटण्यासाठी आमच्याकडे वेळ राहत नाही. सध्या आम्ही पाच कैद्यांबरोबर बायबल अभ्यास करत आहोत व आणखी चौघांनी अभ्यास हवा म्हणून आम्हाला सांगितले आहे.”
आवेशी ख्रिस्ती सेवक या जीवनरक्षक कार्याची जबाबदारी विनामूल्य आणि आनंदाने स्वीकारतात. “तुम्हाला फुकट मिळाले, फुकट द्या,” असे ज्याने म्हटले त्या येशूप्रमाणेच या ख्रिश्चनांची मनोवृत्ती आहे. (मत्तय १०:८) संपूर्ण जगभरात लाखो लोक अशाचप्रकारच्या निःस्वार्थ सेवेत भाग घेत आहेत. यामुळे प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांच्या झुंडीच्या झुंडी प्रतिसाद देऊन शिष्य बनत आहेत. केवळ गेल्या पाच वर्षांतच, जवळजवळ १७ लाख लोकांनी यहोवाला आपले जीवन समर्पित केले. अधिकाधिक लोक राज्य संदेशाला प्रतिसाद देत असल्यामुळे बायबल आणि बायबल आधारित प्रकाशनांच्या उत्पादनात तसेच नवीन राज्य सभागृहांच्या आणि सभास्थानांच्या बांधकामातही वाढ होत चालली आहे. पण या सर्वासाठी पैसा कोठून येतो? पूर्णपणे स्वैच्छिक देणग्यांतून.
जगातील काही भागांत आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे पुष्कळांना आपल्या कुटुंबासाठी जीवनावश्यक गोष्टी पुरवायला देखील काबाडकष्ट करावे लागतात. न्यू सायन्टिस्ट नावाच्या एका मासिकानुसार, शंभर कोटी लोक, त्यांचा निदान ७० टक्के पगार पोट भरण्यासाठी खर्च करतात. आपले बहुतेक ख्रिस्ती बंधूभगिनी अशाच परिस्थितीत राहत आहेत. सहविश्वासूंकडून त्यांना मदत मिळाली नसती तर ते ख्रिस्ती प्रकाशने घेऊ शकले नसते किंवा त्यांच्याजवळ एखादे साधेसे राज्य सभागृहसुद्धा नसते.
याचा असा अर्थ होत नाही, की या बांधवांना, इतरांनी त्यांचा भार उचलावा अशी इच्छा आहे. त्यांना मदतीची आवश्यकता आहे हे मात्र खरे. यहोवाने दिलेल्या आशीर्वादांप्रती कृतज्ञता म्हणून भौतिक देणगी देण्यास मोशेने इस्राएली लोकांना उत्तेजन देताना म्हटले: “तुझा देव परमेश्वर ह्याने आशीर्वाद दिला असेल त्या मानाने प्रत्येकाने आपल्या ऐपतीप्रमाणे द्यावे.” (अनुवाद १६:१७) म्हणूनच, येशूने एका गरीब विधवेला मंदिराच्या दानपेटीत, कवडीमोल असलेल्या “दोन टोल्या” टाकताना पाहिले तेव्हा त्याने शिष्यांसमोर तिची प्रशंसा केली. कारण तिने जमेल तितके दिले होते. (लूक २१:२, ३) अशाचप्रकारे, गरीब ख्रिस्ती बंधूभगिनी जमेल तितके देतात. आणि जे सहख्रिस्ती आर्थिकरीत्या सुस्थितीत आहेत ते उणीव भरून काढतात.—२ करिंथकर ८:१३-१५.
अशाप्रकारे आपण देवाची परतफेड करतो तेव्हा आपली योग्य मनोवृत्ती असणे महत्त्वाचे आहे. (२ करिंथकर ८:१२) पौलाने म्हटले: “प्रत्येकाने आपआपल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे; दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये; कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो.” (२ करिंथकर ९:७) म्हणून पूर्ण मनाने देणगी देण्याद्वारे आपण, यहोवाच्या संघटनेच्या आता होणाऱ्या वाढीला हातभार लावतोच शिवाय आपल्याला स्वतःलाही यात आनंद मिळतो.—प्रेषितांची कृत्ये २०:३५.
प्रचार कार्यात भाग घेणे व ऐच्छिक देणगी देणे हे, यहोवाने आपल्याला दिलेल्या आशीर्वादांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचे दोन मार्ग आहेत. आता सध्या जे लोक यहोवाला ओळखत नाहीत अशा आणखी अनेक प्रांजळ मनाच्या लोकांना तो आशीर्वाद देऊ इच्छितो ही गोष्ट किती प्रोत्साहनदायक आहे! (२ पेत्र ३:९) तेव्हा, नम्र अंतःकरणाच्या लोकांना शोधण्यासाठी व आज्ञाधारकपणा, विश्वास आणि कृतज्ञता हे गुण विकसित करण्यास त्यांना मदत करण्यासाठी आपण आपल्या साधनांचा देवाच्या सेवेत उपयोग करीत राहू या. अशाप्रकारे “परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव” घेण्यास त्यांना मदत केल्याचा आनंद आपल्याला मिळू शकेल.—स्तोत्र ३४:८.
[२८, २९ पानांवरील चौकट]
काहीजण अशाप्रकारे अनुदान देतात जगभरात चाललेल्या कार्यासाठी
“जगभरात होणाऱ्या कामासाठी अनुदान—मत्तय २४:१४.” असे लिहिलेल्या दान पेटीत बरेच लोक ठराविक रक्कम टाकतात.
दर महिन्याला मग मंडळ्या, ही रक्कम न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या मुख्यालयाला अथवा स्थानीय शाखा दफ्तराला पाठतात. पैसे दान करण्याची इच्छा असल्यास तुम्ही ते सरळ पुढील पत्त्यावर देखील पाठवू शकता: The Watch Tower Bible and Tract Society of India, G-३७, South Avenue, Santacruz, Mumbai ४०० ०५४, किंवा तुमच्या देशातील शाखा दफ्तराच्या पत्त्यावर पाठवू शकता. याशिवाय, दागदागिने किंवा इतर किंमती वस्तूसुद्धा दान केल्या जाऊ शकतात. पण, विशिष्ट वस्तू देणगी म्हणून दिल्या जात आहेत असा उल्लेख केलेले एक संक्षिप्त पत्रही त्यासोबत असणे आवश्यक आहे.
धर्मादाय योजना
थेट पैशाची देणगी आणि पैशांची सशर्त देणगी यांव्यतिरिक्त जगभरातील राज्य सेवेच्या लाभाकरता देणगी देण्याचे इतरही मार्ग आहेत. ते असे:
विमा: वॉच टावर सोसायटीला जीवन विमा पॉलिसीचे किंवा रिटायर्मेन्ट/पेन्शन योजनेचे हिताधिकारी बनवले जाऊ शकते.
बँक खाते: बँक खाते, जमा प्रमाण-पत्र किंवा तुमचे रिटायर्मेन्ट खाते बँकेच्या नियमांनुसार वॉच टावर सोसायटीला ट्रस्ट म्हणून तुम्ही देऊ शकता किंवा मग मृत्यूनंतर ते संस्थेला मिळेल अशी व्यवस्था करू शकता.
स्टॉक्स आणि बाँड्स: स्टॉक्स आणि बाँड्स देखील वॉच टावर सोसायटीला थेट दान केले जाऊ शकतात.
जमीन-जुमला: विकाऊ जमीन-जुमला थेट वॉच टावर सोसायटीला भेटीच्या स्वरूपात दिला जाऊ शकतो; किंवा तो संस्थेच्या नावावर करून जिवंत आहात तोपर्यंत त्याचा वापर केला जाऊ शकतो. आपला जमीन-जुमला संस्थेच्या नावावर करण्याआधी तुमच्या देशातील शाखा दफ्तराशी संपर्क साधा.
इच्छा-पत्र आणि ट्रस्ट: इच्छा-पत्रामार्फत तुम्ही तुमची संपत्ती किंवा पैसा कायद्याने वॉच टावर सोसायटीच्या नावावर करू शकता किंवा वॉच टावर संस्थेला ट्रस्ट ॲग्रीमेंटचे हिताधिकारी बनवून आपले इच्छा-पत्र तयार करू शकता.
संस्थेला हिताधिकारी असे संबोधून इच्छा-पत्र तयार करताना, कृपया भारतीय उत्तराधिकार अधिनियम, १९२५ याच्या ११८ कलमाची नोंद घ्या. तिथे असे म्हटले आहे: “ज्या कोणा व्यक्तीला, भाचा किंवा भाची किंवा कोणीही जवळचे नातेवाईक आहेत इच्छा-पत्र तयार न करता आपली संपत्ती किंवा पैसा कोणत्याही धार्मिक अथवा धर्मदाय संस्थेला देण्याचा अधिकार नाही. पण, हे इच्छा-पत्र त्या व्यक्तीच्या मृत्यूच्या एका वर्षांआधी तयार केले पाहिजे आणि सहा महिन्यांच्या आत जिवंत व्यर्क्तिच्या इच्छा-पत्रांच्या सुरक्षित ताब्यासाठी (सेफ कस्टडीसाठी) कायद्याने सांगितलेल्या ठिकाणी ते दिले पाहिजे.”
तुमच्या इच्छा-पत्रात तुम्ही संस्थेला हिताधिकारी बनवू इच्छित असाल तर, इच्छा-पत्रात लिहिण्यासाठी कृपया संस्थेच्या संपूर्ण नावाची आणि पत्त्याची नोंद घ्या:
The Watch Tower Bible and Tract Society of India
G-३७, South Avenue,
Santa Cruz,
Mumbai-४०० ०५४.